




Indian Foreign Ministry: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आजच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा पाकिस्तानला उघड पाडलंय.पाकिस्तानच्या सैन्याकडून नियंत्रण रेषेचे उल्लंघन करण्यात आले. 7 मेला ड्रोन हल्ला केला. पाकिस्तानकडून भटींडा स्टेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो निष्क्रिय करण्यात आला. जम्मू काश्मिरच्या विविध भागात गोळीबारी केली. यात काही भारतीय जवान शहीद झाले तर नागरिकांनाही प्राण गमवावा लागल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या ऑपरेशन सिंदूरला 2 दिवस पूर्ण झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या दोन दिवसांच्या आतापर्यंतच्या सर्व अपडेट्स शेअर केल्या. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैन्याने हे प्रयत्न हाणून पाडल्याचे त्यांनी सांगितले.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले नव्हते. पण भारतातील कोणत्याही लष्करी तळावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल, याचा पुनरुच्चार आज करण्यात आला. 7 आणि 8 मे च्या रात्री पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंदीगड, नल फलोदी, उत्तरलाई आणि भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इंटिग्रेड काउंटर ग्रिड आणि हवाई संरक्षण प्रणालींद्वारे हे हल्ले हाणून पाडण्यात आले. त्यांचे अवशेष अनेक ठिकाणांहून सापडले, जे पाकिस्तानी हल्ल्याचा पुरावा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आज सकाळी भारतीय सैन्याने अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताचा प्रतिसादही सारखाच, त्याच क्षेत्रात आणि त्याच तीव्रतेने होता. लाहोरमधील हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबाराची तीव्रता वाढवलीय. कुपवाडा, मेंढर, बारामुल्ला, उरी, पूंछ आणि राजौरी येथे मोर्टार आणि जड तोफखान्याचा वापर केला जात असल्याची माहिती कर्नल सोफिया यांनी दिली.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. ‘ही मालिका 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यापासून सुरू झाली. भारताने काल त्यांच्या कारवाईला प्रत्युत्तर दिलंय. पहलगाम हल्ल्यावर प्रेस स्टेटमेंट जारी करण्याच्या प्रकरणावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चर्चा होत होती. तेव्हा टीआरएफचा उल्लेख करण्यास विरोध केला गेला. टीआरएफ ही तीच संघटना होती ज्याने एकदा नव्हे तर दोनदा पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.


भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे क्रीडा विश्वातही खळबळ उडाली असून, इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL) बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. IPL मधील पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील गुरुवारचा सामना रद्द झाल्यानंतरच स्पर्धेवर संकटाचे ढग निर्माण झाले होते. अखेर, सर्व परिस्थितीचा विचार करून बीसीसीआयने संपूर्ण हंगाम थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच बीसीसीआयकडून होणार असून, सर्व परदेशी खेळाडूंना सुरक्षितपणे त्यांच्या देशात परत पाठवले जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे.
या हंगामात एकूण 74 सामने खेळवायचे होते. गुरुवारी धर्मशाळा येथे रद्द झालेला सामना हा 58 वा सामना होता, म्हणजे अद्याप 16 सामने बाकी आहेत. मात्र, देशातील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता IPL चा पुढील भाग सध्या थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
सध्या भारताने काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आहे. यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव अधिकच तीव्र झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या तसेच खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने बीसीसीआयने हा निर्णय घेतला.
“सीमावर्ती परिस्थिती रोज बदलते आहे. आम्हाला जे सांगितले जाईल तेच आम्ही करू. सध्या आमची प्राथमिकता खेळाडू, चाहते आणि भागधारकांची सुरक्षा आहे,” असे IPL संचालन मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.
हायलाइट्स:


नागपूर: नागपूरच्या शहरी व ग्रामीण भागात तापमान वाढत आहे. त्यामुळे नागपुरात उन्हाशी संबंधित रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने महिन्याभरात नागपूर शहरात उन्हाशी संबंधित एकूण २३० रुग्ण नोंदवले असून त्यात एका उष्माघाताच्या रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान नागपुरातील उन्हाशी संबंधित आजाराच्या रुग्णाबाबत आपण जाणून घेऊ या. उन्हाळ्याच्या दिवसात राज्यातील सर्वाधिक तापमान राहणाऱ्या जिल्ह्यात नागपूरचाही समावेश आहे. त्यामुळे यंदा एप्रिलपासूनच नागपुरात चांगलेच उन्ह तापू लागले आहे. नागपुरातील विविध भागात २२ एप्रिलपर्यंत नंदनवन, तहसील, लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत आठ अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळले. रुग्णालयात पोहचण्यापूर्वी वा नंतर त्यांचा मृत्यू झाल्याने हे मृत्यू उष्माघाताचे असल्याचे संशय आहे.
दरम्यान शासकीय रुग्णालयांत या मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालातूनच या मृत्यूंचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. महापालिकेकडून मात्र नागपूर शहरात तीन संशयितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान प्रत्येक उन्हाळ्यात नागपूर शहरातील तापमान ४६ अंशांहून वर जाते. नागरिकांना प्रचंड मनस्ताप करावा लागतो. यंदाच्या उन्हाळ्यात तापमान ४३ ते ४४ अंशांपर्यंत पोहचले. त्यामुळे रुग्ण वाढले आहेत. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरात ८ मेपर्यंत २३० रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी एक रुग्ण उष्माघाताचा आहे. ५२ रुग्ण उन्हामुळे पुरळ आलेले, ७२ रुग्ण उन्हामुळे स्नायूला त्रास झालेले, १०५ रुग्ण उन्हामुळे थकवा व इतर त्रास झालेले आहेत. रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता महापालिकेतील डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान नागपूर महापालिकेकडून शहरातील सगळ्याच उद्यानांसह सार्वजनिक भागात विविध सामाजिक संघटना व संस्थांच्या माध्यमातून पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय केली गेली आहे. शहरातील बऱ्याच चौकात हिरवे नेट बांधून नागरिकांना उन्हापासून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर शहरातील सगळ्याच महापालिका व मेडिकल, मेयोसह इतरही शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांची सोय करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या रुग्णालयांत स्वतंत्र कोल्ड वार्डाची सोय आहे.
नागपुरात नागरिकांना उष्णतेमुळे अशक्तपणा, नीट चालता न येणे, चक्कर येणे, भ्रमिष्टपणा येणे, कधीकधी झटका येणेसह इतरही काही त्रास जाणवत आहे. हे रुग्ण डॉक्टरांकडून उपचार घेत आहे.
– उष्माघात – १
– उष्णतेमुळे होणारे पुरळ -५२
– उष्णतेमुळे होणारे पेटके -७२
– उष्णतेमुळे होणारा थकवा -१०५

