Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2766

सरकारचा वेळ संपला, आता उद्यापासून सलाईन काढून पाणीही बंद करणार; मनोज जरांगे आक्रमक

0
सरकारचा वेळ संपला, आता उद्यापासून सलाईन काढून पाणीही बंद करणार; मनोज जरांगे आक्रमक


जालना : मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारला दिलेली वेळ संपली असून उद्यापासून सलाईन काढली जाणार आणि पाणीही बंद केलं जाईल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मागील 10  दिवसांपासून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी त्यांनी आपण सरकारला चार दिवसांची वेळ देत असून, त्यानंतर पाणी आणि उपचार घेण्यास त्याग करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र चार दिवसात आरक्षणाच्या मुद्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आपण उद्यापासून पाणी आणि उपचार घेण्यास त्याग करणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. 

आधीच जरांगे यांचा बिपी कमी झाला होता. तसेच त्यांच्या किडनीवर देखील परिणाम होत असल्याचं डॉक्टरांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या पाणी न घेणे आणि उपचारासाठी नकार देण्याच्या भुमिकेमुळे प्रकृतीवर परिणाम करू शकते. त्यामुळे जरांगे यांच्या या निर्णयामुळे सरकारचं टेन्शन वाढणार आहे. तर, त्यांनी आपली भूमिका बदलण्याबाबत त्यांच्याकडे प्रशासनाकडून विनंती केली जाण्याची शक्यता आहे. 

काय म्हणाले जरांगे? 

दरम्यान याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, माझ आमरण उपोषण सुरु आहे. सरकारच्या सांगण्यावरून आतापर्यंत उपचार आणि पाणी घेत होतो. पण त्यांना दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळपासून अन्न, पाणी आणि सरकारकडून सुरु असलेल्या उपचाराचे देखील त्याग करणार आहे. सोबतच आता पुढील चर्चेसाठी जायचं की, नाही याबाबतीत आम्ही महाराष्ट्र पातळीवर आमची एक बैठक घेणार आहे. त्यात पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

2004 च्या जीआरनुसार निर्णय घ्यावा…

आमची मागणी अशी आहे की, मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे. त्यानुसार जीआरमध्ये दुरुस्ती करण्याची मागणी आहे. मात्र, तशी दुरुस्ती आज आणलेल्या जीआरमध्ये आम्हाला आढळून आली नाही. त्यांच्या जीआरमध्ये कुणबी आणि मराठा असं वेगळ करण्यात आले आहे. तुमच्याकडे जर कुणबी असल्याचे वंशावळ पुरावे असतील तरच कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचा त्यात उल्लेख आहे. पण आमची मागणी अशी आहे की, 2004 च्या जीआरनुसार मराठा समाजाला तातडीने मराठा कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे. याबाबत स्पष्ट अशी ओळ आम्ही लिहून दिली होती. पण जे बोलणं झालं होतं ते जीआरमध्ये नाही. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचे जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

अर्जुन खोतकर जरांगेंच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांचं पत्र दिलं, पण जरांगे म्हणाले…



Source link

Maratha Reservation: मनोज जरांगे उपोषणावर ठाम; GR मध्ये ‘हे’ दोन नवे शब्द टाकण्याची मागणी

0
Maratha Reservation: मनोज जरांगे उपोषणावर ठाम; GR मध्ये ‘हे’ दोन नवे शब्द टाकण्याची मागणी


सरकारपुढे कोंडी कायम

मनोज जरांगे पाटील हे गेले १२ दिवस जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणासाठी बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातील विविध मराठा संघटनांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण झाल्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे. हे आंदोलन राज्यात इतरत्र फैलावू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील या जेष्ठ मंत्र्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगेसह जेष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे भेटून जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळासोबत रात्री दोन वाजेपर्यंत चर्चा केली होती. दरम्यान, आज शनिवारी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या नव्या मागणीमुळं सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले असून कोंडी कायम राहिली आहे.



Source link

विखे पाटलांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजारांच बक्षीस; मल्हार सेनेकडून घोषणा

0
विखे पाटलांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजारांच बक्षीस; मल्हार सेनेकडून घोषणा


जालना :  भाजप (BJP) नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीवरून शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा टाकल्याची घटना शुक्रवारी समोर आली होती. मात्र, यावेळी आंदोलक शेखर बंगाळे यांना तिथे उपस्थित असलेले भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे (Narendra Kale) यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे धनगर समाजातर्फे संताप व्यक्त होत असून, धनगर समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर, विखे पाटलांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजारांच बक्षीस मल्हार सेनेकडून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणाऱ्या युवकास मारहाण केल्याप्रकरणी धनगर समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत. जालन्यातील अंबड तहसील कार्यालयासमोर मल्हार सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज निषेध आंदोलन केलं. दरम्यान, यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून धनगर समाजाच्या तरुणास अमानुष मारहाण केल्याचा निषेध करण्यात आला. तसेच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास 51 हजारांच बक्षीस देणार असल्याची घोषणा करण्यात आली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा घेऊन मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत यावेळी तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं आहे.

धनगर आरक्षण कृती समिती आक्रमक, नेमकं काय घडलं? 

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोलापुरात आले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. अशातच अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे येत होते, आपले प्रश्न मांडत होते. ते लोकांची निवेदनं स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीच्या काही सदस्यांनी कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन त्यांना देण्याची विनंती केली. हे निवेदन राधाकृष्ण विखे पाटील स्विकारत असताना कार्यकर्त्यांनी अचानक खिशातून भंडारा काढला आणि तो राधाकृष्ण विखे पाटलांच्या अंगावर उधळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या विखे पाटलांच्या सुरक्षारक्षकांनी आणि उपस्थित पोलिसांनी धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांना अडवलं आणि बाहेर आणलं. कार्यकर्त्यांना थांबवताना त्यांना काही प्रमाणात मारहाणही करण्यात आली होती.  

