Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 278

India Pakistan War : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अमेरिकेचं मोठं विधान; व्हाईट हाऊसने म्हटलं की ‘राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना…’

0
India Pakistan War : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अमेरिकेचं मोठं विधान; व्हाईट हाऊसने म्हटलं की ‘राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना…’


Donald Trump on India Pakistan War : भारत – पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरांवर ड्रोन हल्ला करण्यात येत आहे. उत्तरेकडील बारामुल्ला ते दक्षिणेकडील भूजपर्यंत, आंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तानशी असलेल्या नियंत्रण रेषेवर 26  ठिकाणी ड्रोन दिसले आहेत. यामध्ये नागरी आणि लष्करी लक्ष्यांना संभाव्य धोका निर्माण करणारे संशयित सशस्त्र ड्रोन समाविष्ट आहेत. या ठिकाणी बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नागरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगड जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुआरबेट आणि लाखी नाला यांचा समावेश आहे, असं संरक्षण सूत्रांनी सांगितलं आहे. 

भारत आणि पाकिस्तानने अनेक भारतीय शहरांवर ड्रोन हल्ले केल्याने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, व्हाईट हाऊसने शुक्रवारी म्हटलं आहे की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारतीय उपखंडातील दोन्ही देशांमधील तणाव लवकरात लवकर कमी करायचा आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो दोन्ही देशांच्या संपर्कात आहेत. (America big statement amid India Pakistan War White House says President Donald Trump says)

भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांबद्दल, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लिविट म्हणाल्या, “ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री आणि आता आमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांचाही सहभाग आहे. राष्ट्रपतींनी व्यक्त केले आहे की, त्यांना हे शक्य तितक्या लवकर तणाव कमी करायचे आहे. त्यांना समजते की हे दोन्ही देश दशकांपासून एकमेकांशी मतभेदात आहेत, अध्यक्ष ट्रम्प ओव्हल ऑफिसमध्ये येण्यापूर्वीपासून. पण, त्यांचे दोन्ही देशांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे दोन्ही देशांच्या नेत्यांशी सतत संपर्कात आहेत आणि हा संघर्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.”





Source link

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी, जनरल मुनीरमियाँ कुठे गायब झाला?

0
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी, जनरल मुनीरमियाँ कुठे गायब झाला?


India vs Pakistan: भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडाली आहे. पाकिस्तानचे जनरल मुनीर कुठे गायब झाले आहेत असा प्रश्न पडला आहे. मुनीर यांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचाही काही ठावठिकाणा नाही. 

भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चवताळलेल्या पाकिस्ताननं प्रतिहल्ला केला. दरम्यान पाकड्यांनी केलेला हा हल्ला त्यांनाच महागात पडलाय. कारण  पाकिस्तानचे सर्व मिसाईल्स आणि ड्रोन भारताच्या S-400 नं हवेत हाणून पाडलेत. त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मोठ्या 15 शहरांवर मिसाईल्स डागल्या
आणि अनेक शहरी उद्ध्वस्त केलीत. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिम मुनीर आणि त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे गायब झाल्याची माहिती आहे.

भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या एका खासदाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. पाकचे खासदार शाहीद अहमद यांनी शाहबाज शरीफला खडे बोल सुनावले आहेत. शाहबाज शरीफ हे नरेंद्र मोदींना घाबरत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

पाकिस्तानचे खासदारच नव्हे तर तिथली जनता देखील पाक सरकारला आरसा दाखवण्याचं काम करतेय.. युद्धाला पाकिस्तानच जबाबदार असल्याचा दावा पाकिस्तानचे नागरीक करताना दिसतायत दहशतवादाला पाठिशी घातल्यामुळे पाकनं युद्ध ओढवून घेतल्याचं पाकिस्तानी नागरिकानं म्हटलंय.

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा भारतानं बदला घेतला. भारतानं पाकिस्तानमध्ये घुसत दहशतवाद्यांना ठोकलं. दरम्यान याच दहशतवाद्यांचा पाठिराखा पाकिस्ताननं त्यानंतर भारतावर प्रतिहल्ला केला… मात्र,  भारतानं पाकिस्तानचा कट उधळून लावला असून उलट पाकिस्तानलाच खाक केलंय. त्यामुळे त्यांचे लष्करप्रमुख आणि पंतप्रधान भारताच्या भीतीनं गायब झाले आहेत.

