Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2849

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसाच्या खाजगी दौर्‍यावर दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) गावी आले आहेत. बुधवारी रात्री ते कारमधून सातारा दौर्‍यावर येणार होते. मात्र उशीर झाल्याने त्यांनी बुधवारी रात्री येणे टाळले. त्यानंतर गुरुवारी सकाळी हेलिकॉप्टरमधून येत असताना खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर भरकटले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुन्हा मुंबईला माघारी जावे लागले. तेथून पुन्हा हेलिकॉप्टरने सातार्‍यात उतरून कारमधून ते गावी रवाना झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवसाच्या सातारा जिल्हा दौर्‍यावर येणार होते. त्यांचे कुटुंबीय बुधवारीच त्यांच्या दरे तर्फ तांब या मूळ गावी पोहोचले आहे. बुधवारी दिवसभरातील आपल्या बैठका व कार्यक्रम संपवून रात्री 10 वाजता ते वाहनाने बाय रोड दरे तर्फ तांब येथे येणार होते. रात्री उशिर झाल्याने त्यांनी गावी येण्याचा निर्णय बदलत गुरुवारी सकाळी वाहनाने निघण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बैठका व कार्यक्रमामुळे त्यांनी हेलिकॉप्टरने जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी हेलिकॉप्टरने मुंबईमधून दर्‍याकडे ते निघाले. मात्र खराब हवामानामुळे त्यांना पुन्हा मुंबईला माघारी फिरावे लागले. दरे या ठिकाणी खराब वातावरण होते. तसेच अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे त्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार सातार्‍यात किंवा कराड येथे हेलिकॉप्टरने उतरण्याचा निर्णय घेतला. सातार्‍यातील सैनिक स्कूल मैदानावरील हेलिपॅडवर सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर उतरले.

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा शासकीय विश्रामगृहाकडे मार्गस्थ झाला. याठिकाणीही प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर विश्रामगृहावर त्यांनी जिल्हातील अधिकार्‍यांशी व नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांचा ताफा सातारा शहरातून यवतेश्वर, कास मार्गे बामणोलीकडे रवाना झाला. बामणोलीतून तराफ्यातून दरे या गावी सायंकाळी उशिरा पोहोचले.

जिल्हा प्रशासनाचा कस…

मुख्यमंत्री जिल्हा दौर्‍यावर येणार हे समजताच बुधवारी रात्रीपासून महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य व अन्य विभागाच्या अधिकार्‍यांची तारांबळ उडाली. काही अधिकारी बुधवारी सायंकाळीच दरे येथे मुक्कामी पोहचले होते. तर विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी गुरुवारी सकाळीच खंडाळा येथे त्यानंतर दरे तर्फ तांब येथे गेले होते. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा बदलल्याने त्यांना पुन्हा सातार्‍यात यावे लागले. मुख्यमंत्री आल्यावर पुन्हा त्यांच्याबरोबर दर्‍याकडे जावे लागले. त्यामुळे सर्व अधिकार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली.











Source link

सातारा : स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास धोका; पुतळ्याखालील बुकिंग रूमचा स्लॅब पाझरतोय | पुढारी

