Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2839

Siddharth Jadhav: ‘मी त्यांना जग बघायला पाठवतोय…’; मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवची पोस्ट वाचून वाटेल कौतुक!

0
Siddharth Jadhav: ‘मी त्यांना जग बघायला पाठवतोय…’; मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवची पोस्ट वाचून वाटेल कौतुक!


अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलेय की, ‘हाच तो क्षण… आई बाबांचा पहिला परदेश दौरा… माझ्यासाठी हा क्षण किती महत्त्वाचा आहे, हे मी शब्दात नाही सांगू शकत. त्यांच्या आशीर्वादाने ‘मी जग बघायला फिरलो’ आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने ‘मी त्यांना जग बघायला पाठवतोय…’. त्यातला आज त्यांचा हा ‘पहिला प्रवास…’. माझ्या शाळेतल्या पहिल्या सहलीपासून ते आतापर्यंत लंडनला शूटला जाईपर्यंत जी उत्सुकता, जो आनंद, त्यांना असायचा तशीच किंवा त्यापेक्षा जास्त उत्सुकता, तसाच आनंद आज मला वाटतोय…. ते मला जे नेहमी सांगायचे तेच आज मी त्यांना सांगतोय.. तुम्ही मज्जा करा.. माझी काळजी नको.. मी आहे तुमच्यासोबत…..कायम….’ सिद्धार्थ जाधवची ही पोस्ट वाचून चाहते आता त्याचं तोंडभरून कौतुक करत आहेत.



Source link

Bigg Boss OTT Season 2: दणक्यात पार पडणार ‘बिग बॉस ओटीटी २’चा महाअंतिम सोहळा! कधी आणि कुठे बघाल? वाचा…

0
Bigg Boss OTT Season 2: दणक्यात पार पडणार ‘बिग बॉस ओटीटी २’चा महाअंतिम सोहळा! कधी आणि कुठे बघाल? वाचा…


अंतिम सोहळ्यापर्यंत या स्पर्धेत टिकून राहिलेल्या सगळ्याच स्पर्धकांच्या चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे. या शोच्या प्रत्येक टास्कमध्ये सुरुवातीपासून ते आतापर्यंत सगळ्याच स्पर्धकांनी आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवली आहे. या शोमध्ये आता अभिषेक मल्हान, एल्विश यादव, मनीषा राणी, पूजा भट्ट, बेबिका धुर्वे यांच्यात आता अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. जिओ सिनेमाचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी २’ आता त्याच्या ग्रँड फिनालेसाठी सज्ज झाला आहे. येत्या काही तासांतच या शोला दुसऱ्या सीझनचा विजेता मिळणार आहे.



Source link

KBC 15: कौन बनेगा करोडपतीमध्ये नवी लाइफलाइन, जाणून घ्या १५ व्या सिझनमध्ये काय असणार नवे?

0
KBC 15: कौन बनेगा करोडपतीमध्ये नवी लाइफलाइन, जाणून घ्या १५ व्या सिझनमध्ये काय असणार नवे?


असे म्हटले जात आहे की केबीसीमध्ये आणखी एक सेगमेंट अॅड करण्यात आले आहे. सुपर संदूक असे त्याचे नाव आहे. हा प्रकार नेमका काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, केबीसीची ट्यून देखील बदलणयात आल्याचे म्हटले जात आहे.



Source link

Prithviraj Chavan : शरद पवारांना दोन मोठी पदं देण्याची भाजपची तयारी; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

0
Prithviraj Chavan : शरद पवारांना दोन मोठी पदं देण्याची भाजपची तयारी; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट


जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनाही ऑफर

केंद्रातील मोदी सरकारविरोधात राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडी आकाराला आली आहे. या आघाडीतील सर्व पक्ष गंभीरपणे भाजपच्या विरोधात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपला सत्ता राखायची असेल तर जुळवाजुळव करावी लागणार आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला फोडूनही भाजपला मोठा लाभ होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पाडण्यात आली आहे. मात्र, शरद पवार जोपर्यंत भाजपकडं जात नाहीत, तोपर्यंत राष्ट्रवादीच्या फुटीला फारसा अर्थ नाही. शिवाय, शरद पवारांनी बाजू बदलणं हा इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का असेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप पवारांसोबतच जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही सामावून घेण्यास तयार आहे.



