Friday, July 17, 2026
Home Blog Page 2817

4000 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळायलाच हवा; खासदार अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम

0
4000 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळायलाच हवा;  खासदार अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम


पुणे : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क(onion)  आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात खासदार अमोल कोल्हे यांनी आंदोलन छेडलं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या निर्णयाने शेतकरी समाधानी नसल्याने अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम आहेत.  कांदा फेकून दिला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना जाग आली नाही का? असा सवाल उपस्थित करत आम्हाला 4 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळायलाच हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे चुकीचे कृषी धोरण आहे, म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे पुण्यातील आळे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत आहे. निर्यात शुल्क आकारण्याचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या ताटात माती कालावणारा आहे. त्यामुळंच केंद्र सरकारच्या या धोरणाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, म्हणूनच आम्ही रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला असल्याचं कोल्हे यांनी म्हटलंय.

सरकारकडून सातत्याने शेतकरी विरोधी धोरणं राबवली जात आहे. कांद्यामुळे शेतकऱ्यांना नफा होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आणि सात आठ महिने पुरेल एवढा कांदा देशात उपलब्ध असताना मोदी सरकारने शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलं आहे. कांद्यावर जे निर्यात शुल्क लावण्यात आलं आहे. ते अघोषित निर्यात बंदी आहे. काही दिवसांपूर्वी नेपाळमधून टोमॅटो आयात करुन टोमॅटोचे भाव पाडले आणि आता कांदा आयात करुन कांद्याचे भाव पाडण्याचं पाप हे मोदी सरकार करत असल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे.

महाराष्ट्र सरकारमध्ये जे लोक भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनावेळी आळे फाटा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. सगळीकडे पोलिसांचा बंदोबस्त करुन शेतकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण करायचं आहे. या सरकारला राज्यातील शेतकऱ्यांचा आवाज दाबायचा आहे. दिल्लीत शेतकऱ्यांना वर्षभर आंदोलन करावं लागलं त्यानंतरच कृषी कायदे मागे घेण्यात आले होते. शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांनं पिकवणं बंद केलं तर सगळ्यांचे खायचे वांदे होतील, असं म्हणत त्यांनी सरकारविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

कांद्याची माळ घालून स्वागत…

काद्याचा प्रश्न सध्या चांगलाच पेटताना दिसत आहे. त्यातच अमोल कोल्हेंनी आंदोलन छेडलं आहे. केंद्रातील कोणतेही मंत्री ज्यावेळी राज्यात येईल त्यावेळी त्यांचं कांद्याचा हार घालून स्वागत करण्यात येईल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दु:ख केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांना समजावं यासाठी त्यांचं अनोखं स्वागत करणार असल्याचं कोल्हेंनी सांगितलं आहे. 

आंदोलनावर ठाम…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. मात्र फडणवीसांच्या निर्णयानंतर शेतकरी समाधानी नसल्याने अमोल कोल्हेंचं ठिय्या आंदोलन सुरुच राहणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Onion News : केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र; उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती 

 

 

 

 

 



Source link

Raju Punjabi Death: मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी; प्रसिद्ध गायक राजू पंजाबी यांचं निधन!

0
Raju Punjabi Death: मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी; प्रसिद्ध गायक राजू पंजाबी यांचं निधन!


राजू पंजाबी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली होती. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा त्यांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजू पंजाबी यांच्यामागे पत्नी आणि ३ मुली असे कुटुंब आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये ते अतिशय प्रसिद्ध गायक होते. त्यांची अनेक गाणी लोकप्रिय ठरली होती. ‘बिग बॉस’ फेम सपना चौधरीसोबतची त्यांची जोडी खूप गाजली होती. हरियाणातील संगीत विश्वाला त्यांनी एक नवी ओळख मिळवून दिली होती.



Source link

Apurva Nemlekar: ‘शेवंता’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या मालिकेविषयी

0
Apurva Nemlekar: ‘शेवंता’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या मालिकेविषयी



Apurva Nemlekar: रात्रीस खेळ चाले या सुपरहिट मालिकेत शेवंता हे पात्र अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साकारले होते. आता ती एका नव्या मालिकेत दिसणार आहे.



