Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2838

Independence Day: कवी प्रदीप यांना समुद्र किनाऱ्यावर फिरताना सुचलेल्या ओळी! ‘ए मेरे वतन के लोगो’चा किस्सा ऐकलात?

0
Independence Day: कवी प्रदीप यांना समुद्र किनाऱ्यावर फिरताना सुचलेल्या ओळी! ‘ए मेरे वतन के लोगो’चा किस्सा ऐकलात?


कवी प्रदीप यांना जेव्हा हे देशभक्तीपर गाणे लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा ते याबाबत खूपच गंभीर होते. काय लिहावे यावर त्यांनी खूप विचार केला. एके दिवशी ते समुद्रकिनारी फेर फटका मारत असताना, उधाणलेल्या समुद्राच्या लाटा पाहत होते. तेवढ्यात त्यांच्या मनात काही ओळी आल्या. आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्या ओळी कागदावर उतरवण्याचा विचार केला. मात्र, नेमका त्यावेळी त्यांच्याजवळ कागद नव्हता. मात्र, त्यांवेली त्यांच्या खिशात सिगारेटचे पाकीट होते. त्यांनी ते पाकीट काढले आणि या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी त्यांनी सिगारेटच्या पाकिटात असलेल्या कागदावर लिहून ठेवल्या. त्यानंतर या गाण्याने कसा इतिहास रचला, हे आज प्रत्येकालाच माहित आहे.



Source link

Abhishek Malhan: ट्रॉफीचा दावेदार असूनही ‘फुकरा इन्सान’ बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात दिसणार नाही!

0
Abhishek Malhan: ट्रॉफीचा दावेदार असूनही ‘फुकरा इन्सान’ बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात दिसणार नाही!


तर, आणखी एकाने लिहिले की, ‘तुला कुणाचीही नजर ना लागो.. थू थू थू… लवकर बरा हो अभिषेक!! ट्रॉफी तुझ्याच घरी येणार आहे.’ एका यूजरने लिहिले की, ‘हे ट्विट पाहून माझ्या डोळ्यात अचानक अश्रू का आले माहीत नाही. तू लवकर बारा हो.’ ‘फुकरा इन्सान’ अर्थात अभिषेक मल्हानने व्लॉगर म्हणून खूप प्रशंसा मिळवली आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये जिया शंकरसोबतचा त्याचा लव्ह अँगल आणि मनीषा राणीसोबतचा क्युट बॉण्ड प्रेक्षकांना खूप आवडला. चाहत्यांनी जिया आणि मनीषासोबत अभिषेकचे अनेक व्हिडीओ केले आहेत. या चांगल्या आठवणींशिवाय त्याची ऑन-ऑफ हाणामारी आणि बाबिकासोबतची मैत्रीही चांगलीच गाजली.



Source link

Genelia Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी दिनी भावूक झाली जिनिलीया! पोस्ट लिहित म्हणाली…

0
Genelia Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी दिनी भावूक झाली जिनिलीया! पोस्ट लिहित म्हणाली…


अभिनेत्री जिनिलीया डिसुजा-देशमुख हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सासरे विलासराव देशमुख यांच्यासोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. जिनिलीयाने शेअर केलेला हा फोटो तिच्या लग्न सोहळ्यातील आहे. यासोबतच तिने वडिलांसमान सासऱ्यांच्या आठवणीत एक पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये जिनिलीयाने लिहिले की, ‘प्रिय पप्पा, मला तुम्हाला हेच सांगायचंय की तुमचा विचार करून मनाला खूप आनंद होतो. पण, तुमच्याशिवाय जीवन जगणं कठीण आहे. मला माहित आहे, तुम्ही जिथेही असाल ती जागा खूप सुंदर असेल. कारण, तुमच्याकडे ती शक्ती होती, जी कुणाच्याही चेहऱ्यावर आनंदाचं हसू घेऊन यायची. तुमची नेहमी आठवण येईल!’



