Saturday, July 18, 2026
Home Blog Page 2784

रसिक स्पेशल: चक्रव्यूहातले अभिमन्यू…

0
रसिक स्पेशल: चक्रव्यूहातले अभिमन्यू…

• Marathi News
• Opinion
• Dr. Amol Annadate’s Article On Suicide Of Students Preparing For Competitive Exams

डॉ. अमोल अन्नदाते5 तासांपूर्वी

• कॉपी लिंक

प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी समाजमन हादरले आहे. लौकिक यशासाठी आपण मुलांना या चक्रव्यूहात पाठवतो खरे, पण ते मिळाले नाही तर त्यातून बाहेर कसे पडायचे, हे शिकवत नाही. किंबहुना ते आपल्यालाही माहीत नसते. परिणामी आप्तांच्या अपेक्षांशी अन् बाहेरच्यांच्या नजरांशी लढता लढता ‘आतलं’ बळ संपतं नि दुर्दैवाने त्यातच अनेकांचा आत्मघात होतो. पालक, नातेवाईक आणि समाज म्हणून आपण अशा चक्रव्यूहात मुलांना पाठवून त्यांचं आयुष्य पणाला लावणं थांबवणार आहोत की नाही?

गेल्या ८ महिन्यांमध्ये कोटा येथे नीट – जेईईच्या, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी गेलेल्या २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या काही वर्षात प्रवेश परीक्षांच्या ओझ्याखाली दबून नैराश्यग्रस्त होऊन प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतच चालली आहे. जेव्हा कोरोना, गॅस्ट्रो यांसारख्या संसर्गजन्य आजारांच्या साथी येतात, तेव्हा यंत्रणा जागी होते, माध्यमे रान उठवतात आणि प्रतिबंधक उपचार-लसीकरणाच्या मोहिमा देशभर राबवल्या जातात. कारण या समस्या दृश्य स्वरूपात दिसत असतात. पण, विद्यार्थ्यांमधील नैराश्य आणि त्यातून होणाऱ्या त्यांच्या आत्महत्या यांचा संसर्गही तेवढाच गंभीर व घातक असतो, हे कोणाच्याही लक्षात येत नाही. या मुळावर उठलेल्या आजारावर मानसिक लसीकरण करणारे आणि आयुष्याचा खरा आनंद, ध्येय, जगण्याचे अन्य उद्देश शोधण्याची दृष्टी मात्र कुठलेही क्लास देत नाहीत. आपल्या पाल्याला शिक्षण, करिअरच्या जीवघेण्या स्पर्धेत उतरवताना, त्यांना मानसिक धैर्याची अन् स्थैर्याची लस टोचणारे नि तो यशस्वी होवो अथवा न होवो, पण आधी तो जगला पाहिजे, एवढी जाणीव असणारे पालक तयार होणे, ही आजची सर्वांत महत्त्वाची निकड आहे.

वर्गात साधारण पहिल्या दहामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांकडून पालक – शिक्षक, समाज अशा सगळ्यांच्याच अपेक्षा असणे साहजिक असते. या शैक्षणिकदृष्ट्या हुशार विद्यर्थ्याना त्यांच्या स्वत:कडून असणाऱ्या अपेक्षा आणि इतरांना त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा पेलत दोरीवर चालण्याची कसरत अगदी चौथी, पाचवीपासून करावी लागते. ३० मुलांचा वर्ग गृहीत धरला, तर १० ते २० म्हणजे मधल्या फळीतील विद्यार्थ्यांना कधीच फारसे टेन्शन असते. त्यांना पहिले येऊन पुढे सरकण्याचाही ताण नसतो आणि मागे घसरून फारसे काही बिघडणार नसते. पण, वर्षानुवर्षे या शालेय आणि उच्च माध्यमिक स्पर्धेतून बऱ्यापैकी यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी मानसिक फसगत होते. पालक, शिक्षक आणि समाज त्याच्या या स्थितीला अजाणतेपणे हातभार लावतात, कारण तोही त्याच मानसिकतेत जगत असतो. ही फसगत म्हणजे, आयुष्यातील आनंद आणि आंतरिक समाधान या गोष्टींना ही मुले शिक्षण, करिअरमधील चमकदार कामगिरी, उपलब्धी किंवा यशाशी जोडू लागतात. न्यूरो प्लास्टिसिटी म्हणजे सवयीप्रमाणे किंवा वारंवार एखादी गोष्ट करून वळणे आणि वाकणे हा मानवी मेंदूचा एक मोठा गुण आहे. तो त्याला इतर प्राण्यांपासून वेगळा ठरवतो. त्यामुळे सतत काहीतरी मिळवणाऱ्या विद्यार्थी अथवा कोणा व्यक्तीचे मन आणि मेंदू केवळ असामान्य कामगिरी, यश एवढ्या एकाच आनंदाच्या साधनाला सरावतात. एका पातळीपर्यंत यात काही गैर नाही आणि असा कामगिरीचा ध्यास राहिला नाही तर जगरहाटी चालणारही नाही. पण, कामगिरीच नाही, तर आनंदही नाही आणि मग माझे अस्तित्व तरी कशासाठी, हा प्रश्न मनाला पडणे गैर आहे.

