Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 281

गाव विकासाच्या कामामागे लाचेचा खेळ; पळशीतील ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

0
गाव विकासाच्या कामामागे लाचेचा खेळ; पळशीतील ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

बारामती :- पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पळशी गावातील ग्रामसेवक कांता बापूराव काळाणे (वय ५७) यांना लाच घेताना अंमलबजावणी विभागाने रंगेहाथ पकडल्याने ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बुधवारी (८ मे) एसीबीने रचलेल्या सापळ्यात २५ हजार रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली.

पळशी ग्रामपंचायतीच्या हद्दीत ठेकेदाराने केलेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या कामासाठी १६ लाख ४६ हजार रुपयांचे बिल मंजूर झाले होते. या कामाच्या बिलासाठी ग्रामसेवक काळाणे यांनी ठेकेदाराकडे ४ टक्क्यांप्रमाणे तब्बल ६० हजार रुपयांची मागणी केली होती. यातील १४ लाख ९६ हजार रुपयांचा पहिला धनादेश देताना त्यांनी आधीच ३० हजार रुपये रोख स्वरूपात स्वीकारले होते.

उर्वरित १ लाख ५० हजार रुपयांच्या बिलाच्या मंजुरीसाठी उर्वरित ३० हजार रुपये घेण्याच्या प्रयत्नात असताना ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर बुधवारी पळशी गावात एका रस्त्याच्या बाजूला ठरल्याप्रमाणे २५ हजार रुपये घेताना काळाणे यांना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले.

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामसेवकाच्या अटकेने संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली आहे.

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी जवान मनोज पाटील सीमेवर, पत्नी यामिनी म्हणाली; “माझं कुंकू ऑपरेशन सिंदूरसाठी पाठवलंय”

0
लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी जवान मनोज पाटील सीमेवर, पत्नी यामिनी म्हणाली; “माझं कुंकू ऑपरेशन सिंदूरसाठी पाठवलंय”



Soldier Manoj Patil Ordered to Return to Border For Operation Sindoor He Went Just After Third Day of His Marriage |लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी जवान मनोज पाटील सीमेवर, पत्नी यामिनी म्हणाली; “माझं कुंकू ऑपरेशन सिंदूरसाठी पाठवलंय”



Source link

BSF Kills 7 Terrorists, Destroys Pakistan Post in Samba During Infiltration Bid

0
BSF Kills 7 Terrorists, Destroys Pakistan Post in Samba During Infiltration Bid


India vs Pakistan Operation Sindoor Latest Updates: जम्मूमधील सांबा सेक्टरमधून काल रात्री भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सात दहशतवादी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कारवाईत ठार झाले आहेत. याबाबत बीएसएफने एका निवेदनाद्वारे माहिती दिली आहे. या कारवाईदरम्यान, बीएसएफने पाकिस्तानी रेंजर्सच्या सीमा चौकीचे मोठे नुकसान केले, जिथून या दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी जोरदार गोळीबार करण्यात येत होता.

“जम्मू फ्रंटियर बीएसएफच्या सांबा सेक्टरमध्ये, ८ आणि ९ मे २०२५ च्या मध्यरात्री, दहशतवाद्यांच्या एका गटाने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. या दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानी रेंजर्सच्या चौकीतून गोळीबार करण्यात आला. परंतु बीएसएफच्या सतर्क जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न निष्फळ ठरवत किमान ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानी रेंजर्स पोस्टचे मोठे नुकसान केले,” असे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले.

तत्पूर्वी काल रात्री, पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर विविध ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत एल-७० तोफा, झेयू-२३एमएम, शिल्का प्रणाली आणि इतर प्रगत काउंटर-यूएएस उपकरणांचा मोठ्या प्रमाणत वापर करण्यात आला. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र विमानांनी जम्मू काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंतच्या शहरांमधील भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचे धाडस केले परंतु त्यापैकी कोणत्याही ठिकाणी त्यांना यश मिळाले नाही. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने त्या सर्वांना हाणून पाडले आहे. पाकिस्तानने संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे, ज्याला भारतीय सैन्य योग्य उत्तर देत आहे.

ऑपरेशन सिंदूर

ऑपरेशन सिंदूरचा एक भाग म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदसह दहशतवाद्यांच्या ९ प्रशिक्षण केंद्रांवर आणि तळांवर नुकतेच हल्ले केले होते. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून दहशतवादी छावण्यांवर भारताने हे हल्ले केले होते. दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता.





Source link

‘मोदीजी, त्यांना संपवून टाका’; हल्ल्याच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानवर लोकप्रिय अभिनेत्रीचा संताप

0
‘मोदीजी, त्यांना संपवून टाका’; हल्ल्याच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानवर लोकप्रिय अभिनेत्रीचा संताप



Operation Sindoor Actress Rupali Ganguly on Pakistan : पाकिस्तानवर लोकप्रिय अभिनेत्रीचा संताप; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मोदींकडे केली ‘ही’ मागणी



Source link

Digital payment banned at some petrol pumps in Nagpur

0
Digital payment banned at some petrol pumps in Nagpur



Digital payment banned at some petrol pumps in Nagpur | युद्धजन्य स्थिती असतांनाच पेट्रोल पंपावर डिजिटल पेमेंट बंद…  संघटना म्हणते…



Source link

Nagpur bench notice regarding tampering with documents in Yavatmal Municipal Council tender process

