Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2842

Kalwa Thane News : ठाण्यातील रुग्णालयात मृत्यूचं तांडव; एका रात्रीत तब्बल १७ रुग्ण दगावले

0
Kalwa Thane News : ठाण्यातील रुग्णालयात मृत्यूचं तांडव; एका रात्रीत तब्बल १७ रुग्ण दगावले


दोन दिवसांपूर्वी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी उपचाराअभावी मृत्यू झाल्याचं सांगत रुग्णांच्या नातेवाईकांनी जोरदार आंदोलन केलं होतं. या घटनेवर स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील संताप व्यक्त केला होता. परंतु आता या घटनेच्या दोनच दिवसांनंतर आणखी १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृत पावलेल्या १३ रुग्णांवर अतिदक्षता विभागात तर चार रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे वृद्ध होते, त्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे.



Source link

Sridevi Google Doodle: गुगलने खास अंदाजात दिला श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा! आजचं डूडल पाहिलं का?

0
Sridevi Google Doodle: गुगलने खास अंदाजात दिला श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा! आजचं डूडल पाहिलं का?


श्रीदेवीने आपल्या अभिनयाचा महिमा भारतातच नाही, तर जगभर गाजवला. आज ती या जगात नसली तरी चाहत्यांच्या हृदयात ती कायम जिवंत राहील. बॉलिवूडच्या ‘चांदनी’च्या जयंतीनिमित्ताने गुगलने खास डूडलद्वारे तिला श्रद्धांजली वाहिली आहे. गुगलने आपल्या होमपेजवर खास डूडल बनवून श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.



Source link

Gadar 2: ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर डंका! दुसऱ्याच दिवशी पोहोचला १०० कोटींच्या जवळ! पाहा कलेक्शन…

0
Gadar 2: ‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर डंका! दुसऱ्याच दिवशी पोहोचला १०० कोटींच्या जवळ! पाहा कलेक्शन…


मोठ्या वीकेंडमुळे या आठवड्यात चार मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये रजनीकांतचा ‘जेलर’, अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’, चिरंजीवीचा ‘भोला शंकर’ आणि सनी देओलचा ‘गदर २’ यांचा समावेश आहे. चार बड्या सुपरस्टारच्या चित्रपटांपैकी ‘गदर २’ने असा डंका वाजवला आहे की, सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या चित्रपटाची पहिल्या दिवसाच्या आगाऊ बुकिंगसाठी तब्बल तीन लाख तिकिटे विकली गेली होती. ‘गदर २’ने पहिल्या दिवशी ४० कोटी आणि दुसऱ्या दिवशी ४३ कोटी कमावले. ८३ कोटींच्या कमाईसह सनी देओलचा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून आता काहीच पावले दूर आहे. रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन मिळवून हा चित्रपट १०० कोटींच्या पुढे जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.



Source link

ठाकरे कुटुंबातील चौघांपैकी एकजण आठ दिवसांत जेलमध्ये जाणार; शिंदे गटाच्या नेत्याची भविष्यवाणी

0
ठाकरे कुटुंबातील चौघांपैकी एकजण आठ दिवसांत जेलमध्ये जाणार; शिंदे गटाच्या नेत्याची भविष्यवाणी


औरंगाबाद: मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Center Scam) ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. बॉडी बॅग (Body Bag) खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. दरम्यान, आता याच प्रकरणात ठाकरे कुटुंबातील चौघांपैकी एकजण जेलमध्ये जाणार असल्याची भविष्यवाणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई पुढील आठ दिवसांत होणार असल्याचं देखील शिरसाट म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

मागील काही दिवसांपासून मुंबईतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. यावरुन सत्ताधारी पक्ष ठाकरे गटावर आरोप करताना देखील पाहायला मिळत आहे. अशातच संजय शिरसाट यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार आणि मुंबईतील रस्ते घोटाळ्यात ठाकरे कुटुंबातील चौघांपैकी एकजण जेलमध्ये जाणार आहे. ईडीकडून पुढील आठ दिवसात ही कारवाई होऊ शकते, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