चांगली कामगिरी आणि शैक्षणिक यश हे आनंदाचे एक साधन असले, तरी इतर अशी अनेक साधने आहेत, ज्यातून तीच भावना किंवा त्याही पेक्षा मोठ्या आनंदाची भावना निर्माण होते, हे मानण्याची सवयच मेंदूला राहत नाही. Law of Averages म्हणजे सरासरीचा नियम सांगतो की, तुम्ही प्रत्येक परीक्षेत तसेच आणि तेवढेच यश मिळवू शकत नाही. सर्वोत्तम क्रिकेटरही प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकार ठोकू शकत नाही. कधी तरी तो शून्यावरही बाद होतो. नीट – जेईई किंवा स्पर्धा परीक्षांसाठी कोटाच नव्हे, तर इतर शहरांमध्ये कोचिंगच्या कारखान्यात जाणारे विद्यार्थी नेमक्या अशाच कामगिरीच्या दडपणाखाली (Performance Pressure) असतात. नीट-जेईईला जाणारी मुले सतत शैक्षणिक यश मिळवलेली हुशार मुले असतात. आता सर्वांत महत्त्वाची म्हणून समजल्या जाणाऱ्या परीक्षेच्या एका दिवसासाठी त्यांची तयारी सुरू असते. मुळात ही परीक्षा काही प्रमाणात त्यांच्या आयुष्याची व्यावसायिक आणि आर्थिक दिशा ठरवणारी असली, तरी ती त्यांच्या आयुष्याची अंतिम दिशा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा, आंतरिक समाधानाचा शेवटचा निकाल लावणारी परीक्षा मुळीच नसते. पालक आणि विद्यार्थ्यांचे समुपदेशन होत नसल्याने त्यांना या सत्याची उकल होत नाही. परिणामी कोचिंग सुरू असतानाचे छोटेसे अपयशही विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सहन होत नाही. त्यासाठी अशा परीक्षांचे, तीव्र स्वरूपाचे कोचिंग सुरू करण्याआधी एक आठवडा पालक आणि विद्यार्थ्यांना मानसिक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा कमी गुणाने उत्तीर्ण होणाऱ्या, मधल्या फळीतील विद्यार्थ्यांना अपयशाचे काहीच वाटत नसते, कारण अशी समाजाच्या दृष्टीने अपयश समजली जाणारी गोष्ट अनुभवतच ते मोठे झालेले असतात. त्यातूनच ते जास्त जोखीम उचलण्यास सक्षम होतात आणि पुढे मोठे व्यावसायिक यश मिळवू शकतात. पण, हुशार विद्यार्थ्यांना आणि प्रवेश परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अपयश पचवण्यासाठी विशेष मानसिक जडणघडण मुद्दामहून करावी लागते. याची सुरूवात शालेय जीवनापासूनच व्हावी लागते.

