Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 283

दंड भरून तीन महिन्यांत नोंदणीसाठी मुदत, अनधिकृत शाळा बसवर कारवाई, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश

0
दंड भरून तीन महिन्यांत नोंदणीसाठी मुदत, अनधिकृत शाळा बसवर कारवाई, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश


मुंबई : राज्यात सध्या ४० हजार स्कूल बस नोंदणीकृत असून ५० ते ६० हजार वाहने स्कूल बस म्हणून अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने ने-आण करीत आहेत. त्यामुळे अनधिकृत वाहनचालक व मालकांनी दंड भरून तीन महिन्यांमध्ये स्कूल बसच्या २०११ च्या नियमावलीनुसार नोंदणी करण्यात यावी. परिवहन विभागाने अनधिकृत स्कूल बस आणि वाहनांवर कारवाई करावी. अशी वाहने आढळल्यास संबंधित परिवहन अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी येथे दिले.

सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात स्कूल बस असोसिएशन आणि पालक असोसिएशनच्या प्रतिनिधींची बैठक झाली. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात ५०-६० हजार वाहने स्कूल बस म्हणून चालविली जात असल्याची तक्रार असोसिएशनच्या प्रतिनिधींनी केली. नोंदणीकृत स्कूल बसचालकांकडून नियमावलीचे पालन केले जाते. मात्र अनधिकृत वाहनांमधून मुलांना धोकादायक पद्धतीने नेण्यात येते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अनधिकृत स्कूलबस चालक-मालकांनी परिवहन खात्याकडे दंड भरून नोंदणी करून घ्यावी, अन्यथा कारवाई केली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी परिवहन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य असून, यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील. त्यावेळी वाहनचालक आणि पालक संघटनांच्या अडचणींचाही विचार केला जाईल. वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सरनाईक यांनी नमूद केले.



Source link

शिवरायांचा इतिहास आता केंद्रीय अभ्यासक्रमात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती

0
शिवरायांचा इतिहास आता केंद्रीय अभ्यासक्रमात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती



Shivaji maharaj history is now in the central curriculum, information from Education Minister Dada Bhuse शिवरायांचा इतिहास आता केंद्रीय अभ्यासक्रमात, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती



Source link

न्यायाधीशांच्या नियुक्त्या लवकर करा, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला विनंती

0
न्यायाधीशांच्या नियुक्त्या लवकर करा, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला विनंती



Appoint judges early, Supreme Court requests Centre न्यायाधीशांच्या नियुक्त्या लवकर करा, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला विनंती



Source link

पाकिस्तानचा पुन्हा ‘एलओसी’वर गोळीबार, भारतीय सैनिकांचेही चोख प्रत्युत्तर

0
पाकिस्तानचा पुन्हा ‘एलओसी’वर गोळीबार, भारतीय सैनिकांचेही चोख प्रत्युत्तर



Pakistan again fires at LoC, Indian soldiers give befitting reply पाकिस्तानचा पुन्हा ‘एलओसी’वर गोळीबार, भारतीय सैनिकांचेही चोख प्रत्युत्तर



Source link

गोल्डन टेम्पलमध्ये इतिहासात पहिल्यांदा ब्लॅकआऊट : Watch Video

0
गोल्डन टेम्पलमध्ये इतिहासात पहिल्यांदा ब्लॅकआऊट : Watch Video


No match is being played.

May 08, 2025 | Match 63

ICC CWC League 2, 2023-27

UAE

(50 ov) 296/6

VS

SCO

199(43.3 ov)

United Arab Emirates beat Scotland by 97 runs
Full Scorecard →

May 07, 2025 | Match 57

Indian Premier League, 2025

CSK

(20 ov) 179/6

VS

KKR

183/8(19.4 ov)

Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 2 wickets
Full Scorecard →

May 06, 2025 | Match 56

Indian Premier League, 2025

GT

(20 ov) 155/8

VS

MI

147/7(19 ov)

Gujarat Titans beat Mumbai Indians by 3 wickets (DLS method)
Full Scorecard →





Source link

भारतीय लष्कराची जोरदार कारवाई! पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ल्याचा प्रयत्न; प्रत्युत्तरादाखल लाहोरसह अनेक ठिकाणी हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त

0
भारतीय लष्कराची जोरदार कारवाई! पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ल्याचा प्रयत्न; प्रत्युत्तरादाखल लाहोरसह अनेक ठिकाणी हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त