650 ची बॉडी बॅग साडेसात हजारात घेतली…

दरम्यान याचवेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, कोविड सेंटर घोटाळ्यात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा प्रकार हा फक्त छोटासा भाग आहे. यात अनेक असे प्रकरण असून, त्यात मागे चौकशी देखील झाली. यात जे 16 ते 17 कंत्राटदार आहेत त्यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आला आहे. मग ते कंत्राटदार कोणाचे होते, त्यांना कोणी विना टेंडर कंत्राट टेंडर दिले. साडेसहा शे रुपयांची बॉडी बॅग तब्बल साडेसात हजारात विकत घेण्यात आली. त्यामुळे, या प्रकरणात ईडीने चौकशी सुरु केली आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं आली आहे. पण, यावर पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीने अधिकृतरीत्या यावर प्रतिकिया दिली नाही. तसेच हे चुकीचं असल्याचं देखील कोणी म्हटले नसल्याचं, शिरसाट म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तास काम करतात, हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे 15 ऑगस्टनंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून ते पुण्याच्या कार्यक्रमात गेले नाहीत. त्यांची काळजी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे काहीही असलं तरीही तुम्ही दोन किंवा तीन दिवस हॉस्पिटलमध्ये जा अशी त्यांना विनंती करणार असल्याचे शिरसाट म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Kishori Pednekar : मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल



Source link

Kokan Railway News : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवाला कोकणात रेल्वेच्या २२ विशेष फेऱ्या, पाहा वेळापत्रक

0
Kokan Railway News : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवाला कोकणात रेल्वेच्या २२ विशेष फेऱ्या, पाहा वेळापत्रक


भारतीय रेल्वेने उधना ते मडगाव, अहमदाबाद ते कुडाळ आणि उधना ते मंगळुरू या रेल्वेंच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच कोकण रेल्वे मार्गावर दोनशेहून अधिक फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता अधिकच्या २२ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. वसईमार्गे जाणाऱ्या उधना ते मडगाव या रेल्वेच्या १० फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. उधना-मंगळुरू या रेल्वेच्या सहा फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. ही रेल्वे वसई रोड स्थानकातून जाणार आहे. याशिवाय अहमदाबाद-कुडाळ या रेल्वेच्या सहा अधिकच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. या तिन्ही रेल्वे १३ ते २७ सप्टेंबरदरम्यान दर बुधवारी आणि गुरुवारी धावणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.



Source link

Chandramukhi 2: कंगनाचा सुंदर क्लासिकल अवतार; ‘चंद्रमुखी २’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

0
Chandramukhi 2: कंगनाचा सुंदर क्लासिकल अवतार; ‘चंद्रमुखी २’चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!


‘स्वागतांजली’ या गाण्याची सुरुवात सुंदर संगीताने होते. त्यानंतर कंगना रनौतच्या चेहऱ्यावर एक तेजस्वी हास्य असलेली झलक दिसते. ‘स्वागतांजली’ या गाण्यात कंगना रनौत पारंपारिक पांढऱ्या साडीत पायऱ्या उतरताना दिसत आहे. मग, संगीत आणि गीत यांच्या अप्रतिम सोबतीने अभिनेत्रीच्या डोळ्यातली चमक अतिशय सुंदर भासत जाते. कंगना रनौतचे शास्त्रीय नृत्य आणि भावभावनांमुळे ‘स्वागतांजली’ हे गाणे आणखी सुंदर होत आहे.



Source link

Dhule Fire News : धुळ्यातील प्रबोधनकार ठाकरे संकुलात भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

0
Dhule Fire News : धुळ्यातील प्रबोधनकार ठाकरे संकुलात भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल


मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील जुन्या महापालिकेच्या इमारतीशेजारी असलेल्या प्रबोधनकार ठाकरे संकुलात शनिवारी रात्री उशीरा आग लागली. संकुलातील प्रियांका स्पोर्ट्स या दुकानातून धुराचे लोट निघत असल्याचं समजातच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेच्या काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. या घटनेत कुणालाही गंभीर इजा झालेली नसून प्रियांका स्पोर्ट्स या दुकानातील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं आहे.



Source link

Jawan: शाहरुख खान अन् नयनताराचा सिझलिंग रोमान्स; ‘जवान’चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

0
Jawan: शाहरुख खान अन् नयनताराचा सिझलिंग रोमान्स; ‘जवान’चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार!


‘जवान’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटली यांनी केले आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट हिंदी, तेलुगु आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये शाहरुख खानची व्यक्तिरेखाही खूप वेगळी दिसत आहे. शाहरुख आणि नयनतारा व्यतिरिक्त या चित्रपटात विजय सेतुपती, योगी बाबू, सान्या मल्होत्रा आणि प्रियामणी यांचाही समावेश आहे.



