Wardha News : वर्ध्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी, निम्न वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडले
Source link

Wardha News : वर्ध्यात पावसाची पुन्हा दमदार हजेरी, निम्न वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडले
Source link

इतक्या वर्षांच्या अभिनय कारकिर्दीनंतर मला ही वेगळी व्यक्तिरेखा साकारायला मिळाली आहे. मी त्याबद्दल मी खरोखरच आनंदी आहे. माझ्या अभिनय कारकिर्दीत मी खूप काळ काम केले आहे, जवळपास १७० चित्रपटात नायक-खलनायक म्हणून काम केले आहे. ही माझी १०६वी मालिका आहे. आजपर्यंत मी अनेक दूरदर्शन आणि वाहिन्यांवर काम केलं. आता पुन्हा एकदा नवीन आणि वेगळी भूमिका करताना छान वाटत आहे’, असे अशोक शिंदे म्हणाले.

सनी देओलचे चाहते ‘गदर २’ या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. ‘गदर २’ची दमदार कमाई पाहून आता निर्माते आणि कलाकार चांगलेच खूश झाले आहेत. दरम्यान, ‘गदर २’चे आठव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. या चित्रपटाने आता ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्यासाठी हा पहिला विकेंड अतिशय दमदार ठरला आह. एका आठवड्यात या चित्रपटाने २८३ कोटींचा गल्ला जमवला आहे.

मलायका आणि अर्जुन यांच्या या पोस्ट पाहून आता ते दोघे वेगळे झाले आहेत का, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. अभिनेता अर्जुन कपूर एकटाच सुट्टीचा आनंद लुटत आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सोलो व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. तर, अभिनेत्री मलायका अरोरा हिचे काही नवे फोटोज नुकतेच समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ती बॉलिवूड स्टार्सचा लाडका कॉमन फ्रेंड ऑरी उर्फ ओरहान अवत्रामणीसोबत लेट नाईट पार्टी करताना दिसली आहे. विशेष म्हणजे या पार्टीत तिचा मुलगा अरहान खानही तिच्यासोबत होता. मात्र, अर्जुन कपूर या पार्टीत दिसला नाही.

सतीश शहा यांनी दादांमधील माणुसकीला सलाम करत या बैलजोडीची आठवण सांगितली आहे. ते म्हणाले की, ‘दादा जेव्हा ‘आगे की सोच’ या चित्रपटाची तयारी करत होते, तेव्हा मला त्यांच्याकडून या चित्रपटातील भूमिकेची ऑफर आली. दादांच्या चित्रपटात काम करायला मिळणार याचा मला खूप आनंद झाला होता. पुण्याजवळील त्यांच्या इंगळी या गावातील फार्महाउस परिसरात या चित्रपटाचं शूटिंग झालं. दादांची एक गोष्ट मला फार आवडायची. ते त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर पोटच्या मुलासारखं प्रेम करायचे. मग, ते शेतातील घर असो, किंवा तेथील वस्तू… हा परिसर त्यांनी खूप छान ठेवला होता. शूटिंग दरम्यान गावातील एक शेतकरी काही अडचणीमुळे त्याच्या बैलजोडीला कत्तलखान्यात घेउन चालला होता. दादांना ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनी ती बैलजोडी आपल्या ताब्यात घेतली. ते बैल त्यांनी शेतातील घरी आणले आणि म्हणाले की, आता ही बैलजोडी इथेच राहिल. मी त्यांचा सांभाळ करेन. मरणाच्या वाटेवरून बैलजोडीला जीवनदान देणाऱ्या दादांनी आयुष्यभर ती बैलजोडी आपल्या पोटच्या मुलांसारखी जपली. दादांच्या अनेक चित्रपटात ती बैलजोडी झळकली. या बैलजोडीसाठी दादा स्वतः काही प्रसंग तयार करायचे आणि ते चित्रपटात दाखवायचे. दादांनी कधीच त्यांच्या या दातृत्वाचा ढोल वाजवला नाही. दादांच्या स्वभावातील ती भावलेली गोष्ट मी कधीच विसरणार नाही.’

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये… आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर ‘जागतिक हेलियम दिवस’ साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक

राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

विजयदुर्गवर आज साजरा होणार ‘जागतिक हेलियम दिवस’

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी ‘साहेबांचा ओट’ या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस ‘जागतिक हेलियम दिवस’ म्हणून करणार आहेत.

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी

कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.

Source link

अमित ठाकरे म्हणाले की, स्थगिती मिळाल्यानंतर का बोलत आहात? वातावरण कोणाविरोधात आहे आणि कोणाच्या बाजूने हे, निवडणूक झाल्यावर कळेल. भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, भीती वाटल असेल, तर निवडणुका पुढे ढकलणं, हा पर्याय नाही. मैदानात उतरा. तुम्ही चुकीचे आहात, म्हणून तुमच्याविरोधात वातावरण आहे. ही लोकशाही असून, लोकांना बोलून द्या,” असे आव्हान अमित ठाकरे यांनी भाजपाला दिले.

