Friday, July 17, 2026
Home Blog Page 2821

संजय राऊत हे पवार कुटुंबाचे सदस्य झाले का? धनंजय मुंडेंची टीका

0
संजय राऊत हे पवार कुटुंबाचे सदस्य झाले का? धनंजय मुंडेंची टीका


बीड : शरद पवार यांची साथ सोडून भाजपासोबत गेलेले अजित पवार यांनी आता शरद पवार यांच्या संस्थेतील देखील पदाचे राजीनामे द्यावेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यानंतर राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. संस्थेतील राजीनामाचा प्रश्न हा अजित पवार आणि शरद पवार एकत्र मिळून निर्णय घेतील, कारण हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, संजय राऊत हे पवार कुटुंबाचे सदस्य झाले आहेत का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. येत्या 27 तारखेला बीडमध्ये होणारी सभा ही उत्तर सभा नसून बीड जिल्ह्याच्या विकासाची, सन्मानाची आणि अस्मितेची सभा असेल असंही ते म्हणाले. 

येत्या 27 तारखेला अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होणार असून या सभेच्या तयारीसाठी धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये आज एक बैठक घेतली. त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “27 तारखेची सभा ही यापूर्वीच होणार होती, मात्र काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे 17 तारखेला झालेल्या शरद पवार यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नसून बीड जिल्ह्याची अस्मिता, विकास आणि सन्मानाची सभा आहे. 17 तारखेला झालेल्या सभेला 2024 मध्ये जनताच उत्तर देईल.”

बीडमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची 17 तारखेला सभा झाली आणि या सभेमध्ये परळी येथील बबन गीते यांनी शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या समोर एक आव्हान उभं राहिल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्यामुळे माझ्यासमोर कुठलंही मोठं आव्हान नसून परळी मतदारसंघात केलेली काम आणि विकास आणि लोकांच्या मनामध्ये मी स्थआन मिळवलेलं आहे. 

जिल्हाध्यक्ष काय म्हणाले ?

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची बीडला सभा झाल्यानंतर त्याला उत्तर देणारी उत्तर सभा ही बीड शहरातील मल्टीपर्पज ग्राउंड वरती येत्या 27 तारखेला होणार आहे. या संदर्भामध्ये बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी सुद्धा बीडमध्ये नियोजित सभा होणारच असल्याचे सांगितले आहे. बीडमध्ये होणाऱ्या या सभेला मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नऊ मंत्री येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी 27 तारखेला सभा होणार आहे, अशी माहिती दिली आहे.

पवारांच्या सभेत पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप? 

दरम्यान, 17 ऑगस्ट रोजी बीडमध्ये झालेल्या शरद पवारांच्या सभेत पैसे देऊन लोकांना जमवल्याचा आरोप होत आहे. तर, काही महिला पैसे वाटप करत असल्याचे देखील तथाकथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात पवारांच्या सभेला महिलांना पैसे देऊन आणण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर अजून तरी दोन्ही गटाची अधिकृत अशी प्रतिक्रिया आलेली नाही. 

ही बातमी वाचा: 

 



Source link

Ladakh Accident: लडाख अपघातात साताऱ्याचे वैभव भोईटे शहीद; राजाळे गावात शोककळा

0
Ladakh Accident: लडाख अपघातात साताऱ्याचे वैभव भोईटे शहीद; राजाळे गावात शोककळा


Satara Jawan Dies In Ladakh Accident: लडाख अपघातात साताऱ्याचे वैभव भोईटे शहीद झाल्याने राजाळे गावात शोककळा पसरली आहे.



Source link

राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील कारवाई अन्यायकारक; जळगावच्या सराफ व्यावसायिकांची प्रतिक्रिया

0
राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील कारवाई अन्यायकारक; जळगावच्या सराफ व्यावसायिकांची प्रतिक्रिया


जळगाव : जळगावमधील (Jalgaon) राजमल लखीचंद परिवाराची एकशे पासष्ट वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा आहे. मात्र ईडीच्या (ED) कारवाईमुळे आरएल परिवार अडचणीत सापडला आहे, मात्र लवकरच यातून बाहेर पडेल, असा विश्वास आहे. सोन्याचा व्यवसाय करताना व्यापारी प्रामाणिकपणे काम करत असला तरी कधी कधी काम करताना चुका होतात, त्याचा फटका व्यापार करताना बसतो, अशी खंत जळगावच्या सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. 