0









प्रतिभा राजे

कराड :  नूतनीकरणानंतरही अनेक समस्यांनी ग्रस्त असणार्‍या स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल)मध्ये असणार्‍या बुकिंग रूममध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपासून गळती लागली आहे. पावसाळ्यात या रूममध्ये तळे साचत असून बुकिंग रूमच्या स्लॅबमधून पाणी पाझरत असते. त्यामुळे या स्लॅबचे लोखंडी पिलर गंजत चालले असून, या स्लॅबवर असणारा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला धोका निर्माण झाला आहे. कराडचे वैभव असणार्‍या टाऊन हॉलकडे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने रंगकर्मी तसेच नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टाऊन हॉलमध्ये वर्षभरात विविध कार्यक्रम होत असतात. अनेक नाटके, विविध कार्यक्रम होणार्‍या या टाऊन हॉलला समस्यांनी ग्रासले आहे. मुळातच याठिकाणी अनेक सुविधांची वानवा आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा ज्या इमारतीवर उभारण्यात आला आहे. त्या बुकिंग रूमची अवस्था दयनीय आहे. सुमारे 30 फूट असणार्‍या या रूममध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वीपासून पावसाळ्यात गळती लागलेली आहे. या रूमच्या वर टाऊन हॉलमध्ये जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍यांच्या मधोमध स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा आहे. या पुतळ्याचा बराचसा भाग या बुकिंग रूमच्या स्लॅबवर आहे. बुकिंग रूममध्ये गेल्यावरच जुन्या हवेलीमध्ये प्रवेश केल्यासारखे वाटते. स्लॅबच्या गळतीमुळे भिंतींचा रंग तर उडालाच आहे. परंतु या भिंतीवरचे सिमेंटही खराब झाले आहे. रूममध्ये असणार्‍या लाईटच्या पाईप्स तुटलेल्या आहेत. लोखंडी पिलर तर अक्षरश: गंजून काही ठिकाणी फुटलेले आहेत. बुकिंग रूममधील कपाटाची अवस्था अत्यंत घाणेरडी झालेली आहे. जुन्या काळातील हे कपाट बदलून नवीन कपाट देणे पालिकेला शक्य झालेले नाही. टेबलला बँडेज केले आहेत, तर खुर्ची निकामी झालेली आहे. बुकिंग रूमच्या बाहेरच्या भिंतीलाही तडे गेलेले आहेत. दरवाजा मोडकळीत आलेला आहे. बाहेरून अत्यंत देखण्या दिसणार्‍या टाऊन हॉलच्या इमारतीमधील या बुकिंग रूमची अवस्था पाहिल्यावर पालिकेच्या कारभाराबाबत शंका उपस्थित होत आहे.

याबरोबरच टाऊन हॉलमध्ये अनेक असुविधा असून मेकअप रूममध्ये पाणी साचून राहते. बुकिंग रूम पुढच्या बाजूस असणे गरजेचे होते. मात्र आतील बाजूस असल्याने बुकिंगसाठी येणार्‍या लोकांना बुकिंगची रूम शोधावी लागते. हॉलमधील कॅन्टीनचीही तीच अवस्था आहे. कॅन्टीन शेजारीच स्वच्छतागृह असल्याने स्वच्छतागृहाची दुर्गंधी कॅन्टीनमध्ये येत असते.

30 फुटांपैकी 5 फूट सुस्थितीत

बुकिंग रूममधील 30 फुटांपैकी केवळ 5 फूट जागा बर्‍या अवस्थेत आहे. 25 फूट जागेत पावसाळ्यात बसणे म्हणजे शॉवरखाली बसण्यासारखी अवस्था असते. केवळ 5 फुटांची जागा शिल्लक आहे. त्या जागेवर बसून कर्मचारी कसेबसे जेवण करतात. रंगकर्मी, कर्मचार्‍यांनी अनेकदा पालिकेकडे या बुकिंगरूमच्या अवस्थेबाबत माहिती देऊन गळती काढण्याबाबतची मागणी केली आहे. तत्कालिन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दुरुस्ती केली होती. मात्र ती दुरुस्तीही तात्पुरती झाली होती. त्यानंतरही अनेकदा पालिकेला कळवूनही याकडे दुर्लक्ष केले आहे.

पायर्‍यांना गेलेत तडे

बुकिंग रूमच्यावरूनच टाऊन हॉलमध्ये जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या पायर्‍यांना खालच्या बाजूने तडे गेलेले आहेत. ज्या सिमेंटच्या खांबावर या पायर्‍या उभ्या केल्या आहेत, त्या खांबालाही चिरा पडलेल्या आहेत.