मानसिक स्वास्थ्यासोबतच Resilance म्हणजेच मानसिक लवचिकपणाला मानसशास्त्रात खूप महत्त्व असते. एकदा पडल्यावर तुम्ही परत वेगाने उठून चालू लागता, तसे तणावाच्या स्थितीतही परत उसळी घेऊन मन पूर्ववत होऊ शकते, यालाच Resilance म्हणतात. सैन्य आणि खेळामध्ये हे आवर्जून शिकवले जाते. स्वत: जखमी असलो, तरी गोळी लागलेल्या सहकाऱ्याला उचलून धावायचे कसे, याचे विशेष प्रशिक्षण सैन्यात दिले जाते. स्पोर्टस् सायकॉलॉजीमध्येही, हरलो तर काय? यावर भर दिला जातो. आज स्पर्धा इतकी वाढली आहे की शैक्षणिक स्पर्धेसाठीचे मानसशास्त्र गरजेचे झाले आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या उदाहरणे देत पालकांनाच मुलांच्या मनाची आणि मेंदूची जडणघडण करावी लागेल. गुणवत्तेचा, उत्तमतेचा ध्यास गैर नाही, तो हवाच. त्याशिवाय गुणवत्तापूर्ण गोष्टी निर्माण कशा होणार? पण, या गुणवत्तेचा अट्टहास , दुराग्रह आणि त्यासाठी आपले अस्तित्व पणाला लावण्याइतपत ही तो महत्त्वाचा नाही. शैक्षणिक गुणवत्ता आणि नीट-जेईईची रँक हे आनंदाचे एक साधन असेल, पण ते एकमेव नाही. ते नसले तरी केवळ स्वत:चे अस्तित्वही आपल्याला समाधानी ठेवण्यास पुरेसे आहे, हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा लागेल. मानवी मन आणि शरीर प्राण्यांपासून उत्क्रांत झाले आहे. त्यामुळे धोका ओळखून त्यावर काही सेकंदात शारीरिक प्रतिक्रिया देणारा अमिगडाला हा भाग मानवी मेंदूत प्राण्यांसारखा सक्रिय आहे. बऱ्याचदा हा धोका काल्पनिक असतो, पण शरीर मात्र अतिरेकी प्रतिसाद देते. परीक्षेतील अपयशाची भीती आणि त्यातून घडणाऱ्या क्रिया मेंदूच्या या सर्किटमधून घडतात. पण, मानवी मनाला एक वरदानही मिळाले आहे. ते म्हणजे, सारासार विचार करणारा फ्रंटल लोब. धोक्याचा आणि तणावाचा विचार मनात आला की केवळ १० सेकंद थांबले तरी सारासार विचार करणारा फ्रंटल लोब सक्रिय होतो आणि आपल्याला शांत करतो. त्यातूनच आपण योग्य रीतीने आणि सद्सद्विवेकबुद्धीने वागून तणावावर मात करतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माइंड फुलनेस म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करून सारासार विचारशक्ती विकसित करण्याचे प्रशिक्षण देणे, त्याची सवय लावणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने गतकाळात किंवा भविष्यात सतत रेंगाळणाऱ्या मनाला आताच्या क्षणात आणणे, हे सध्याच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे.

प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी समाजमन हादरले आहे. लौकिक यशासाठी आपण मुलांना या चक्रव्यूहात पाठवतो खरे, पण ते मिळाले नाही तर त्यातून बाहेर कसे पडायचे, हे शिकवत नाही. किंबहुना ते आपल्यालाही माहीत नसते. परिणामी आप्तांच्या अपेक्षांशी अन् बाहेरच्यांच्या नजरांशी लढता लढता ‘आतलं’ बळ संपतं नि दुर्दैवाने त्यातच अनेकांचा आत्मघात होतो. पालक, नातेवाईक आणि समाज म्हणून आपण अशा चक्रव्यूहात मुलांना पाठवून त्यांचं आयुष्य पणाला लावणं आपण थांबवणार आहोत की नाही, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

संपर्क : ९४२१५१६५५१

dramolaannadate@gmail.com

Source link

रसिक स्पेशल: महाराष्ट्राचा ‘स्वभाव’ अन् राष्ट्रवादीचे ‘स्वबळ’

0
रसिक स्पेशल: महाराष्ट्राचा ‘स्वभाव’ अन् राष्ट्रवादीचे ‘स्वबळ’