Source link

Sridevi Birth Anniversary: बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

0
Sridevi Birth Anniversary: बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी! अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?


श्रीदेवीने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून आपली मनोरंजन विश्वातील कारकीर्द सुरू केली होती. श्रीदेवीने ‘थुनईवन’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. श्रीदेवीने बॉलिवूडमध्येही इतके सुपरहिट चित्रपट दिले की, तिला हिंदी चित्रपटांची पहिली ‘फिमेल सुपरस्टार’ देखील म्हटले गेले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत श्रीदेवीने तब्बल ३०० चित्रपटांमध्ये काम केले होते.



Source link

नेटस्ट्रीम: स्थलांतरित कामगारांचे अस्वस्थ करणारे वास्तव

0
नेटस्ट्रीम: स्थलांतरित कामगारांचे अस्वस्थ करणारे वास्तव


समीर गायकवाड2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘द बॉक्स’मधील एक दृश्य.

व्हेनेझुएलातील विख्यात पटकथा लेखक आणि दिग्दर्शक लॉरेन्झो विगास यांचा Mubi प्लॅटफॉर्मवर आलेला ‘द बॉक्स’ (ला काजा) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. एक किशोरवयीन मुलगा मेक्सिको सिटीमधून उत्तर मेक्सिकोतील एका सामूहिक कबरीत दफन केल्या गेलेल्या आपल्या वडिलांचे उर्वरित अवशेष मिळवण्यासाठी प्रवास करतो. पण. नशिबाने तिथे भलतेच घडते. त्याच्या वडिलांसारखा दिसणारा माणूस त्याला भेटतो आणि काही काळ भांबावून गेल्यावर तो त्याच्यामागे जाण्याचा निर्णय घेतो… या सिनेमाची स्टोरी लाइन अशी काहीशी गोंधळात टाकणारी आणि त्याचवेळी अस्वस्थ करणारीही आहे.

