Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 282

भारत-पाकिस्तान संघर्षानंतर बॉलिवूडही सावध; रात्रीची झोप उडाली तरी… सूचक पोस्ट करत वेधलं लक्ष

0
भारत-पाकिस्तान संघर्षानंतर बॉलिवूडही सावध; रात्रीची झोप उडाली तरी… सूचक पोस्ट करत वेधलं लक्ष


Bollywood Celebrity on India-Pakistan War : पाकिस्तानकडून दुसऱ्या दिवशी देखील भारतावर हल्ला करण्यात येत आहे. काल पाकिस्ताननं पंजाब आणि जम्मूसोबत इतर ठिकाणांवर देखील निशाणा साधण्याचे प्रयत्न केले पण भारतानं ते सगळे हल्ले परतावून लावले आहेत. त्यानंतर भारताकडून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. या सगळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हे भारतीय सैनेचं कौतूक करताना दिसत आहेत. या सगळ्यात कंगना रणौत, अनुपम खेर, रिचा चड्ढा, कॉमेडियन वीर दास, अनिल कपूर, श्रद्धा कपूर, अंगद बेदी, मिनी माथूर अशा अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर केल्या आहेत. 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून लिहिले की ‘जम्मू टार्गेटवर आहे’ आणि त्यानंतर तिनं ‘घाबरू नका #Jammu’ असं म्हटलं.

bollywood celebrity on India Pakistan war

रिचा चड्ढानं इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत म्हटलं, ‘ही काही मॅच नाही किंवा हा काही खेळ नाही. युद्ध हे गंभीर असतं… प्रत्येक गोष्ट हास्यास्पद किंवा मीम पोस्ट नसावी. कृपया थोडा विचार करा. सीमेवर राहणाऱ्यांच्या मनात काय भीती असते हे समजून घ्या.’
 

bollywood celebrity on India Pakistan war

कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यानं देखील पोस्ट केली आहे. वीर दासनं त्याच्या X अर्थात आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये तो म्हणाला, ‘आपण आता इथे बोलत असताना ज्यांचं कुटुंब आणि मित्र हे सध्या या ब्लकआऊटमध्ये आहेत. आम्ही तुमचाच विचार करतोय आणि तुमच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांची जी सुरक्षा करत आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत. आभार, प्रार्थना आणि आदर तुम्हाला. सुरक्षित राहा. 

अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून लिहिलं की, ‘जे सैनिक महिला आणि पुरुष आपली सुरक्षा करत आहेत त्यांचे आभार मानतो आणि प्रार्थना करतो. तुम्ही आमचे खरे हिरो आहात.’
 

bollywood celebrity on India Pakistan war

अनुपम खेर यांनी आधीच्या ट्विटर अर्थात X अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली की ‘माझा चुलत भाऊ सुनील खैर हा जम्मुमध्ये राहतो त्यानं त्याच्या घराच्या इथून हा व्हिडीओ शेअर केला आहे. मी लगेच त्यांना फोन करून विचारलं की ते लोकं सुरक्षित आहेत ना? तो हसला आणि म्हणाला आमची सुरक्षा भारतीय सेना आणि माता वैष्णो देवी करत आहे. चिंता करू नका. मिसाईल खाली लागू देत नाहीयेत. जय माता दी! भारत माता की जय!’

श्रद्धा कपूर हिनं पोस्ट केलं, ‘आपल्या रक्षणकर्त्यांचा अभिमान आहे. जय हिंद.’
 

bollywood celebrity on India Pakistan war

तनिशा मुखर्जी हिनं म्हटलं, ‘हे युद्ध थांबवा. आपली सुंदर भूमी आणि लोकं नष्ट करू नका. #JammuKashmir #MissileAttacks’
 

bollywood celebrity on India Pakistan war

अंगद बेदीनं लिहिलं, ‘वाहेगुरू सगळ्यांना सुखी ठेवो. हे सर्व सहन करण्याची ताकद देवो.’
 

bollywood celebrity on India Pakistan war

मिनी माथूर हिने लिहिलं, ‘रात्री झोप येणार नाही. सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू.’
 

bollywood celebrity on India Pakistan war

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ले करण्याचे प्रयत्न केले खरे. मात्र, हे सर्व हल्ले भारतानं उधळून लावले. एकिकडून भारतीय सैन्यदल, दुसरीकडून वायुसेना आणि तिथं सागरी मार्गानं भारतीय नौदलानं पाकिस्तानची कोंडी केली. 