प्रशांत कदम8 तासांपूर्वी

• कॉपी लिंक

शरद पवारांसारख्या महाराष्ट्राच्या नेत्याची राष्ट्रीय राजकारणातील उंची कायम मोठी राहिली, पण राज्यावर एकहाती मांड ठोकणे मात्र त्यांना शक्य झालं नाही. पवारांचा पक्ष प्रादेशिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांमध्ये अधिक रममाण असतो, म्हणून हे झालं नाही असं म्हणावं, तर प्रखर प्रादेशिक मुद्द्यांवर आक्रमक राहणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा स्वबळावर शिवसेनेची सत्ता आणता आली नाही. त्यामुळं महाराष्ट्राचा स्वभाव एकाच वेळी प्रादेशिक आणि राष्ट्रीय असा सरमिसळीचा बनल्यामुळं हे झालं असावं का, असा प्रश्न निर्माण होतो.

शरद पवार इतके मोठे नेते असूनही त्यांना महाराष्ट्राची सत्ता स्वबळावर का नाही जिंकता आली? पवारांचेच एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि राज्याचे वर्तमान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विधानाने हा प्रश्न चर्चेत आला आहे. प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींची, आंध्र प्रदेशात जगनमोहन यांची स्वबळावर सत्ता येते, उत्तर प्रदेशात अखिलेश यादव एकट्याच्या जोरावर सत्ता स्थापन करतात, नितीशकुमार बिहार जिंकू शकतात, ओडिशात बिजू जनता दल सत्ता मिळवू शकतो.. मग महाराष्ट्रात शरद पवार ही किमया का करु शकले नाहीत? खरं तर प्रश्न रास्त आहे, विचार करायला लावणाराही आहे. आणि या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत नेमका काय आहे, हे देखील स्पष्ट करणारा आहे. महाराष्ट्रात खरंच शरद पवारांना हे का नाही जमलं आणि जे त्यांना जमलं नाही ते भविष्यात कोण करुन दाखवू शकेल का? की महाराष्ट्राच्या राजकारणाचा पटच असा बनला आहे की, इथं कायम आघाड्यांचं राजकारण करावं लागणार आहे? राष्ट्रवादीला इतर प्रादेशिक पक्षांप्रमाणे स्वबळावर सत्ता न मिळण्याचं पहिलं कारण म्हणजे इतरांप्रमाणे राष्ट्रवादीची स्थापना प्रादेशिक अस्मितेवर झालेली नाही. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा करत शरद पवार काँग्रेसबाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासोबत जे तीन प्रमुख नेते बाहेर पडले, त्यात बिहारचे तारिक अन्वर, मेघालयचे पी. ए. संगमा हे प्रमुख नेते होते. महाराष्ट्रातील एक प्रादेशिक पक्ष म्हणून नव्हे, तर काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षातून फुटलेला एक छोटा का होईना, पण राष्ट्रीयच गट अशी काहीशी त्या स्थापनेमागची रचना होती. एका मराठी माणसावर दिल्लीकडून होणारा अन्याय यापेक्षा दुसरी कुठली प्रादेशिक अस्मिता त्यात नव्हती. किंवा स्थापनेनंतर राष्ट्रवादीने असे प्रादेशिक अस्मितेचे कुठले मुद्देही आक्रमकपणे हाती घेतल्याचं दिसलं नाही.