Source link

Jailer Movie: रजनीकांतच्या ‘जेलर’ सिनेमात दिसले दोन मराठमोळे कलाकार

0
Jailer Movie: रजनीकांतच्या ‘जेलर’ सिनेमात दिसले दोन मराठमोळे कलाकार



Jailer Movie: रजनीकांतचा जेलर हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात मराठमोळ्या कलाकारांनी काम केले आहे. कोण आहेत हे कलाकार चला पाहूया…



Source link

TOP 90 : 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 ऑगस्ट 2023: ABP Majha

0
TOP 90 : 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 ऑगस्ट 2023: ABP Majha


Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात एनआएची पुन्हा छापेमारी; दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशय 



Source link

महाबळेश्वर हाऊसफुल्ल; वर्षा पर्यटन बहरले | पुढारी

0









महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य दिन व सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच रेलचेल अनुभवायास मिळत आहे. पावसाची रिमझिम बरसात, कडाक्याची थंडी, हिरवागार निसर्ग अन् धुक्यात लपटलेले वातावरण, याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. रिसॉर्टस्, लॉजिंगचे दर वाढले असून अनेकांनी आधीच रूम आरक्षित केलेल्या आहेत.

महाबळेश्वर व पाचगणीत वर्षा पर्यटनाचा माहोल असून महाबळेश्वरचा प्रसिद्ध लिंगमळा धबधबा दाट धुक्यात ओसंडून वाहत आहे. या धबधब्याचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेले वेण्णालेक दाट धुक्यात हरवले आहे. वेण्णालेकसह क्षेत्र महाबळेश्वर मंदिर तसेच विविध पॉईंटवर पर्यटकांची रेलचेल आहे महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटकांचे माहेरघर असलेल्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी स्वातंत्र्य दिन व सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची रेलचेल आहे. हिरव्यागार वनश्रीने महाबळेश्वरचे रूप पूर्णपणे पालटले असून डोंगर कपारीतून उंचावरून वाहणारे धबधबे, दाट धुक्याची चादर पसरली आहे. या सुखद व रम्य वातावरणाची मजा लुटण्यासोबतच पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत.

पाऊस व दाट धुक्यात पर्यटक वेण्णालेक येथे नौकाविहार करत असून अनेक हौशी पर्यटक घोडसवारी करताना दिसत आहेत. धुंद वातावरणात खवय्ये पर्यटक गरमागरम मका पकोडा, कांदा भजी, मका कणीस, आलेदार चहासह गरमागरम मॅगीचा आस्वाद घेताना पहावयास मिळत आहेत. मुख्य बाजारपेठेत गरमागरम चणे, चिक्की फजसोबतच उबदार ब्लँकेट, कानटोपी, मफलर, येथील प्रसिद्ध चप्पल्स खरेदीसाठी पर्यटकांची पावले बाजारपेठेकडे वळत आहेत.