साहस टाइम्स :-पाकिस्तानकडून भारतातील चार राज्यांतील १५ महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र भारतीय सैन्याच्या दक्षतेमुळे हा कट उधळून लावण्यात आला. जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थान ही राज्ये पाकिस्तानच्या रडारवर होती. ७ ते ८ मेच्या रात्री अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. भारतीय एअर डिफेन्स सिस्टम आणि इंटिग्रेटेड काउंटर-यूएएस ग्रिडमुळे हे हल्ले निष्क्रिय करण्यात आले.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या प्रयत्नांचे अवशेष विविध ठिकाणी आढळून आले असून, हे पुरावे पाकिस्तानी हस्तक्षेप स्पष्ट करतात. या पार्श्वभूमीवर भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरसह अनेक ठिकाणी जोरदार प्रत्युत्तर दिले. लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली पूर्णतः निष्प्रभ करण्यात आली असून, पाकिस्तानची अनेक रडार सिस्टिम्स उद्ध्वस्त करण्यात आल्याचे समजते.

या कारवाईदरम्यान भारताने हॅरोप ड्रोनचा वापर करून अत्यंत अचूकतेने पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य केले. ही कारवाई भारत सरकारने अधिकृत निवेदनाद्वारे जाहीर केली आहे. भारताने पाकिस्तानला त्याच तीव्रतेने आणि पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरही जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये अंधाधुंध गोळीबार आणि तोफांचा मारा केला होता. या हल्ल्यांत १६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ३ महिला आणि ५ मुलांचा समावेश आहे. याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, सीमारेषेवर सजगता अधिक वाढवण्यात आली आहे.

या दरम्यान, काल रात्री पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये एक पाकिस्तानी घुसखोर सीमा ओलांडत असताना बीएसएफच्या जवानांनी गोळीबार करून त्याचा खात्मा केला. तो अंधाराचा फायदा घेऊन भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होता.

भारत सरकार आणि लष्कराच्या या तीव्र आणि निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला असून, देशभरातून लष्कराच्या शौर्याचे कौतुक होत आहे.

चिखलीत धारदार हत्याराने वार करून एकाचा खून

0
चिखलीत धारदार हत्याराने वार करून एकाचा खून


पिंपरी : चिखलीतील कृष्णानगर चौक ते चेरी चौक या मुख्य रस्त्यावर एकाचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. महेश चामे (रा. नवचैतन्य सोसायटी, चिखली, मूळ लातूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हे मोबाइल स्क्रीन गार्ड विक्रीचा व्यवसाय करीत होते. ते रस्त्यालगत दुकान लावायचे. गुरुवारी सकाळी कृष्णानगर चौक ते चेरी चौक या मुख्य रस्त्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, महेश गंभीर जखमी असल्याचे समोर आले. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महेश यांचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले. हा खून कोणी, का, केला याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. तसेच, आरोपींबाबत माहिती मिळाली असून, पोलीस त्यांच्या मागावर असल्याचेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.



Source link

corridor is proposed between chauphala and mahadwar ghat survey of 630 property owners begins

0
corridor is proposed between chauphala and mahadwar ghat survey of 630 property owners begins



corridor is proposed between chauphala and mahadwar ghat survey of 630 property owners begins | ‘पंढरपूर कॉरिडॉर’साठी बाधितांचे सर्वेक्षण सुरू, बारा पथकांद्वारे काम; काही बाधितांचा विरोध



Source link

pune municipal Corporation warns to cut water supply of citizens protesting water meter installation

0
pune municipal Corporation warns to cut water supply of citizens protesting water meter installation



pune municipal Corporation warns to cut water supply of citizens protesting water meter installation | पाण्याच्या मीटरला विरोध करणाऱ्यांचा थेट नळजोड बंद करण्याचा पुणे महापालिकेचा इशारा



Source link

लग्न घटिका रोखली पावसाने !

0
लग्न घटिका रोखली पावसाने !


ठाणे – मे महिना म्हटलं की लग्नसराईचा हंगाम. घरासमोर मांडव, उत्साहाचे वातावरण आणि नटलेले वधू वर. मात्र यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे या आनंदावर विरझण घातले. त्यामुळे ऐन लग्नात अनेकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. तर पुढील मुहुर्तावर लॉन्सवर होणारी लग्न रद्द करून अनेकांना ऐनवेळी बंदिस्त हॉल शोधावे लागत आहेत. यामुळे मंडप व्यवस्थापन, स्वागत सजावट करणारे, जेवणाचे व्यवस्थापक, छायाचित्रकारांना नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

साधारणत: एप्रिल मे महिने म्हणजे लग्नसराईचा कालावधी मानला जातो. दिवाळीनंतर विवाहसोहळ्यांना सुरुवात होत असते. एप्रिल ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर विवाहसोहळे दरवर्षी होत असतात. यामध्ये विवाह सोहळ्याला नवनवीन कार्यक्रमांमुळे आनंदाचा रंग चढतो. वधु वरांसाठी महत्वाचा दिवस असल्याने त्याकरिता काही दिवस आधीपासुनच नियोजन सुरु असते. यामध्ये सांगितिक कार्यक्रम, जेवण, लग्नाचे ठिकाण, वधुवरांच्या स्वागतासाठी सजावट, मांडव, अविस्मरणीय क्षण टिपण्यासाठी छायाचित्र अशा विविध गोष्टींचे आयोजन आखले जाते.

मात्र, अशा विविध गोष्टींचे नियोजन करून देखील यंदा मे महिन्यात अवेळी आलेल्या पावसाने आनंदाच्या दिवसांवर पाणी फिरवल्याचे चित्र सर्वत्र दिसुन येत आहे. अनेकांचे विवाहसोहळे सुरू असताना आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर, अनेक विवाहसोहळे हे सायंकाळच्यावेळी लॉन्सवर केले जातात. अचानक आलेल्या पावसामुळे लॉन्सवर होणारी लग्न रद्द करून अनेकांना ऐनवेळी बंदिस्त हॉल शोधावे लागत असल्याचेही समोर आले आहे.

आनंदाच्या क्षणावर पावसाचे पाणी

हल्लीच्या काळात विवाहसोहळे मोठ्या धुमधडाक्यात करण्याकडे नागरिकांचा कल दिसुन येतो. यामध्ये सायंकाळच्यावेळी लॉन्सवर लग्न, जेवणासाठी विविध पदार्थांची रेलचेल, फटाक्यांची आतषबाजी, वधुवरांचे स्वागत असा ट्रेंड दिसुन येतो. मात्र अवकाळी पावसामुळे नवविवाहित जोडप्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अडचण सामोरे जावे लागत आहे. ओपन लॉन्सवरील लग्नांना आता बंदिस्त हॉल्स शोधावे लागत आहेत.

मे महिन्यात लग्नांचे मुहूर्त मोठ्या प्रमाणात असून अनेक लग्नसराईंचे आयोजन लॉन्सवर करण्यात आले होते. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे लॉन्सवरील लग्न रद्द केले जात आहेत. ही लग्न ऐनवेळी बंदिस्त हॉलमध्ये ठेवली जात आहेत. त्यामुळे स्वागतासाठी तसेच लग्नाच्या दरम्यान केली जाणारी फटाक्यांच्या आतषबाजीची तसेच स्वागतासाठी केली जाणाऱ्या सजावटीच्या ऑर्डर रद्द करण्यात आल्या. ऑर्डर रद्द झाल्याने ७० टक्के नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. – नितेश भोईर, सजावट करणारे

मे महिना हा लग्न सराईचा महिना असून अनेकजण या कालावधीत लॉन्सवर लग्न आयोजित करतात. मला अशाच एका लग्नाची आगाऊ नोंदणी होती. परंतू, पावसामुळे लॉन्सवर लग्न केल्यास नुकसान होईल अशी भीती वधु-वरांच्या कुटूंबामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐनवेळी ते बंदिस्त सभागृह शोधत आहेत. जर हे सभागृह मिळाले नाही तर, लग्नाची तारिख पुढे ढकलण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींमुळे आमची ऑर्डर रद्द झाल्यास आमचे एक दिवसाचे आर्थिक नुकसान होणार आहे. – निखील जाधव, फोटो आणि व्हिडीओग्राफर

अवेळी आलेल्या पावसामुळे मांडव बांधण्यासाठी असणारे बांबु पावसाच्या पाण्याने भिजले आहेत. अनेक लग्न ही पुढील मुहुर्तावर होणार आहेत. तर लॉनवरील लग्नासाठी नागरिक आग्रही नाहीत. – मनिष मुंद्रा, मांडव व्यवस्थापक



Source link