जळगाव येथील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर (Rajmal Jwellers) ईडीने छापेमारी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) खळबळ उडाली. तब्बल 45 तास चौकशी करण्यात आली. तीन दिवसांच्या छाप्यांमध्ये 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. यानंतर जळगाव येथील सोने व्यावसायिकांनी या कारवाई आक्षेप घेत ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले आहे. राजमल लखीचंद परिवाराची एकशे पासष्ट वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा आहे. त्यांनी संपूर्ण देशभर लोकांच्या विश्वास कमावला आहे. त्यांनी काही गैर कृत्य केले असे वाटत नाही, त्यांच्यासोबत झालेली कारवाई दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया सराफ असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. 

जळगावमधील जळगाव जिल्हा सुवर्ण असोसिएशनचे (Saraf Association)  सचिव स्वरूप लुंकड यांनी म्हटलं आहे की, आरएल गृपवर झालेली कारवाई कायद्याला धरुन असायला हवी. आरएल ग्रुपने बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात बँकेने चार टक्के ऐवजी सोळा टक्के व्याज आकारणी केली आणि त्यातून हा वाद निर्माण झाला. या वादातून ईडी किंवा सीबीआयसारख्या यंत्रणा लावण्याऐवजी हा वाद आपसात सोडवायला पाहिजे होता. राजमल लखीचंद परिवाराची एकशे पासष्ट वर्षांची सोने व्यवसायाची परंपरा आहे. मात्र ईडीच्या कारवाईमुळे आर एल परिवार अडचणीत सापडला आहे, मात्र लवकरच यातून बाहेर पडेल, असा विश्वास आहे. सोन्याचा व्यवसाय करताना व्यापारी प्रामाणिकपणे काम करत असला तरी कधी कधी काम करताना चुका होतात, त्याचा फटका व्यापार करताना बसतो, अशी खंत जळगावच्या सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. 
   
या घटनेत आरएल (R L Jwellers) ज्वेलर्सबाबत सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीसारख्या यंत्रणा वापरल्या गेल्या, हे व्हायला नको होते. त्यांच्या या कारवाईनंतर ज्वेलर्समधील सगळा माल घेऊन गेल्याने जळगाव सुवर्ण नगरीत एखाद्या दुकानातून संपूर्ण माल घेऊन जाणे ही कारवाई शंभर टक्के अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया स्वरूप लूंकड यांनी दिली आहे. व्यापारी म्हणून याकडे पाहिले की ईडीने केलेली कारवाईमध्ये संपूर्ण माल घेऊन जाणे. ज्या फर्मशी वाद आहे, ती फर्म सोडून दुसऱ्या फर्मचा माल जप्त करून घेऊन जाणे, त्यांचा व्यवसाय ठप्प करणे, हे दंडूकशाही आणि अन्यायकारक आहे. या कारवाईमुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले अडीचशे कर्मचारी व्यवसायावर अवलंबून आहे. त्यांचा जगण्याचा प्रश्न या कारवाईने निर्माण झाला आहे. यामध्ये कायदेशीररित्या यांची चूक असेल तर कायद्याप्रमाणे कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया सराफ असोसिएशनचे विजय वर्मा यांनी दिली. 

 1.11 कोटी रुपयांची रक्कम जप्त

ईडीने केलेल्या कारवाईत राजमल लखीचंद ग्रुपच्या 60 मालमत्तेचा तपशील हाती लागला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने जळगाव, नाशिक आणि ठाण्यात 13 ठिकाणी शोधमोहीम राबवली. अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या तीन दिवसात मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय ईश्वरलाल जैन आणि त्याचा साथीदारांच्या जवळपास 13 ठिकाणांची झडती घेतली. ईडीने गेल्या तीन दिवसांत टाकलेल्या छाप्यांमध्ये 24.7 कोटी रुपयांचे 39.33 किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. त्याशिवाय, ईडीला काही महत्त्वाच्या गोष्टी आढळून आल्या आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ED Raid : आर एल ज्वेलर्सवर कारवाई, जळगावसह 13 ठिकाणी छापे; ईडीला काय सापडले?



