Saturday, July 18, 2026
Home Blog Page 2785

फ्लिपकार्टवरून मोबाईल खरेदी, मात्र ग्राहकांना मिळायची फरशी, नाशिक पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश 

0
फ्लिपकार्टवरून मोबाईल खरेदी, मात्र ग्राहकांना मिळायची फरशी, नाशिक पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश 


नाशिक : आजकाल ऑनलाईन खरेदी (Online Shopping) एकदम चुटकीसरशी होऊ लागली आहे. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागविल्यास त्यात ग्राहकाला भलतीच गोष्ट मिळत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. आता नाशिकमध्ये देखील असाच काहीसा प्रकार समोर आला असून फ्लिपकार्ट कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी केलेले मोबाईल ग्राहकापर्यंत जाण्याआधीच ते काढून घेत त्यात फरशी पॅक करून ग्राहकांची फसवणूक करणारी टोळीच नाशिक पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

सध्याच्या हायटेक युगात अनेकजण मोबाईलवरून (Mobile) एखाद्या शॉपिंग वेबसाईटवर (Shopping Website) जाऊन ऑनलाईन खरेदी करत असतात. मात्र यातून फसवणूक होण्याचा धोका अधिक असतो, असे या घटनेवरून दिसून आले. फ्लिपकार्ट कंपनीमध्ये ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या मोबाईलचा परस्पर अपहार होत असल्याचे येथील फ्लिफकार्ट कंपनीचे संलग्न असलेल्या इस्टाकार्ड कंपनीच्या मॅनेजरला ही बाब निदर्शनास आली. त्याने पोलिसांशी संपर्क केल्यानंतर फ्लिफकार्टमधील कामगारांचे ग्राहकांची फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. मोबाईल काढून घेत फरशी ठेवून कंपनीला परत पार्सल देणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 3 लाख सहा हजार 582 रुपयांचे 10 मोबाईल जप्त केले.

फ्लिफकार्ट (Flipcart) डिलिव्हरीकरीता कंपनीतून आलेले फोन कंपनीचे व इतर कंपनीचे 51 मोबाईलचा त्यांचे कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा संशयित बळीराम रावजी खोकले याने मोबाईल डिलिव्हरी न करता परस्पर लंपास केले होते. याप्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशन येथे फ्लिपकार्ट कंपनीचे संलग्न असलेली इस्टाकार्ड कंपनीचे नाशिक शाखेचे मॅनेजर दिनेश ज्ञानेश्वर पाटील यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police) फिर्याद दाखल केली. त्यानुसार नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकने तपास सुरु केला. तपास सुरु असताना फिर्यादीत नमुद असलेला बळीराम खोकले नावाचा इसम हा सदर कंपनीत कधी कामास नव्हता. त्याच्या नावाचा वापर करून अनोळखी व्यक्तीने गुन्हा केला आहे. त्यावर तपासात धक्कादायक माहिती समोर आली. 

अशी केली जात होती फसवणूक 

कॅशिफाय या ऑनलाईन जुने मोबाईल खरेदी विक्री कंपनीत काम करणारा संशयित निखील पाथरवट व कॅशिफाय कंपनीमध्ये पूर्वी काम करणारा आकाश शर्मा यांनी एकत्र मिळून फ्लिपकार्ट कंपनीचे नाशिक विभागातील संलग्न असलेल्या इस्टाकार्ड कंपनीचे एच. आर विभागात काम करणारा निखील मोरे यांच्याशी संगनमत केले. त्यांच्या ओळखीचा वापर करत अमोल खैरे यास कंपनीमध्ये बळीराम खोकले नावाने कामास लावले होते. त्यानंतर बळीराम खोकले नावाने काम करीत असलेला अमोल खैरे हा कंपनीमध्ये आलेले मोबाईलचे पार्सल डिलिव्हरीसाठी बाहेर घेऊन जात असे. त्यानंतर आकाश शर्मा व निखील पाथरवट त्यामधील मोबाईल काढुन घेवुन त्यात मोबाईलच्या वजनाची फरशी टाकुन तो पुन्हा पॅक करत असे. सदर पार्सल ग्राहकांची डिलेव्हरी न झाल्याचे सांगुन ते पार्सल पुन्हा कंपनीत जमा करायचे, अशा पध्दतीने अपहार करून काढलेले मोबाईल निखील पाथरवट विक्री करायचा. पोलीस तपासात फ्लिपकार्ट कंपनीचे पार्सल डिलिव्हरी करणारी संलग्न कंपनी इन्टाकार्ड कामगारच करीत असल्याचे व त्याचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. 
              
