Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2840

Khashaba Jadhav : ऑलिम्पिकवीर खाशाबांची इच्छा 39 वर्षांनंतरही अपूर्णच | पुढारी

0









कराड ः चंद्रजित पाटील फिनलँडमधील हेलसिंकी येथे सन 1952 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये देशाला वैयक्तिक क्रीडा पहिले कांस्यपदक मिळवून दिले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करूनही स्व. पै. खाशाबा जाधव यांची राष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्याची इच्छा आज 39 वर्षांनंतरही अपूर्णच आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडून 95 गुंठे जागा जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या नावावर करून देण्यात आली आहे. मात्र, त्यापैकी 58 गुंठे जागा गायब आहे. तर उर्वरित 36 गुंठे जागा प्रशासनाच्या ताब्यात आहे. याशिवाय 14 वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही 1 कोटी 58 लाखांतून केवळ राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या वॉल कंपाऊंडचेच काम करण्यात आले आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची आज, सोमवार, दि. 14 रोजी पुण्यातिथी आहे. देशाला पदक मिळवून देणार्‍या या मल्लाला न्याय मिळायला अजून किती काळ जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Khashaba Jadhav)

हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये प्रथम अन्याय करून स्व. पै. खाशाबा जाधव यांना डावलण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर पतियाळाच्या महाराजांनी या विषयात लक्ष घालून ऑलिम्पिकमध्ये निवड झालेल्या मल्लांशी पुन्हा कुस्ती लावण्याची सूचना केली आणि यात खाशाबा जाधव यांनी बाजी मारत ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविला होता. मात्र, त्यानंतर ऑलिम्पिकसाठी हेलसिंकीला जाण्यासाठी आवश्यक रक्कम नसल्याने लोकवर्गणी गोळा करण्यात आली. त्याचबरोबर प्राचार्य बाळासाहेब खर्डेकर यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून आपला विद्यार्थी खाशाबांना 7 हजार रुपये दिले होते. अशाप्रकारे अडथळ्यांची शर्यत पार करत स्व. पै. खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत कांस्यपदक मिळविले होते. (Khashaba Jadhav)

14 ऑगस्ट 1984 मध्ये शेणोली येथील अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांनी आपले गुरू गोविंद नागेश पुरंदरे यांच्याकडे गोळेश्वरमध्ये नवोदित मल्लांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा आजही अपूर्णच आहे. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी स्व. खाशाबांचे पुत्र रणजित जाधव यांनी स्वतःच्या मालकीची 22 गुंठे जागा शासनाच्या नावे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर गोळेश्वर ग्रामपंचायतीने 95 गुंठे जागा देत ती जागा जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या नावे केली. यापैकी सद्यस्थितीत 58 गुंठे जागा कोठे आहे? हेच समजत नसून ती जागा गायब असल्यासारखीच परिस्थिती आहे. तर उर्वरित जागा शासनाच्या ताब्यात आहे. या जागेवर मागील 14 वर्षांतील पाठपुराव्यानंतर 1 कोटी 58 लाखांच्या निधीतून केवळ वॉल कंपाऊंड उभारण्यात आले आहे. त्यानंतर आजवर या क्रीडा संकुलाचे काम रखडले असून आजवर एकही साधी वीट चढविण्यात आलेली नाही. त्यामुळेच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार? हा अनुत्तरित प्रश्न कायम आहे. (Khashaba Jadhav)

 











Source link

Nick Jonas: भर कॉन्सर्टमध्ये चाहती निक जोनसवर फेकले अंतर्वस्त्र अन्… Video viral

0
Nick Jonas: भर कॉन्सर्टमध्ये चाहती निक जोनसवर फेकले अंतर्वस्त्र अन्… Video viral


हा व्हिडीओ शेअर करत चाहतीने “निकच्या कॉन्सर्टची काही क्षण, ज्यामध्ये एका चाहतीने त्याच्यावर ब्रा फेकली. लोक कधी मोठे होतील आणि कलाकारांचा आदर करतील” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.