दुसरा मुद्दा म्हणजे, शरद पवारांची ताकद ही कायमच ५० ते ६० आमदारांची राहिली आहे. काँग्रेसमधून ते दोन वेळा बाहेर पडले. एकदा १९८० ते ८६ या काळात समांतर काँग्रेस म्हणून, नंतर १९९८ मध्ये राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा. दोन्ही वेळा हे दिसलं की, शरद पवार या ५०-६० च्या आकड्यापलीकडे फार मजल मारु शकले नाहीत. याचं कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील काँग्रेसचा मजबूत डीएनए. जो मतदार पवारांना स्वबळावर सत्ता देऊ शकतो, त्याच विचाराच्या मतदारांमध्ये सर्वात मोठा वाटेकरी काँग्रेस पण आहे. हा मुद्दा नीट समजून घ्यायचा, तर आपण राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या निवडणुकीची आकडेवारी नीट पाहिली पाहिजे. १९९९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ५८ जागा मिळाल्या. ७५ जागा मिळालेला काँग्रेस त्यावेळी पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता. राष्ट्रवादी हा काँग्रेसमधून फुटून तयार झालेला पक्ष. पण तरीही आधीच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत तो काँग्रेसचे किती नुकसान करु शकला, तर केवळ ५ जागांचं. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्रित काँग्रेसला ८० जागा मिळाल्या होत्या. आणि पवार वेगळे झाल्यानंतरही काँग्रेसनं ७५ जागा जिंकल्या. पण मग, पवारांनी शिवसेना-भाजपचा मतदार आपल्याकडे वळवून या जागा जिंकल्या, असं त्यावरुन म्हणता येतं का? तर तसंही नाही. १९९५ ला एकत्रित काँग्रेसच्या ज्या ८० जागा निवडून आल्या, त्या काँग्रेससाठी सर्वात कमी जागा होत्या. पण, त्याच निवडणुकीत तब्बल ४५ अपक्ष आमदार निवडून आले होते. त्याच अपक्षांची संख्या राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पहिल्या निवडणुकीत १२ वर आली. (या अपक्षांपैकी रामराजे नाईक निंबाळकर, अनिल देशमुख यासारखे अनेक नेते नंतर राष्ट्रवादीत सहभागी झाले.)

राष्ट्रवादी काँग्रेस १९९८ ला पक्ष स्थापन झाला, तेव्हा शरद पवारांचं वय ५८ वर्षे होतं. राष्ट्रवादीला स्बवळाची किंवा किमान मुख्यमंत्रिपदासाठीची सर्वात मोठी संधी याच निवडणुकीत होती. इथंच त्यांनी काँग्रेसला मागं टाकणं आवश्यक होतं. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीनं खरं तर काँग्रेसपेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या, तर कदाचित शरद पवार स्वत: मुख्यमंत्री झालेही असते. त्यावेळी केंद्रातही भाजपचं सरकार होतं. १९९९ ते २००४ या काळात तसेही शरद पवार केवळ एक खासदारच होते. पण, पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने दाखवून दिलं की, राष्ट्रवादी फुटूनही आपली पाळंमुळं घट्ट आहेत. काँग्रेसच्या ७५ जागा निवडून आल्या आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार मंत्रिमंडळात सहभागी होतील, अशी शक्यता नव्हतीच. त्याऐवजी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्रिपद मागितलं. २००४ मध्ये राष्ट्रवादीला ७१ आणि काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. पण तेव्हाही ही मुख्यमंत्रिपदाची संधी राष्ट्रवादीने घेतली नाही. त्याऐवजी उपमुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाची खाती मागितली आणि नंतर केंद्रात शरद पवार स्वत: कृषिमंत्री झाले. कुठल्याही प्रादेशिक पक्षाचे स्वबळावर सत्ता आणायचे स्वप्न असेल, तर मुख्यमंत्रिपदावरचा दावा कधीच सोडून चालत नाही. राष्ट्रवादीनं मात्र तो सोडला.

राष्ट्रवादी हा कायम साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून हिणवला जातो. सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर. राष्ट्रवादीचं अधिक वर्चस्व पश्चिम महाराष्ट्रात आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादीला ७१ जागा मिळाल्या, त्यावेळी त्यांनी विदर्भात ९ जागा जिंकल्या होत्या. हा त्यांचा आजवरचा विदर्भातील सर्वात मोठा आकडा आहे. राष्ट्रवादी जितक्या जागा जिंकते त्यातील जवळपास २५ जागा या साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रातीलच असतात. पण, मुंबईत या पक्षाचं अस्तित्व जसं जास्त प्रभावी नाही, तसं ते विदर्भातही नाही. मुंबईच्या कॉस्मोपॉलिटन संस्कृतीमध्ये प्रादेशिक अस्मितेचा धागा काहीसा विरळ झाल्यासारखाही दिसतो. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर काँग्रेसी विचारांचा मतदार आणि उजव्या विचारांचा मतदार अशा दोन गटात सरळसरळ विभागणी दिसते. राष्ट्रवादीनं स्थापनेनंतर याच काँग्रेसच्या मतदारांमध्ये थोडीशी जागा मिळवली. त्यामुळं राष्ट्रवादीला वाढायचं असेल, तर काँग्रेसला कमजोर व्हावं लागेल. किंवा काँग्रेसला वाढायचं असेल, तर राष्ट्रवादीला कमजोर व्हावं लागेल, असं एकूण चित्र आहे.