Source link

रितेश देशमुख जिनिलीया भारतीय लष्कर पोस्ट

0
रितेश देशमुख जिनिलीया भारतीय लष्कर पोस्ट



genelia Riteish Deshmukh posts for Indian Army : genelia Riteish Deshmukh saluting heroes protecting us : genelia Riteish Deshmukh posts amid india pakistan tension : रितेश देशमुख जिनिलीया भारतीय लष्कर पोस्ट



Source link

रायगडात ८३ हजार हेक्टरवर खरीप लागवडीचे उद्दीष्ट

0
रायगडात ८३ हजार हेक्टरवर खरीप लागवडीचे उद्दीष्ट



अलिबाग: रायगड जिल्ह्यात ८३ हजार ८९० हजार हेक्टरवर यंदा खरीपाच्या लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भात आणि नागली पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात भाताची आणि नाचणी पिकाची उत्पादकता वाढविण्यावर यंदा भर दिला जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे.

रायगड जिल्ह्यात ९५ हजार ६४५ एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदा ८१ हजार ३३५ हेक्टरवर भात लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे .गेल्या वर्षी ७८ हजार ७००हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. यंदा लागडवड क्षेत्र ३ हजार हेक्टरने वाढवण्याचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.

गेल्या वर्षी प्रती हेक्टरी उत्पादकता २ हजार ३४८ किलोग्रँम होती. यावर्षी त्यात २ हजार ९९५ किलो ग्रॅम वाढ करण्याचे उद्दीष्ट अपेक्षित आहे. जिल्ह्यात २ हजार ८११ हेक्टर नाचणी लागवडीखालील क्षेत्र आहे. यापैकी गेल्या वर्षी २ हजार ४९१ हेक्टरवर नाचणीची लागवड करण्यात आली होती. यंदा २ हजार ५५० हेक्टरवर नाचली पेरणीचे लक्षांक कृषी विभागाने ठेवला आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी १८ हजार २०० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यात १६ हजार क्विंटल सुधारीत तर २०० क्विंटल संकरीत भात बियाण्याचा समावेश आहे. महाबिज आणि इतर खाजगी कंपन्याकडून हे बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नियोजन पूर्ण झाले आहे.

खरीप हंगामासाठी १६ हजार ०२५ मेट्रीक टन खतांची मागणी शासनाकडे रायगड जिल्हा कृषी विभागाने केली आहे. यात ११ हजार ९१० मेट्रीक टन युरीया, १ हजार २५५ मेट्रीक टन डिएपी, १८०० मेट्रीक टन एनपीके तर १ हजार मेट्रीक टन इतर मिश्र खतांचा समावेश आहे. कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आली आहेत.

दरम्यान, औद्योगीकीकरण आणि शहरीकरण यामुळे शेतीक्षेत्र घटत असले तरी शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढवण्यावर भर द्या असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी कृषी अधिकाऱ्यांना दिले.

नाविन्यपूर्ण पिकांची लागवडीचे प्रयोग होणार

नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत यावर्षी जिल्ह्यात हळद, लाल आणि काळ्या रंगाचा भात, कणघर, ड्रॅगन फ्रुट, करटोली, काळीमिरी आणि मोगरा या पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा तालुक्यात ही लागवड केली जाणार आहे.

शेतकऱ्यांची लगबग…

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी देखील कामाला लागला आहे. पावसाळ्यापूर्वीची मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरु केली आहेत. दक्षिण रायगडात धूळपेरणीची कामे सुरु झाली आहेत. बांधबंदिस्ती , चर मारणे, तसेच शेतीच्या मशागतीची कामे देखील सुरु झाली आहेत.