Source link

OMG 2 Vs Gadar 2: सीक्वेलची कमाल! तीन दिवसात ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ने केली बक्कळ कमाई

0
OMG 2 Vs Gadar 2: सीक्वेलची कमाल! तीन दिवसात ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ने केली बक्कळ कमाई


तार सिंह आणि सकीनाच्या ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. मात्र विकेंडला चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे समोर आले आहे. गदर २ चित्रपटासोबतच अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांचा ओएमजी २ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता दोन्ही चित्रपटांनी प्रदर्शनाच्या तीन दिवसात किती कमाई केली आहे चला पाहूया…



Source link

ऑलिम्पिकवीर खाशाबांची इच्छा ३९ वर्षांनंतरही अपूर्णच | पुढारी

0









कराड; चंद्रजित पाटील : फिनलँडमधील हेलसिंकी येथे सन 1952 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये देशाला वैयक्तिक क्रीडा पहिले कांस्यपदक मिळवून दिले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करूनही स्व. पै. खाशाबा जाधव यांची राष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्याची इच्छा आज 39 वर्षांनंतरही अपूर्णच आहे.

विशेष म्हणजे ग्रामपंचायतीकडून 95 गुंठे जागा जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या नावावर करून देण्यात आली आहे. मात्र, त्यापैकी 58 गुंठे जागा गायब आहे. तर उर्वरित 36 गुंठे जागा प्रशासनाच्या ताब्यात आहे. याशिवाय 14 वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही 1 कोटी 58 लाखांतून केवळ राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या वॉल कंपाऊंडचेच काम करण्यात आले आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची आज, सोमवार, दि. 14 रोजी पुण्यातिथी आहे. देशाला पदक मिळवून देणार्‍या या मल्लाला न्याय मिळायला अजून किती काळ जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये प्रथम अन्याय करून स्व. पै. खाशाबा जाधव यांना डावलण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर पतियाळाच्या महाराजांनी या विषयात लक्ष घालून ऑलिम्पिकमध्ये निवड झालेल्या मल्लांशी पुन्हा कुस्ती लावण्याची सूचना केली आणि यात खाशाबा जाधव यांनी बाजी मारत ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविला होता. मात्र, त्यानंतर ऑलिम्पिकसाठी हेलसिंकीला जाण्यासाठी आवश्यक रक्कम नसल्याने लोकवर्गणी गोळा करण्यात आली. त्याचबरोबर प्राचार्य बाळासाहेब खर्डेकर यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून आपला विद्यार्थी खाशाबांना 7 हजार रुपये दिले होते. अशाप्रकारे अडथळ्यांची शर्यत पार करत स्व. पै. खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत कांस्यपदक मिळविले होते.

14 ऑगस्ट 1984 मध्ये शेणोली येथील अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांनी आपले गुरू गोविंद नागेश पुरंदरे यांच्याकडे गोळेश्वरमध्ये नवोदित मल्लांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा आजही अपूर्णच आहे. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी स्व. खाशाबांचे पुत्र रणजित जाधव यांनी स्वतःच्या मालकीची 22 गुंठे जागा शासनाच्या नावे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर गोळेश्वर ग्रामपंचायतीने 95 गुंठे जागा देत ती जागा जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांच्या नावे केली. यापैकी सद्यस्थितीत 58 गुंठे जागा कोठे आहे? हेच समजत नसून ती जागा गायब असल्यासारखीच परिस्थिती आहे. तर उर्वरित जागा शासनाच्या ताब्यात आहे. या जागेवर मागील 14 वर्षांतील पाठपुराव्यानंतर 1 कोटी 58 लाखांच्या निधीतून केवळ वॉल कंपाऊंड उभारण्यात आले आहे. त्यानंतर आजवर या क्रीडा संकुलाचे काम रखडले असून आजवर एकही साधी वीट चढविण्यात आलेली नाही. त्यामुळेच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार? हा अनुत्तरित प्रश्न कायम आहे.











Source link

Johnny Lever: कधी काळी पोटासाठी जॉनी लिवरने विकले होते पेने, आज आहे कॉमेडीचा बादशाह

0
Johnny Lever: कधी काळी पोटासाठी जॉनी लिवरने विकले होते पेने, आज आहे कॉमेडीचा बादशाह


जॉनी लिवरचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ साली आंध्र प्रदेश येथे झाला. जॉनीचे वडील प्रकाश राव जनमुला हिंदुस्थान लीवर फॅक्ट्रीमध्ये काम करायचे. जॉनी लहानपणापासूनच खूप विनोदी स्वभावाचा. तो कायम समोरच्याला हसवायचा, त्यामुळे मित्रमंडळींमध्ये तो खूप लोकप्रिय होता. जॉनीला तीन बहिणी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी गरिबी अनुभवली आहे. पोटासाठी जॉनी यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि पेन विक्रेता म्हणून काम स्वीकारले. जॉनी बॉलिवूडमधील नाटकांची नक्कल करायचे. आज जॉनी लिवर कोट्यावधी रुपयांचा मालक आहे.