महाराष्ट्राचा राजकीय, सामाजिक इतिहास पाहिला, तर या राज्याला प्रादेशिक अस्मितेपेक्षा राष्ट्रीय अस्मितेत, राष्ट्रीय राजकारणात अधिक रस राहिला आहे. स्वातंत्र्य चळवळ असो की त्यानंतरच्या सामाजिक सुधारणा; प्रत्येक विचारधारेचा उगम महाराष्ट्रात आहे. डावे, उजवे, काँग्रेसी, समाजवादी सगळ्यांचे प्रमुख नेते महाराष्ट्रीयन, मराठी राहिलेले आहेत. महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अग्रेसर आहेच, पण राजकीयदृष्ट्याही तितकंच मोलाचं स्थान बाळगून आहे. उत्तर प्रदेशापाठोपाठ लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रातून येतात. उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या आपल्यापेक्षाही मोठं आहे, तरीही तिथे प्रादेशिक पक्ष स्वबळावर सत्ता खेचून आणतात. पवारांसारख्या महाराष्ट्राच्या नेत्याची राष्ट्रीय राजकारणातील उंची कायम मोठी राहिली, पण राज्यावर एकहाती मांड ठोकणे मात्र त्यांना शक्य झालं नाही. पवारांचा पक्ष प्रादेशिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांमध्ये अधिक रममाण असतो, म्हणून हे झालं नाही असं म्हणावं, तर प्रखर प्रादेशिक मुद्द्यांवर आक्रमक राहणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा स्वबळावर शिवसेनेची सत्ता आणता आली नाही. त्यामुळं महाराष्ट्राचा स्वभाव एकाच वेळी प्रादेशिक आणि राष्ट्रीय असा सरमिसळीचा बनल्यामुळं हे झालं असावं का, असा प्रश्न निर्माण होतो. मग अशा स्थितीत जे पवारांना जमलं नाही, ते भविष्यात कुणाला जमेल?

pshantkadam@gmail.com

Source link

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा; मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात यलो अलर्ट

0
Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा; मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात यलो अलर्ट

शनिवारी दिवसभरात कोल्हापूर, रायगड, सांगली, पुणे या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. राज्यात २४ तासांत लोणावळा येथे १०५ मिमी, तर चिंचवड येथे ८३ मिमी पावसाची नोंद झाली.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

केंद्र सरकारकडून संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे 18 ते 22 सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात 5 सत्र होणार आहेत.केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत.

राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना

महाराष्ट्र राज्यात अमंली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन करण्याचे प्रमाण वाढत असल्याने ड्रग्जला रोखण्यासाठी राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.पोलीस महासंचालकांचे मार्गदर्शन आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या नियंत्रण याचा देखरेखीखाली विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अधिपत्याखाली ही टास्क फोर्स काम करेल

इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस

मुंबई मध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीचा आज दुसरा आणि महत्वाचा दिवस आहे.या बैठकीसाठी 28 पक्षांचे 63 प्रतिनिधी म्हणजे नेते मुंबईत उपस्थित आहेत. इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या प्रतिनिधींचा ग्रुप फोटोसेशन.. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक

महायुतीच्या बैठकीचा दुसरा दिवस

महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे.सकाळी 9 वाजता, एनएससीआय येथे विभागवार बैठकीतून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे

आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दुधाच्या दरात एकाच वेळी दोन रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू होतील. 85 रुपयांऐवजी आता 87 रुपये लिटरने दूध मिळणार आहे. चारा आणि जनावरांच्या चाऱ्याच्या दरात 20 टक्के वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे काही महत्वाचे बदल

देशातील ऑईल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतींत बदल करतात. अशा परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर्सच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधनाच्या (ATF) किमती बदल करतात, त्यामुळे यावेळेस सप्टेंबरच्या पहिल्या तारखेलाही CNG-PNG च्या दरांत बदल केला जाऊ शकतो.

उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे बांधण्यात येत असलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेच्या कार्यान्वित समारंभाला उपस्थित रहाणार आहेत. ‘महेंद्रगिरी’ ही MDL ने बांधलेली चौथी युद्धनौका आणि भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत सातवी स्टेल्थ फ्रिगेट आहे.

Source link

Nashik: नाशकात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

0
Nashik: नाशकात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

जयवंता दळवी (वय, ४७) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, मनोहर शिवाजी दळवी (वय, ५१) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचा मुलगा लक्ष्मणने दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी मनोहरला दारूचे व्यसन होते. मनोहर हा दररोज दारू पिऊन आल्यानंतर मयत जयवंता हिच्याशी वाद घालायचा. दरम्यान, ०१ सप्टेंबर २०२३ रोजी मनोहर नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. त्यावेळी जयवंता चुलीवर स्वयंपाक करीत होती. तेव्हा चारित्र्याच्या संशयावरून मनोहर आणि जयवंता यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्याने मनोहरने जयवंता मानेवर उजव्या बाजूला कुऱ्हाडीने वार करून घटनास्थळावरून पळ काढला.

Source link

Jalna Lathi Charge:लाठीमारावरून राजकीय आरोप प्रत्यारोप जोरात

0
Jalna  Lathi Charge:लाठीमारावरून राजकीय आरोप प्रत्यारोप जोरात

Jalna  Lathi Charge:लाठीमारावरून राजकीय आरोप प्रत्यारोप जोरात

Source link

Maratha Reservation: मराठा आरक्षण… काय भूतकाळ, काय भविष्य ?

0
Maratha Reservation: मराठा आरक्षण… काय भूतकाळ, काय भविष्य ?

Maratha Reservation: मराठा आरक्षण… काय भूतकाळ, काय भविष्य ? राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी राजकीय पोळी भाजून घ्यायचा विचार मनातून काढला आणि खरंच इच्छाशक्ती दाखवली तर मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळेल. असा दावा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील आशिष गायकवाड यांनी केलाय. यावेळी गायकवाड यांनी मराठा आरक्षणाची सध्यस्थिती नेमकी काय आहे? सरकारने कायमस्वरूपी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी काय करावं? तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नेमकं काय घडलं? पुढं न्यायालयात हे आरक्षण टिकावं यासाठी काय करणं गरजेचं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये नाजिम मुल्ला यांनी.

Source link

Pune Murder: दारु पिताना झालेल्या वादातून तरुणाची हत्या; आरोपींचे वय ऐकून बसेल धक्का!

0
Pune Murder: दारु पिताना झालेल्या वादातून तरुणाची हत्या; आरोपींचे वय ऐकून बसेल धक्का!

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव रघुनाथ मोरे (वय, २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृतक आणि अल्पवयीन मुले रामटेकडी परिसरातील ढेरे कंपनीजवळ डोंगरावर मोकळ्या जागेत दारु प्यायला गेले होते. त्यावेळी महादेव आणि त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने अल्पवयीन मुलांनी महादेवला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.

Source link

Eknath Shinde: जालना लाठीचार्ज घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; उद्धव ठाकरेंवर फोडले खापर

0
Eknath Shinde: जालना लाठीचार्ज घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; उद्धव ठाकरेंवर फोडले खापर

जालन्यातील लाठीचार्ज घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “नोव्हेंबर २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने सत्तेत असताना मराठा आरक्षणाची घोषणा केली होती. राज्य सरकारने घेतलेला आरक्षणाचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने वेगळा निर्णय दिला. हे कोणाच्या निष्काळजीपणामुळे घडले, हे सर्वांना माहिती आहे”, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केले आहेत.

Source link

Maharashtra Rains: महाराष्ट्रात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट!

0
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट!

Maharastra Rain Updates: महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असून राज्यातील २१ जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

Source link