पाकिस्तानचा जम्मूवर वार

जम्मूच्या पूँछ आणि कुपवाड्यात पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात मोठं नुकसान झालंय. अनेक घरांचं गोळीबारामध्ये नुकसान झालं. थेट घरांमध्ये देखील गोळ्या शिरल्याचं दृश्यांमधून दिसतंय. तर तिकडे कुपवाड्यात तोफ-गोळ्यांच्या हल्ल्यानं घराच्या भींती पडल्या आहेत. जम्मूच्या सांबा आणि उरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात नुकसान झालंय. सांबात अनेक घरांमध्ये गोळ्या शिरल्यात तसंच रात्रभर गोळीबाराचा आवाज सुरू असल्याचं इथल्या स्थानिकांनी सांगितलंय. उरीमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. उरीमध्ये गाड्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. राजौरी, बारामुल्लाला देखील पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं होतं. या भागात देखील रात्री ब्लॅक आऊट घोषित करण्यात आला होता. पाकिस्ताननं या परिसरात जोरदार गोळीबार केला होता. यामुळे काही काळ या ठिकाणी भीतीचं वातावरण असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. पाकिस्ताननं केलेले हल्ले भारतानं परतवून लावले आहेत. तसंच पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल्स भारतानं हवेतच हाणून पाडलेत त्यामुळे पाकिस्तानचा कट भारतानं उधळून लावला आहे. पाकिस्तानला भारताच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करायचा होता. अशी माहिती भारतीय लष्करी अधिका-यांनी दिलीय. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा भारतानं बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवला. तरीही पाकिस्तान सुधारला नाही. त्यानं पुन्हा भारतावर हल्ला केला. मात्र, या हल्ल्यात पाकिस्तानचंच मोठं नुकसान झालंय.





Source link

देशांतर्गत वादामुळे पाकिस्तान अडचणीत; भारत आणि बलुचिस्तानचा पाकिस्तानवर दुहेरी वार

0
देशांतर्गत वादामुळे पाकिस्तान अडचणीत; भारत आणि बलुचिस्तानचा पाकिस्तानवर दुहेरी वार


India Pakistan War : भारताच्या हल्ल्यापाठोपाठ आता पाकिस्तानची अंतर्गत कोंडी सुरु झालीये.  बलुचिस्तानमध्ये BLA आर्मीकडून जोरदार हल्ले केले जातायत.पाकिस्तानी सैन्याच्या 14 पोस्टवर बलुचिस्तान आर्मीनं ताबा मिळवलाय. त्यामुळे पाकिस्तान चारही बाजूने अडकलाय. 

भारताला वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धकमी देणारा आणि दहशतवादाला पोसणारा पाकिस्तान आणखी अडणींनी घेरला गेलाय.एका बाजूला भारत पाकिस्तानातील दहशतवाद्यांना लक्ष करत जोरदार हल्ले करतोय. तर दुस-या बाजूला पाकिस्तानच्याच बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ले होतायत. बलोच लिबरेशन आर्मी म्हणजेच BLAने पाकिस्तानच्या सैनिकांवर पुन्हा मोठा हल्ला करत पाकिस्तानी सैन्याला चितपट केलंय.

भारतासोबत पंगा घेतल्याने पाकिस्तानी सैन्याचे वाईट दिवस सुरू झालेत. भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलोच लिबरेशन आर्मीनेही पाकिस्तानाविरोधात मोर्चा वळवलाय.बलोच आर्मीने पाकिस्तानच्या क्वेटामधील 14 पोस्टवर ताबा मिळवत पाकिस्तानी सैन्याला उलट्या पायांनी पळून जायला भाग पाडलंय. इतकंच काय तर बुलच आर्मीने गॅस पाईपलाईनही उडवल्याचा दावा करण्यात आलाय.

या हल्ल्यांनंतर पाकिस्तान घेरला गेलाय. BLAने क्वेटावर हल्ला तर TTP म्हणजेच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने पख्तूनख्वावर हल्ला केलाय. तर सीमाभागात भारताकडून जोरदार हल्ले होताय. त्यामुळे पाकचं चांगलंच कंबरडं मोडलंय.