Source link

Maharashtra Rain Update : पावसाचे राज्यात होणार कमबॅक; ‘या’ भागात बरसणार, वाचा हवामानाचा अंदाज

0
Maharashtra Rain Update : पावसाचे राज्यात होणार कमबॅक; ‘या’ भागात बरसणार, वाचा हवामानाचा अंदाज


राज्यात १८ ते २४ ऑगस्ट आणि २५ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस विदर्भातील काही भागात होणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पाऊस कमबॅक करु शकतो. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस होईल, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत असल्याचे होसाळीकर यांनी ट्विट करून सांगितले आहे.



Source link

Today In History : भारताची फाळणी, विलासराव देशमुख आणि विनायक मेटे यांचा स्मृतीदिन; इतिहासात आज

0
Today In History : भारताची फाळणी, विलासराव देशमुख आणि विनायक मेटे यांचा स्मृतीदिन; इतिहासात आज


What Happened on August 14th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 14 ऑगस्ट रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती. विनायक मेटे आणि राकेश झुनझुनवाला यांचे 2022 मध्ये निधन झाले. तर खाशाबा जाधव यांनी 1984 मध्ये अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे 2012 मध्ये निधन झाले होते. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

खाशाबा जाधव यांची पुण्यतिथी – 

भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या मराठमोळ्या खाशाबा जाधव यांची आज पुण्यातिथी आहे. 14 ऑगस्ट 1984 रोजी खाशाबा जाधव यांचे कराड येथे निधन झाले होते. खाशाबा जाधव यांनी मराठी, लाल मातीचा आणि कुस्तीचा जगभर गौरव केला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता झाल्यानंतर स्वतंत्र भारतासाठी कुस्ती खेळात 1952 मध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून मराठमोळ्या खाशाबा जाधवांनी (K. D. Jadhav) पराक्रमाची गाथा रचली होती. देशाच्या क्रीडा क्षेत्रात तो क्षण मैलाचा दगड ठरावा असाच तो प्रसंग होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खाशाबा जाधव यांनी देशाची मान अभिमानाने उंचावली होती.

खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी मराठा साम्राज्याच्या गौरवशाली क्षणांचा साक्षीदार असलेल्या सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. केडी (KD) आणि पॉकेट डायनामो या टोपणनावाने देखील खाशाबा जाधव ओळखले जात होते. सन 2000 मध्ये भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी नव्याने बांधलेल्या कुस्तीस्थळाला त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचे नाव देण्यात आले.  

1948 मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली तेव्हा ते सहाव्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोहोचणारे भारतातील ते एकमेव खेळाडू होते. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे स्वतंत्र भारतासाठी मिळवलेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं. 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता.  1955 मध्ये खाशाबा जाधव पोलिस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात रुजू झाले. त्यांनी आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर क्रीडा मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. पोलिस खात्यात 27 वर्षे नोकरी केल्यानंतर ते सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. 1984 मध्ये खाशाबा जाधव यांचे अपघाती निधन झाले. 2001 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

राकेश झुनझुनवाला यांचे निधन

मुंबई शेअर बाजारातील ‘बिग बुल’ अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे (Rakesh Jhunjhunwala Passed Away) आजच्याच दिवशी निधन झाले होते. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी झाला. मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते चार्टर्ड अकाऊंटंटही झाले. महाविद्यालयीन जीवनापासून राकेश झुनझुनवाला यांचा ओढा शेअर बाजाराकडे होता.

राकेश झुनझुनवाला यांनी 1985 च्या सुमारास अवघ्या पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यांना पहिला नफा 1986 च्या सुमारास मिळाला. पहिल्याच गुंतवणुकीत झुनझुनवाला यांनी जवळपास तीन पट नफा मिळवला होता, असे म्हटले जाते. झुनझुनवाला यांनी ‘टाटा टी’ चे पाच हजार शेअर्स 43 रुपयांच्या दराने खरेदी केले होते. हेच शेअर त्यांनी 143 रुपयांना विकले. त्यानंतरच्या पुढील तीन वर्षात त्यांनी जवळपास 20 लाख रुपये कमावले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शेअर बाजारातील बिग बुल अशी ओळख त्यांना मिळाली होती. 

