Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2824

नंदू ननावरे आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग; भावाने बोट कापल्यानंतर अटकसत्र सुरू

0


अंबरनाथ, ठाणे : नंदकुमार ननावरेंनी (Nandkumar Nanavare) 1 ऑगस्टला उल्हासनगरमधील राहत्या घराच्या टेरेसवरून पत्नीसह आत्महत्या केली. या आत्महत्येला अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर (Balaji Kinikar) यांचे पीए जबाबदार असल्याचा आरोप आहे. ननावरे दाम्पत्य काही जणांच्या त्रासाला कंटाळले होते, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. साताऱ्यातील काही लोक आम्हाला मानसिक त्रास देत असल्यानं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं ननावरे आत्महत्येपूर्वी म्हणाले होते, तसा व्हिडीओ त्यांनी रेकॉर्ड केला होता. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे.

चार ते पाच जणांना अटक

धनंजय ननावरे यांच्या या व्हिडीओनंतर ठाणे क्राईम ब्रांचने तात्काळ कारवाई सुरू केली असून, उल्हासनगर तसेच अंबरनाथमधून चार ते पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये विशेष म्हणजे शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहायक शशिकांत साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते कमलेश निकम तसेच नरेश गायकवाड यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

रणजितसिंह निंबाळकरांचंही सुसाईड नोटमध्ये नाव

आत्महत्यापूर्वीच्या व्हिडीओतखासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा उल्लेख केल्याने या आत्महत्येमागे काही राजकीय खेळी तर नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे, मात्र या प्रकरणी रणजितसिंह निंबाळकर यांचाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येचा छडा लावणं आणि आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी ठाणे गुन्हे शाखेला मोठी कसरत करावी लागणार आहे.

बोट कापल्याच्या व्हिडिओनंतर अटकसत्र सुरू

विठ्ठलवाडी पोलिसांच्या दिरंगाईमुळे या प्रकरणाचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता. मात्र तरीही कारवाई न झाल्याने ननावरे यांच्या भावाने आपलं बोट कापत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवणार असल्याचा व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओची दखल घेत तातडीने तपासाची चक्रं फिरली आणि खंडणीविरोधी पथकानं शुक्रवारी (18 ऑगस्ट) काही जणांना अटक केली. यामध्ये शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचे स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते कमलेश निकम, राष्ट्रवादीचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे.

आत्महत्येनंतर उल्हासनगरमध्ये खळबळ

नंदू ननावरे आणि त्यांच्या पत्नी उज्वला ननावरे या दाम्पत्याने दुपारच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर उल्हासनगर परिसरात खळबळ उडाली होती. नंदू ननावरे हे उल्हासनगरच्या दिवंगत आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक (पीए) म्हणून कार्यरत होते, मात्र ज्योती कलानी यांच्या निधनानंतर नंदू ननावरे स्थानिक राजकीय नेत्यांची मंत्रालयीन कागदपत्राची कामं हाताळत होते. 1 ऑगस्टला नंदू ननावरे आणि त्यांच्या पत्नीच्या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली होती.

आत्महत्येपूर्वी ननावरे दाम्पत्याने बनवला व्हिडीओ

आत्महत्या करण्यापूर्वी नंदू ननावरे आणि त्यांच्या पत्नी उजवला ननावरे यांनी एक व्हिडिओ बनवला होता, हा व्हिडीओ त्यांच्या आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्यांनी आपल्या आत्महत्येचं कारण तसंच त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींची नावं घेतली होती. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, असी मागणीही दाम्पत्याने केली होती.

विठ्ठलवाडी पोलिसांवर प्रश्नचिन्ह

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर आता हा गुन्हा ठाणे क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला असून ठाणे क्राईम ब्रांच आरोपींचा शोध घेत होती. आत्महत्येच्या घटनेला साधारण 20 दिवस उलटूनही तपास संथ गतीने होत असल्याचा आरोप नंदू ननावरे यांचे भाऊ धनंजय ननावरे यांनी पोलिसांवर केला. आपल्या भावाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अटक होत नाही तोपर्यंत शरीराचा एक भाग कापून पाठवणार

नंदू ननावरेंच्या भावाने केलेल्या व्हिडीओत त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे योग्य तपासाची मागणी केली असून, जोपर्यंत त्यांच्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ते आपल्या शरीराचा एक भाग छाटून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देणार आहेत, असं म्हणत आहेत. संथ गतीने सुरू असलेला पोलीस तपास जलद गतीने सुरू व्हावा, अशी मागणी देखील बंधू धनंजय ननावरे यांनी केली आहे. धनंजय ननावरे यांनी आपलं एक बोट कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई?