Source link

सातारा : पर्यटन विकासातून रोजगारनिर्मिती; मुख्यमंत्र्यांची ग्वाही | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अत्यंत चांगला विकास आराखडा सादर केला आहे. या विकास आराखड्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षमता वृद्धिंगत होणार आहे. त्याद्वारे जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा हा अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गसंपदा लाभलेला संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्याला 110 किलोमीटरचा कोयनेचा बॅकवॉटरचा पट्टा लाभला आहे. या जिल्ह्यात जंगले आहेत, प्राणी आणि पक्षी अभयारण्य आहे. मंदिरे, गड, किल्ले, धबधबे, पठारे आहेत. अशा स्थितीत पर्यटनाचा विकास झाल्यास जिल्ह्यातून नोकरी, धंद्यासाठी बाहेरगावी जाणार्‍या युवकाला आपल्याच मायभूमीत रोजगार मिळेल. या दृष्टीने जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीच्या क्षमता ओळखून अत्यंत चांगला आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. रोजगारानिमित्त इतर शहरात गेलेले तरुण पुन्हा आपल्या मायभूमीत परत यावेत, या उद्देशाने जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाच्या माध्यमातून दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अनेक वर्षापासून रखडलेल्या तापोळा पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बामणोली ते दरे आणि आपटी ते तापोळा अशा दोन पुलांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी हे पूल अत्यंत महत्त्वाचे ठरतील आणि याचा फायदा पर्यटन वाढीलाही होईल. महाबळेश्वर ते तापोळा रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण सुरू आहे. मुनावळे येथे पर्यटकांसाठी आकर्षण स्थळे विकसित करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. रोजगारासाठी युवकांना उद्युक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.











Source link

जावलीत दारूबंदी उठणार नाही : आ. शिवेंद्रराजे | पुढारी

0


मेढा; पुढारी वृत्तसेवा :  दारूबंदी असलेल्या जावली तालुक्यात पुन्हा दारू विक्री सुरू करण्यासाठी हालचाली होत आहेत. या गोष्टीला विरोध असतानाही दारू विक्रेत्यांच्या सोयीसाठी काही राजकारण्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यावर आ. शिवेेंद्रराजे भोसले आक्रमक झाले आहेत. दारू सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेल्यांना त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. कोणी कितीही आदळाआपट केली तरी जावली तालुक्यात दारूबंदी उठणार नाही. जे दारू विक्री पुन्हा सुरू करण्यासाठी उठाव करत असतील त्यांना कोणतेही राजकीय व सामाजिक समर्थन मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा आ. शिवेंद्रराजेंनी दिला आहे.

जावली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा दारू विक्री सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कुडाळ येथे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या पुढाकाराने त्यासाठी बैठकही झाली होती. या बैठकीला सौरभ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती रवी परामणे, संदीप परामणे, बाजार समिती माजी उपसभापती राजेंद्र शिंदे, सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष समाधान पोफळे, माजी सरपंच विरेंद्र शिंदे व कुडाळ ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी तालुक्यातील दारूबंदी हटवण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आ. शिवेंद्रराजे म्हणाले, जावली तालुक्यातील कुडाळ, मेढा परिसरात अवैध दारूधंद्यावर कारवाई होत नाही. तसेच पर्यटनाला चालना मिळत नसल्याने तालुक्यात पुन्हा दारू दुकाने सुरू व्हावीत, असा सूर काहींनी काढला आहे. जावली तालुका हा माझ्या मतदारसंघातील दारूबंदी झालेला पहिला तालुका आहे. पण आता कुडाळ व मेढा परिसरातील काही भागांत चोरून दारूविक्री होत आहे. यावर कारवाई होत नसल्याने काही लोकांनी येथे दुकाने सुरू व्हावीत, अशी भूमिका घेतली आहे. मुळात ही भूमिका चुकीची आहे. त्यांच्या या भूमिकेला राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळणार नाही. खरेतर व्यसनापासून सर्वांनीच दुर राहिले पाहिजे. व्यसनाला सर्वांचा विरोधच राहणार आहे. त्यांना कोणाचा पाठिंबा मिळेल, असे मला वाटत नाही.

कुणी काहीही प्रयत्न करत असेल तर त्याला राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळणार नाही. तसेच त्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. तालुक्यात दारूबंदी राहिलीच पाहिजे. 16 वर्षापूर्वी ज्या मंडळींनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला तीच मंडळी आता दारू पुन्हा सुरू करा म्हणून पुढे येत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याचेही आ. शिवेंद्रराजेंनी सांगितले.