इतर महत्वाची बातमी : 

बापाने खेळायला मोबाईल दिला, पोरानं मात्र ‘गेमच’ केला; 6 वर्षाच्या मुलानं दिली तब्बल 80 हजार रुपयांच्या जेवणाची ऑर्डर, सोबत 25 टक्के टीपही



Source link

सातारा : कराडात मराठा समाजाकडून रास्ता रोको; आरक्षणासाठी 15 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा : कराडमधील दत्त चौक (शिवतीर्थ) परिसरात तालुक्यातील मराठा समाजाकडून एक तासाहून अधिक काळ निदर्शने करत राज्य शासनासह जालना पोलिसांचा निषेध नोंदवला.

त्याचवेळी राज्य शासन व जालना पोलिसांच्या निषेधार्थ बंद पाळण्याचे आवाहनही करण्यात आले. जालन्यातील दोषी पोलीस उपअधीक्षक तसेच दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आले. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी करत तहसीलदार विजय पवार यांना निवेदन देण्यात आले.

एक मराठा लाख मराठा, जालना पोलिसांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत राज्य शासनासह जालना पोलिसांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर दत्त चौक व तहसील कार्यालय परिसरात रास्ता रोको करत राज्य शासनाला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 15 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. 15 सप्टेंबरनंतर मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा सज्जड इशाराही मराठा समाज बांधवांनी दिला आहे.











Source link

Jalna violence: शरद पवार जालन्यात दाखल; जखमी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर काय म्हणाले? वाचा

0
Jalna violence: शरद पवार जालन्यात दाखल; जखमी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर काय म्हणाले? वाचा


जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे आंदोलकांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी लढतोय. मात्र, राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे मराठा समाजाला वारंवार आंदोलन आणि उपोषण करावे लागत आहे. सरकारने शब्द न पाळल्याने जालन्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. मात्र, या ठिकाणी बळाचा गैरवापर करण्यात आला. पोलिसांनी हवेत गोळीबार करत आंदोलकांना पळवून लावले.”



Source link

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान व्हायरल झाला शाहरुखचा व्हिडीओ

0
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान व्हायरल झाला शाहरुखचा व्हिडीओ


आशिया कप 2023 चा बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान महामुकाबला आज खेळला जात आहे. अ गटातील हा दुसरा सामना आहे. तर टीम इंडियाचा हा या आशिया कपमधील पहिला सामना खेळत आहे. भारत आणि पाकिस्तान कँडीच्या पल्लेकल्ले क्रिकेट स्टेडिमयवर आमने-सामने आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.



Source link

Pune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय? अल्पवयीन मुलांनी तरुणाला संपवले

0
Pune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय? अल्पवयीन मुलांनी तरुणाला संपवले


पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून खुनाचं   (Pune Crime News)सत्र सुरुच आहे. पुण्यातील वानवडी (Wanwadi) परिसरात तरुणाचा टोळक्याने दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी पहाटे काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. या घटनेमुळे वानवडी परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या खुनाचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही आहे. 

महादेव रघुनाथ मोरे  (वय-25 रा. काळेपडळ) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश असून पोलिसांनी (Pune Police) मुलांना ताब्यात घतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही सगळी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

पुण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख

काहीच दिवासांपूर्वी पुण्यात चाकूने वार करत तरुणाची  दहा ते बारा जणांनी मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना पुण्यातील मंगला टॉकीज (Mangla Talkies Pune) परिसरात 15 ऑगस्ट रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घडली होती. चित्रपट पाहून बाहेर (Murder Case) पडताना या तरुणावर वार करण्यात आले होते. नितीन मस्के (Nitin Maske) असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव होतं. नितीन चित्रपट गृहातून बाहेर पडला. त्यावेळी त्याच्यावर चाकुने वार करण्यात आले होते. यामध्ये नितीन मस्के याचा जागीच मृत्यू झाला होता. तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड अशी हत्यारे घेऊन दहा ते बारा जणांनी घेरून मस्के यांची हत्या केली होती.

