Satara : साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात
Source link
Satara : साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात
Shahid Kapoor: वेड्यासारखे का ओरडताय?; शाहिद कपूर फोटोग्राफर्सवर संतापल

आजकाल बॉलिवूड कलाकारांना कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी त्यांच्यामागे सतत फोटोग्राफर्स फिरताना दिसतात. कधी त्यांच्या घराबाहेर फोटोग्राफर्स उभे असतात तर कधी विमानतळावर त्यांची वाट पाहात असतात. मात्र, सतत मागे फिरणाऱ्या या फोटोग्राफर्सला कधीकधी कलाकारही वैतागतात. नुकताच बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर फोटोग्राफर्सवर संतापला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Crime News : ब्रेकअपमुळे प्रियकर संतापला! शेवटचं भेटायचं म्हणून फ्लॅटवर जात प्रियसीच्या गळ्यावर केले तब्बल ३५ वार

आरोपी प्रकाश चुंचवाड आणि कामाक्षी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, कामाक्षीने प्रकाश सोबत ब्रेकअप केले. या घटनेचा राग प्रकाशला आला. त्याने तिला ठार मारण्याचे ठरवले. दरम्यान, प्रकाश हा तिला शेवटच्या भेटण्याच्या उद्देशाने तिच्या फ्लॅटवर गेला. यावेळी प्रकाशने कुठलाही विचार न करता सोबत नेलेल्या चाकूने कामाक्षीच्या गळ्यावर तब्बल ३५ वर केले. यात कामाक्षीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन त्याने जमिनीत पुरला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Kareena Kapoor: करीनाला सिनेमातून काढून टाकले होते; अमिषा पटेलचा ‘कहो ना प्यार’बाबत मोठा खुलासा

पु़ढे ती म्हणाली, ‘अभिनेता हृतिक रोशनने या चित्रपटातून पदार्पण केले होते आणि सर्वजण तणावत होते. पिंकी आंटीने पुढे मला सांगितले की राकेश यांनी मला एका लग्नात पाहिले होते आणि ते संपूर्ण रात्र झोपले नाहीत. ते सतत सोनिया सापडली, सोनिया सापडली असे म्हणत होते. फक्त आता तिने होकार दिला पाहिजे.’
Bigg Boss Marathi:’बिग बॉस मराठी’मधील स्पर्धकांचा येणार चित्रपट, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Dil Dosti Deewangi: या चित्रपटात अभिनेत्री स्मिता गोंदकर, वीणा जगताप, सुरेखा कुडची आणि विद्याधर जोशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Source link
Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्रीचा यूटर्न, ‘जवान’वर टीका केल्यानंतर केली प्रशंसा

Vivek Agnihotri on Jawan: विवेक अग्निहोत्रीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मीम्स शेअर करत ‘जवान’ आणि ‘सालार’ चित्रपटावर टीका केली होती. आता मात्र, त्याने यूटर्न घेतला असून दोन्ही चित्रपटांची प्रशंसा करताना दिसत आहे.
Source link
Shakti Kapoor: ३९ वर्षांनी लहान पूनम पांडेसोबत रोमॅन्स ते बिग बॉस, जाणून घ्या शक्ती कपूर यांच्याविषयी

शक्ती कपूर यांनी मल्याळम, बंगाली, उड़िया, पंजाबी, तेलुगू, इंग्लिश, नेपाली, मराठी, असमी, कन्नड़, बांग्लादेशी अशा अनेक भाषांमध्ये काम केले आहे. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी चिरंजीवीसोबत काम केले. शक्ती कपूर हे बिग बॉस सिझन ५ च्या घरात देखील दिसले होते. त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेसोबत बोल्ड सीन्स देखील दिले आहेत. जर्नी ऑफ कर्मा या चित्रपटात पूनम पांडे आणि शक्ती कपूर हे एकत्र दिसले होते. त्यांनी या चित्रपटात बोल्ड सीन्स दिले आहेत. त्यावेळी शक्ती कपूर यांनी ३९ वर्षांनी लहान असणाऱ्या पूनमसोबत बोल्ड सीन्स दिल्यामुळे चर्चा रंगल्या होत्या.
TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 03 सप्टेंबर 2023 : ABP Majha

Horoscope Today 3 September 2023 : मिथुन, सिंह, धनुसह ‘या’ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त ‘हे’ काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
माझ्या हिश्श्याचे किस्से: ज्या कपड्यांमुळे करिश्माने चित्रपट सोडला, तेच घालण्यासाठी राजी झाली होती दिव्या