2012 : विलासराव देशमुख यांचे निधन 

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज पुण्यतिथी आहे.  14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचं निधन झालं होते. लातूरमधील मराठवाडा भागातील विलासराव देशमुख हे एक मातब्बर राजकीय नेतृत्व होते. विलासराव देशमुख यांनी दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी लातूर येथील बाभळगाव येथे झाला होता. बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून विलासराव यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली होती.  18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी  2003 आणि 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर  2008 या काळात विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेय. मनमोहन सिंह मंत्रिमंडळात ते अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.  

विनायक मेटे यांचा स्मृतीदिन- 

आजच्याच दिवशी 2022 मध्ये विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं होते.  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचार सुरू असतानाच मेटे यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

30 जून  1970 रोजी शिवसंग्राम पार्टीचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा बीडमध्ये जन्म झाला होता. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य होते.

फाळणी वेदना स्मरणदिन  Partition Horrors Remembrance Day

भारतामध्ये 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मरणदिन साजरा करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये याबाबत घोषणा केली होती. शाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी हा विशेष दिवस साजरा केला जाणार आहे.

14 ऑगस्ट : देशाचे दोन तुकडे

14 ऑगस्टची तारीख देशाच्या इतिहासात अश्रूंनी लिहिलेली आहे. हा तो दिवस होता जेव्हा देशाची फाळणी झाली आणि 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यात आले. या फाळणीत केवळ भारतीय उपखंडाचेच दोन भाग झाले नाहीत, तर बंगालचेही विभाजन झाले आणि बंगालचा पूर्व भाग भारतापासून विभक्त होऊन पूर्व पाकिस्तान बनला, जो 1971 च्या युद्धानंतर बांगलादेश झाला.

म्हणायला ही फक्त देशाची फाळणी आहे, पण प्रत्यक्षात ते अंतःकरण, कुटुंब, नातेसंबंध आणि भावनांचे विभाजन होते. देशावर ही फाळणीची जखम शतकानुशतके राहील आणि येणाऱ्या पिढ्यांना या सर्वात वेदनादायक आणि रक्तरंजित दिवसाची छटा जाणवत राहतील.

पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन –

1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तान या देशाची निर्मिती केली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांचा स्वातंत्र्यदिन एकापाठोपाठ एक असतो. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन भारताच्या एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्ट आहे.  

भारताची फाळणी माउंटबँटन योजनेनुसार करण्यात आली. प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया “मांउटबॅटन योजने”नुसार पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिकाऱ्याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. हिंदू बहुसंख्य असणारे प्रांत, विभाग भारतात आणि मुस्लिम बहुसंख्य असणारे प्रांत, विभाग पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आले. ब्रिटिशांनी केलेली फाळणी सदोष असल्याचे म्हटले जाते. भारताची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना स्वातंत्र्य देण्याबाबतचा ठराव ब्रिटीश संसदेत मांडण्यात आला. पुढे 18 जुलै 1947 रोजी ब्रिटीश संसदेने या ठरावाला मंजुरी दिली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली. 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री भारत आणि पाकिस्तान या देशांना इंग्रजांनी स्वतंत्र्य केले. भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो तर पाकिस्तान 14 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. 

मुंबई उच्‍च न्यायालयाची स्थापना – 

आजच्याच दिवशी 1962 मध्ये मुंबई उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली होती. मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालायापैकी एक आहे. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि औरंगाबाद येथे तर गोव्यात पणजी येथे आहे. उच्च न्यायालयातील खटल्यांबाबत संकेतस्थळाला भेट देऊन आपल्याला पाहिजे असलेल्या प्रकरणाची माहिती, निर्णय मिळू शकतो.  

जागतिक सरडा दिवस –

दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी जागतिक सरडा दिवस साजरा केला जातो. या दिवसाला तसा कोणताही इतिहास नाही. फक्त काही पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात. जगभरात सरड्यांच्या जाती 50 हजारांपेक्षा जास्त आहेत.

1947 : भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली. 

गोदावरी परुळेकर यांची जयंती –

स्वातंत्र्यसैनिक गोदावरी परुळेकर यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1908 रोजी पुण्यात झाला होता. ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाच्या नेत्या गोदावरी परुळेकर यांच्या नेतृत्वात तलासरी, उंबरगाव, डांग आदी गुजरात सीमेवरील भागात संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन करण्यात आले. कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्यामुळे आदिवासींनीदेखील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठा सहभाग घेतला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका म्हणून त्या ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. तलासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्‍यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ’जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे. 