पिक कर्ज वाटपात राजकारण नको…

खरीप आढावा बैठकीत खासदार धैर्यशील पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पिक कर्ज वितरणात होत असलेल्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त केली. सुधागड तालुक्यात कर्ज वितरण करताना शेतकऱ्यांची अडवणूक झाल्याचे त्यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्या निदर्शनास आणून दिले. कर्ज वितरणात कुठल्याही परिस्थितीत राजकारण येऊ देऊ नका असा सल्ला त्यांनी दिला.



Source link

Job opportunity: Recruitment at IITM नोकरीची संधी : ‘आयआयटीएम’मध्ये भरती

0
Job opportunity: Recruitment at IITM नोकरीची संधी : ‘आयआयटीएम’मध्ये भरती


● इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिओरॉलॉजी ( IITM), पुणे (पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार) प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट सायंटिस्ट, प्रोजेक्ट कन्स्लटंट्स, प्रोग्राम मॅनेजर पदांची करार पद्धतीने अल्पकालीन भरती. एकूण रिक्त पदे – १७८. पोस्ट कोडनिहाय रिक्त पदांचा तपशिल –

( I) सायंटिफिक असिस्टंट – २६ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३) (१ पद दिव्यांग कॅटेगरीसाठी राखीव).

वेतन – दरमहा रु. २९,२००/- एचआरए (रु. ७,८८४/-) एकूण रु. ३७,०८४/-.

(१) सायंटिफिक असिस्टंट – २ पदे.

पात्रता – मास कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर डिझाईन/ ग्राफिक्स/डिझाईन/अॅनिमेशन विषयातील पदवी सरासरी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (एम.एससी. पदवीधारकांसाठी गुणांची अट नाही.)

इष्ट पात्रता – आयटी, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी आणि संवाद कौशल्य.

(२) सायंटिफिक असिस्टंट – १० पदे.

(३) सायंटिफिक असिस्टंट – ४ पदे.

पद क्र. २ व ३ साठी पात्रता – बी.एससी. (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन/अॅटमॉस्पेरिक सायन्सेस/ मेटिओरॉलॉजी/ कॉम्प्युटर सायन्स/जिऑलॉजी इ.) किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (एम.एससी. पदवीधारकांसाठी गुणांची अट लागू नाही.)

इष्ट पात्रता – लॅबोरेटरी एक्सपरिमेंट्स, सिम्युलेशन्स, सॉलिड मॉडेलिंग, डेटाबेस मॅनेजमेंट आणि PHP, Java, HTML इ. चा वापर करून आयटी डेव्हलपमेंट्स इ.

(४) सायंटिफिक असिस्टंट – ४ पदे

पात्रता – बी.एससी. (फिजिक्स/केमिस्ट्री/मॅथेमॅटिक्स/अॅटमॉस्पेरिक सायन्सेस/एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस/जीओफिजिक्स (मेटिओरॉलॉजी /इन्स्ट्रूमेंटेशन)) किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

इष्ट पात्रता – फोरकास्टिंग मॉडेल्स चालविण्याचा अनुभव; प्रोग्रामिंग लँग्वेजेस मधील अनुभव.

(५) सायंटिफिक असिस्टंट- ६ पदे.

पात्रता – बी.एससी. (फिजिक्स/केमिस्ट्री/इन्स्ट्रूमेंटेशन/अॅटमॉस्पेरिक फिजिक्स/अॅटमॉस्पेरिक सायन्सेस/मीटीओरॉलॉजी) किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

इष्ट पात्रता –वेदर रडार / लिडार /विंड प्रोफाइलर /एअरोसोल /क्लाउड मायक्रोफिजिक्स /लायटनिंग /रेडिएशन /साउंडिंग /केमिस्ट्री आणि इतर मीटिओरॉलॉजिकल इन्स्ट्रूमेंट्सचे इन्स्ट्रूमेंटेशन संबंधित कामाचा अनुभव इ.

( II) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I – एकूण ८८ पदे . वेतन दरमहा – रु. ५६,०००/- एचआरए रु. १५,१२०/- .

(१) प्रोजेक्ट सायंटिस्ट- – १२ पदे.

पात्रता – एम.एससी. (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन/रेडिओ फिजिक्स/अॅटमॉस्फेरिक सायन्सेस/ मीटीओरॉलॉजी) किंवा बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेंटेशन/ EEE/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/एअरोनॉटिकल) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(२) प्रोजेक्ट सायंटिस्ट- क – २१ पदे.