नंदू ननावरे आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये नावं सापडूनही स्थानिक विठ्ठलवाडी पोलिसांनी कारवाईत चालढकल केली. त्यामुळे या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा उल्हासनगरमध्ये सुरू आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ तयार करत आपल्याला कोण त्रास देत होतं, याची माहिती दिली होती. तसंच त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये काही जणांची नावं त्यांनी लिहून ठेवली होती. ही सुसाईड नोट हाती लागूनही गेल्या दोन आठवडे विठ्ठलवाडी पोलिसांनी याप्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मृत ननावरे यांच्या भावाने विठ्ठलवाडी पोलिसांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतरही विठ्ठलवाडी पोलिसांनी या प्रकारणात चालढकल केली. त्यामुळे ही चालढकल आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. या प्रकरणात थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे आता संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा उल्हासनगर शहरात सुरू आहे.

हेही वाचा:



Source link

आधी म्हणाले अजितदादा चक्की पिसिंग, आता त्यांच्यासोबतच किसिंग; अंबादास दानवेंची भाजपवर सडकून टीका

0
आधी म्हणाले अजितदादा चक्की पिसिंग, आता त्यांच्यासोबतच किसिंग; अंबादास दानवेंची भाजपवर सडकून टीका


महाराष्ट्रातील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले होते. त्यावेळी फडणवीस यांनी आमचे सरकार आल्यानंतर अजितदादा तरुंगात जातील, असा दावा केला होता. यावरून अंबादास दानवे यांनी फडणवीस यांच्यावर निशाला साधला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, “ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असणारे पुरावे घेऊन यायचं, आधी अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचं आणि आता अजितदादा किसिंग किसिंग चालू आहे.”



Source link

धक्कादायक! एकाच दिवशी भाऊजीची अन् मेहुण्याची आत्महत्या; परिसरात खळबळ

0
धक्कादायक! एकाच दिवशी भाऊजीची अन् मेहुण्याची आत्महत्या; परिसरात खळबळ


Aurangabad News : औरंगाबादमध्ये (Aurangabad) एक धक्कादायक घटना समोर आली असून, एकाच दिवशी भाऊजीची अन् मेहुण्याने वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या (Suicide) केली आहे. मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्यातून भाऊजीने विष प्राशन करून, तर मेहुण्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कन्नड तालुक्यातील टाकळी अंतुर आणि सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे एकाच दिवशी या दोन्ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. तर, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजू लिंबाजी गायकवाड (वय 32 वर्षे, रा. मृत राजू गायकवाड टाकळी अंतुर, ता. कन्नड) व विनोद शालिक बनसोड (वय 30 वर्षे, रा. हट्टी, ता. सिल्लोड) असे आत्महत्या करणाऱ्या भाऊजी व मेहुण्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, टाकळी अंतुर-चिंचोली लिंबाजी रस्त्याला लागून असलेल्या गट नं 201 मधील शेतात राजू गायकवाड हे वास्तव्य करत होते. आई, वडील व दोन्ही भावातून विभक्त राहत होते. राजू याचा अकरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पण लग्नाला 11 वर्षे उलटूनही मुलबाळ होत नसल्याने ते सतत तणावात व नैराश्यात राहायचे. दरम्यान, राजू यांची पत्नी चार-पाच दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. राजू हे घरी एकटेच होते. शुक्रवारी सकाळी राजू यांनी शेतातील राहत्या घरात विष प्राशन केले. 

मेहुण्याने देखील केली आत्महत्या….

