Sunday, July 19, 2026
Home Blog Page 2782

Shiv Sena UBT : शाखाप्रमुख लक्ष्मीकांत गवंडे यांचं निधन, सच्चा शिवसैनिक हरपल्याची भावना

0
Shiv Sena UBT : शाखाप्रमुख लक्ष्मीकांत गवंडे यांचं निधन, सच्चा शिवसैनिक हरपल्याची भावना

आज अंत्यसंस्कार

लक्ष्मीकांत गवंडे यांच्या पार्थिवावर आज रात्री ११ वाजता सागबाग येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चांदिवलीतील संघर्ष नगर येथील स्वप्न साकार बिल्डिंग येथून रात्री साडेदहा अंत्ययात्रा निघेल. ही अंत्ययात्रा लक्ष्मीनारायण मंदिर, परेरावाडी, पाईपलाईन मार्गे सागबागला पोहोचेल, अशी माहिती युवा सेनेचे चांदिवली विधानसभा सचिव मनोज (बालाजी) सांगळे यांनी दिली.

Source link

उद्या राज्यभर बंद असला तरी तलाठी भरतीची परीक्षा होणारच, उमेदवारांनी वेळेपूर्वी हजर राहावं

0
उद्या राज्यभर बंद असला तरी तलाठी भरतीची परीक्षा होणारच, उमेदवारांनी वेळेपूर्वी हजर राहावं

मुंबई: राज्यात उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असला तरीही तलाठी भरतीची परीक्षा होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन वेळेपूर्वीच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं असं आवाहन परीक्षा आयोजन करणाऱ्या संस्थेने केलं आहे. त्यासंबंधित एक मेल सर्व उमेदवारांना पाठवण्यात आला आहे.

जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील विविध संघटनांनी उद्या म्हणजे सोमवारी बंद पुकारला आहे. त्यामुळे वाहतूकीमध्ये अडचणी येण्याची शक्यता असून त्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन उमेदवारांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू असून त्याचा एक टप्पा सोमवारी पार पडणार आहे. जालन्यामध्ये घटना घडली असली तरी त्याचा परिणाम परीक्षेवर होणार नसून परीक्षा ही वेळेतच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

काय म्हटलंय मेलमध्ये?

ज्या संस्थेकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे त्या संस्थेकडून सर्व उमेदवारांना मेल करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटलंय की, जालना येथे घटलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 4 सप्टेंबर रोजी राज्यात सर्वत्र तलाठी भरती परीक्षा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर रहावे. उद्या विविध संघटनांनी बंद पुकारला असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपण परीक्षा केंद्रावर येण्याबाबत आपल्या स्तरावार नियोजन करून परीक्षा केंद्रावर वेळेवर हजर राहण्याची दक्षता घ्यावी.

अनेक उमेदवार परीक्षेला मुकण्याची शक्यता

उद्या तलाठी पेपर होणार असल्याबाबत विद्यार्थ्यांना सध्या मेल येत आहे राज्यात सध्या अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था बंद आहे उद्या अनेक ठिकाणी आंदोलन होणार आहे अशावेळी विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाने जर अशा मुलांची संधी हुकली तर त्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही आमची मागणी आहे असं स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटलं आहे.

ही बातमी वाचा:

Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षा पेपर फुटी संदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती न्यायालयात जाण्याच्या तयारीत!

Source link

Tushar Doshi: तुषार दोशींनी दिले होते गोळीबाराचे आदेश? जालना घटनेसंदर्भात नवी माहिती

0
Tushar Doshi: तुषार दोशींनी दिले होते गोळीबाराचे आदेश? जालना घटनेसंदर्भात नवी माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. यात ३८ पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अंबड तालुक्यातील धुळे-सोलापूर रस्त्यावरील अंतरवली सारथी गावात हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचा दावाही गावकऱ्यांनी केला. मात्र, अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला नाही. दरम्यान, तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याने त्यांनीच गोळीबाराचे आदेश दिल्याची चर्चा सुरु आहे.

Source link

शरद पवार यांचं प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकणं मोठी चूक, आमदार रोहित पवार यांचा हल्लाबोल

0
शरद पवार यांचं प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकणं मोठी चूक, आमदार रोहित पवार यांचा हल्लाबोल

जळगाव : ‘शरद पवार   (Sharad Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यावर विश्वास टाकून मोठी चूक केली. जेव्हा आपली सत्ता आली होती, तेव्हा केंद्रात प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद दिलं होतं. मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी अनेक मंत्रीपदे आपल्याला मिळाली होती. आपल्या सर्वांना मंत्रीपद मिळावे, म्हणून आपल्या पक्षाने त्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडलं’, असे स्पष्टीकरण आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर दिले आहे.

आमदार रोहित पवार हे जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला की, राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले नाही ही शोकांतिका आहे. अनेक वर्ष एका जागेवर समाधान, चांगल्या लोकांना संधी मिळाली नाही, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार  (Sharad Pawar) यांना लगावला. यावर रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकूनच मोठी चूक केली. जेव्हा आपली सत्ता आली होती, तेव्हा केंद्रात प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद दिलं होतं. मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी अनेक मंत्रीपद आपल्याला मिळाली होती. त्यामुळे प्रत्यक्षपणे आपण कसे चुकलो आहोत, हेच प्रफुल्ल पटेल सांगत आहोत. प्रफुल पटेल भविष्याचे पुस्तक लिहिणार आहेत, त्या पुस्तकात त्यांनी शरद पवार यांनी विश्वास टाकल्यामुळे पार्टीचा फायदा किती झाला आणि नुकसान किती झालं, हे त्यांनी त्या पुस्तकात लिहावं, असा सल्लाही रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिला.