सिनेमाची सुरूवात मेक्सिको सिटीतील हॅट्झिन (नवोदित अभिनेता – हॅट्झिन नॅवरेटे) या हटके स्वभावाच्या किशोरवयीन मुलापासून होते, जो आपल्या वडिलांचे – एस्टेबान एस्पिनोझा लेव्हा यांचे अवशेष गोळा करण्यासाठी बसने उत्तर मेक्सिकोला निघालेला असतो. हॅट्झिनने वडील हयात असताना त्यांच्यासोबत फारसा वेळ घालवलेला नसतो. मात्र, आपले वडील एक स्थलांतरित कामगार होते आणि त्यांचा मृत्यू एका औद्योगिक अपघातात झाला, हे त्याला ठाऊक असते. अगदी धीरोदात्तपणे तो आपल्या वाट्याला आलेलं दु:ख आणि वडिलांच्या अकाली जाण्याने झालेली हानी यांचा सामना करतो. सिनेमातील अनेक फ्रेम्समध्ये त्याच्या खोल उदास डोळ्यात तरळलेलं पाणी सहज दिसतं! सामुदायिक कबरीपाशी आल्यानंतर संबंधित महिला अधिकारी त्याची कागदपत्रे तपासते आणि अत्यंत अनौपचारिकपणे त्याच्या हाती एक पत्र्याचा बॉक्स देते. त्या बॉक्समध्ये त्याच्या वडिलांच्या वस्तू आहेत, असे त्याला सांगितले जाते. अत्यंत आत्मीयतेने हा बॉक्स घेऊन जड पावलांनी तो तेथून निघून येतो. दरम्यान आपल्या आजीला तो फोनवरती त्याविषयीची माहिती देतो. तिलाही ते एेकून समाधान वाटते. मात्र, नियतीला हे मान्य नसते. घराकडे परतत असताना अचानक त्याला फूटपाथवर एक माणूस दिसतो, जो हुबेहूब त्याच्या दिवंगत वडिलांसारखा दिसत असतो. त्याला पाहताच हॅट्झिन आधी भ्रमित होतो, त्याचा विश्वासच बसत नाही. मात्र, काही वेळातच भानावर येऊन तो बसमधून उतरतो. त्या माणसाच्या मागेमागे जातो. हॅट्झिन त्याच्याशी संवादही साधतो. मात्र, तो माणूस आपली वेगळीच ओळख सांगतो, तो स्वतःचे नाव मारिओ एन्डरले (हर्नान मेंडोझा) असे सांगतो. त्यानंतर हॅट्झिन सातत्याने त्याचा पिच्छा पुरवतो. तरीही तो माणूस, ‘मी तुझा बाप नाहीय!’ हेच त्याला सांगतो. हॅट्झिनचा मात्र काही केल्या त्यावर विश्वास बसत नाही. त्या माणसाने विरोध करूनही त्याचा आपल्या वडिलांशी काही संबंध आहे का, याची तो चाचपणी करत राहतो. त्याच्या जिद्दीपुढे अखेरीस नमते घेत मारिओ त्याला आपल्या पंखाखाली घेतो! मारिओप्रमाणेच हॅट्झिनही प्रतिकूल परिस्थितीत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या स्थानिक युनिट्समध्ये स्थलांतरित कामगारांचे ट्रक उतरवण्यात गुंततो. मारियो, त्याची गरोदर पत्नी आणि त्याच्या मुलासोबत तो मारिओच्याच घरात राहू लागतो. ‘चिनी लोकच आपले खरे शत्रू आहेत!’ असे तिथे काम करणाऱ्या लोकांना सातत्याने सांगितले जाते. वास्तवात हे वसाहतवादी भांडवलशाहीवरचे भाष्य आहे. ज्यांची तोंडओळख देखील नाही, अशा लोकांना भीती बसावी म्हणून या वल्गना केल्या जातात. काम जाण्याच्या भीतीने कामगार अधिक वेगाने कार्यरत राहावेत, यासाठीचा हा फंडा! आपण दारिद्र्यात ढकलले जाऊ नये, म्हणून मेक्सिकन आणि लॅटिन अमेरिकन लोकांमध्ये जाणीवपूर्वक स्पर्धा निर्माण केली जाते. तिथे काम करताना विचारी मनाच्या हॅट्झिनला यामागचं तथ्य उमगतं. कपड्याच्या कारखान्यांतील स्थलांतरित कामगारांचे शोषण आणि त्यांना घातली जाणारी भीती यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्याचा तो प्रयत्न करतो. तिथे गायब झालेल्या एका तरुण मुलीचा तो शोध घेतो. तिथलं शोषण जाणून घेतो. अधूनमधून तिथे उठणाऱ्या विद्रोही आवाजांची धीरगंभीर शांतता त्याला चकित करते. तो त्यांना मदत करू शकत नाही, मात्र आपल्या वडिलांच्या मृत्यूशी या घटना ताडून पाहतो. व्हेनेझुएलाने हा सिनेमा ‘ऑस्कर’साठी पाठवला होता. ‘द बॉक्स’ मेक्सिकोतील स्थलांतरित कामगारांच्या दुरवस्थेवर लक्ष वेधून घेतो. क्राइम थ्रिलर जॉनरमध्ये हा सिनेमा येतो. ‘वापरा आणि टाकून द्या’ या तत्त्वावर मानवी आयुष्ये पणाला लावली जातात, तेव्हा कोणती जीवनमूल्ये मागे उरतात, याचा शोध यात घेतला आहे. नवोदित हॅट्झिनने या थ्रिलर क्राइम ड्रामामध्ये बाजी मारली आहे. संपूर्ण सिनेमात साधे स्मितहास्यही न करता त्याने आपल्या अभिनयातून भूमिकेत जीव ओतला आहे. त्याच्या भूमिकेतील संयम आणि विचारातील लवचिकता मारिओच्या व्यक्तिरेखेला पूरक आहे, जो स्वतःचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एका घाणेरड्या व्यवसायाचे नेतृत्व करत असतो. सतत उफाळून येणारी संशयास्पद मानसिकता नि त्याच वेळेस दिसणारे आशेचे किरण यात दोलायमान जीवन जगणाऱ्या जगभरातील स्थलांतरित कामगारांची दुर्दशा आणि हे कामगार हरवल्यानंतर त्यांच्या मुलांवर होणारा त्याचा दु:खद परिणाम ‘द बॉक्स’मध्ये दिसतो. जगभरातील स्थलांतरितांचा प्रश्न गंभीर बनलेला असताना हा सिनेमा रिलीज झालाय, हे विशेष!

संपर्क : 9766833283 sameerbapu@gmail.com



Source link