Source link

Jalna Sex Racket : जालन्यात कॉफीशॉपमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड; धाड टाकताच नको त्या अवस्थेत आढळले विद्यार्थी

0
Jalna Sex Racket : जालन्यात कॉफीशॉपमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड; धाड टाकताच नको त्या अवस्थेत आढळले विद्यार्थी



Jalna Sex Racket: जालन्यात एका कोचिंग क्लासेसजवळ सुरू असलेल्या कॉफी शॉपमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला. पोलिसांनी कॉफी शॉपवर धाड टाकताच विद्यार्थी नको त्या अवस्थेत आढळले.



Source link

Kaas plateau : कास पठार बहरले; रानफुलांच्या रंगोत्‍सवाला सुरूवात | पुढारी

0









सातारा : पुढारी ऑनलाईन जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर विविध रानफुलांचा रंगोत्सवाला सुरूवात झाली आहे. विविध फुलांच्या रंगेबिरंगी कळ्या उमलल्या असून, पुढील 10 दिवसांत पठार विविध फुलांनी बहरणार आहे. यंदा कासचा हंगाम दि.1सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. दरम्‍यान पर्यटक आतापासूनच पठारावर हजेरी लावत आहेत. शनिवारी आणि रविवारी या दोन सुट्टींच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक पठारावर हजेरी लावत आहेत.

कास पठारावर विविध रंगी, आकर्षक फुले उमलल्‍यानंतर या ठिकाणच्या निसर्गाचे रूपडेच बदलून जाते. या फुलांवर पसरलेली धुक्‍याची दुलई त्‍यावर बागडणारी इवलीशी फुलपाखरे ही मन मोहवून टाकतात. या फुलांचा मनमोहक नजारा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पर्यटक कास पठारावर हजेरी लावत असतात. इथल्‍या निसर्गसौदर्याची ख्याती आता सर्वदूर पोहोचली असून, पर्यटक, निसर्गप्रेमी या फुलांच्या बहरण्याचा एक प्रकारे वाटच पाहत असतात. ऑगस्‍ट ते सप्टेंबर महिण्याच्या दरम्‍यान पठारावर कळ्या येउन त्‍या उमलण्यास सुरूवात हाते. यंदा १ सप्टेंबरपासूनच कासचा हंगाम सुरू होणार असल्‍याने पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होणार आहे. 

हेही वाचा : 











Source link

AP Dhillon: अखेर बोभाटा झालाच! खुशी कपूर नव्हे, एपी ढिल्लोनने चाहत्यांना दाखवला खऱ्या गर्लफ्रेंडचा चेहरा

0
AP Dhillon: अखेर बोभाटा झालाच! खुशी कपूर नव्हे, एपी ढिल्लोनने चाहत्यांना दाखवला खऱ्या गर्लफ्रेंडचा चेहरा


एपी यापूर्वी अनेकदा बनिता संधूसोबत दिसला होता. पापाराझींनी या दोघांनाही अनेकदा आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. मात्र, आता नुकतेच एपी ढिल्लोन आणि बनिता यांचा एक म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे, ज्यामध्ये दोघांची उत्कृष्ट केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्याही चर्चेत आल्या होत्या.



Source link

Ganesh festival : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मोफत बस सेवा; तर कोल्हापूरमार्गे जाण्याऱ्यांना टोलमाफी

0
Ganesh festival : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मोफत बस सेवा; तर कोल्हापूरमार्गे जाण्याऱ्यांना टोलमाफी



Ganesh festival : गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्त मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना खास गिफ्ट दिले आहे.



Source link

जत तालुक्यात पाण्याच्या मागणीवरुन पुन्हा एल्गार, कर्नाटक एकीकरण समिती स्थापन करण्याचा इशारा

0
जत तालुक्यात पाण्याच्या मागणीवरुन पुन्हा एल्गार, कर्नाटक एकीकरण समिती स्थापन करण्याचा इशारा


सांगली : जत (JAT) तालुक्याच्या पूर्व भागातील आणि सीमावर्ती भागातील गावांच्या पाण्याचा प्रश्न हा दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. तसेच, या भागासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मंजूर केलेली विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाला देखील अजून सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या भागातील लोकांसाठी शेवटचा पर्याय हा कर्नाटकात (Karnataka) सामील होण्याचा असणार असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच, या भागामध्ये कर्नाटक एकीकरण समिती स्थापन करण्याचा आणि कानडी फलक लावण्याचा इशारा पाणी संघर्ष समितीने महाराष्ट्र सरकारला दिला आहे. 