Source link

OMG 2 Review: सेक्स एज्युकेशनवर प्रकाश टाकणारा सिनेमा, पंकज-यामीने जिंकली मने

0
OMG 2 Review: सेक्स एज्युकेशनवर प्रकाश टाकणारा सिनेमा, पंकज-यामीने जिंकली मने


OMG 2 Movie Review: अक्षय कुमार, यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ओएमजी २ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा नेमकी काय आहे जाणून घेऊया…



Source link

Baipan Bhari Deva: पुरुषांनीही पहावा असा हा सिनेमा; ‘बाईपण भारी देवा’ची राज ठाकरेंना भूरळ

0
Baipan Bhari Deva: पुरुषांनीही पहावा असा हा सिनेमा; ‘बाईपण भारी देवा’ची राज ठाकरेंना भूरळ



Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाविषयी भाष्य केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले आहे.



Source link

Jailer: पहिल्याच दिवशी रजनीकांतच्या चित्रपटाने केला रेकॉर्ड, कमावले इतके कोटी

0
Jailer: पहिल्याच दिवशी रजनीकांतच्या चित्रपटाने केला रेकॉर्ड, कमावले इतके कोटी



Rajinikanth Jailer Movie:दक्षिणेकडे रजनीकांतला देवाचा दर्जा दिला जातो. त्यामुळे पहिल्या दिवसापासून त्याच्या चित्रपटाला तुफान गर्दी होते.



Source link

Nashik News: नाशिक हादरले ! अंबड रोडवर भर रस्त्यात दोन तरुणांची हत्या, परिसरात तणाव

0
Nashik News: नाशिक हादरले ! अंबड रोडवर भर रस्त्यात दोन तरुणांची हत्या, परिसरात तणाव


दरम्यान, मृतांच्या नातेवाइकांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत दोघांचेही मृतदेह थेट रुग्णवाहिकेतून पोलीस आयुक्त कार्यालयात घेऊन गेले. यावेळी तणावाचे वातावरण होते. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातल्यावर तणाव निवळला. दरम्यान, अंबड रोड परिसरात पोलिसांची शीघ्र कृती दलाचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



Source link

KHC: छत्रपती शिवराजी महाराजांविषयी विचारण्यात आलेल्या या सोप्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही शिक्षिका

0
KHC: छत्रपती शिवराजी महाराजांविषयी विचारण्यात आलेल्या या सोप्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही शिक्षिका


सन १६५६मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता. या किल्ल्यावरच त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, समाधी सोहळा अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी या किल्ल्यावर झाल्या आहेत.



Source link

शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक असले, तरी राज्य सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. शेतकरी हिताचे अनेक ऐतिहासिक निर्णय पूर्वी घेतले असून पुढेही सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी राहील. सातारा जिल्ह्यात पर्यटनाला खूप वाव आहे. त्याद़ृष्टीने पर्यटनाचे अनेक पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसांचा खासगी दौरा असून ते दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे मुक्कामी आहेत. गावी जाण्यासाठी मुख्यमंत्री गुरुवारी सायंकाळी मुंबईहून सातार्‍यात दाखल झाले. विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांसोबत चर्चा केली.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाबाबत मी स्वत: बैठक घेतली होती. या कामामध्ये  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही स्वत: लक्ष घालत आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही लक्ष असून त्यांनी या कामाची पहाणी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी एक लेन सुरू करण्यात येणार आहे.

महाबळेश्वर येथे झालेल्या बैठकीत महाबळेश्वर, पाचगणी आणि कास याबद्दल ठोस भूमिका घेत सुचना केल्या होत्या. त्याच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांसोबत चर्चा झाली. जिल्ह्यातील तरुणांना नोकरीसाठी मुंबई व इतर शहरांमध्ये जावे लागत आहे. जिल्ह्यात पर्यटन व इतर क्षेत्रांसाठी वाव आहे. त्याचाच भाग कोयना बॅकवॉटरवर पूल करण्यात येत आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून आणखी दोन पुलांना मंजुरी दिली आहे. क्लस्टर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचा समावेश करण्याच्या सुचना दिल्या आहेत. मुनावळे येथे स्कूबा डायव्हिंग करण्यात येणार आहे. सिक्युरिटी अ‍ॅक्टचा मुद्दा काढून हे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