जयवंत दळवी यांचा जन्म 

मराठीतील प्रसिद्ध नाटककार आणि कथा-कादंबरीकार जयवंत दळवी यांची आज जयंती आहे. 14 ऑगस्ट 1925 रोजी जयवंत दळवी यांचा जन्म झाला होता. ते ’ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी आणि मार्मिक लेखन करीत.  कथांवर आणि कादंबऱ्यांवर त्यांनीच नाटके लिहिली आणि ती प्रचंड गाजली, लोकप्रिय झाली. मराठीतील एक अभूतपूर्व कादंबरी म्हणून दळवींच्या ‘चक्र’चा उल्लेख केला जातो.  गहिवर, एदीन, रुक्मिणी, स्पर्श यासारखे कथासंग्रह दळवी यांनी लिहिलेत. चक्र, स्वगत, महानंदा, अथांग, अल्बम यासारख्या कादंबऱ्या दळवींच्या लेखणीतून आल्यात. संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्यास्त, महासागर, पुरुष, नातीगोती यासारखी नाटके दळवी यांनी लिहिली. 

जॉनी लीव्हर यांचा वाढदिवस – 

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते जॉनी लीव्हर (Johny Lever) आज (14 ऑगस्ट) वाढदिवस आहे. जॉनी यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. जॉनी लीव्हर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1967 रोजी आंध्र प्रदेशातील कानिगिरी येथे झाला. त्यांनी 90च्या दशकांत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कॉमेडीने लोकांना खूप हसवले. शाहरुख खान, आमिर खान आणि अनिल कपूर यांसारख्या बड्या स्टार्ससोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली. जॉनी लीव्हर यांनी आपल्या दमदार कॉमिक टायमिंगने लोकांना नेहमी हसवत ठेवले. जॉनी लीव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाशराव जानुमाला आहे. त्यांचे वडील प्रकाश राव जानुमाला हे हिंदुस्थान लीव्हरमध्ये ऑपरेटर म्हणून काम करायचे. जॉनी तीन बहिणी आणि दोन भावांमध्ये सर्वात मोठे होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे ते शाळेची फी देखील भरू शकत नव्हते.   

1982मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातून जॉनी लीव्हर यांनी बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. पण, 1993मध्ये प्रदर्शित झालेल्या अब्बास मस्तान दिग्दर्शित ‘बाजीगर’ या चित्रपटातून त्यांना बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली. या चित्रपटात जॉनी लीव्हर यांनी साकारलेल्या ‘बाबूलाल’च्या भूमिकेने त्यांना प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवून दिली. जॉनी लीव्हर यांनी ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जीत’, ‘जुदाई’, ‘कोयला’, ‘इश्क’, ‘एंटरटेनमेंट’, ‘गोल माल’ आणि ‘गोल माल रिटर्न्स’, ‘धमाल’, ‘टोटल धमाल’, ‘हाऊसफुल’ आणि ‘नवरा माझा नवसाचा’ अशा अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये काम केले.



Source link

Eknath shinde : “…तर आम्ही भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढू”, शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान

0
Eknath shinde : “…तर आम्ही भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढू”, शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान


तसेचएकनाथ शिंदे यांनी सांगितल्यासआम्ही अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवण्यास तयार आहे. एकनाथ शिंदेंनी सांगितलं की, आपल्याला भाजपाकडून लढायचं आहे, तर आम्ही भाजपाकडून लढू. आमचे सर्व निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असे पाटील म्हणाले.