दुसरीकडे याच दिवशी सिल्लोडच्या हट्टी येथील युवा शेतकरी तथा राजू गायकवाड यांचे मेहुणे विनोद बनसोडे यांनी देखील आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास गावातीलच स्वतःच्या गॅरेजमध्ये विनोद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतात काहीच पिकत नसल्याने त्यांनी स्वतःचा गॅरेज टाकला होता. पण, मागील काही दिवसांपासून त्यांची आर्थिक परीस्थिती बेताचे होती. त्यात बँकेतून कर्ज घेऊन पेरणी केली. पण पावसाने पाठ फिरवल्याने शेतातून काही हाती येण्याची अपेक्षा कमी झाली होती. डोळ्यासमोर नापिकी दिसून येत असल्याने बँकेच्या कर्जासह इतर खासगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. एकाच दिवशी भाऊजीची अन् मेहुण्याची आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

घाटी रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू 

राजू गायकवाड यांनी शेतातच विष प्राशन केले. तसेच याबाबत शेतात वखरणीचे काम करत असलेल्या बापू मोरे यांना सांगितली. मोरे यांनी तत्काळ त्यांचा मोठा भाऊ विजू गायकवाड यांना ही माहिती दिली. त्यांनी तातडीने मित्रांच्या मदतीने राजू यांना चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी रेफर करण्यास सांगितले. सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना औरंगाबाद येथे जाण्यास सांगितले. मात्र, शासकीय घाटी रुग्णालयात पोहोचण्याआधीच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.

इतर महत्वाच्या बातम्या: 

कुठे गुंडांचा हैदोस, तर कुठं नशेखोरांची हुल्लडबाजी; औरंगाबादेत गुन्हेगारांमधील पोलिसांचा धाक उरला नाही?



Source link

OMG 2 Collection: दुसऱ्या आठवड्यात अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ची चांगली सुरुवात! पाहा किती झाले कलेक्शन…

0
OMG 2 Collection: दुसऱ्या आठवड्यात अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ची चांगली सुरुवात! पाहा किती झाले कलेक्शन…


‘ओएमजी २’च्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात चांगली झाली आहे. तर, १५ ऑगस्टच्या सुट्टीचा फायदाही या चित्रपटाला मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाची कमाई चांगली झाली आहे. आता हा चित्रपट १०० कोटींच्या ओपनिंगकडे वेगाने वाटचाल करत आहे. प्रौढ शिक्षणावर आधारित ‘ओएमजी २’चे पहिल्या आठवड्यातील कलेक्शन ८५.०५ कोटींवर थांबले आहे. आता दुसऱ्या आठवड्याच्या ओपनिंगमध्ये या चित्रपटाने ९० कोटींचा आकडा पार केला आहे.



Source link

Pune Crime : फेसबुकवरील मैत्रिणीला हॉटेलमध्ये भेटणे पडले महागात; पुण्यातील व्यावसायिकाबरोबर घडला भलताच प्रकार

0
Pune Crime : फेसबुकवरील मैत्रिणीला हॉटेलमध्ये भेटणे पडले महागात; पुण्यातील व्यावसायिकाबरोबर घडला भलताच प्रकार


पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असणाऱ्या व्यावसायिकाला फेसबूक वरील एका मुलीशी मैत्री चांगलीच भोवली आहे. त्याच्या फेसबूक वरील मैत्रिणीने त्याला भेटायला हॉटेल वर बोलावले. मात्र, हॉटेलमध्ये गेल्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना पकडत सायबर पोलीस असल्याचं भासवून व्यावसायिकाला तब्बल ५३ हजार ५०० रुपयांना लुटले. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ ऑगस्टरोजी घडला.



Source link

Ishwarlal Jain : EDच्या कारवाईवर ईश्वरलाल जैन यांची एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत

0
Ishwarlal Jain : EDच्या कारवाईवर ईश्वरलाल जैन यांची एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत



<p>शरद पवार यांचे निकटवर्तीय ईश्वरलाल जैन आणि साथीदारांच्या जवळपास नऊ ठिकाणांची ईडीनं गेल्या दोन दिवसांत झडती घेतली आहे. &nbsp;ईडीच्या मुंबई स्थित झोन-2 युनिटने या प्रकरणाचा तपास केला आणि मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद आणि जळगाव येथे शोध घेतला. ईडीने कागदपत्रे तसेच डिजिटल पुरावे गोळा केल्याचा दावा केला आहे. तसंच, जळगावमधील कार्यालयातून ईडीनं शुक्रवारी ८७ लाखांची रोकड आणि कोट्यवधींचं सोनं जप्त केलं. हा ऐवज जळगावमधील स्टेट बँकेत&nbsp;<br />ठेवण्यात आला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये स्टेट बँकेनं आरएल ज्वेलर्सविरोधात सीबीआयकडे एफआयआर दाखल केली होती. त्याबाबत ईडी तपास करत आहे.&nbsp;</p>