म्हैसाळ योजनेचं काम अजूनही सुरु नाहीच

काही महिन्यांपूर्वी पूर्व भागातील जनतेने आंदोलन केल्यानंतर आणि कर्नाटकात जाण्याचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली होती. त्यानंतर या बैठकीमध्ये म्हैसाळ योजनेतून पाणी देण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.   नऊशे पन्नास कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचं गावकऱ्यांना सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात अजूनही कोणतचं काम सुरु नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

जर कर्नाटकात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत, शेतीला पाणी दिले जात आहे तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया पाणी संघर्ष समितीने दिली आहे. तसेच जर जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण निविदा काढून म्हैसाळ योजनेच्या कामाला सुरुवात न केल्यास कर्नाटकात सामील होण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

महाराष्ट्रामध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याचा दावा या समितीकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच  जनआंदोलन उभं करुन कर्नाटक एकीकरण समिती स्थापन करू, कर्नाटकात जाऊ. तसेच सीमेवर आणि प्रत्येक गावामध्ये कन्नड भाषेतील फलक लावू असा इशारा आता देण्यात आला आहे. 

राज ठाकरे यांना संतप्त नागरिकांचा सवाल

जत तालुक्याच्या पाणी प्रश्नाने येथील नागरिक संतप्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच या गावकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील सवाल विचारला आहे. महाराष्ट्र अखंड राहण्यासाठी आग्रह धरणारे आणि प्रयत्न करणारे मनसेचे अध्यक्ष जत गावकऱ्यांच्या या इशाऱ्याबाबत कोणती भूमिका घेणार असा सवाल गावकऱ्यांनी विचारला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेकडेही आता गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबई – गोवा महामार्गासाठी आक्रमक भूमिका घेणारे राज ठाकरे आता जत तालुक्यासाठी काही भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sangli News : सांगली जिल्ह्यात पुन्हा ‘लम्पी’चे सावट, अवघ्या 11 दिवसात हजारांवर जनावरे बाधित; जनावरांचा आठवडी बाजार, बैलगाडा शर्यतीला बंदी



Source link

Gadar 2: हेमा मालिनी यांनी पाहिला सावत्र लेकाचा चित्रपट; ‘गदर २’बद्दल बोलताना म्हणाल्या…

0
Gadar 2: हेमा मालिनी यांनी पाहिला सावत्र लेकाचा चित्रपट; ‘गदर २’बद्दल बोलताना म्हणाल्या…


Hema Malini Reaction on Gadar 2: हेमा मालिनी काळी पँट आणि गुलाबी रंगाचा टॉप परिधान करून अतिशय स्टायलिश अवतारात मुंबईतील चित्रपटगृहात ‘गदर २’ पाहायला आल्या होत्या.



Source link

ED Raid : आर एल ज्वेलर्सला ईडीचा दणका; नाशिक, जळगावसह १३ ठिकाणी छापे, २४ कोटींचे दागिने जप्त

0
ED Raid : आर एल ज्वेलर्सला ईडीचा दणका; नाशिक, जळगावसह १३ ठिकाणी छापे, २४ कोटींचे दागिने जप्त


राजमल लखीचंद जळगाव भागीदारी फर्मसोबतच्या लेखापुस्तकात देखील अनेक बोगस विक्री-खरेदीचे व्यवहार दाखविण्यात आल्याचे तपासात आढळले आहे. खोट्या व्यवहारावर दागिन्यांसाठी खरेदी दाखवून स्टॉकवर घेतलेले कर्ज बुडवले गेल्याचे तपासात पुढे आले आहे. प्रवर्तक राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, आरोपी कंपन्यांनी कर्जाचा खरा वापर सिद्ध करण्यासाठी कोणतेही आधारभूत कागदपत्र सादर केले नाहीत. फसवणूक करून नवीन कर्जासाठी अर्ज करण्यासाठी डमी संचालक करत खोटी कंपनी देखील करण्यात आली होती.



Source link