


केरळमधील श्री नारायण मानव धर्मम ट्रस्टने वक्फ (सुधारणा) कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. समाजसुधारक श्री नारायण गुरू यांच्या शिकवणीचा प्रसार करणाऱ्या या ट्रस्टने वक्फ कायद्यातील बदल भारतातील मुस्लिम समुदायाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करतात, असं म्हटलं आहे. ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष व राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे माजी संचालक डॉ. जी. मोहन गोपाल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी वक्फ कायद्याबद्दल आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल, तसेच इतर मुद्द्यांवर चर्चा केली. त्याबाबत जाणून घेऊ…
हिंदू ट्रस्ट वक्फ कायद्यातील सुधारणांविरोधात का लढत आहे?
सर्वांत आधी तर आम्ही हिंदू हे लेबल नाकारतो. आम्ही स्वत:ला हिंदू ट्रस्ट, असं मानत नाही. एक जात, एक धर्म आणि एका देवाचा पुरस्कार करणाऱ्या श्री नारायण गुरूंच्या तत्त्वांचे आम्ही पालन करतो. गुरूंनी हिंदू धर्माची धर्म म्हणून संकल्पना नाकारली होती. २०२३ मध्ये स्थापन झालेल्या आमच्या ट्रस्टला केरळमधील श्री नारायण समुदायाचा आवाज म्हणून ओळखले जाते. आम्ही गुरूंना हिंदू व्यक्तिमत्त्व म्हणून सादर करण्याच्या विरोधात आहोत.
दक्षिण भारताचं कोडं सोडवण्यासाठी भाजपाकडे तयार आहे मास्टरप्लॅन…
तुम्ही केरळमधील श्री नारायण समुदायाची सर्वांत शक्तिशाली संघटना श्री नारायण धर्म परिपालन योगमच्या विरोधात आहात का?
आम्ही सुधारणावादी संघटना नाही, तर स्पष्टीकरण देणारी संघटना आहोत. लोकांनी वेगळे काही तर्क लावण्याऐवजी त्यांना थेट गुरूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. सामाजिक शांतता आणि सौहार्दता कायम राहावी यासाठी आम्ही कार्यक्रम आयोजित करीत आहोत.
सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या निर्णयाबाबत तुम्हाला कशा प्रतिक्रिया मिळाल्या?
एक ट्रस्ट म्हणून या प्रकरणात आमचा कोणताही सहभाग नाही. मात्र, आम्ही मुस्लिमांच्या हितासाठी लढत आहोत. अनेकांनी आमचे कौतुक केले. मात्र, ज्यांना समाजाचे ध्रुवीकरण करायचे आहे आणि अल्पसंख्याकांना वेगळे करायचे आहे. ते वक्फ कायद्यातील बदलांमुळे आनंदी आहेत.
वक्फ कायद्याबाबत तुम्हाला काय चिंता आहे?
कायद्यातील या दुरुस्तीने वक्फची मूळ यंत्रणाच रद्द केली आहे आणि त्या जागी राज्य व्यवस्था आणली आहे. बिगर-मुस्लिमांना प्रशासन सोपवून वक्फचे व्यवस्थापन मुस्लीम परंपरेनुसार केले पाहिजे, या नियमाला धक्का बसत आहे. हा कायदा वक्फ व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांशी छेडछाड करतो. गरीब मुस्लिमांची काळजी घेणाऱ्या व्यवस्थेचा नायनाट करणाऱ्या या सुधारणा आहेत. हा कायदा वक्फच्या निर्मितीवर अनेक निर्बंध लादतो. त्यामुळे निधीचा प्रवाहदेखील प्रभावित होतो. वक्फची निर्मिती तोंडी शक्य नाही, ती केवळ कृतीतूनच करावी लागते. वक्फसाठी मालमत्तेचे समर्पण करणे खूप महत्त्वाचे आहे. सरकारने वक्फची ठरविलेली व्याख्या इतकी विस्तृत आहे की, कोणत्याही सरकारला किंवा त्यांच्या संस्थेला मालमत्तेवर दावा करणे शक्य आहे. जिल्हाधिकारी संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही मालमत्तेत प्रवेश करू शकतात.
याचे परिणाम काय होतील?
पुढच्या २० वर्षांत याचे परिणाम जाणवतील. मुस्लीम संस्थांना निधीची कमतरता जाणवू लागेल. मदरसे चालविण्यासाठीही पुरेसे पैसे नसतील. धार्मिक संस्था चालविण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तेव्हा धर्माचे अस्तित्व धोक्यात येईल. हा एक मोठा धोका आहे. तुम्ही धार्मिक संस्थांच्या आर्थिक व्यवहार्यतेवर हल्ला करीत आहात. धर्माचे पालन करण्यासाठी आर्थिक संसाधनांची आवश्यकता असते. आर्थिक संसाधनांवर आघात करणे म्हणजे धर्माची कोंडी करणे. लोक ते स्वीकारणार नाहीत.
मुनांबम जमिनीवरील मालकी हक्काच्या वादाबद्दल काय?