मुंबई : बायो मेडिकल वेस्टची (Bio Medical Waste) योग्यप्रकारे विल्हेवाट नाही लावली तर तो केवळ रुग्णालयातील कर्मचारी, परिचारीका यांच्यासाठीच नाही तर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी तो घातकच असतो. या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) आपली चिंता व्यक्त केली आहे. बायो मेडिकल वेस्टची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी रसायनी एमआयडीसी (Rasayani MIDC) इथं तयार होत असलेल्या प्रकल्पाला प्रदूषण नियंत्रण मंडळ (Maharashtra Pollution Control Board), पर्यावरण आणि अन्य विभागानं सहकार्य करावे. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक त्या परवानग्या कमीत कमी वेळेत द्याव्यात, असे आदेशही हायकोर्टानं दिले आहेत.
गोवंडी येथीन न्यू संगम सोसायटीने वाढत्या प्रदूषणाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर प्रशासनाला रसायनी एमआयडीली इथला प्लांट लवकर तयार करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटी व अन्य काही जणांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर यावर शुक्रवारी सुनावणी झाली. गोवंडी इथं बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावली जाते. मात्र, याचा येथील स्थानिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे ही बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट इतरत्र लावावी, अशी मागणी या याचिकेतून हायकोर्टाकडे करण्यात आली आहे.
हा प्रकल्प उभारण्यासाठी विविध विभागाच्या परवानग्या आवश्यक आहेत. तेथील जागेचा ताबा घेण्यापासून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 13 महिन्यांचा कालावधी लागेल, असं हा प्रकल्प उभारणाऱ्या ‘एसएमएस एन्व्होक्लिन कंपनीनं हायकोर्टात सांगितलं आहे. मात्र हा 13 महिन्यांचा कालावधी कमी करण्यासाठी प्रदूषण मंडळानं कंपनी व पालिका अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घ्यावी. या बैठकीत 13 महिन्यांचा कालावधी कमी कसा करता येईल?, याबाबत तोडगा काढावा असंही हायकोर्टानं आपल्या आदेशांत नमूद केलं आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.

या सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असेल. मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा उपस्थित राहणार आहेत.

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर (Mumbai University Senate Election) गुरुवारी प्रशासनाने अचानकपणे स्थगिती दिल्याने एकच गोंधळ उडाला. मुंबई विद्यापीठाने (University Of Mumbai) घेतलेल्या या निर्णयामुळे जवळपास सगळ्याच विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या. आज ठाकरे गट युवा सेना, छात्र भारती, सम्यक विद्यार्थी संघटना, मनविसे आदी संघटनांनी नाराजी व्यक्त केली. विद्यापीठाने अचानक निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर आता, मुंबई विद्यापीठाने निवेदन जारी करत सिनेट निवडणुकीला स्थगिती का दिली, याची माहिती दिली आहे.
मुंबई विद्यापीठाचे पत्र काढून या सर्व सिनेट निवडणुकीच्या स्थगितीवर स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 28 (2) (न) मधील तरतूदीनुसार अधिसभेवर 10 नोंदणीकृत पदवीधर निवडून देण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने सर्व संबंधिताना कळविण्यात आले होते. दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार यादी (सुधारीत) प्रसिद्ध करण्यात आली होता. दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठास अंतिम मतदार यादी (सुधारीत) यामध्ये काही विसंगती असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्याचे कळविण्यात आले.
सदर विसंगतीची तात्काळ सखोल चौकशी करून त्याच दिवशी अहवाल सादर करण्यास कळविले व त्या अनुषंगाने विद्यापीठाने मतदार यादीतील मतदारांची मोठी संख्या पाहता विसंगतीबाबत तात्काळ कार्यवाही करणे शक्य होणार नाही, तसेच याबाबत योग्य ती सखोल चौकशी करण्याकरीता विद्यापीठास वेळ आवश्यक असल्याने शासनाने विद्यापीठास योग्य ते मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली.
त्याअनुषंगाने शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रामध्ये मतदार यादीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी होऊनच निवडणूक प्रक्रिया होणे आवश्यक असल्याने मतदार यादी सुधारीत करून निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठाला निर्देश दिले.
या निर्देशाच्या अनुषंगाने विद्यापीठाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार पुढील आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी परिपत्रक निर्गमित केले. पुढील निवडणूक प्रक्रियेबाबत वेळोवेळी विद्यापीठ निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने म्हटले.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगित दिल्याने राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत. 9 ऑगस्ट रोजी सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. 10 सप्टेंबरला निवडणूक आणि 13 सप्टेंबरला निकाल, असा हा कार्यक्रम होता.
दरम्यान, सिनेट निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार यादीमधील मतदारांच्या नावांमध्ये तफावत असल्याची तक्रार भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली होती. तसे त्यांनी एक पत्र राज्य सरकारला दिलं होतं. त्यानंतर अंतिम आदेश येईपर्यंत या निवडणुकांना स्थगिती देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या.