Friday, July 17, 2026
Home Blog Page 2820

Gadar 2 Collection: ‘गदर २’ने घातलाय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ४०० कोटींच्या क्लबमध्येही एन्ट्री करणार!

0
Gadar 2 Collection: ‘गदर २’ने घातलाय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ४०० कोटींच्या क्लबमध्येही एन्ट्री करणार!

‘गदर २’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले आहे. रिलीजच्या अवघ्या १० दिवसांतच या चित्रपटाने जवळपास ३५० कोटींचा टप्पा गाठला आहे. अशा परिस्थितीत ४०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचण्यासाठी या चित्रपटाला आता काहीच काळ वाट पाहावी लागणार आहे. ‘सॅकनिल्क’ने आता या चित्रपटाच्या १०व्या दिवसाच्या कलेक्शनचे अंदाजे आकडे जाहीर केले आहेत. या आकडेवारीनुसार रविवारी या चित्रपटाने तब्बल ४० कोटींची कमाई केली आहे. जर कमाईचा हा आकडा योग्य असेल, तर ‘गदर २’ची आतापर्यंतची दहा दिवसांची एकूण कमाई ३७६.२० कोटी रुपये होणार आहे.

Source link

Adil Khan: राखीचा खरा चेहरा समोर आणणार! तुरुंगातून बाहेर आलेल्या आदिल दुर्राणीने दिला इशारा

0
Adil Khan: राखीचा खरा चेहरा समोर आणणार! तुरुंगातून बाहेर आलेल्या आदिल दुर्राणीने दिला इशारा

दरम्यान, आदिल खानने असा खुलासा केला की, राखी सावंतसोबतच या संपूर्ण प्रकरणामध्ये इतरही अनेक लोक सामील आहेत. मात्र, पापाराझींनी आदिल खानला ‘तो राखी सावंतला पुन्हा भेटणार का?’ विचारताच त्याने काहीही उत्तर दिले नाही. पहिल्या लग्नाप्रमाणेच राखी सावंतने आदिल खानसोबत गुपचूप दुसरे लग्न केले. मात्र, काही महिन्यांतच आदिल खानला तुरुंगात टाकल्यानंतर राखी सावंतने तिची बाजू साऱ्या जगासमोर मांडली.

Source link

Sana Khan Birthday: सना खानवर लागला होता किडनॅपिंगचा आरोप! अभिनेत्रीबद्दल ‘हे’ ऐकलंयत का?

0
Sana Khan Birthday: सना खानवर लागला होता किडनॅपिंगचा आरोप! अभिनेत्रीबद्दल ‘हे’ ऐकलंयत का?

सना खानने आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले. तिने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरातींमधून केली होती. सनाने हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००५मध्ये सना खानने ‘यही है हाई सोसायटी’ या लो बजेट अॅडल्ट चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. यासोबतच ती टीव्ही जाहिरातींमध्येही झळकत होती. ‘बॉम्बे टू गोवा’, ‘धन धना धन गोल’ या चित्रपटांमध्ये तिच्या भूमिका विशेष गाजल्या. हिंदी चित्रपटांमध्ये फारसे यश न मिळाल्याने तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे आप मोर्चा वळवला. २०१४मध्ये सना सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात दिसली होती. यानंतर तिने ‘वजाह तुम हो’ आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ हे चित्रपट केले.

Source link

Kalyan crime : कल्याण हादरले ! अल्पवयीन प्रेयसीचं थेट रेल्वेतून अपहरण; प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
Kalyan crime : कल्याण हादरले ! अल्पवयीन प्रेयसीचं थेट रेल्वेतून अपहरण; प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kalyan crime : कल्याण येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचे थेट रेल्वेतून अपहरण केले. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या प्रियकराला अटक केली आहे.

Source link

Bhumika Chawla Birthday: सलमानच्या ‘तेरे नाम’मधून तुफान प्रसिद्धी मिळवणारी भूमिका चावला सध्या काय करते?