रुमी जाफरी, बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘रंग’ चित्रपटातील एका दृश्यात दिव्या भारती.
तलत जानी तसे रोजच माझ्या घरी यायचे. त्यांच्यासोबत दिव्याची चेष्टामस्करी चालायची. तलतकडे पाहत ती हसून म्हणाली, ‘तुमचे डोळे तर दिसत नाहीत, तुम्ही शॉट कसा घेणार?’ मग बोलली, ‘ठीक आहे! मी करेन हा चित्रपट. रूमी भाईने सांगितलंय आणि कथाही मी रूमी भाईकडून ऐकून घेईन. आणि तुम्ही करिश्मासाठी कपडे बनवलेत ना? मग ते कपडे द्या. मी तेच कपडे घालेन…’
माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये मी आज एक असा किस्सा सांगणार आहे, जो सांगण्यापूर्वीच माझे अंत:करण जड झाले आहे, मनात एक विचित्र अस्वस्थता आहे. कोण्या एका व्यक्तीच्या मोठेपणाच्या, चांगुलपणाच्या, आपुलकी आणि नातेसंबंध निभावण्याच्या गुणाबद्दल मनात एक वेगळी भावना दाटली आहे. चार दिवसांपूर्वी रक्षाबंधन होते आणि रक्षाबंधनाला मी माझी बहीण दिव्या भारतीला खूप मिस करत होतो. १९९१ ची गोष्ट आहे. मी लिहिलेला “रंग’ हा चित्रपट सुरू झाला होता. पहिले शेड्यूल गाण्याचे ठेवले होते. गाणे होते.. “हम तुम पिक्चर देख रहे हों किसी पिक्चर थिएटर के अंदर, और बिजली चली जाय..’ बॉबी चित्रपटातील “हम तुम एक कमरे में बंद हो..’ या गाण्यावरून प्रेरणा घेऊन हे गाणे बनवण्यात आले होते. चित्रपटाच्या मुहूर्तासाठी फिल्मालय स्टुडिओमध्ये तीन सेट लावण्यात आले होते. एक प्लेनचा, एक ट्रेनचा आणि तिसरा बॉबीची ती खोली, ज्यात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया राहत होते. हुबेहूब तोच सेट लावला होता. त्या वेळी चित्रपटात दोन नायिका होत्या- करिश्मा कपूर आणि चांदनी. नायक होता कमल सदाना आणि महत्त्वाच्या भूमिकेत जितेंद्र आणि अमृता सिंह होत्या. करिश्मा कपूरचा िदग्दर्शक तलत जानी यांच्यासोबत कपड्यांबाबत प्रॉब्लेम सुरू होता. तलत जानी यांना कपडे त्यांच्या पत्नीकडून तयार करून घ्यायचे होते आणि करिश्माची इच्छा होती की, तिच्या डिझायनरने कपडे बनवावे. मी तलत यांना समजावलं, ‘तलत, कपड्यांचा निर्णय नायिकेच्या डिझायनवर सोडला तर बरे होईल, कारण ते तिच्यासाठी कम्फर्टेबल असूू शकेल.’ पण, तलत जानी यांनी आपल्या पत्नीकडून कपडे बनवून घेतले.
असो. एके दिवशी मी घरी असताना निर्माता मन्सूर सिद्दिकी यांचा माणूस आला आणि म्हणाला, “तुम्हाला लगेच ऑफिसमध्ये बोलावलंय.’ मला वाटलं, काय झालं असावं? मी पटकन कपडे बदलले आणि निघालो. मन्सूर यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो तर तिथे मन्सूर आणि तलत जानी बसले होते. दोघे खूप टेन्शनमध्ये दिसत होते. मी विचारलं, “काय झालं?’ तर म्हणाले, “करिश्माने चित्रपट सोडलाय..’ मन्सूर म्हणाले, “रूमी, सुरुवातीलाच नुकसान होईल. पहिलाच चित्रपट आहे माझा, पुढे चित्रपट कसा बनणार? तीन-तीन सेट लागले आहेत, सर्वांच्या तारखा मिळाल्या आहेत.’ मी विचारलं, “सांगा, मी काय करू शकतो? तर म्हणाले, “तू दिव्याशी बोल आणि कसंही करून तिला हा चित्रपट करायला सांग.’ मी म्हणालो, “हे बघा, मी कधीही कामात वैयक्तिक संबंध आणत नाही.’ मन्सूर, तलत म्हणाले, “भाई, हा आमच्या करिअरचा प्रश्न आहे. काहीतरी करावं लागेल.’ त्या वेळी मोबाइल नव्हते. मी दिव्याचा सेक्रेटरी जतीन राजगुरूला त्यांच्या ऑफिसमध्ये फोन लावला आणि त्यांना, “दिव्या कुठं आहे?’ असं विचारलं. जतीन म्हणाले की, त्या डेंटिस्टकडे गेल्या आहेत. मी म्हणालो, ‘ठीक आहे, तिला सांगा, माझा फोन होता. तिच्याकडे काही काम आहे.’ जतीनने विचारलं, “कुठून बोलताय?’ मी सांगितलं, ‘मन्सूर यांच्या ऑफिसमधून बोलताेय.’ मग फोन ठेवून दिला. मन्सूर, मी आणि तलत तणावात तिथेच बसलो होतो. साधारण एक-दीड तासानंतर मन्सूरच्या सेक्रेटरी त्या रूममध्ये आल्या आणि म्हणाल्या, “रूमीजी, तुमच्यासाठी दिव्या भारतींचा फोन आहे.’ आणि तिने फोन आत ट्रान्सफर केला. मी फोन उचलतोय तोवर मन्सूर आणि तलत एक्साइटमेंटने उभे झाले होते आणि मला खुणेनेे सांगत होते की, तिला लगेच बोलावून घे.
दिव्याने विचारले, “रूमी भाई, काय झाले?’ तिला चिंता वाटली. कारण त्या काळात दिव्या भारती माझ्याच घरी राहत होती. त्यामुळे ज्या व्यक्तीसोबत आपण राहतो तीच आपल्याला शोधतेय ही काळजी करण्यासारखीच गोष्ट होती. मी म्हणालो, अशी काही खास गोष्ट नाही, तू घरी पोहोच. मी घरी येऊन तुझ्याशी बोलतो.’ मग मी, तलत आणि मन्सूर लगेच घरी पोहोचलो. दिव्या आली आणि तिनं, ‘काय झालं?’ असं विचारलं. मी तिला स्पष्टपणे सांगून टाकलं की, करिश्माने हा चित्रपट सोडला आहे आणि तुला तो करावा लागेल. आधी ती हसली. कारण तलत जानी तसे रोजच माझ्या घरी यायचे. तलतसोबत तिची चेष्टामस्करी चालायची. कारण तलतचे केस अर्ध्या चेहऱ्यावर पसरलेले असायचे. ती हसून म्हणाली, ‘तुमचे डोळे तर दिसत नाहीत, तुम्ही शॉट कसा घेणार?’ मग बोलली, ‘ठीक आहे! मी करेन हा चित्रपट. रूमी भाईने सांगितले आहे आणि कथादेखील मी रूमी भाईकडून ऐकून घेईन. आणि तुम्ही करिश्मासाठी कपडे बनवलेत ना? मग ते कपडे द्या. मी तेच कपडे घालेन.’ जरा विचार करा, याच कपड्यांमुळे करिश्मा कपूरने चित्रपट सोडला आणि दिव्या भारती तेच कपडे घालायला तयारी झाली. नंतर म्हणाली, ‘रूमी भाई, माझ्या तारखाच शिल्लक नाहीत, मग शूटिंग कसं करणार?’ मी म्हणालो, “मला माहितीय तुला झाेप येत नाही. रात्री शूटिंग करून हा सेट कम्प्लिट कर, नंतर पुढचं बघू.’ मग तिनं रात्री शूटिंग करून ते पूर्णही केले. कोणत्याही अभिनेत्रीकडून, विशेषत: दोन अभिनेत्री असतील तर त्यांच्याकडून चित्रपट करून घेणं किती कठीण असतं हे मी जाणून आहे. हा दिव्याचा त्या चित्रपटावर, मन्सूरवर, तलतवर आणि माझ्यावर खूप मोठा उपकार आहे. अकबर इलाहबादींचा एक शेर आहे…
ये है कि झुकाता है मुख़ालिफ़ कि भी गर्दन
सुन लो कि कोई शय नहीं एहसान से बेहतर।
दिव्याचे तर इतके किस्से आहेत की त्यासाठी मला एक पुस्तकच लिहावं लागेल. तूर्तास इतकेच.. दिव्या भारतीच्या “रंग’मधील हे गाणे ऐका..
हम तुम पिक्चर देख रहे हों किसी थिएटर के अंदर…
और बिजली चली जाए, अंधेरा ही अंधेरा हो।
स्वत:ची काळजी घ्या. आनंदी राहा.
Vivek Oberoi: ‘या’ एका चुकीमुळे विवेकचा ऐश्वर्यासोबत झाला ब्रेकअप, स्वत: केला होता खुलासा

Vivek Oberoi Birthday: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सोबत झालेल्या ब्रेकअपनंतर अभिनेत्री ऐश्वर्या रॉय ही विवेक ऑबेरॉयसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण त्यांचेही नाते फार काळ टिकू शकले नाही.
Source link