बलुचिस्तानने वेगळा देश घोषित करण्याची मागणी केलीये.  UNOकडे बलुचिस्तानने ही मागणी केलीये. याच मागणीवरून बलुचिस्तान पाकिस्तानी सैन्याविरोधात आधीपासूनच आक्रमक झालाय. त्यातच आता भारतासोबत बलुचिस्ताननेही दहशतवादाला पोसणारं पाकिस्तान नेस्तानाबूत करण्याचा प्लान आखलाय. त्यामुळे पाकिस्तानची आता पळताभुईथोडी झालीये. 

बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने संपूर्ण बलूचिस्तान ताब्यात घेण्याचा दावा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, BLA ने बलूचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या 14 चौक्या उद्ध्व्स्त केल्या आहेत. सोशल मीडियावर बलोच अॅक्टिविस्ट #OperationSindoorTillVictory आणि #PakisganLeaveBalochistan सारखे हॅशटॅग वापरून बलूचिस्तान हा वेगळा देश बनवण्याची मागणी करत आहेत. बलोच कार्यकर्ते मीर यार बलूच यांनी देवी दुर्गा मातेचा फोटो शेअर करत म्हटलं होतं की, प्रिय 1.4 अब्ज भारतीय बंधू-भगिनींनो आपण दोन महान संस्कृती आहोत. आपण एकमेकांचे दुःख समजून घेतो. तर आज आपण भारत माता आणि मातृभूमि बलूचिस्तानची रक्षण करुयात. आमच्या बंदुका हिंगलाज माता मंदिराची रक्षा करतील, आमच्या बंदुका हिंदूंना धर्मांतरित होण्यापासून वाचवतील. आपण शांती प्रस्थापित करु, आमच्या बंदुका तुम्हाला विजय मिळवून देतील, असं त्यांनी म्हटलं आहे. 





Source link

pandharpur Security at Vitthal Temple increased

0
pandharpur Security at Vitthal Temple increased



pandharpur Security at Vitthal Temple increased | पंढरीच्या विठ्ठल मंदिरातील सुरक्षा वाढवली ; हार, फुले, नारळावर बंदी, भाविकांची तपासणी



Source link

after ipl 2025 postponed for one week pcb took big decision remaining matches of psl postponed

0
after ipl 2025 postponed for one week pcb took big decision remaining matches of psl postponed



after ipl 2025 postponed for one week pcb took big decision remaining matches of psl postponed | PSL 2025: आयपीएल एक आठवड्यासाठी स्थगित; PSL साठी स्टेडियम मिळेना; शेवटी PCB ने निर्णय घेतला



Source link

Blackout in Jammu sounds of explosions and Sirens heard across the city amide india pakistan tension marathi news

0
Blackout in Jammu sounds of explosions and Sirens heard across the city amide india pakistan tension marathi news



Blackout in Jammu sounds of explosions and Sirens heard across the city amide india pakistan tension marathi news | जम्मूमध्ये आज पुन्हा ब्लॅकआउट, शहरात ऐकू आले सायरन आणि स्फोटांचे आवाज



Source link

Thane District Administration watch on Social media fake news

0
Thane District Administration watch on Social media fake news


ठाणे : भारताने दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तान मध्ये केलेल्या सिंदूर ऑपरेशन नंतर दोन्ही देशांचे सीमेवर सशस्त्र संघर्ष सुरू झाला आहे. मात्र या बाबत सोशल मीडियावर सर्रास खोट्या बातम्या पसरत असल्याचे दिसून आले आहे. आता याच ” सोशल मीडिया योद्ध्यांवर ” जिल्हा प्रशासनाची करडी नजर असून भारत-पाक तणावाच्या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

भारत-पाक सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जावू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे, महत्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील विविध भागात मॉक ड्रील आयोजित करून कोणत्याही धोकादायक घटनेचा सामना करण्यासाठी तयारी ठेवली आहे. जिल्ह्यात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा आणि द्वेषपूर्ण संदेशांवर प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. तसेच भारत-पाक तणावाच्या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ठाणे जिल्हा प्रशासन आपल्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे,” असे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आश्वस्त केले आहे.