दारूबंदीनंतर अवैध दारू किंवा अवैध धंदे बंद करण्यासाठी जी लोकं पुढे आली नाहीत, अशीच मंडळी दारूची दुकाने सुरू करण्यासाठी उतावीळ झाली आहेत. या लोकांनी दारू बंदी मोडीत काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. तो कधीही सफल होवू देणार नाही. दारू विक्री पुन्हा सुरू करणारे सर्वसामान्यांच्या संसारावर उठले आहेत. जावलीच्या महिलांनी लिहिलेला सुवर्ण इतिहास पुसण्याचा प्रयत्न या लोकांकडून होत आहे. ते कदापि होवू देणार नाही.
– विलासबाबा जवळ, मार्गदर्शक व्यसनमुक्त युवक संघटना

जावली तालुक्यात दारू विक्रीसाठी काहींनी मागणी केली ही विनाश काले विपरीत बुध्दी असे म्हणावे लागेल. इतिहासात अशी मागणी करणार्‍यांची नोंद काळ्या अक्षरात लिहली जाईल. दारूच्या व्यसनामुळे तरूण पिढी नासली जात आहे. कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. जावली तालुक्याला दारूबंदीचा मोठा इतिहास आहे. अवैध पध्दतीने जावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारू वाढली आहे? हा काय प्रकार आहे. असे म्हणणे म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे हे अपयश आले. जी मंडळी यावर ठराव करत आहेत त्यांचे आर्थिक हितसंबध यात दडले आहेत. याचा भांडाफोड तालुक्यातील महिलाच करतील. याविरोधात महिलांनी एकजूट होवून आडवी बाटली उभी करणार्‍यांना चांगलाच धडा शिकवावा.
-अ‍ॅड. वर्षा देशपांडे, सामाजिक कार्यकर्त्या



Source link

सांगा… श्रावणी आता माघारी येणार आहे का?; बसमध्ये जागा पकडण्यासाठीच्या गर्दीने श्रावणीला देवाघरी नेले | पुढारी

0









संजीव कदम

सातारा : घरी जाण्यासाठी एस.टीची वाट पाहणार्‍या श्रावणी अहिवळे हिला बसमध्ये जागा पकडण्यासाठीच्या गर्दीने देवाघरी नेले. वाईच्या एस.टी. स्टँडमधील ही दुर्घटना काळजात कालवाकालव करून गेली. समाजमनाला सुन्न करणार्‍या या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले. एस.टी.मध्ये जागा पकडण्यासाठी दररोज सुरू असणारी विद्यार्थी व प्रवाशांची जीवघेणी चढाओढ थांबणार आहे का?. श्रावणी गेली, आता उपाययोजनांचे कागदी घोडे नाचवले जातील, नुकसान भरपाईची तजवीज केली जाईल, श्रावणीच्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्नही होईल. पण, खरोखरच श्रावणी माघारी येणार आहे का? जीवघेणी गर्दी श्रावणीसारखे आणखी किती बळी घेणार आहे?

श्रावणीच्या किंकाळ्या कुणालाच का ऐकू आल्या नाहीत?

