Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2767

Jawan Box Office Collection: शाहरुखच्या ‘जवान’ने विक्रम रचला! अवघ्या दोन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई

0
Jawan Box Office Collection: शाहरुखच्या ‘जवान’ने विक्रम रचला! अवघ्या दोन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई


एकीकडे ‘जवान’ कमाईचे झेंडे फडकावत आहेत. तर, दुसरीकडे शाहरुख खान देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहिला आहे. शाहरुख खानने या उदंड प्रतिसादासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘जवान’ला दोन दिवसांत मिळालेले यश पाहून किंग खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानणारी एक पोस्ट ट्विटमध्ये शेअर केली आहे, जी सध्या खूप व्हायरल होत आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसली आहे. तर, साऊथ स्टार विजय सेतुपती देखील दमदार भूमिकेत दिसला आहे.



Source link

Morya: गणपती बाप्पाच्या आगमनाची धामधूम; ‘मोरया’ या गाण्याने दुमदुमणार यंदाचा गणेशोत्सव!

0
Morya: गणपती बाप्पाच्या आगमनाची धामधूम; ‘मोरया’ या गाण्याने दुमदुमणार यंदाचा गणेशोत्सव!


‘श्री स्वामी समर्थ क्रिएशन’ प्रस्तुत मोरया या गाण्याच्या निर्मितीची धुरा निर्माते विजुतात्या विष्णुपंत बहिरट व प्रमोद अरविंद नाईक यांनी सांभाळली आहे. तर, दिग्दर्शक डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. या गाण्याच्या संगीताची जबाबदारी प्रसाद प्रभाकर शिंदे यांनी सांभाळली असून, गायक नकाश अझीझ याने त्याच्या दमदार व सुमधुर आवाजात हे गाणं गायलं आहे. हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार आवाजाने चाहतावर्ग तयार केलेल्या नकाश अझीझ या गायकाने साऱ्यांच्या मनावर ताबा मिळवला. आजवर हिंदी सिनेसृष्टीत त्याने बरीच हिट गाणी गायली असून, त्याच्या सुमधुर आवाजात त्याने मराठीतील बाप्पाला वंदन करणार ‘मोरया’ हे गाणं गायलं आहे. तर गीतकार मंगेश कांगणे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.



Source link

Aaliya Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीला दुबई सरकारने पाठवली नोटीस; नेमकं प्रकरण काय? वाचा…

0
Aaliya Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीला दुबई सरकारने पाठवली नोटीस; नेमकं प्रकरण काय? वाचा…


Nawazuddin Siddiqui Wife Aaliya Receives Legal Notice: आलिया सिद्दीकी आणि वादाचे तसे जुने नाते आहे. दरम्यान, आता दुबई सरकारने देखील आलिया सिद्दीकीला नोटीस पाठवल्याचे बातमी समोर आली आहे.



Source link

Akshay Kumar Birthday: अक्षय कुमारने मॉडेलिंगपासून केलेली करिअरची सुरुवात; असा झाला बॉलिवूडचा ‘खिलाडी’!

0
Akshay Kumar Birthday: अक्षय कुमारने मॉडेलिंगपासून केलेली करिअरची सुरुवात; असा झाला बॉलिवूडचा ‘खिलाडी’!


मात्र, या प्रवासात अक्षय कुमारला अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला होता. ‘फिर हेरा फेरी’ या त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटापूर्वी अक्षयचे सलग १६ चित्रपट फ्लॉप ठरले होते. पण, असे असूनही त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये कोणतीही घट झाली नाही. यंदाचे वर्षही अक्षयसाठी काही खास ठरले नाही. आतापर्यंत प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. परंतु, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘ओएमजी २’ या चित्रपटाला चांगले यश मिळाले आहे. मात्र, आजही अक्षय इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे.



Source link

ठाणे जिल्ह्यासाठी 24 तास अखंड वीजपुरवठ्यासाठी 4 हजार 500 कोटींचा आराखडा

0
ठाणे जिल्ह्यासाठी 24 तास अखंड वीजपुरवठ्यासाठी 4 हजार 500 कोटींचा आराखडा


Maharashtra Thane News: ठाणे जिल्ह्यातील (Thane District) संपूर्ण वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करून 24 तास अखंड वीजपुरवठा करण्यासाठी 4 हजार 500 कोटी रुपयांचा आराखडा करण्यात येत आहे. या आराखड्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) 60 टक्के अनुदान दिले जाणार आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या आराखड्यात अन्य लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी दिले आहेत.

केंद्र सरकारकडून देशभरातील 2023 पर्यंत वीज यंत्रणा आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र (RDSS) ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार ठाणे जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या भांडूप, कल्याण आणि वसई परिमंडळातील 34 लाखांहून अधिक ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरिंग, वीज हानी कमी करणं आणि सिस्टीमची क्षमता वाढवणं आदी कामं केली जातील. या योजनेत ठाणे जिल्ह्यासाठी 4500 कोटींचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात काल (शुक्रवारी) झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. 

ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील शहरे आणि सुमारे 850 गावांमध्ये वीज वितरणाचं जाळं मजबूत करण्यात येणार आहे. त्यानुसार 4 हजार 500 कोटींचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. त्यातील 1200 कोटींची कामं प्राधान्यानं पहिल्या दोन वर्षात केली जातील. तर उर्वरित कामं पाच वर्षांमध्ये पूर्ण होतील, असं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारकडून साधारणत: 3200 कोटींपर्यंत अनुदान मिळेल, असंही ते म्हणाले आहेत. 

सध्या नवी मुंबईत 7, डोंबिवलीत 6, ठाण्यात 7 आणि कल्याणमध्ये 12.5 टक्के वीजगळती आहे. वीज गळतीचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा कमी केल्यास केंद्र सरकारकडून अनुदान मिळेल. अन्यथा, ही रक्कम कर्ज म्हणून महावितरणला अदा करावी लागेल, असंही यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी सांगितलं. या योजनेतील 218 कोटींचं काम मंजूर झाले असून, ते लवकरच सुरू होईल. तर केंद्र सरकारकडून आराखडा मंजूर झाल्यानंतर वर्षभरात काम सुरू होईल, या आराखड्याच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील वीज वितरणाचे जाळे मजबूत होईल. त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परिपूर्ण आराखडा तयार करावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर डोंबिवलीत वीज केंद्रासाठी अडीच एकर जागेसंदंर्भात अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घ्यावी, अशी सूचनाही केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली. याचवेळी शहरांमध्ये रस्त्यात येणारे वीजेचे खांब दूर करण्याचा खर्च महावितरणने उचलावा. त्यासाठी योजनेत तरतूद करावी, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. या जिल्हा विद्युत समितीच्या बैठकीत आमदार संजय केळकर, आमदार गणपत गायकवाड, आमदार रमेश पाटील यांनीही काही सूचना केल्या आहेत.



Source link

https://marathi.abplive.com/short-videos/news/Supriya Sule : राष्ट्रवादीला खाली दाखवायचं पाप देवेंद्र फडणवीस करतात- सुप्रिया सुळे

0
https://marathi.abplive.com/short-videos/news/Supriya Sule : राष्ट्रवादीला खाली दाखवायचं पाप देवेंद्र फडणवीस करतात- सुप्रिया सुळे



<p>Supriya Sule : राष्ट्रवादीला खाली दाखवायचं पाप देवेंद्र फडणवीस करतात- सुप्रिया सुळे&nbsp;</p>



Source link

https://marathi.abplive.com/short-videos/news/Girish Mahajan: सरसकट मराठ्यांना कुणबी समजून आरक्षण न्यायालयात टिकणार नाही

0
https://marathi.abplive.com/short-videos/news/Girish Mahajan: सरसकट मराठ्यांना कुणबी समजून आरक्षण न्यायालयात टिकणार नाही



<p>Girish Mahajan: सरसकट मराठ्यांना कुणबी समजून आरक्षण न्यायालयात टिकणार नाही&nbsp;</p>



Source link

Satara Rape: सख्ख्या बहिणीवर आठ महिने अत्याचार; पीडिता गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड!

0
Satara Rape: सख्ख्या बहिणीवर आठ महिने अत्याचार; पीडिता गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड!


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत. पीडित मुलगी १५ वर्षांची आहे. तर, आरोपी मुलगा १७ वर्षांचा आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे आई-वडिल मोलमजुरी करण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करतात. पीडितेचा भाऊ नातेवाईकांकडे राहत होता. आठ महिन्यापूर्वी घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन पीडितेचा भाऊ एकेदिवशी दुपारीच घरी आला. यानंतर बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. तेव्हापासून तिच्यावर अनेकदा अत्याचार झाले.



Source link

Aatmapamphlet: ‘वाळवी’च्या यशानंतर परेश मोकाशींचा नवा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Aatmapamphlet: ‘वाळवी’च्या यशानंतर परेश मोकाशींचा नवा चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला


दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात, ” चित्रपटाचे नाव असे का आहे, ते टिझरमध्ये स्पष्ट कळत आहे. खूप साधी, सरळ आणि मनाला भावणारी अशी ही कथा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण कोरोनाच्या काळात झाले होते. त्याचबरोबर इतर असंख्य आव्हानं असतानाही चित्रपटाच्या टीमने मनापासून काम केले आणि चित्रपट पूर्ण केला. चित्रपटाने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावली आहे. याचे सारे श्रेय संपूर्ण टीमचे आहे. ‘आत्मपॅम्फ्लेट’मधील पात्रांपैकी एखादे पात्र तरी बालपणी आपल्यात, आपल्या मित्र मैत्रिणीत दडल्याचे प्रेक्षकांना जाणवेल. एखाद्या फास्ट रोलर कोस्टर राईडसारखी, तिरकस विनोदी शैली चित्रपटाची आहे. सर्व वयोगटासाठी हा चित्रपट आहे.”



Source link

Radhakrishna Vikhe Patil: भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली याचा विशेष आनंद

0
Radhakrishna Vikhe Patil: भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली याचा विशेष आनंद



<p>Radhakrishna Vikhe Patil: भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली याचा विशेष आनंद</p>



Source link