Saturday, July 18, 2026
Home Blog Page 2794

Chitrangada Singh Birthday: हवाई सुंदरी बनण्याचं स्वप्न; मग मनोरंजन विश्वात कशी आली चित्रांगदा सिंह? वाचा…

0
Chitrangada Singh Birthday: हवाई सुंदरी बनण्याचं स्वप्न; मग मनोरंजन विश्वात कशी आली चित्रांगदा सिंह? वाचा…


चित्रांगदा सिंहने कधीच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. इतकेच नाही तर, तिने सुपरहिट चित्रपट ‘हजारों ख्वैशीं ऐसी’ नंतर ब्रेक घेतला, तेव्हा तिने अभिनयात परतण्याचा विचारही केला नव्हता. चित्रांगदाला शॉपिंगची आवड आहे. या विषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली होती की, ‘चांगला बँक बॅलन्स खूप महत्वाची आहे. कारण, खरेदी करत राहणे देखील खूप महत्त्वाचे आहे. चित्रांगदाने २००१मध्ये ज्योती रंधावा सोबत लग्न केले होते. मात्र, २०१४मध्ये त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.



Source link

शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावं, कृषी विभागाचं आवाहन; 31 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

0
शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावं, कृषी विभागाचं आवाहन; 31 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज


Agriculture News : शेतकऱ्यांनी (Farmers) खरीप हंगाम सन 2023 मधील पीक स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन पुणे कृषी विभागानं केलं आहे. कृषी विभागामार्फत या चालू खरीप हंगामात सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग आणि सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या पीक स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धा राबवण्यात येत असल्याची माहिती पुणे कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आली. 

स्पर्धेसाठी अटी आणि शर्ती

या स्पर्धेसाठी काही स्पर्धेसाठी अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रमाणे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क असणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी. ती जमीन तो स्वत: कसत असावा. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. 

पीक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर आणि इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासोबत जोडावयची कागदपत्रे 

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ),  ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खात्याच्या चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील. सर्वसाधारण आणि आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीक निहाय बक्षीस देण्यात येणार आहेत. यामध्ये तालुका पातळीवर प्रथम क्रमांकासाठी पाच हजार, द्वितीय तीन हजार आणि तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये, जिल्हा पातळीवर 10 हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये तर राज्यपातळीवर प्रथम 50 हजार, द्वितीय 40 हजार तसेच तृतीय 30 हजार रुपये बक्षीस असणार आहे. दरम्या, या योजनेबाबत अधिक माहिती https://krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Rain: पाच किंवा आठ ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार, हवामान विभागाची माहिती, कोकण वगळता राज्यात पावसाची मोठी तूट



Source link

Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्याची काय स्थिती? वाचा वेदर अपडेट

0
Maharashtra Weather: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्याची काय स्थिती? वाचा वेदर अपडेट



Maharashtra rain Update: राज्यात आज तब्बल ११ जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.



Source link

धक्कादायक! लग्न जमत नाही म्हणून मुलानं केलं भयानक कांड, डोक्यात फरशी मारून केली जन्मदात्याची हत्या

0
धक्कादायक! लग्न जमत नाही म्हणून मुलानं केलं भयानक कांड, डोक्यात फरशी मारून केली जन्मदात्याची हत्या


गोपिचंदने वडिलांकडे लग्नाचा हट्ट धरला होता. त्याला वाटत होते की, वडील लग्न जुळवण्यास टाळाटाळ करत आहेत. रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास गोपिचंद याने वडिलांना म्हटले की, माझे लग्न करत नाही, तर तुला मी आता जिवंत ठेवत नाही’ असे म्हणून शिवागाळ सुरू केली. रागाच्या भरात त्याने घरासमोर पडलेला फरशीचा तुकडा वडिलांच्या डोक्यात मारला त्याचबरोबर लाकडी फळीच्या तुकडयाने तोंडावर मारहाण केली. या मारहाणीत हुकुम कदम गंभीर जखमी झाले.



Source link

INDIA : इंडिया आघाडी मोदींचा वारु कसा रोखणार? अरिथमेटिक जिंकणार की केमिस्ट्री?