Source link

Actor Pawan: अवघ्या २५व्या वर्षी अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप! हृदयविकाराचा झटका ठरलं कारण

0
Actor Pawan: अवघ्या २५व्या वर्षी अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप! हृदयविकाराचा झटका ठरलं कारण


Actor Pawan Passes Away: अभिनेता पवन याने वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेता पवन अनेक हिंदी आणि तमिळ मालिकांमध्ये झळकला होता.



Source link

Pune Pimpri-chinchwad: गणेश वर्गणीसाठी तगादा लावला तर होणार कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचा मंडळांना इशारा

0
Pune Pimpri-chinchwad: गणेश वर्गणीसाठी तगादा लावला तर होणार कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचा मंडळांना इशारा


पुणे : पुण्यातील गणेशशोत्सव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. या सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या साठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सोहळा साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा केली जात आहे. मंडळाचे कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करत आहेत. दरम्यान, ही वर्गणी गोल करतांना अनेकदा जबरदस्ती केली जाते. तसेच मारहाण देखील केली जाते. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी मंडळांना इशारा दिला आहे. ‘वर्गणी गोळा करताना कोणावरही जबरदस्ती करू नका,’ असे केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे. नागरिकांनी तक्रारी केल्यास गुन्हे दाखल केले जाईल असा, इशारा त्यांनी दिला आहे.



Source link

Satvya Mulichi Satavi Mulgi: मनोरमा कोण? अवघ्या महाराष्ट्राला पडलाय प्रश्न! अद्वैत-नेत्रा अखेर शोधणार उत्तर

0
Satvya Mulichi Satavi Mulgi: मनोरमा कोण? अवघ्या महाराष्ट्राला पडलाय प्रश्न! अद्वैत-नेत्रा अखेर शोधणार उत्तर


या गूढ ‘मनोरमा’चं राजाध्यक्षांच्या घरात नेत्राला दिसणं, पद्माकर आजोबांचं भूतकाळ आठवून अस्वस्थ होणं, इंद्राणीने रूपालीला आजोबांना मारायला सांगणं, नेत्राला दिसणाऱ्या मृत्यूच्या संकेतांची साखळी, अशा महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा मालिकेत लवकरच होणार आहे. अव्दैत-नेत्राने मनोरमाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यामुळे मनोरमाचं सत्य काय? त्रिनयना देवीचं वरदान असलेली ती तिसरी स्त्री कोण? मनोरमाचा आत्मा स्वतःहून नेत्राला हे सगळं सांगणार का… याची उत्तरंही प्रेक्षकांना मालिका पाहताना मिळणार आहेत.



Source link

KBC 15: शरीरात ३००हून अधिक फ्रॅक्चर तरीही संयमी खेळ! थोडक्यात हुकली राहुलची १ कोटी जिंकण्याची संधी

0
KBC 15: शरीरात ३००हून अधिक फ्रॅक्चर तरीही संयमी खेळ! थोडक्यात हुकली राहुलची १ कोटी जिंकण्याची संधी


राहुल ज्या पद्धतीने मन शांत ठेवून आणि संयमीपणे प्रश्नांची उत्तरे देत होता, ते पाहून खुद्द अमिताभ बच्चनही थक्क झाले. केबीसीच्या सेटवर उपस्थित असलेल्या अनेकांना वाटत होते की, ३१ वर्षीय राहुल या खेळात १ कोटी रुपये नक्की जिंकेल. मात्र, १ कोटीच्या प्रश्नाचे उत्तर न आल्याने राहुलने ५० लाख रुपये घेऊन हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. राहुल हा मध्य प्रदेश राज्यातील भोपाळच्या ग्रामीण बँकेच्या शाहपुरा शाखेत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो.



Source link