0
Bhumika Chawla Birthday: सलमानच्या ‘तेरे नाम’मधून तुफान प्रसिद्धी मिळवणारी भूमिका चावला सध्या काय करते?

भूमिका चावला हिने आतापर्यंत ‘रन’, ‘दिल ने जिस अपना कहा’, ‘गांधी माय फादर’, ‘सिलसिले’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पंण, या अभिनेत्रीचे सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. भूमिकाने २०१६मध्ये ‘एमएस धोनी’ चित्रपटात सुशांत सिंहच्या बहिणीची भूमिका केली होती. भूमिका बॉलिवूड चित्रपटांपासून दूर असली तरी, साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. अभिनेत्रीने २००७मध्ये प्रियकर भरत ठाकूरसोबत लग्न केले. भरत ठाकूर हा योग शिक्षक आहे. आता या जोडीला एक मुलगा देखील आहे.

Source link

महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म; आज इतिहासात

0
महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म; आज इतिहासात

21st August In History: आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म आजच्या दिवशी झाला, त्यांना ‘जलनायक’ म्हणून संबोधलं जातं. ख्यातनाम सनईवादक बिस्मिल्ला खान यांचं निधन आजच्या दिवशी झालं. आजच्या दिवशी इतर कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे आजच्या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया.

1934: महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांची 21 ऑगस्ट रोजी जयंती. महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये त्यांचा जन्म झाला. सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री होते आणि त्यांना ‘जलनायक’ म्हणून ओळखलं जातं. जलसंधारणाचं खरं कार्य सुधाकरराव नाईक यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा नाहीसा करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती करून राज्यात भरीव काम केलं आणि त्यामुळेच  महाराष्ट्र सरकारने 10 मे हा त्यांचा स्मृतिदिन ‘जलसंधारण दिन’ म्हणून घोषित केला आहे.

देशात पहिल्यांदाच जलसंधारण खात्याची स्वतंत्र निर्मिती करून त्यांनी जलक्रांतीची बीजं रुजवली. पाणी अडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र त्यांनी लोकांना दिला. महिला आणि बालकल्याण विभागाची निर्मिती देखील सुधाकरराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत झाली. मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढीसाठी सुधाकरराव नाईक यांनी मुलींचं शैक्षणिक शुल्क माफीचं तसेच उपस्थिती भत्ता सारख्या कल्याणकारी योजना सुरू केल्या.

सुधारकरराव नाईक यांनी राजकारणाची सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थेपासून केली होती. यामुळे प्रशासन कसं काम करतं याचा दांडगा अनुभव होता. मुख्यमंत्री पदापासून ते राज्यपाल पदापर्यंत त्यांनी उत्कृष्ट काम केलं.

2006: भारतरत्न ख्यातनाम सनईवादक बिस्मिल्ला खान यांचं निधन

लग्नसमारंभ किंवा कोणतंही शुभकार्य, अशा मंगलमय वातावरणाला सनईचे सूर अधिकच प्रसन्न बनवतात. भारतामधील सनई या वाद्याला जगभर खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली ती म्हणजे उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी. उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा जन्म 21 मार्च 1916 रोजी बिहारमधील डुमरोन येथे झाला, त्यांचे वडील भोजपूरच्या राजाच्या दरबारी संगीतकार होते. घरात संपूर्णपणे कलेचं वातावरण असल्यामुळे बिस्मिल्लाह खान अगदी लहान वयातच सनई वाजवायला शिकले. बिस्मिल्लाह खान यांच्यासाठी संगीत हेच आयुष्य होतं.

1947 साली ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी पंडित नेहरूंना वाटलं या क्षणी बिस्मिल्ला खान यांची सनई वाजली पाहिजे. बिस्मिल्लाह खान त्यावेळी मुंबईत होते, त्यांना विमानाने दिल्लीत आणलं गेलं आणि सुजान सिंह पार्क येथे राजकीय पाहुणे म्हणून त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. 1959 साली यांनी ‘गूँज उठी शहनाई’ या सिनेमात बिस्मिल्ला खान यांनी संगीत दिग्दर्शनही केलं होतं.’दिल का खिलौना हाए टूट गया’ या गाण्याला बिस्मिल्ला खान यांनी संगीत दिलं होतं. बिस्मिल्ला खान यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये सनई वादकाची भूमिकाही साकारली होती.