Source link

स्वातंत्र्य दिनापूर्वी NIA मोठी कारवाई; PFI शी संबंधित अनेक ठिकाणांवर छापा

0
स्वातंत्र्य दिनापूर्वी NIA मोठी कारवाई; PFI शी संबंधित अनेक ठिकाणांवर छापा



<p style="text-align: justify;"><strong><a title="मुंबई" href="https://marathi.abplive.com/news/mumbai" data-type="interlinkingkeywords">मुंबई</a> :&nbsp;</strong> लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करून शांतता बिघडवण्याचा <strong><a href="https://marathi.abplive.com/topic/pfi">पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा</a> </strong>(PFI) कट हाणून पाडण्यासाठीच्या सतत प्रयत्नांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी पाच राज्यांमध्ये छापे टाकले. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यात एनआयए ही कारवाई केली. या पाच राज्यातील 14 ठिकाणी छापे टाकून काही साहित्य जप्त करण्यात आले आहे.&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">एनआयएने केरळमधील कन्नूर आणि मलप्पुरम, कर्नाटकातील दक्षिण कन्नड, <a title="महाराष्ट्र" href="https://marathi.abplive.com/news/maharashtra" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a>ातील नाशिक आणि <a title="कोल्हापूर" href="https://marathi.abplive.com/kolhapur" data-type="interlinkingkeywords">कोल्हापूर</a>, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि बिहारमधील कटिहार येथे छापे टाकले. या वेळी एनआयएने डिजीटल उपकरणे, कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">दहशतवादी, हिंसाचार आणि तोडफोडीच्या कृत्यांमधून 2047 पर्यंत भारतात इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी पीएफआय प्रयत्नशील असल्याचा आरोप आहे. त्यासाठी PFI कडून कट्टरतावादी विचारांचा प्रसार करण्यासह सशस्त्र प्रशिक्षित तरुणांची संघटना उभी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानंतर गृहमंत्रालयाने पीएफआयवर बंदी घातली. तर, दुसरीकडे एनआयएने आपली कारवाई सुरू ठेवली आहे.&nbsp;</p>
<p style="text-align: justify;">NIA ला संशय आहे की PFI चे हस्तक ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून काम करत आहेत. देशाच्या विविध राज्यांमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहेत. कट्टरतावादी PFI केडर्सना शस्त्रे, लोखंडी रॉड, तलवारी आणि चाकू वापरण्याचे प्रशिक्षण देत आहेत. &nbsp;गुप्तचर आणि तपासात्मक विश्लेषण आणि अंतर्दृष्टीच्या आधारावर, या कॅडर आणि कार्यकर्त्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून विविध राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत.</p>
<p style="text-align: justify;">हा कट उधळून लावण्यासाठी एनआयए छापे टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. गुप्त माहितीच्या आधारे तपास यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यकर्त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकत आहे.</p>
<h2 style="text-align: justify;">पीएफआयवर बंदी&nbsp;</h2>
<p style="text-align: justify;">NIA ने एप्रिल 2022 मध्ये दिल्लीत PFI विरोधात गुन्हा दाखल केला होता. गेल्या वर्षी केंद्र सरकारने पीएफआय आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. त्यादरम्यान अनेक पीएफआय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते.</p>
<p style="text-align: justify;">मार्च 2023 मध्ये त्यापैकी 19 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात एक संघटना म्हणून पीएफआयचेही नाव होते. &nbsp;त्यानंतर, एप्रिल 2023 मध्ये, शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणाऱ्या PFI च्या राष्ट्रीय समन्वयकाविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.</p>
<h3 style="text-align: justify;"><strong>इतर महत्त्वाच्या बातम्या:<br /></strong></h3>
<ul>
<li style="text-align: justify;"><strong><a href="https://marathi.abplive.com/news/india/nia-raids-on-pfi-and-sdpi-offices-across-the-nation-know-about-what-is-pfi-and-sdpi-organization-1102747">What is PFI SDPI: बंदी घातलेल्या सिमीचा नवा अवतार पीएफआय? जाणून घ्या ही संघटना आहे तरी काय</a></strong></li>
</ul>



Source link

नात्याला काळिमा! नराधम पित्याकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, पुण्यातील घटना

0
नात्याला काळिमा! नराधम पित्याकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, पुण्यातील घटना


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अकरावीच्या वर्गात शिकते. तिच्या आईचा मृत्यू झाला असून ती वडिलांसोबत राहते. ४२ वर्षीय वडील शेती करतात. मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून वडिलांनी मे २०२३ ते १७ जुलै २०२३ पर्यंत म्हणजे तीन महिने या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. घरात कोणी नसताना राहत्या घरात तसेच घराजवळच्या मोकळ्या जागेत चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. वडिलाना घाबरून सुरुवातीला तिने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. मात्र वडिलांचा अत्याचार सहन न झाल्याने तिने ही गोष्ट आपल्या मैत्रिणीला सांगितली. त्यानंतर मैत्रिणीच्या नातेवाईकांनी पारगाव पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. 



Source link