भाजप शहराध्यक्षांनी मागितली माफी

सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मुद्यावरुन शेखर बंगाळे (Shekhar Bangale) यांनी भंडारा टाकला होता. यावेळी आंदोलक शेखर बंगाळे यांना भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे (Narendra Kale) यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर धनगर समाजातर्फे संताप व्यक्त होऊ लागला. तर धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी या मारहाणी प्रकरणी माफी मागितली आहे.

 



Source link

OTT Releases: ‘हड्डी’ ते ‘जेलर’; या आठवड्यात तुम्ही ओटीटीवर काय बघणार? पाहा यादी…

0
OTT Releases: ‘हड्डी’ ते ‘जेलर’; या आठवड्यात तुम्ही ओटीटीवर काय बघणार? पाहा यादी…


OTT Releases in September First Week: दर आठवड्याला प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्याने रिलीज होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याच वेळी, हा आठवडा देखील ओटीटी प्रेक्षकांसाठी चांगला असणार आहे. या आठवड्यात ‘जेलर’, ‘हड्डी’सारखे चित्रपट आणि ‘द फ्रीलान्सर’, ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’सारख्या काही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या आहेत. चला तर, बघूया या आठवड्यात ओटीटीवर रिलीज झालेल्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी…



Source link

Gashmeer Mahajani: ‘वडील गेल्यावर केस का नाही कापले?’; चाहत्याच्या प्रश्नावर गश्मीर महाजनी म्हणाला…

0
Gashmeer Mahajani: ‘वडील गेल्यावर केस का नाही कापले?’; चाहत्याच्या प्रश्नावर गश्मीर महाजनी म्हणाला…


अभिनेते रवींद्र महाजनी यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. तर, त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेता गश्मीर महाजनी हा हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर ते गेल्या वीस वर्षांपासून एकटेच वेगळे राहत होते, असा खुलासा गश्मीरने केला होता. एकत्र राहण्यासाठी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी नेहमीच नकार दिला, असे देखील गश्मीर म्हणाला होता.



Source link

Bollywood Nostalgia: अवघ्या १२ लाखांत बनलेल्या ‘या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घातला होता चांगलाच धुमाकूळ!

0
Bollywood Nostalgia: अवघ्या १२ लाखांत बनलेल्या ‘या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घातला होता चांगलाच धुमाकूळ!


Bollywood Nostalgia Special: अवघ्या १२ लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ९ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.



Source link

Manoj Jarange यांच्या शिष्टमंडळाची सरकारशी नेमकी काय चर्चा झाली? सदस्य शिवानंतर भानुसे म्हणाले…

0
Manoj Jarange यांच्या शिष्टमंडळाची सरकारशी नेमकी काय चर्चा झाली? सदस्य शिवानंतर भानुसे म्हणाले…



<p>Manoj Jarange यांच्या शिष्टमंडळाची सरकारशी नेमकी काय चर्चा झाली? सदस्य शिवानंतर भानुसे म्हणाले…</p>



Source link

Mumbra Accident : ठाण्यात भरधाव टँकर नाल्यात कोसळला; केमिकलच्या उग्र वासाने नागरिकांची तारांबळ

0
Mumbra Accident : ठाण्यात भरधाव टँकर नाल्यात कोसळला; केमिकलच्या उग्र वासाने नागरिकांची तारांबळ


मिळालेल्या माहितीनुसार, भोईसरहून जालन्याच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव टँकरला पहाटे पाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. टँकरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड भरलेलं होतं. चालकाचं नियंत्रण सुटल्याने सुटल्याने टँकर थेट चर्नी पाडा येथील नाल्यात कोसळला. या भीषण अपघातात चालक ब्रिजेश सरोळ यांना गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, मुंब्रा पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. याशिवाय घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं.



Source link

Mahesh Babu: साऊथ स्टार महेश बाबूलाही पडली ‘जवान’ची भुरळ; शाहरुख खानचं कौतुक करत म्हणाला…

0
Mahesh Babu: साऊथ स्टार महेश बाबूलाही पडली ‘जवान’ची भुरळ; शाहरुख खानचं कौतुक करत म्हणाला…


एकीकडे ‘जवान’ कमाईचे रेकॉर्ड मोडत आहे. तर, दुसरीकडे शाहरुख खान देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहिला आहे. शाहरुख खानने या उदंड प्रतिसादासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘जवान’ला दोन दिवसांत मिळालेले यश पाहून किंग खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानणारी एक पोस्ट ट्विटमध्ये शेअर केली आहे, जी सध्या खूप व्हायरल होत आहे.



Source link

Gadar 2: ‘गदर २’ने तोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड! ‘जवान’च्या वादळातही सनी देओलच्या चित्रपटाची हवा

0
Gadar 2: ‘गदर २’ने तोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड! ‘जवान’च्या वादळातही सनी देओलच्या चित्रपटाची हवा


Gadar 2 Breaks Baahubali 2 Record: सध्याच्या घडीला चित्रपटगृहांमध्ये चांगलाच हल्लाकल्लोळ पाहायला मिळत आहे. सनी देओलच्या ‘गदर २’नंतर आता ‘जवान’ची जादू चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळत आहे. ‘जवान’ रिलीज झाल्यामुळे याआधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर मोठा परिणाम झाला आहे. ‘जवान’ रिलीज झाल्यानंतर सनी देओलच्या ‘गदर २’साठी ‘बाहुबली’चा रेकॉर्ड मोडणे फार कठीण जाईल, असे मानले जात होते. पण, सनी देओलच्या या चित्रपटाने रिलीजच्या २९व्या दिवशी ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड मोडला आहे.



Source link