एम. एस. सुब्बलक्ष्मी आणि रविशंकर यांच्यानंतर, उस्ताद बिस्मिल्ला खान हे सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त करणारे तिसरे शास्त्रीय संगीतकार होते. त्यांना पद्मश्री (1961), पद्मभूषण (1968), पद्मविभूषण (1980) आणि भारतरत्न (2001) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीत साधनेला वाहिलं. अखेर 21 ऑगस्ट 2006 रोजी वयाच्या 90व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

1917: भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचे शिल्पकार विनू मांकड यांचं निधन

मूलवंतराय हिम्मतलाल मांकड म्हणजेच विनू माकंड यांचा जन्म 12 एप्रिल 1917 साली जामनगरमध्ये झाला होता. त्यांनी 233 प्रथम श्रेणीचे सामने खेळले. तर, 44 कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. कसोटी सामन्यात 31.47 च्या सरासरीने त्यांनी 2,109 धावा केल्या. त्यात पाच शतकं आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. 231 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यांनी गोलंदाजीत कमाल दाखवत 162 बळी घेतले. 52 धावांत 8 गडी ही त्यांची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ठरली.

भारताला 1932 साली कसोटी क्रिकेटसाठीची मान्यता मिळूनही संघाला पहिल्या कसोटी विजयासाठी दोन दशकं वाट पाहावी लागली होती. विजय हजारे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 1952 साली इंग्लंडवर एक डाव आणि आठ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. विनू मांकड यांनी या कसोटीत इंग्लंडचे 12 गडी बाद केले होते.

इतर महत्त्वाच्या घटना:

1871: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म. (मृत्यू: 17 नोव्हेंबर 1935)

1888: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचं पेटंट घेतलं.

1911: पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातून लिओनार्डो-द-व्हिन्सी याचं मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेलं.

1915: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि चित्रपट निर्माता इस्मत चुगताई यांचा जन्मदिन.

1976: प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पांडुरंग नाईक यांचं निधन. (जन्म: 13 डिसेंबर 1899)

1981: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, पत्रकार- पद्मविभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते काका कालेलकर यांचं निधन. (जन्म: 1 डिसेंबर 1885)

2001: मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर यांचं निधन.

2000: स्वातंत्र्यलढ्यातील आणि गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत विनायकराव कुलकर्णी यांचं निधन.

2012: आफ्रिकन देश डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये इबोला विषाणूच्या संसर्गामुळे 20 लोकांचा मृत्यू झाला.

2022: भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान 50 लोकांचं निधन.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये… आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर ‘जागतिक हेलियम दिवस’ साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक

राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

विजयदुर्गवर आज साजरा होणार ‘जागतिक हेलियम दिवस’

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी ‘साहेबांचा ओट’ या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस ‘जागतिक हेलियम दिवस’ म्हणून करणार आहेत.

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी

कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.

Source link

Pune Supriya Sule :अजितदादा-सुप्रिया सुळेंच्या फोटोची फ्रेम कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळेंना भेट

0
Pune Supriya Sule :अजितदादा-सुप्रिया सुळेंच्या फोटोची फ्रेम कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळेंना भेट

Pune Supriya Sule :  सुप्रिया सुळेंना कार्यकर्त्यांकडून अनोखी फोटो फ्रेम भेट

Source link

Top 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्यांचा आढावा : 20 ऑगस्ट 2023 : रविवार : ABP Majha

0
Top 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्यांचा आढावा : 20 ऑगस्ट 2023 : रविवार : ABP Majha

Top 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्यांचा आढावा : 20 ऑगस्ट 2023 : रविवार : ABP Majha

Source link

Sharad Pawar: केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर टाळायचा असेल तर…; भरसभेत शरद पवार म्हणाले

0
Sharad Pawar: केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर टाळायचा असेल तर…; भरसभेत शरद पवार म्हणाले

पुढे शरद पवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडून होणारा यंत्रणेचा गैरवापर जर टाळायचा असेल, तर सोशल मीडिया हाच एक पर्याय आहे. सोशल मीडियाच्या माध्यातून आपण त्यांच्यावर हल्ला केला तर राज्यकर्ते हे परत करण्याच्या आधी विचार करतील. तुम्ही जागरूक राहिले पाहिजे, तुमच्यातील एकावर हल्ला झाल्यास ५० जणांनी उत्तर दिले आहे. अशाने तुमच्यावर हल्ला करणारे नक्कीच थांबतील”, असाही त्यांनी सल्ला दिला आहे.

Source link