वाईच्या एस.टी. स्टँडवर शनिवारी घडलेली दुर्घटना काळजाचा ठाव चुकवणारी होती. लवकर शाळा सुटल्याने घरी जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाई बसस्थानकात गर्दी केली होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणारी श्रावणी अहिवळे ही घराकडे जाणार्‍या बसची वाट पाहत उभी होती. गावाकडे जाणारी वाई-बालेघर ही बस लागल्यानंतर श्रावणी बसजवळ आली. मात्र, एस.टीत चढत असताना गर्दीमुळे ती खाली कोसळली अन् कायमची देवाघरी गेली. त्यावेळी तिच्या किंकाळ्या गर्दीत अन् बसमधील जागा पकडण्यासाठी सुरू असणार्‍या चढाओढीच्या वातावरणात विरून गेल्या. कुणालाही तिच्या किंकाळ्या ऐकू आल्या नाहीत. कारण त्या गर्दीतल्या प्रत्येकाला एस.टी.मध्ये बसण्यासाठी जागा पकडायची होती. श्रावणी जीवाच्या आकांताने बचावासाठी टाहो फोडत होती. पण कुणालाच काही समजत नव्हते. लाखमोलाचा जीव गर्दीमुळे हिरावून गेला. या दुर्घटनेने भेदरलेले वातावरण आता निवळेलही, पण श्रावणी परत येणार आहे का? त्या गर्दीला पश्चाताप होईलही, पण श्रावणीच्या आई-वडिलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला पोटचा गोळा पुन्हा मिळणार आहे का?. या घटनेतून विद्यार्थी व एसटी प्रशासन बोध घेणार आहे का?

तीन फुटांच्या दरवाजातून पाच-पन्नास जणांच्या घोळक्याची घुसखोरी

एस.टी.तील जागा पकडण्यासाठीची जीवघेणी रस्सीखेच जिल्ह्याच्या प्रत्येक बसस्थानकात रोजच पाहायला मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थी अगदी सकाळी 6 वाजल्यापासून शाळा, कॉलेजसाठी शहरात येत असतात. पुन्हा घरी माघारी जाताना लवकर पोहोचण्याची प्रत्येकालाच आस असते. विद्यार्थ्यांची एवढी गर्दी होते की बसमधील जागाही अपुरी पडते. मग सुरू होते ती जीवघेणी चढाओढ. विद्यार्थ्यांचा जथ्था जागा पकडण्यासाठी इरेला पेटतो. त्यातून अघटीत घडू लागले आहे.
जागा पकडण्यासाठी प्रत्येकजण इर्षेने बसमध्ये चढत असतो. त्यामुळे होणारी तुडूंब गर्दी दरवाजाच्या दिशेने धावत असते. एसटीच्या सुमारे तीन फुटाच्या दरवाजातून घुसण्यासाठी पाच-पन्नास जणांचा घोळका एकाचवेळी प्रयत्न करत असतो. एकमेकाला ढकलून, मागे ओढून जीवाच्या आकांताने प्रत्येकजण दरवाजातून आतमध्ये घुसत असतो. त्यातूनच श्रावणीसारखे काही जीव गेले आहेत. ही जीवघेणी चढाओढ थांबणार आहे की नाही? याचे उत्तर कोण देणार?

विभाग नियंत्रक निर्णय घ्या आता..

  • बसमध्ये चढताना होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल का? विद्यार्थ्यांना शिस्त लागेल का?
  • आलेले प्रवासी उतरल्यानंतरच एसटी फलाटावर लागेल का?
  • विभाग नियंत्रक रोहन पलंगे यावर काय निर्णय घेणार? हे पहावे लागेल.
  • एस.टी फलाटावर लागण्यापूर्वी बसमधून आलेले प्रवासी अगोदरच उतरवणे गरजेचे असते. मात्र, तसे होत नाही. बस थेट फलाटावर नेली जाते. त्यामुळे बसमधून उतरणारे प्रवासी व बसमध्ये घुसण्यासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी यांच्यात बाका प्रसंग उद्भवतो. अनेकदा उतरणार्‍या शेवटच्या चार ते पाच प्रवाशांना बसमध्ये घुसणारी गर्दी पुन्हा आत घेऊन जाते.
  • वाई बसस्थानकातील दुर्घटना हा काही पहिला अपघात नव्हता. यापूर्वीही अशा घटना घडूनही त्यावर ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. दुर्घटनेच्या चौकशीचा फार्स करून काय उपयोग? घटनेची तीव्रता ओसरली की पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ हे सुरूच. हे कधी थांबणार आहे? एस.टी प्रशासन यावर विचार करणार आहे की नाही?











Source link