बाळाला अंघोळीच्या पाण्यासोबत बाहेर फेकू नका. हा तथ्यांबाबतचा मुद्दा आहे आणि ही तथ्ये निश्चित करण्यासाठी एक यंत्रणा आहे. वक्फ बोर्डाचा निर्णय जर चुकीचा असेल, तर वक्फ ट्रिब्युनलमध्ये त्यावर उपाय आहे. तसेच त्यावर उच्च न्यायालयाचे अधिकारही आहेत. मुनांबमचा वापर केवळ इस्लामोफोबिया निर्माण करण्यासाठी केला जात आहे. अशा प्रकारचे वाद किती मंदिरांबाबत आहेत… असे असताना या वादांचा वापर कधीही एखाद्या समुदायाला लक्ष्य करण्यासाठी केला गेला नाही. मुनांबम येथील जमिनीच्या वादाचा वापर मुस्लिमांवर हल्ला करण्यासाठी केला जात आहे.
मुनांबमचा वाद
१९०० च्या दशकाच्या सुरुवातीला मुनांबममधील ४०० एकर जमीन त्रावणकोर राजघराण्याकडून अब्दुल सतार मूसा सैत यांनी भाडेतत्त्वावर घेतली होती. १९४८ मध्य अब्दुल यांचे उत्तराधिकारी मोहम्मद सिद्दीक सैत यांनी ही जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. त्यानंतर दोन वर्षांनी ती कोझिकोड इथल्या फारूक महाविद्यालयाला दान म्हणून दिली. या भागाजवळील किनारपट्टीच्या जमिनीवर मोठ्या संख्येने मच्छीमार रहात होते. त्यांची कुटुंबं इथे पिढ्यानपिढ्या आहेत. १९८७ ते १९९३ दरम्यान फारूक कॉलेज व्यवस्थापनाने इथल्या रहिवाशांकडून पैसे घेतले आणि त्यांना या जागेचे मालकी हक्क दिले. त्यावेळी १९९५ मध्ये वक्फ कायदा लागू करणं हा फार क्लिष्ट विषय होता.
२००८ मध्ये तत्कालीन सीपीआय(एम) सरकारने केरळ राज्य वक्फ बोर्डाच्या कामकाजाची आणि वक्फ मालमत्तेच्या हस्तांतरणाची तपासणी करण्यासाठी एका आयोगाची नियुक्ती केली. या आयोगाच्या पडताळणीनुसार मुनांबमची जमीन वक्फ मालमत्ता असल्याचे आढळून आले, त्यानुसार कारवाई करण्याची शिफारसही आयोगामार्फत करण्यात आली. तरीही फारूक महाविद्यालय व्यवस्थापनाने वक्फ बोर्डाकडे जमिनीसंदर्भात नोंद केली नव्हती. २०१९ मध्ये वक्फ बोर्डाने आपणहून मुनांबममधील ही जमीन वक्फ मालमत्ता असल्याचे घोषित केले. तसंच महसूल विभागाला तत्कालीन मालकांकडून जमीन कर स्वीकारणे थांबवण्याचे निर्देश दिले.
२०२२ मध्ये राज्य सरकारने यात हस्तक्षेप करत वक्फ बोर्डाचे निर्देश रद्द केले आणि जमीन कर वसूल करणे सुरू ठेवण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले. जमीन कर भरत राहिल्यास रहिवासी हक्क सांगू शकतात आणि भविष्यात कर्ज मिळवण्यासाठी मालमत्ता गहाणही ठेवू शकतात, याच कारणामुळे वक्फ बोर्डाने जमीन कर स्वीकारण्यास थांबवण्याचे निर्देश दिले होते.
राज्य सरकारच्या हस्तक्षेपानंतर जमीन कर स्वीकारण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. या मुद्द्यावर बऱ्याचदा सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारी निर्णयाला स्थगिती दिली. या याचिका दाखल करणाऱ्यांपैकी एक फारूक महाविद्यालयदेखील होते. फारूक महाविद्यालय व्यवस्थापनाकडून संबंधित जमीन वक्फ बोर्डाची मालमत्ता जाहीर केल्याच्या निर्णयाला आव्हान करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. “ही महाविद्यालय व्यवस्थापनाला भेट म्हणून देण्यात आलेली मालमत्ता आहे, ज्यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी रहिवाशांना ही जमीन विकली होती”, असं या याचिकेत व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
NCP Sharad Pawar Camp & Ajit Pawar Camp: रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आज साताऱ्यामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमाला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी हजेरी लावली. यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार, संचालक म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि शरद पवार यांच्या भगिनी सरोजताई पाटील यादेखील सातारा इथल्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळामध्ये दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे देखील एक संचालक आहेत.
पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर संस्थेची बैठक होत असते. कार्यक्रमापासून अगदी जवळच असलेल्या इमारतीमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला शरद पवार यांच्यासह सर्व संचालक मंडळ चेअरमन यांच्या केबिनमध्ये चर्चा करत होते. त्यानंतर मुख्य बैठकीला जाण्यासाठी सर्वच बाहेर पडले. सगळ्यात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीसाठी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यादेखील पोहोचल्या, सगळ्यात शेवटी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील चौथ्या मजल्याकडे जाण्यासाठी लिफ्टच्या दिशेने निघाले… शरद पवार त्यांच्यासह लिफ्टमध्ये दोन सुरक्षारक्षक होते. त्याचवेळी शरद पवार यांनी लिफ्टच्या बाहेर उभा असलेल्या दिलीप वळसे पाटील यांना पाहिले. लिफ्ट थांबवली आणि शरद पवार यांनी सुरक्षारक्षकांना बाहेर जाण्याचा इशारा केला…आणि त्याच वेळी हाताने इशारा करून दिलीप वळसे पाटील यांना लिफ्टमध्ये बोलावले. शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील दोघे एकाच लिफ्टमधून बैठकीसाठी चौथ्या मजल्यावर पोहोचले.
व्यासपीठावर असताना शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी एकमेकांशी अजिबात संवाद साधला नाही. त्याचबरोबर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी देखील एकमेकांशी संवाद साधला नाही. सुप्रिया सुळे या शरद पवार आणि रोहित पवार यांच्याशी चर्चा करत होत्या तर अजित पवार हे दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत बोलत होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार अशी चर्चा कालपासून सुरू झाली आहे. त्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमांनी अजितदादा आणि शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास दोन्ही नेत्यांनी नकार दिला. तर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांची मुलाखत मी वाचली नसल्याचे म्हटले. तर रोहित पवार यांनी देखील अशा कुठल्याही निर्णयाबाबत पक्षाची बैठक झाली नसल्याचे बोलून दाखवले.
आणखी वाचा
आम्ही विचाराने एकच, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, शरद पवारांनी पत्ता टाकला!
अधिक पाहा..

India-Pakistan Tensions: भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन शुक्रवारी संध्याकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँका आणि वित्तीय संस्थांच्या सायबर सुरक्षा तयारीबाबत आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीला विविध सार्वजनिक आणि खाजगी बँकांचे प्रतिनिधी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एनएसई, बीएसई आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम यांच्यासह इतर अनेक बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम सायबर सुरक्षा तयारीची खात्री करण्यासाठी विविध महत्त्वाच्या क्षेत्रातील संस्थांशी समन्वय साधत आहे.
गुरुवारी रात्री पाकिस्तानी सशस्त्र दलांनी भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रे वापरून हल्ले करत जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने त्याचे हल्ले निष्प्रभ ठरवले. याचबरोबर पाकिस्तानी हवाई दलाचे एक विमान आणि ५० हून अधिक ड्रोन पाडले आहेत.
पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर विविध ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत एल-७० तोफा, झेयू-२३एमएम, शिल्का प्रणाली आणि इतर प्रगत काउंटर-यूएएस उपकरणांचा मोठ्या प्रमाणत वापर करण्यात आला. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
७ मे रोजी, द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले होते की ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर, भारताच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची जबाबदारी असलेल्या संस्था, जसे की ऊर्जा मंत्रालय, बँकांसह वित्तीय संस्था आणि टेलिकॉम ऑपरेटर्सना पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक सायबर हल्ल्यांना तोंड द्यावे लागल्याने “हाय अलर्ट” वर राहण्यास सांगण्यात आले आहे.
“काही पायाभूत सुविधांवर DDoS सायबर हल्ले झाले आहेत, परंतु आम्ही ते रोखले. आता आम्ही आणखी सतर्क झालो आहोत, कारण अशा प्रकारचे आणखी सायबर हल्ले करण्याचे प्रयत्न नक्कीच केले जातील,” असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने आधी सांगितले होते.


Military Recruitment Process: . युद्धादरम्यान सैन्यात भरतीची प्रक्रिया काय असते? आणि कोणत्या गोष्टींमध्ये सवलत दिली जाते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Source link


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता इंडियन प्रिमियर लीग (IPL) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI Suspended IPL 2025) मोठा निर्णय घेतला आहे.
पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना गुरुवारी रद्द झाला होता. त्यामुळे आयपीएलवर स्थगितीचे ढग होते. अशातच आता आयपीएलला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआय लवकर यावर अधिकृत घोषणा करेल.
तसेच सर्व परदेशी खेळाडूंना परत पाठवले जाईल. बीसीसीआय त्यांना सुरक्षितपणे परत पोहोचवेल याची खात्री करेल, अशी माहिती समोर आली आहे.
धर्मशाळा येथे रद्द झालेला दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना हंगामातील 58 वा सामना होता. या हंगामात एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजे अजून 16 सामने शिल्लक आहेत.
आगामी सामन्यांवर संकटाचे ढग दाटून येत आहेत. याचे कारण भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला तणाव आहे. पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, सीमाभागात परिस्थिती दररोज बदलत आहे. आम्हाला जे काही सांगितले जाईल ते आम्ही करू आणि सर्व भागधारकांना त्याबद्दल माहिती देऊ. सध्या आमची प्राथमिकता सर्व खेळाडू, चाहते आणि भागधारकांची सुरक्षा आहे, असं राजीव शुक्ला म्हणाले होते.