Source link

Mumbai unauthorized madrasa on playground of school in Oshiwara high Court orders inquiry by Municipal Corporation

0
Mumbai unauthorized madrasa on playground of school in Oshiwara high Court orders inquiry by Municipal Corporation



Mumbai unauthorized madrasa on playground of school in Oshiwara high Court orders inquiry by Municipal Corporation | ओशिवरास्थित शाळेच्या क्रीडांगणावर अनधिकृत मदरसा ? उच्च न्यायालयाचे महापालिकेला चौकशीचे आदेश



Source link

Mumbai bmc administration scam has been revealed in drain cleaning work this year as well

0
Mumbai bmc administration scam has been revealed in drain cleaning work this year as well



Mumbai bmc administration scam has been revealed in drain cleaning work this year as well | नालेसफाईच्या कामात यंदाही घोटाळा,उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचा आरोप



Source link

तुमच्या एरियात घिरट्या घालणारे विमान भारताचे आहे की पाकिस्तानचे? मोबाईलमुळे एका झटक्यात समजेल

0
तुमच्या एरियात घिरट्या घालणारे विमान भारताचे आहे की पाकिस्तानचे? मोबाईलमुळे एका झटक्यात समजेल


India Pakistan War : 22 एप्रिल 2025  रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला. भारताने 7 मे 2025 रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत याला प्रत्युत्तर दिले,  भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चवताळलेल्या पाकिस्ताननं प्रतिहल्ला केला आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात मॉकड्रिल घेण्यात आले.  नागरिकांना आकाशात विमान घिरट्या घालताना दिसल्यास मोबाईलच्या माध्यमातून हे विमान भारताचे आहे की पाकिस्तानचे हे जाणून घेता येवू शकते.

भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक बनावट संदेश व्हायरल होत आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये भीती पसरत आहे. अशा परिस्थितीत सतर्क राहणे गरजेचे आहे.

तुम्हाला घरावरून विमान उडताना दिसले तर हे विमान ते शत्रूचे आहे की आपले जाणून घेण्याची सोपी मोबाईल ट्रिक जाणून घेऊया. याच्या मदतीने घर बसल्या तुमच्या परिसरात उडणारे विमान कुठून आले आहे आणि कुठे जात आहे हे जाणून घेऊ शकता.

Flightradar24.com या पोर्टलवर आकाशात घिरट्या घालणाऱ्या सर्व विमानांची माहिती मिळू शकते. या पोर्टलवर जगभरातील विमानांबद्दल रिअल-टाइम माहिती उपलब्ध होते. या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या ठिकाणावरून उडणाऱ्या विमानांची माहिती तपासू शकता. हे पोर्टल प्रामुख्याने व्यावसायिक उड्डाणांचा डेटा उपलब्ध करुन देते. यात लष्करी जहाजांची माहिती असू शकत नाही. मात्र,  सभोवतालच्या हवाई हालचाली समजून घेण्यासाठी हे एक अतिशय उपयुक्त साधन आहे.

Flightradar24.com या पोर्टलवर विमानांची माहिती मिळवणे अतिशय सोपे आहे. मोबाईल किंवा लॅपटॉपवर वेबसाइट ओपन करा. या वेबसाइटवर पिवळ्या चिन्हांसह एक नकाशा दिसेल. हे चिन्ह जगभर उडणाऱ्या विमानांचे प्रतिनिधित्व करतात. हे पोर्टल ADS-B ट्रान्सपॉन्डर तंत्रज्ञानाचा वापर करते, जे विमानांकडून त्यांचे स्थान, उंची आणि मार्ग याबद्दल माहिती उपलब्ध होते.  लष्करी जहाजे अनेकदा हे तंत्रज्ञान बंद ठेवतात, त्यामुळे त्यांची माहिती येथे दिसत नाही.

विमानाच्या पिवळ्या चिन्हावर क्लिक करा येथे क्लिक करताच त्या फ्लाइटची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. यामध्ये विमानाचे नाव, क्रमांक, ते कुठून उड्डाण करत आहे, कुठे जात आहे, त्याची उंची आणि वेग यासारखी माहिती उपलब्ध होते. उदाहरणार्थ, जर इंडिगो किंवा स्पाइसजेटची फ्लाइट असेल तर तिचे नाव स्पष्टपणे दिसेल. यावरून तुम्हाला सहज समजेल की हे एक व्यावसायिक विमान आहे. लष्करी विमाने अनेकदा त्यांचे ट्रान्सपॉन्डर बंद ठेवतात जेणेकरून त्यांचे स्थान ट्रॅक केले जाऊ नये. अशा स्थितीत जर नकाशावर कोणतेही जहाज दिसत नसेल तर ते लष्कराचे असू शकते. भारतीय सुरक्षा एजन्सीने हवाई हल्ल्यांचा इशारा दिला आहे. 





Source link