क्षृल्लक कारणावरुन हत्या

सध्या पुण्यात क्षृल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरुन भांडणं होतात. त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याबरोबरच बलात्कार, सायबर क्राईम आणि लैंगिक छळांच्या घटनेत देखील वाढ होत आहे. कोयता गॅंग आणि चुहा गॅंग सक्रिय आहेत. त्यातील कोयता गॅंगने सध्या पुण्यात धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता पुण्यात एकापाठोपाठ एक क्षृल्लक कारणावरुन हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

ही बातमी वाचा : 



Source link

सातारा : खबरदारीचा उपाय म्हणून उंब्रज बसस्थानकात एसटीचा विसावा | पुढारी

0









उंब्रज; पुढारी वृत्तसेवा : जालना येथे मराठा आंदोलकावर झालेल्या लाठी हल्याच्या निषेधार्थ कराड येथे रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून उंब्रजचे वाहतूक नियंत्रक यांनी पुणेहून कराड, कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी खबरदारीचा उपाय म्हणून उंब्रज बसस्थानकात थांबविण्यात आल्या होत्या.

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध सर्वत्र होत आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. कराड येथे आज (दि. २) सकाळी मराठा आंदोलकांचा मोर्चा होता. याच पार्श्वभूमीवर कराड आगार व्यवस्थापक यांनी उंब्रज बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक जी.डी.चव्हाण व महिला वाहतूक नियंत्रक एम.ए.पाटोळे यांना पुणे हून येणाऱ्या एसटी उंब्रज बसस्थानकात थांबविण्याच्या सूचना करण्यात आल्या.

वाहतूक नियंत्रक चव्हाण व पाटोळे यांनी तात्काळ सूचनांची अंमलबजावणी करून उंब्रज पोलिसांच्या सहकार्याने महामार्गावरून कराड, कोल्हापूर दिशेकडे जाणाऱ्या सर्व एसटी उंब्रज बसस्थानकात व महामार्गावर थांबविण्यात आल्या. सुमारे अर्धा तास एसटी बसस्थानकात व महामार्गावर थांबविण्यात आल्या होत्या. कराड येथील मोर्चाचे वातावरण निवळल्यावर उंब्रज बसस्थानकात व महामार्गावर थांबविण्यात आलेल्या एसटी सोडण्यात आल्या. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळाचे कराड आगाराचे वरीष्ठ अधिकारी यांच्या सुचनेवरून कराड कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी काही वेळासाठी उंब्रज बसस्थानकात थांबविण्यात आल्या होत्या.
जी.व्ही.चव्हाण, वाहतूक नियंत्रक, उंब्रज











Source link

Pune Rain : पुण्यात पावसाची दमदार हजेरी; पहाटेपासून मेघगर्जनेसह मुळधार पाऊस, अनेक भागात साचले पाणी

0
Pune Rain : पुण्यात पावसाची दमदार हजेरी; पहाटेपासून मेघगर्जनेसह मुळधार पाऊस, अनेक भागात साचले पाणी


पुण्यात पुढील काही दिवस वतावर ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलका तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे कोकण, विदर्भ, मराठवाड्यात पुढील पाच दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.



Source link

दिल्लीत G20 परिषदेची तयारी, चंद्रानंतर भारत आता सूर्यावर; फोटोंमधून पाहा या आठवड्यातील घडामोडी

0
दिल्लीत G20 परिषदेची तयारी, चंद्रानंतर भारत आता सूर्यावर; फोटोंमधून पाहा या आठवड्यातील घडामोडी



India In Pics: दिल्लीत G20 परिषदेची तयारी, चंद्रानंतर भारत आता सूर्यावर; फोटोंमधून पाहा या आठवड्यातील घडामोडी



Source link

Appi Amchi Collector: स्मिताच्या लग्नात सरकारांची एन्ट्री, काय करणार अप्पी आणि अर्जुन?

0
Appi Amchi Collector: स्मिताच्या लग्नात सरकारांची एन्ट्री, काय करणार अप्पी आणि अर्जुन?



Appi Amchi Collector Serial update: स्मिताच्या लग्नात सरकारांची एन्ट्री स्मिताचं लग्न सुखरूप पार पडेल? सुजय काय नवीन गोंधळ घालेल ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.



Source link

Sai Tamhankar : सई ताम्हणकरने मुंबईतील ‘या’ परिसरात खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर

0
Sai Tamhankar : सई ताम्हणकरने मुंबईतील ‘या’ परिसरात खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर



Sai Tamhankar New House : सईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तिने “एक मैलाचा दगड गाठला” असे म्हटले आहे.



Source link