आमदार रोहित पवार यांनी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या आरोपावर उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आता या विषयावर राजकारण न करता हा प्रश्न कसा सोडवता येईल, यासाठी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे. शैक्षणिक तसेच ज्या ठिकाणी संधी देता येईल, त्या ठिकाणी शरद पवार यांनी सर्वांना संधी दिली. 2014 मध्ये शरद पवार यांनी कुणबी समाजासाठी घेतलेला निर्णय हा सुद्धा महत्वपूर्ण ठरला. आरक्षणाचा विषय हा संसदेच्या माध्यमातून मार्गी लावता येईल, भाजपने गायकवाड आयोग नेमला, मात्र अधिवेशनात चर्चा कुठलीही केली नाही, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. राजकीय दृष्टिकोनातून बावनकुळे जर आज काहीही बोलले तर त्यांना उत्तर हे आपले शरद पवारच देतील, असेही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडीला भाजप घाबरले!

आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीबाबत बोलताना म्हटले की, नरेंद्र मोदी यांना मदत करण्यासाठी मग इतर पक्ष का लागत आहे. लोकांनाच भाजप नकोसे झाले आहे, आणि लोकांना ही नकोसे झाल्यामुळे हे भाजपला समजल्यामुळे भाजप घाबरले आहे. इंडिया आघाडी मजबूत होत आहे. सततच्या बैठकांमुळे भाजप दहशतीत आहे. तत्पूर्वी निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे. मुंबईतील बैठक चांगली झाली. पाच समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. या बैठकीत एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणजे भाजप घाबरला आहे. त्यामुळे केंद्र सरकार विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत बोलत असल्याचे ते म्हणाले.

इतर महत्वाची बातमी :

Jalgaon News : पोलीस कुणाशी तरी फोनवर बोलले अन् त्यानंतर आंदोलकांना घेवून जायला सुरवात केली, रोहित पवार काय म्हणाले?

Source link

पुण्यात मराठा समाजाचं आंदोलन; जालन्यात घडलेल्या घटनेचा निषेध

0
पुण्यात मराठा समाजाचं आंदोलन; जालन्यात घडलेल्या घटनेचा निषेध

Pune news : पुण्यात मराठा समाजाचं आंदोलन; जालन्यात घडलेल्या घटनेचा निषेध

Source link

Nanded accident: नांदेड-हिंगोली मार्गावर कारचा भीषण अपघात, शिक्षक पती-पत्नी जागीच ठार; मुलगा गंभीर

0
Nanded accident: नांदेड-हिंगोली मार्गावर कारचा भीषण अपघात, शिक्षक पती-पत्नी जागीच ठार; मुलगा गंभीर

Nanded accident: हिंगोली नांदेड मार्गावर कारचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत शिक्षक पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास घडली.

Source link

Kiran Mane: “भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत

0
Kiran Mane: “भारतात मुस्लिम आहेत म्हणून तुम्ही हिंदू आहात”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत

किरण माने यांनी शेअर केलेल्या मीममध्ये ‘द डार्क नाईट’ या चित्रपटामधला एक सीन आहे. पोलीस स्टेशनमधील जोकर आणि बॅटमॅनच्या संवादाचा हा सीन आहे. या मीममध्ये या सीनचा वापर करून जोकर सांगताना दिसतोय की, ‘पुन्हा सांगतो लक्षात घे. भारतात मुस्लिम आहे म्हणून तुम्ही हिंदू आहात; नंतर तुम्ही खालच्या किंवा वरच्या जातींचे राहणार.’ हे मीम शेअर करत किरण माने यांनी लिहीलं आहे की, “…हे मीम लै खोल हाय. एका फटक्यात भानावर आननारं हाय. बघा. विचार करा. लब्यू जितेंद्र रायकर.”

Source link

Satara Hill Half Marathon Competition : यवतेश्वर घाटात हिल हाफ मॅरेथॉन , बेळगावचा आनंद गावकर पहिला

0

Satara Hill Half Marathon Competition : यवतेश्वर घाटात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा, देश-विदेशातील स्पर्धकांचा सहभाग

Source link

Bahubali 2: ‘गदर २’ने मोडला बाहुबली २चा रेकॉर्ड? जाणून घ्या २३व्या दिवसाची कमाई

0
Bahubali 2: ‘गदर २’ने मोडला बाहुबली २चा रेकॉर्ड? जाणून घ्या २३व्या दिवसाची कमाई

Gadar 2 Box Office Collection: ‘गदर २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. आता २३व्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली आहे जाणून घेऊया…

Source link

सांगली : जालना लाठीमाराच्या निषेधार्थ आमणापूर बंद, सकल मराठा समाजाच्या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा | पुढारी

0

पलूस; पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे- पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांवर ताबड अंतरवाली सराटी गावात पोलिसांकडून लाठीचार्ज झाला होता. यानंतर मराठा आंदोलन आणखी आक्रमक झाले आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर शासन आणि पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे.

आज (रविवार) समस्त मराठा समाज आणि शिवप्रतिष्ठान आमणापूर यांच्या वतीने पुकारलेल्या आमणापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आज सकाळपासून जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ संपुर्ण आमणापूर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. सकाल मराठा समाज व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सकाळी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत जालना घटनेच्या निषेधार्थ घोषणा दिल्‍या. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज यापुढे संघटीतपणे लढत राहणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

हेही वाचा :

Source link