Source link

Vijaykumar Gavit : ऐश्वर्या रायवर भाष्य करणे गावितांना भोवले, महिला आयोगाने धाडली नोटीस; तीन दिवसांत मागितले उत्तर

0
Vijaykumar Gavit : ऐश्वर्या रायवर भाष्य करणे गावितांना भोवले, महिला आयोगाने धाडली नोटीस; तीन दिवसांत मागितले उत्तर


नोटीसीत म्हटले आहे की, धुळे जिल्हयातील अंतुर्ली येथील सभेत उपस्थितांना संबोधित करताना आपण महिलांचा अवमान होईल, असे वक्तव्य केले असल्याबाबतचे व्हिडिओ माध्यमांवरुन प्रसारित झाले आहेत. आपण केलेल्या वक्तव्यांमुळे समाजातील सर्व स्तरांतुन तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणत्याही राज्याच्या प्रगतीचा आलेख त्या राज्यातील स्त्रियांची स्थिती आणि सुरक्षितता यावरुन ठरविला जातो. लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याचा व वर्तनाचा दिर्घ परिणाम समाजमनावर होतो आणि त्यातुनच सुदृढ वैचारिक समाजाची निर्मिती होत असते. सकल समाज घडवण्याची प्राथमिक जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. त्यामुळेच लोकप्रतिनीधींनी समाजात वावरताना त्यांच्यावर असलेल्या या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. तरी आपण केलेल्या वक्तव्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार आयोगास तीन दिवसात प्राप्त होईल, अशारितीने खुलासा सादर करावा.



Source link

Adil Khan: आदिलच्या आरोपांवर राखी सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली…

0
Adil Khan: आदिलच्या आरोपांवर राखी सावंतची प्रतिक्रिया, म्हणाली…


काय म्हणाला आदिल?

नुकताच मुंबईत स्पॉट झालेल्या आदिल खानला राखी सावंतसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘माझ्यासोबत सगळ्याच गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत. मी राखीसारखा नाही, मी माझ्या बाजूने संपूर्ण प्रकरण लवकरच सांगेन. माझ्यासोबत खूप चुकीचे घडले आहे. मी लवकरच पत्रकार परिषद घेईन आणि सर्व काही सांगेन. आता कोणीही येऊन मला तुरुंगात पाठवून प्रसिद्धी मिळवू शकत नाही. आता मी बाहेर आलो आहे, एक-दोन दिवसांत माझी गोष्टही सांगेन.’



Source link

शेतकऱ्यांना अफू-गांजा लावायची परवानगी द्या, कांद्याच्या मुद्यावरुन खोतांचा सरकारवर निशाणा  

0
शेतकऱ्यांना अफू-गांजा लावायची परवानगी द्या, कांद्याच्या मुद्यावरुन खोतांचा सरकारवर निशाणा  


Sadabhau Khot : केंद्र सरकारने कांदा (Onion)निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. या निर्णयानंतर विविध शेतकरी संघटनांनी देखील केंद्र सरकारवर टीका केलीय. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देखील सरकारवर निशाणा साधलाय. सरकारनं शेतकऱ्यांना अफू, गांजा लावायची परवानगी द्यावी, आम्ही कांदा भाजीपाला, अन्नधान्य पिकवायचं बंद करतो, अशा शब्दात खोतांनी सरकारवर टीका केली. 

शेतकऱ्यांची शेती ताब्यात घ्या, त्याच्या कुटुंबातील प्रत्येकाला मंत्रालयातील क्लर्क एवढा पगार द्या 

सरकारनं शेती करायची की नाही करायची याबाबत सरकारनं धोरण तयार करावं. सगळ्यांनाच शेतकऱ्यांचा शेतमाल फुकट खायचा असेल तर, सरकारनं शेतकऱ्यांची शेती ताब्यात घ्यावी आणि त्याच्या घरातील प्रत्येकाला मंत्रालयातील क्लर्क एवढा पगार द्यावा असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. आम्ही शेतमाल पिकवायचे बंद करतो, शेतकऱ्याला अफू गांजा लावायची परवानगी द्यावी असेही खोत म्हणाले. तुम्हाला कोणाच्या शेतात अन्नधान्य पिकवायचे ते पिकवा असे खोत म्हणाले. 

ज्यांना जास्त कांदा खायचाय त्यांनी स्वस्ताईच्या काळात कांद्याचा ज्यूस करावा

कांदा नाही खाल्ला म्हणून कोणाचा मृत्यू झालाय का? ज्याला जास्त कांदा खायचा आहे, त्यांनी स्वस्ताईच्या काळात कांद्याचा ज्यूस करा आणि कांद्यानं अंगोळ करा असेही खोत म्हणाले. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले की त्याचे खळे डोळ्यादेखत लुटलं जात आहे. त्यामुळं कांदा प्रश्नी पुढच्या महिन्यात आम्ही नाशिकपासून शेतकऱ्यांचे आंदोलन उभं करणार असल्याचे खोत म्हणाले. सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की, शेतकऱ्यांना काही देता नाही आलं देऊ नका मात्र, अन्नात माती कालवण्याचे काम करु नका असेही खोत म्हणाले. दरम्यान, कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारला रयत क्राती संघटनेच्या वतीनं निवेदन देणार असल्याचंही खोत यावेळी म्हणाले.

धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावर 

सरकारनं कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मी केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं. या मुद्यावरुन राज्य सरकारवर देखील टीका होत आहे. त्यामुळं धनंजय मुंडे हे आज दिल्लीला जाऊन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेणार आहेत. तसेच, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी नक्कीच आम्ही मार्ग काढू असा विश्वास देखील धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

कांदा निर्यात शुल्क:  कृषीमंत्री धनंजय मुंडे आज दिल्ली दौऱ्यावर, कृषीमंत्री तोमरांसह पियूष गोयलांची भेट घेणार 



Source link

Gadar 2: ‘गदर २’च्या कमाईत घसरण, सोमवारी आता पर्यंतची सर्वात कमी कमाई

0
Gadar 2: ‘गदर २’च्या कमाईत घसरण, सोमवारी आता पर्यंतची सर्वात कमी कमाई


११व्या दिवशी गदर २च्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. १०व्या दिवशी चित्रपटाने ३८.९ कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, ११व्या दिवशी चित्रपटाने केवळ १४ कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे चित्रपटाने जवळपास ४०० कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार, चित्रपटाने ३८९.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे.



Source link

Chiranjeevi: हवालदाराचा मुलगा ते सुपरस्टार, चिरंजीवीचा थक्क करणारा प्रवास

0
Chiranjeevi: हवालदाराचा मुलगा ते सुपरस्टार, चिरंजीवीचा थक्क करणारा प्रवास



Chiranjeevi Birthday: एका वर्षात १४ सुपरहिट चित्रपट देणाऱ्या चिरंजीवीचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी…



Source link

Maharashtra weather : राज्यात पाऊस पुन्हा विश्रांती घेणार! आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

0
Maharashtra weather : राज्यात पाऊस पुन्हा विश्रांती घेणार! आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता


पुणे आणि परिसरात २१, २२ आणि २३ ला वातावरण ढगाळ राहणार आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान, आकाश समान्यता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सोमवारी बुलढाण्यात सर्वाधिक २७ मिमी, वर्ध्यात १२.४, वाशिममध्ये ४, चंद्रपुरात १.२ आणि अमरावतीत १.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडय़ात हलक्या सरी झाल्या.



Source link

कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीविरोधात राज्यभरात आंदोलनं; आज दिवसभरात

0
कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीविरोधात राज्यभरात आंदोलनं; आज दिवसभरात


22nd August Headlines: आज दिवसभरात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त शेतकरी आज राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करणार आहेत. कांदा प्रश्नावर कृषी मंत्री धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहेत, तर आजपासून ठाकरे गटाच्या आढावा बैठकीच्या दुसऱ्या टप्प्याला देखील सुरुवात होणार आहे.

कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीविरोधात राज्यभरात आंदोलनं

राज्यभरातील विविध ठिकाणी आज केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्काच्या निर्णयाविरोधात आंदोलनं होणार आहेत. खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीकडून पुणे– नाशिक महामार्गावर आळे फाटा येथे रास्ता रोको करण्यात येणाक आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी अहमदनगर आणि राहुरी मध्येही रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

कांदा प्रश्नावर कृषीमंत्री धनंजय मुंडे दिल्लीत घेणार केंद्रीय मंत्र्यांची भेट

केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लादला, केंद्राच्या या निर्णयाला शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.  कृषीमंत्री धनंजय मुंडे आज दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारमधील काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत मुंडे आज चर्चा करणार आहेत. या चर्चेअंती तरी काही तोडगा निघणार का? की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बंद कायम राहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आजपासून ठाकरे गटाच्या आढावा बैठकीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

ठाकरे गटाकडून 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्टदरम्यान दुसऱ्या टप्प्यात एकूण 9 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसनेचे 18 खासदार विजयी झाले होते, त्यामुळे पक्षातील फुटीनंतर होणारी पहिली लोकसभा ठाकरेंसाठी महत्त्वाची असणार आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मतदारसंघ असलेल्या नागपूर मतदारसंघाचा देखील आढावा ठाकरे गटाकडून 25 तारखेला घेतला जाणार आहे.

सांगलीत आज तासगाव तालुका बंदची हाक

दोन दिवसांपूर्वी तासगावमधील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराबद्दल संताप व्यक्त करत शिवसेनेचे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी मुख्यालय सहायक चंद्रकांत शिरढोणे यांच्यासह तिघांना कानशिलात लगावली. नंतर प्रदीप माने यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी आणि खंडणी मागितल्याप्रकरणी तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आज तासगाव तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.

नवीन महिला धोरणाचं सादरीकरण

राज्य सरकारच्या नवीन महिला धोरणाचं सादरीकरण आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर सह्याद्री अतिथीगृह येथे केलं जाणार आहे. त्याचसोबत नवनियुक्त अंगणवाडी सेविकांचं नियुक्तीपत्रही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिलं जाणार आहे.



Source link