0
INDIA : इंडिया आघाडी मोदींचा वारु कसा रोखणार? अरिथमेटिक जिंकणार की केमिस्ट्री?


INDIA : देशातील सध्याच्या राजकीय घडामोडी बघितल्या की प्रसिद्ध रशियन लेखक, नाटककार अंतॉन चेकॉव्ह याचं शे-सव्वाशे वर्ष जुनं वाक्य आठवतं…अंतॉन म्हणतो.. Love, friendship and respect do not unite people as much as a common hatred for something. याचा अर्थ आहे, एखाद्याबद्दलचं प्रेम, मैत्री आणि आदर यापेक्षाही जास्त एखाद्या बद्दलचा सामाईक द्वेष लोकांना चटकन एकत्र आणतो. पाटणा, बंगळुरुनंतर मुंबईत दोन दिवस 26 पक्षांना एकत्र आणणारा- जोडणारा असाच समान धागा म्हणजे मोदी विरोध.

2024 सालची लोकसभा निवडणूक अवघ्या सात-आठ महिन्यांवर येऊन ठेपलीय. 2014 आणि 2019 प्रमाणे 24 मध्ये सुद्धा मोदी मॅजिक चालेल का हा यक्ष प्रश्न विरोधकांसमोर आहे. या मोदी मॅजिकला निष्प्रभ करायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवं या विचाराने विरोधक एकवटले आहेत. त्यांची संख्याही वाढते आहे. कर्नाटक विधानसभेत भाजपला हरवल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे, नेहेमीचा आत्ममगपणा, राष्ट्रीय पक्ष असल्याचा अहंकार बाजुला ठेवत, प्रसंगी कमीपणा घेत सर्व पक्षांची मोट बांधण्याचा चंग काँग्रेसच्या नेत्यांनी बांधला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला होता, त्याच धर्तीवर अंतर्विरोध विसरुन एकत्र आलो तर देशपातळीवर मोदींचा आणि भाजपचा वारु रोखणं शक्य आहे असा विश्वास विरोधकांना वाटतोय. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. बुधवारी दुपारी 4 वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदही असणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला देशातील 26 पेक्षा जास्त पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. ग्रँड हयात इथं होणाऱ्या बैठकीत ईशान्य भारतातील आणखी काही पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. 

या बैठकीत इंडिया आघाडीचा नवा लोगो, तसंच मोदींविरोधातील नेता सुद्धा ठरणार आहे. संयोजक हा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेलच असं नाही पण पंतप्रधानपदासाठी अनेक दावेदार असल्यामुळे ही निवड वाटते तितकी सोपी नसेल. मोदींना आणि भाजपला हरवण्यासाठी तडजोड करण्याशिवाय पर्याय नाही हे या नेत्यांच्या लक्षात आलं असल्यानं प्रत्येक जण खळखळ न करता पुढे जात आहे. “पदाच्या अपेक्षेनं नाही तर  शक्य तेवढ्या पक्षांना एकत्र आणणं हेच ध्येय असल्याचं नितीश कुमारांनी सांगितलंय. “मोदींची हुकुमशाही मोडून काढायची आहे, आमच्याकडे भाजपसारखा एकच चेहरा नाही तर बरेच चेहरे आहेत” असं खासदार संजय राऊत म्हणालेत.

मोदी विरोधी पक्षांच्या पाटण्यातील पहिल्या बैठकीत 15 पक्ष सामील झाले होते. बंगळुरुतील दुसऱ्या बैठकीत ती संख्या 26 वर पोहोचली. त्या बैठकीतच UPA चे Indian National Developmental Inclusive Alliance म्हणजे इंडिया असं नवं बारसं केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बैठकीकडून जास्त अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

शरद पवार, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी असे पंतप्रधान बनण्याची क्षमता असलेले आणि आस असलेले अनेक महत्वाकांक्षी नेते इंडिया आघाडीत आहेत. अशा दिग्गजांमधून मोदींसमोर स्पर्धेत शेवटपर्यंत टिकू शकेल असं एक नाव निवडणं आणि त्याच्यामागे ठामपणे उभं राहणं हे दिव्य काम इंडिया आघाडीला पार पाडावं लागणार आहे.  