पात्रता – एम.एससी. (फिजिक्स/मॅथेमॅटिक्स/मीटिओरॉलॉजी/अॅटमॉस्फेरिक सायन्स/ डेटासायन्स/ ओशियानोग्राफी किंवा बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/डेटा सायन्स) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(३) प्रोजेक्ट सायंटिस्ट- क – १२ पदे.

पात्रता – एम.एससी. (फिजिक्स/मॅथेमॅटिक्स/केमिस्ट्री/ जीओफिजिक्स/मीटीओरॉलॉजी/अॅटमॉस्फेरिक सायन्स/एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस) किंवा एम.टेक. किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(४) प्रोजेक्ट सायंटिस्ट- I – ३६ पदे.

पात्रता – एम.एससी. (फिजिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन/ मीटीओरॉलॉजी/अॅटमॉस्फेरिक सायन्सेस/कॉम्प्युटर सायन्स/जीओलॉजी इ.) किंवा बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रूमेंटेशन/ EEE / E & T/मेकॅनिकल/सिव्हील/कॉम्प्युटर सायन्स/आयटी इ.) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(५) प्रोजेक्ट सायंटिस्ट- क – २ पदे.

(६) प्रोजेक्ट सायंटिस्ट- क – ४ पदे.

पद क्र. ५ व ६ साठी पात्रता – एम.एससी. (फिजिक्स/ मीटीओरॉलॉजी/ अॅटमॉस्फेरिक सायन्सेस) किमान ६० टक्के गुण.

(७) प्रोजेक्ट सायंटिस्ट- क – १ पद.

पात्रता – कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स/आयटीमधील मास्टर्स डिग्री किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

अन्य पदांसाठीची इष्ट पात्रता www. tropmet. res. in/ careers वर उपलब्ध आहे.

वयोमर्यादा – (दि. १५ मे २०२५ रोजी) सायंटिफिक असिस्टंट – २८ वर्षे, प्रोजेक्ट सायंटिस्ट- क – ३५ वर्षे, प्रोजेक्ट सायंटिस्ट- II – ४० वर्षे, प्रोजेक्ट सायंटिस्ट- ककक – ४५ वर्षे, प्रोजेक्ट सायंटिस्ट-ई – ५० वर्षे.

ऑनलाइन अर्ज http:// www. tropmet. res. in/ careers या संकेतस्थळावर दि. १५ मे २०२५ (५ वाजे)पर्यंत करावेत.

suhaspatil237@gmail.com



Source link

India Pakistan War Updates | Operation Sindoor | 24 Airports Shut Across North India as India-Pakistan Tensions Escalate

0
India Pakistan War Updates | Operation Sindoor | 24 Airports Shut Across North India as India-Pakistan Tensions Escalate



India Pakistan War Updates | Operation Sindoor | 24 Airports Shut Across North India as India-Pakistan Tensions Escalate | भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; देशातील ‘या’ २४ विमानतळांवरील उड्डाणे थांबवली, वाचा संपूर्ण यादी



Source link

Operation Sindoor: Pakistani Fighter Jet Shot Down in Pathankot by Indian Air Defence

0
Operation Sindoor: Pakistani Fighter Jet Shot Down in Pathankot by Indian Air Defence



Operation Sindoor: Pakistani Fighter Jet Shot Down in Pathankot by Indian Air Defence | भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानला जबरदस्त झटका, पठाणकोटमध्ये पाडलं पाकिस्तानी विमान



Source link

Operation Sindoor: “U.S. Won’t Intervene in India-Pakistan Conflict”, Says JD Vance

0
Operation Sindoor: “U.S. Won’t Intervene in India-Pakistan Conflict”, Says JD Vance



Operation Sindoor: “U.S. Won’t Intervene in India-Pakistan Conflict”, Says JD Vance | “भारताला शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही”, भारत-पाकिस्तान तणावावर अमेरिकेची भूमिका; जेडी व्हान्स म्हणाले, “आम्हाला अडकायचं नाही”



Source link

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक युद्ध होणार का? ग्रह-गोचरकडून पाहा संकेत

0
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक युद्ध होणार का? ग्रह-गोचरकडून पाहा संकेत


६-७ मे २०२५ च्या मध्यंतरी रात्री, भारतीय सैन्याने पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या २६ जणांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हवाई हल्ल्याद्वारे हल्ला केला. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. पण यानंतर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सूडाच्या ज्वाला शांत होतील की युद्धात रूपांतरित होतील? ग्रहांची स्थिती आणि त्यांचे भ्रमण काय सांगते?

शुक्र, शनि आणि राहू यांची गोचरातील स्थिती पाकिस्तानसाठी मोठ्या अपमानाची आणि आर्थिक नुकसानाची परिस्थिती दर्शवत आहे. पाकिस्तानच्या उत्पन्नाच्या स्रोतांवरील नाकेबंदी बराच काळ कायम राहील; चालू असलेल्या सर्व आयात-निर्यातीवरही परिणाम होणार आहे.

पाकिस्तान मे २०२५ पर्यंत भारतावर हल्ला करू शकतो. पण हे हल्ले पाकिस्तानसाठी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे ठरतील. पाकिस्तानच्या हेतूंना भारताकडून निश्चितच योग्य उत्तर मिळेल.

मोठ्या प्रमाणावर युद्धाची परिस्थिती निर्माण होईल का?

क्षणभंगुर परिस्थिती सांगते की पाकिस्तानला युद्ध घोषित करणे कठीण आहे. पण पाकिस्तान आपल्या जुन्या सवयीमुळे लहान दहशतवादी गटांच्या माध्यमातून भारतावर हल्ले करण्यापासून मागे हटणार नाही. भारतीय सैन्य या हल्ल्यांना योग्य उत्तर देत राहील आणि भारत स्वतः युद्ध घोषित करणार नाही परंतु शांततापूर्ण धोरण पुढे ठेवून दहशतवादी हल्ले हाणून पाडण्यात यशस्वी होईल.

(हे पण वाचा – India Pakistan War : भारत-पाक युद्धात 9 आकडा का ठरतोय महत्त्वाचा? काय आहे यामागचं कारण?) 

पाकिस्तान उघडपणे युद्ध घोषित करू शकणार नाही. जर पाकिस्तानने ही चूक केली तर जून २०२५ पर्यंत पाकिस्तानच्या सर्व समस्या भारतीय सैन्य सोडवेल.

अणु हल्ला होईल का?

या मार्गावर, पाकिस्तान किंवा भारताकडून कोणत्याही प्रकारच्या अणुहल्ल्याचे कोणतेही संकेत नाहीत किंवा तिसऱ्या महायुद्धाचे कोणतेही संकेत नाहीत. जून २०२५ पर्यंत, पाकिस्तान आपला सन्मान वाचवू शकणार नाही, भारताचे कोणतेही मोठे नुकसान करू शकणार नाही किंवा युद्ध घोषित करू शकणार नाही. पाकिस्तान दोन महिने पाण्याबाहेर असलेल्या माशासारखा संघर्ष करत राहील.





Source link

पालक कुटुंब निवृत्तीवेतनाचा शासननिर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू, वृद्ध दाम्पत्याला दिलासा देताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा

0
पालक कुटुंब निवृत्तीवेतनाचा शासननिर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू, वृद्ध दाम्पत्याला दिलासा देताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा



Government decision family pension High Court verdict elderly couple पालक कुटुंब निवृत्तीवेतनाचा शासननिर्णय पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू, वृद्ध दाम्पत्याला दिलासा देताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा



Source link

उपकराबाबत केंद्राच्या धोरणाने राज्यांचे आर्थिक नुकसान, महाराष्ट्राचा तक्रारीचा सूर

0
उपकराबाबत केंद्राच्या धोरणाने राज्यांचे आर्थिक नुकसान, महाराष्ट्राचा तक्रारीचा सूर



Central policy on cess causing financial loss to states. Maharashtra’s tone of complaint उपकराबाबत केंद्राच्या धोरणाने राज्यांचे आर्थिक नुकसान, महाराष्ट्राचा तक्रारीचा सूर



Source link