0
Nagpur bench notice regarding tampering with documents in Yavatmal Municipal Council tender process



Nagpur bench notice regarding tampering with documents in Yavatmal Municipal Council tender process | यवतमाळ नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेतील कागदपत्रांत छेडछाड, उच्च न्यायालयाकडून…



Source link

Arijit singh postpones abu dhabi concert amid rising india pakistan tensions after operation sindoor

0
Arijit singh postpones abu dhabi concert amid rising india pakistan tensions after operation sindoor



Arijit singh postpones abu dhabi concert amid rising india pakistan tensions after operation sindoor | भारत-पाकिस्तानातील वाढत्या तणावादरम्यान अरिजीत सिंगचा मोठा निर्णय, ‘या’ अरब देशातील कॉन्सर्ट केला रद्द; म्हणाला…



Source link

iiser professors Seema Sharma Saurabh Dubeyand 23 researchers win breakthrough award in materials Science

0
iiser professors Seema Sharma Saurabh Dubeyand 23 researchers win breakthrough award in materials Science



iiser professors Seema Sharma Saurabh Dubeyand 23 researchers win breakthrough award in materials Science | ‘आयसर पुणे’तील शास्त्रज्ञांना प्रतिष्ठेचा ‘ब्रेकथ्रू’ पुरस्कार



Source link

Saptahik Ank Rashifal 12 To 18 May 2025 week will start good days for 3 mulank will get some good news weekly horoscope

0
Saptahik Ank Rashifal 12 To 18 May 2025 week will start good days for 3 mulank will get some good news weekly horoscope



Saptahik Ank Rashifal 12 To 18 May 2025 week will start good days for 3 mulank will get some good news weekly horoscope | Saptahik Ank Rashifal 12 To 18 May 2025: या आठवड्यात ३ मूलांकच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होणार मिळणार काहीतरी आनंदाची बातमी, जाणून घ्या साप्ताहिक अंक ज्योतिष्य



Source link

pakistan drone attack in jammu rajasthan indian army shared video proof

0
pakistan drone attack in jammu rajasthan indian army shared video proof


Indian Army Shares Video: ८ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत जवळपास ५० ड्रोन डागण्यात आल्याचं समोर आलं आहे. भारताच्या S-400 सुदर्शन या एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने भारतानं पाकिस्तानचे हे सर्व ड्रोन हल्ले निष्प्रभ केले असून भारतीय हद्दीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. एकीकडे पाकिस्तानच्या बाजूने या ड्रोन हल्ले झाल्याचं प्रत्यक्ष स्थानिकांनीही पाहिल्यानंतरही पाकिस्तानने मात्र आपण काहीही केलं नसल्याचा कांगावा केला. यानंतर मात्र भारतीय लष्करानं थेट पुरावाच दिला असून पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

काय घडलं ८ मेच्या मध्यरात्री?

गुरुवारी ८ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर भारतातली १५ शहरांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांमधील सीमेवरच्या भागांमधली ही ठिकाणं असून त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. एस ४०० सुदर्शन या भारताच्या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीने पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारतानं पाडले आहेत. या कारवाईदरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून सीमेवरच्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण ब्लॅकआऊट पाळण्यात आला.

पाकिस्तानच्या या आगळिकीनंतर भारतानं पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत ठणकावलं आहे. पाकिस्ताननं जर ही आगळीक थांबवली नाही, तर भारतही थांबणार नाही, अगदी शेवटपर्यंत प्रत्युत्तर दिलं जाईल, असा सज्जड दमच भारतानं पाकिस्तानला दिल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून अनेक देशांनी भारताच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून पाकिस्तानला माघार घेण्याचा सल्ला दिला आहे.

भारतानं दिला पुरावा, पाकिस्तानचा दावा खोटा!

दरम्यान, पाकिस्तानं भारतातील ड्रोन हल्ल्यांशी आपला काहीही संबंध नसल्याचा कांगावा पाकिस्ताननं केल्यानंतर भारतीय लष्करानं पुरावाच सादर केला आहे. भारतीय लष्कराच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भातली माहिती देण्यात आली असून ड्रोन हल्ल्याचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

“ऑपरेशन सिंदूर… पाकिस्तानी लष्करानं ८ आणि ९ मेदरम्यानच्या रात्री भारताच्या संपूर्ण पश्चिमेकडील सीमेलगत वेगवेगळ्या ठिकाणी ड्रोन आणि इतर दारुगोळ्याचा वापर करून हल्ला केला. जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ (LOC) पाकिस्तानी लष्करानं अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानच्या या ड्रोन हल्ल्यांना भारताकडून यशस्वीरीत्या निष्प्रभ करण्यात आलं असून शस्त्रसंधी उल्लंघनालाही सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे”, असं भारतीय लष्करानं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“भारताचं सार्वभौमत्व आणि भौगौलिक एकतेचं संरक्षण करण्यासाठी भारतीय लष्कर बांधील आहे. त्यावर आक्रमण करणाऱ्या कोणत्याही आततायी कृतीला संपूर्ण ताकदीनिशी उत्तर दिलं जाईल”, असा इशाराही भारतीय लष्करानं पाकिस्तानला दिला आहे.

हेही वाचा

Video मध्ये काय आहे?

लष्करानं शेअर केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये एक ड्रोन हवेतच उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे. लष्कराच्या विशेष कॅमेऱ्यात टिपलेली ही दृश्य पाकिस्तानच्या कांगाव्यातला फोलपणा स्पष्ट करण्यासाठी पुरेशी ठरली असून आता पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरूनदेखील शांततेसाठी माघार घेण्यासाठी दबाव येऊ लागला आहे.



Source link