Source link

Pune Crime : पुणे हादरले ! लहान भावाला जीवे मारण्याची धमकी देत शिकवणी चालकाचा मुलीवर बलात्कार

0
Pune Crime : पुणे हादरले ! लहान भावाला जीवे मारण्याची धमकी देत शिकवणी चालकाचा मुलीवर बलात्कार


दरम्यान, मुलगी गर्भवती राहिली. ही बाब तिच्या आईला समजल्यावर तिने तिला विश्वासात घेत या प्रकरणी विचारपूस केली. तेव्हा तिच्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. मुलीने घरी शिकवणीसाठी येणारे अलोक सरांनी बलात्कार केल्याचे आईला सांगितले. त्यानंतर मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुतार तपास करत आहेत.



Source link

Baaplyok: वडिल मुलाच्या नात्याची गोष्ट, ‘बापल्योक’चा ट्रेलर प्रदर्शित

0
Baaplyok: वडिल मुलाच्या नात्याची गोष्ट, ‘बापल्योक’चा ट्रेलर प्रदर्शित


आईचं काळीज समजणाऱ्या पोरांना बापाची तळमळ समजत नाही. आयुष्याच्या वाटेवर अपेक्षा, जबाबदारीचे ओझे घेऊन धावणाऱ्या बापाने अजून जोरात पळायला हवे, असे प्रत्येक मुलाला नेहमी वाटत असत. पण जेव्हा तो स्वतः पळायला लागतो, तेव्हा जीवघेण्या शर्यतीचे नियम समजतात. प्रवास झाल्याशिवाय जगणं समजत नाही. आणि दुसऱ्याची बाजूही कळत नाही. हाच प्रवास नागराज मंजुळे यांच्या ‘बापल्योक’या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.



Source link

पावसाचा खंड, पिंकावर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी 150 हेक्टरवरील कपाशी उपटून फेकली

0
पावसाचा खंड, पिंकावर रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी 150 हेक्टरवरील कपाशी उपटून फेकली


औरंगाबाद: मागील काही दिवसांत पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्यातच पावसाचा (Rain) खंड पडल्याने पिंकावर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अनेक फवारण्या करून देखील पिकांवर रोग कमी होत नाही. त्यामुळे या सर्व परिस्थितीला वैतागून औरंगाबादच्या (Aurangabad) सोयगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने रोगाने ग्रासलेल्या कपाशीला (Cotton) उपटून फेकले आहे. 

सोयगाव तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी धूळपेरणीवर कपाशीची लागवड केली आहे. सुरुवातीला आलेल्या पावसामुळे आणि शेतकऱ्यांनी खुरपणी करत खताचा डोस दिल्याने झाडेही चांगली मोठी झाली. पण, आता पावसाने पाठ फिरवल्याने या पिकावर रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. तर, फवारणी साठी लागणारा खर्च परवडणारा नाही. त्यात पावसाचा अंदाज नाही. अशा सर्व परिस्थितीमुळे सोयगाव परिसरात असलेल्या विष्णू गव्हांडे, संजय वाघ, प्रमोद वाघ, प्रमोद बावस्कर, रमेश वाघ, भरत बावस्कर या सहा शेतकऱ्यांनी 150 हेक्टरवरील कपाशी उपटून फेकली आहे.

सोयगावसह परिसरात पावसाचा मोठा खंड आणि कपाशीच्या पिकांवर झालेल्या विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सोयगाव परिसरात शेतकरी उद्विग्न झाले आहेत. रोगाने ग्रासलेल्या आणि वाढ खुंटलेल्या कपाशीपासून शेतकऱ्यांना कोणतेही भवितव्य दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी सरळ कपाशी उपटणे सुरू केले आहे. यात आतापर्यंत कपाशीवर केलेला सर्वच खर्च पाण्यात गेला असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. कपाशीवर रोगराई आल्यानंतरही कृषी विभागाकडून कोणत्याही उपाययोजना मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहे. शेवटी कपाशीचे पीक सांभाळणे म्हणजे ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट कपाशी उपटून फेकण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत… 