जुलैमध्ये बंगळुरुत झालेल्या विरोधकांच्या बैठकीवर स्वत: पंतप्रधान मोदींनी खरपूस टीका केली होती. विरोधक विकासविरोधी आहेत, स्वत:चा परिवार वाचवण्यासाठी सगळे भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत असं मोदी म्हणाले होते. ‘एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग’ या गाण्याची आठवणही त्यांनी काढली होती. ही इंडिया नाही तर घमंडिया आघाडी असल्याची टीकाही मोदी आणि भाजपने सुरु केलीय. मोदी विरोधकांनी 2024 ची लढाई INDIA विरुद्ध NDA असेल असं जाहीर केलंय. विरोधकांची एकजूट पाहूनच मोदींना आपला पवित्रा बदलावा लागला असा दावाही मल्लिकार्जुन खर्गेंनी केलाय. 

एनडीएच्या विखुरलेल्या 38 छोट्यामोठ्या पक्षांना एकत्र आणावं लागलं हे विरोधी पक्षांचं यश असल्याचं मोदी विरोधकांना वाटतंय. मोदींच्या विरोधात कोणता चेहरा घेऊन उतरतात हे दोन दिवसात स्पष्ट होईलच. मुंबईतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतरच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होईल. राजकीय गणितात कधीच दोन अधिक दोन चार होत नसतात हे आपण ऐकून आहोत..त्यामुळे 2024 ला अरिथमेटिक जिंकेल की केमिस्ट्री हे बघणं रंजक ठरणार आहे.

याच लेखकाचा हा ब्लॉग वाचा: 

 



Source link

Ulhasnagar Special Report : मी धोकादायक आहे, मला पाडण्याचे आदेश द्या…इमारतीनेत भरला कोर्टात अर्ज

0
Ulhasnagar Special Report : मी धोकादायक आहे, मला पाडण्याचे आदेश द्या…इमारतीनेत भरला कोर्टात अर्ज



<p>मंडळी, कोर्टात चालणाऱ्या खटल्यांबाबत आपण अनेकदा ऐकतो. घोटाळ्याची प्रकरणं, घटस्फोट, हाणामारी…. असे एक ना अनेक प्रकरणांचे खटल्यांविषयी आपण ऐकलंय. पण म्हणतात ना ऐकाल ते नवलंच. तसंच काहीसं उल्हासनगरमध्ये घडलंय. तिथं चक्क एका इमारतीनंच खटला दाखल केलाय. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय. असं काय घडलंय की, इमारतीला पक्षकार व्हावं लागलं? ही इमारत कोणती आणि कोर्टाने त्यावर काय निकाल दिलाय, पाहूयात या रिपोर्टमधून.</p>



Source link

BMC Hospital : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये‘रुग्ण मित्र’ मदतकक्ष होणार स्थापन

0
BMC Hospital : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये‘रुग्ण मित्र’ मदतकक्ष होणार स्थापन


BMC Hospital News : मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण,&nbsp;तसेच त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी ‘रुग्ण मित्र’ मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहे.



Source link

Andheri Gokhale Bridge : बांधकामांमुळे गोखले पुलाचं काम रखडलं, परिसरातील बांधकामं तोडण्याचे आदेश

0
Andheri Gokhale Bridge : बांधकामांमुळे गोखले पुलाचं काम रखडलं, परिसरातील बांधकामं तोडण्याचे आदेश



<p>अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल खुला होण्यासाठी डिसेंबर २०२३चा मुहूर्त काढलाय खरा,, मात्र पुलाच्या आजूबाजूला असलेल्या बांधकामांमुळे पुलाच्या कामाला अडथळा निर्माण होतोय.. आजूबाजूची बांधकामं तोडल्यास पुलाचं काम जलदगतीने पूर्ण होईल, यापार्श्वभूमीवर पालिकेच्या पूल विभागाने लवकरात लवकर बांधकामं तोडण्याचं आदेश दिलेत..</p>



Source link

सोलापूर हादरलं.. प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकलीचा जन्मदात्रीनेच प्रियकरासोबत घोटला गळा

0
सोलापूर हादरलं.. प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकलीचा जन्मदात्रीनेच प्रियकरासोबत घोटला गळा


Solapur&nbsp;crime &nbsp;: प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पोटच्या चार वर्षीय चिमुकलीचा जन्मदात्या आईनेच गळा दाबून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.



Source link

यवतमाळच्या सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह; परिसरात खळबळ

0
यवतमाळच्या सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह; परिसरात खळबळ


yavatmal crime : यवतमाळच्या खानगाव शिवारातील सज्जनगड मठात&nbsp; मठप्रमुख&nbsp;व त्यांच्या सेवेकरी यांचे मृतदेह आढळले आहेत. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.



Source link