महाबळेश्वरमध्ये पर्यटनाला खूप वाव असून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. महाबळेश्वरातील रस्ते, पार्किंगच्या समस्या सोडवण्यात येणार आहे. मिनी काश्मिर म्हणून ओळखल्या जाणार्‍या तापोळा भागाचा विकास करण्यात येणार आहे. बामणोली, वासोटा भागात पर्यटनाच्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सातारा आणि कोकण कनेक्टीव्हिटी व्हावी यासाठीच कोयना बॅक वॉटरवर पुलाचे काम सुरू केले आहे. सातारामार्गे कोकणातून सरळ पश्चिम महाराष्ट्रात दळणवळण वाढावे यासाठी कनेक्टीव्हिटी करण्याचे काम केले जाणार आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती असून टँकरची मागणी असल्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, पावसाचे प्रमाण कमी-जास्त आहे. बर्‍यापैकी पेरण्या झाल्या आहेत. सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही. शेतकर्‍यांच्या पाठिशी राहणारे सरकार आहे. त्यामुळेच निकषात बसवून सर्वांधित नुकसान भरपाई सरकारने दिली आहे. पावसाने सतत होणार्‍या नुकसानीसाठी 1 हजार 500 कोटींचे वाटप करण्यात आले आहे.



Source link

Suniel Shetty: गर्लफ्रेंडमुळे सलमान खानला मागावी लागली होती सुनील शेट्टीची माफी

0
Suniel Shetty: गर्लफ्रेंडमुळे सलमान खानला मागावी लागली होती सुनील शेट्टीची माफी



Suniel Shetty Birthday: आज ११ ऑगस्ट रोजी सुनील शेट्टीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…



Source link

स्वातंत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर.

0
स्वातंत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार, वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर.


15 August flag hoisting : मंगळवारी म्हणजे 15 ऑगस्टला आपल्या देशाचा 76 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) मोठ्या उत्साहात देसाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. दरम्यान, या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) झेंडावंदन करतात. पण पालकमंत्र्यांची यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण झेंडावंदन करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, यावर राज्य सरकारनं मार्ग काढला असून, कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. 

राज्य सरकारनं पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ज्या जिल्ह्यांची नावे नाहीत तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे. पाहुयात कोणत्या जिल्ह्यात कोण करणार ध्वजारोहण…

कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्यात करणार ध्वजारोहण

देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे – पालघर

या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार

जिल्हाधिकारी रायगड –  रायगड
जिल्हाधिकारी हिंगोली –  हिंगोली 
जिल्हाधिकारी वर्धा –        वर्धा
जिल्हाधिकारी गोंदिया –   गोंदिया 
जिल्हाधिकारी भंडारा –    भंडारा   
जिल्हाधिकारी अकोला –   अकोला 
जिल्हाधिकारी नांदेड –       नांदेड 

इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून आपला देश 15 ऑगस्ट 1947  रोजी स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला दीर्घ काळ संघर्ष करावा लागला. यासाठी अनेकांनी लढा दिला, अनेकांनी सरकारच्या अत्याचारांना तोंड दिले, अनेकांना दुखापतग्रस्त झाले, अनेक जण शहीद झाले, अनेकांनी हसतमुखाने फाशीवर गेले आणि मृत्यूला मिठी मारली,.तर अनेकांनी या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य, आपली संपूर्ण तारुण्य घालवले. भारतमातेच्या या सच्च्या सुपुत्रांच्या त्याग आणि बलिदानामुळेच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Gondia News : प्रजासत्ताक दिनी लग्नमंडपात पोहोचण्याआधी दोन भावंडांकडून ध्वजारोहण



Source link