या वर्षी मृग नक्षत्रात साधारण पडलेल्या पावसावर पुढे पाऊस पडेल, या आशेवर औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. थोडाफार पाऊस झाल्याने पिकाची उगवण ही झाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पाऊस न पडल्याने आणि कडक उन्हामुळे पिके सुकू लागली आहेत. पावसाळा सुरू असून चार नक्षत्र संपले तरीदेखील अपेक्षित पाऊस झालेला नाही. खरीप पिकात वाढलेले तण काढण्यासाठी खुरपणी, कोळपणी यांची कामे सुरू आहेत. मशागतीमुळे शेतातील जमिनीचा वरचा थर मोकळा होऊन खाली थोडाफार असलेला ओलावाही नष्ट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीन भर पडत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Paddy sowing : देशात भात लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांची वाढ, तर तेलबियांसह कापूस लागवडीत घट; वाचा कृषी मंत्रालयाची आकडेवारी



Source link

Jawan New Song: पुन्हा एकदा दिसला शाहरुख खानचा रोमँटिक अंदाज! ‘जवान’चं ‘चलेया’ गाणं रिलीज

0
Jawan New Song: पुन्हा एकदा दिसला शाहरुख खानचा रोमँटिक अंदाज! ‘जवान’चं ‘चलेया’ गाणं रिलीज


शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबरला रिलीज होत आहे. शाहरुख खानच्या आगामी चित्रपटाबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. ‘जवान’चे निर्मातेही सोशल मीडियावर बझ वाढवण्यासाठी नवनव्या कल्पना वापरत आहेत. दररोज या चित्रपटाशी संबंधित पोस्टर आणि व्हिडीओ रिलीज केले जात आहेत. अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ हा मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे. शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, रिद्धी डोगरा, सान्या मल्होत्रा यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



Source link

Aai Kuthe Kay Karte: ‘या घरात एकतर ईशा तरी नसेल, नाहीतर मी तरी’, अरुंधतीने घेतला कठोर निर्णय

0
Aai Kuthe Kay Karte: ‘या घरात एकतर ईशा तरी नसेल, नाहीतर मी तरी’, अरुंधतीने घेतला कठोर निर्णय



Aai Kuthe Kay Karte Serial update: अरुंधती तिने ठरवलेल्या गोष्टींमध्ये सफल होणार का? की तिला घर सोडून जावे लागणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना त्यांच्या या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.



Source link

Sunday Box Office: बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ची जादू, मोडला ‘KGF 2’ आणि ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड

0
Sunday Box Office: बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ची जादू, मोडला ‘KGF 2’ आणि ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड



Gadar 2 Sunday Box Office: बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत असणारा ‘गदर २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतील अनेक नवे रेकॉर्ड केले आहेत.



Source link

सातारा : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या प्रकल्पाला गती | पुढारी

0









कराड : पुढारी वृत्तसेवा; देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या ऑलिंपिक वीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या 39 व्या पुण्यतिथीदिनी आज (दु.१४)  ऑलिंपिकवीर पैलवान खाशाबा जाधव राष्ट्रीय क्रीडा संकुलाचा मागील वीस वर्षापासून रखडलेल्या प्रकल्पास गती मिळाली आहे. राज्य क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी आज कराड प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत दोन ते तीन दिवसात कुस्ती संकुलाचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले.

त्याचबरोबर स्मशानभूमी रस्ता, शासकीय जागेतील अतिक्रमण याबाबत महसूल विभागाने निर्णय घ्यावा अशी सूचना करत सद्यस्थितीत ताब्यात असलेल्या 36 गुंठे जागेत क्रीडा संकुल उभारण्यात येईल असेही क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी या बैठकीत स्पष्ट केले. दोन ते तीन पर्याय असलेला आराखडा सादर करून त्यास त्वरित मान्यता दिली जाईल, कुस्ती संकुल साठी निधी उपलब्ध असून तो त्वरित वर्ग केला जाईल अशी ग्वाही क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली आहे. या बैठकीस प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, स्वर्गीय खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव, गोळेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा 











Source link