Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनMaharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटाला, जाणून घ्या कधी आणि...

Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटाला, जाणून घ्या कधी आणि कुठे?

Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटाला, जाणून घ्या कधी आणि कुठे?

[ad_1]

कॉमेडीचा बाज, अचूक टायमिंग आणि वन टेकमध्ये विनोदवीरांनी साकारलेल्या हास्याच्या या जादूला प्रेक्षकांनी यापूर्वीच डोक्यावर घेतले आहे. यातील फिल्टर पाड्याचा बच्चन असो किंवा कोळी वाड्याची रेखा, लॉली असो किंवा शंकऱ्या-शितलीची लव्ह स्टोरी. यातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत. अभिनेता गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले , दत्तू मोरे, अभिनेत्री वनिता खरात, नम्रता संभेराव आदी कलाकारांना या हास्यजत्रेने एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. याचे सगळे श्रेय जाते ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक, दिग्दर्शक, निर्माते असलेल्या सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांना. त्यांच्या बहारदार लेखणीतून उतरलेले विनोद आणि मार्मिक भाष्य यांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. दर दिवशी नव्या जोमाने केलेले भन्नाट विनोदी स्कीट, सद्यस्थितीवर केलेले तिरकस भाष्य आणि परीक्षकांपासून निर्मात्यांपर्यंत सर्वांवर केलेले विनोद हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे खुमासदार सूत्रसंचालन, अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांचे परीक्षण या सर्व गोष्टी प्रेक्षकांना भावणाऱ्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments