Friday, July 17, 2026
Home Blog Page 2809

Dr. Narendra Dabholkar: खडकी दारुगोळा कारखान्यातील गोळ्यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या?; तपासाबाबत सीबीआय उदासीन

0
Dr. Narendra Dabholkar: खडकी दारुगोळा कारखान्यातील गोळ्यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या?; तपासाबाबत सीबीआय उदासीन


डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्यात सहा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून त्यातील दोनच साक्षीदारांना संशयित आरोपींची छायाचित्रे दाखवण्यात आली आहे. इतर साक्षीदारांना छायाचित्रे का दाखविली नाहीत, याचे सांगता येणार नसल्याचे देखील सिंग म्हणाले. दरम्यान, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे येरवडा कारागृहात होते हे माहिती होते. सगळे साक्षीदारही पुण्यातीलच आहेत, याची देखील माहिती होती. पण, मी त्यांची कारागृहातील ओळख परेड देखील केली नव्हती. या सोबतच खंडेलवाल आणि नागोरीला आम्ही क्लीन चीट दिली नाही असे त्यांनी सांगितले.



Source link

Rajiv Kapoor Birthday: ‘कपूर’ घराण्याचा लेक ज्याला मनोरंजन विश्वात प्रसिद्धी मिळालीच नाही! वाचा राजीव कपूरबद्दल…

0
Rajiv Kapoor Birthday: ‘कपूर’ घराण्याचा लेक ज्याला मनोरंजन विश्वात प्रसिद्धी मिळालीच नाही! वाचा राजीव कपूरबद्दल…


ज्याप्रमाणे राजीव यांचे व्यावसायिक जीवन विस्कळीत झाले होते, त्याचप्रमाणे त्यांचे वैयक्तिक आयुष्यही गडबडले होते. राजीव यांनी २००१मध्ये आर्किटेक्ट आरती सभरवाल यांच्याशी लग्न केले होते. परंतु, त्यांचे लग्न २ वर्षेही टिकू शकले नाही. २००३मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. लग्नापूर्वी राजीवचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. अभिनेत्री दिव्या राणा, अभिनेत्री तृष्णा यांच्यासोबत त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, नंतर ते एकटेच राहिले.



Source link

महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांना आर्थिक गुन्हे शाखेनं बजावले समन्स, आज होणार चौकशी

0
महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांना आर्थिक गुन्हे शाखेनं बजावले समन्स, आज होणार चौकशी


Mumbai BMC Covid Scam Case :  कोरोना काळात बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार (Ramakant Biradar) यांना आर्थिक गुन्हे शाखेनं (Economic Offences Wing ) समन्स बजावले आहे. कोविड काळात झालेल्या बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी बिरादार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आता  मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर माकांत बिरादार हे जबाब नोंदवणार आहेत.

घोटाळ्याच्या वेळी रमाकांत बिरादार हे मुंबई महापालिकेच्या खरेदी विभागात उपमहापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होते. कोविड काळात झालेल्या बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. सध्या बिरादार हे उपमहापालिका आयुक्त झोन 2 आहेत. कोविड काळात ते केंद्रीय खरेदी विभागाचे प्रभारी होते.  यापूर्वी ईडीने रमाकांत बिरादार यांचे जबाब नोंदवले आहे. दरम्यान, याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर यांच्यासह वेदान्त इनोटेक प्रा. लि, तत्कालीन अतिरिक्त पालिका आयुक्त, मध्यवर्ती खरेदी विभागाचे (सीपीडी) तत्कालीन उपायुक्त व अनोळखी सरकारी कर्मचारी यांच्याविरोधात भादंवि कलम 409, 418, 420 व 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार 49 लाख 63 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पडवाले हे याप्रकरणातील तक्रारदार आहेत. मृतदेहासाठी पिशव्या, मुखपट्टीसह इतर साहित्याच्या खरेदीप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी ही चौकशी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Kishori Pednekar : कोरोनाकाळातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, किशोरी पेडणेकर यांना न्यायालयाचा दिलासा कायम



Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…


Bhandara News : भंडाऱ्यात आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; 36 जणांवर उपचार सुरू, चौघांची प्रकृती गंभीर



Source link

Naxalism : ८२ लाखांचे बक्षीस असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला पत्नीसह अटक, महाराष्ट्रासह ४ राज्यात ६० गुन्हे

0
Naxalism : ८२ लाखांचे बक्षीस असणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला पत्नीसह अटक, महाराष्ट्रासह ४ राज्यात ६० गुन्हे


एटीएसच्या म्हणण्यानुसार, अशोक रेड्डी याच्यावर चार राज्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा,  दंगल,  पोलिसांवर हल्ला, अपहरण, दरोडा, जाळपोळ, शस्त्र कायदा आणि स्फोटक कायदा असे एकूण ६० गुन्हे दाखल आहेत. अशोक रेड्डी तेलंगणा आणि छत्तीसगडच्या भागात नक्षलवादी कारवाया करत असे. मध्य प्रदेशात नक्षलवाद्यांचे जाळे मजबूत करून त्यात लोकांना सहभागी करून घेण्यात अशोक रेड्डी यांचाही हात होता. अशोक रेड्डी आणि रहमती यांची चौकशी केल्यानंतर एटीएस अधिकारी त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.



Source link

माझ्या जीवाला धोका, अनोळखी व्यक्तींकडून पाळत; भाजप नेते प्रसाद लाड यांचे मुख्यमंत्री, पोलिसांना

0
माझ्या जीवाला धोका, अनोळखी व्यक्तींकडून पाळत; भाजप नेते प्रसाद लाड यांचे मुख्यमंत्री, पोलिसांना


मुंबई :  भाजपचे नेते, आमदार आणि व्यावसायिक प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. असेच एक पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुंबई पोलीस आयुक्तांना (Mumbai Police) पत्र लिहिले आहे. गायकवाड नामक व्यक्तीकडून जीवे मारण्याबाबत विविध मार्गांचा अवलंब करत प्रयत्न करत असल्याचा उल्लेख आमदार प्रसाद लाड (Pradad Lad Letter) यांनी उल्लेख केला आहे. त्याशिवाय, एक अनोळखी व्यक्ती आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे लाड यांनी म्हटले. 

पत्रात नेमकं प्रसाद लाड काय म्हणाले?

मला प्राप्त झालेल्या पत्रानुसार या पत्रात राहुल कंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड नामक व्यक्तीकडून मला जीवे मारण्याबाबत विविध मार्गांचा अवलंब करत प्रयत्न करत असल्याबाबत या पत्रात उल्लेख आहे. याबाबत राहुल कंडागळे यांनी महिन्याभरापूर्वी खार पोलीस स्टेशनला याची रितसर कल्पना दिली होती. त्याचबरोबर यांनी गायकवाड नामक व्यक्तीने जितेंद्र कांबळे व त्याचे दोन सहकारी यांना दगडी चाळ व तसेच चेंबूर येथे घेऊन गेल्याचे पत्रात नमूद केलेले आहे. त्याप्रमाणे जितेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल गायकवाड नामक व्यक्ती वरील नमूद दोन ठिकाणी घेऊन गेला होता. त्याप्रमाणे राहुल कंडागळे तसेच जितेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गायकवाड व्यक्ती आहे का ? याचा तपास होणे आवश्यक आहे. 

राहुल कंडागळे यांनी महिन्याभरापूर्वी माहिती दिलेली असताना सुद्धा यावर कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही. त्याचप्रमाणे मागील आठवड्यात माझ्यासह माझे सहकारी हे अमित पवार यांच्यावर अनोळख्या व्यक्तीकडून पाळत ठेवण्यात येत असल्याबाबत निदर्शनास आले आहे. माझ्या राहत्या घराजवळ व ऑफिसजवळ एक अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचे मला जाणवले आहे. या सर्व घटनांबाबत सोबत जोडलेल्या पत्रांच्या माध्यमातुन रितसर माहिती देण्यात आलेली आहे. यातील एक विषय ‘श्रमिक उत्कर्ष सभा’ या युनियनच्या संबंधित असून तसेच दुसरा विषय हा माझ्या व्यवसायाशी संबंधित आहे. तरी मी एक लोकप्रतिनिधी या नात्याने विविध क्षेत्राशी संबंध येत असतो. 

याबाबतचे निवेदन मागील आठवडयात सह-आयुक्त गुन्हे व कायदा सुव्यवस्था यांना दिली होती. तरी वरील दोन्ही विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन तातडीने दखल घेण्यात यावी. व आपणांकडुन उचित कारवाई करण्यात येईल अशी मी अपेक्षा बाळगतो.



Source link

Uddhav Thackeray: “तेच तेज.. तोच स्वाभिमान” उद्धव ठाकरेंच्या हिंगोली सभेचा टीझर लाँच, मराठवाड्यात रविवारी राजकीय धुमशान!

0
Uddhav Thackeray: “तेच तेज.. तोच स्वाभिमान” उद्धव ठाकरेंच्या हिंगोली सभेचा टीझर लाँच, मराठवाड्यात रविवारी राजकीय धुमशान!


हिंगोलीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार –

उद्धव ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा विरोधकांवर धडाडणार आहे. हिंगोलीत उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेचा टीझर ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आला आहे.ठाकरेंची सभा हिंगोलीत रामलीला मैदानात दुपारी दोन वाजता होणार आहे.’तेच तेज,तेच सळसळतं रक्त,तोच स्वाभिमान आणि तोच निष्ठावंतांचा जनसागर’, या वाक्यांसह या टीझर व्हिडीओची सुरुवात होते. हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असं आवाहन प्रोमोच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे.



Source link

Eknath khadse : भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना मोठा दिलासा

0
Eknath khadse : भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना मोठा दिलासा


पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. ACB नं दाखल केलेल्या गुन्ह्यात २९ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी यावर आक्षेप घेण्यात आले आहे. याच प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची नुकतीच कारागृहातून सुटका झाली आहे.



Source link

Sana Khan Case Update : भाजपाच्या सना खान हत्या प्रकरणात अमित साहू आणि संजय शर्मांची समोरासमोर चौकशी

0
Sana Khan Case Update : भाजपाच्या सना खान हत्या प्रकरणात अमित साहू आणि संजय शर्मांची समोरासमोर चौकशी



<p>नागपूरच्या भाजपा पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात चौकशीचं सत्र सुरू आहे. मध्य प्रदेशचे आमदार संजय शर्मा यांची आज चौकशी झालीय. मुख्य आरोपी अमित साहू आणि संजय शर्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यात आलीय.</p>



Source link

Hrithik Roshan Girlfriend: १२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट करण्यावर पहिल्यांदाज बोलली सबा

0
Hrithik Roshan Girlfriend: १२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट करण्यावर पहिल्यांदाज बोलली सबा


हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या डेटिंगच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये प्रचंड रंगत आहेत. हृतिकने २००० साली सुझेन खान सोबत लग्न केले होते. मात्र, २०१४ साली त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हृतिक गेल्या काही महिन्यांपासून सबाला डेट करत आहे. सबा देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. एअरपोर्ट असो किंवा आउटिंग सबा आणि ह्रतिक सगळीकडे एकत्र जाताना दिसतात. तर, ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे देखील बोलले जात आहे.



Source link