Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2768

Sameer Wankhede: समीर वानखडेंना दिलासा, आर्यन खानप्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका

0
Sameer Wankhede: समीर वानखडेंना दिलासा, आर्यन खानप्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका


याप्रकरणी कॅटने समीर वानखेडे यांच्या बाजूने निकाल दिला. समिर वानखेडे यांच्यावरील आरोप खोटे असून ते निर्दोष असल्याचे कॅटने म्हटले आहे. कॅटने आपल्या आदेशात असे म्हटले आहे की, “समीर वानखेडे यांच्यासाठी जी चौकशी समिती नेमण्यात आली होती, या समितीत एनसीबी संचालक ज्ञानेश्वर सिंह नव्हते. त्यांनी जो तपास केला, त्याची सर्व माहिती सिंह यांना होती, असे म्हणता येणार नाही.”



Source link

Mumbai Fire: मुंबईच्या वांद्रे परिसरात गॅस गळतीमुळे आग; दोन जण गंभीररित्या होरपळले

0
Mumbai Fire: मुंबईच्या वांद्रे परिसरात गॅस गळतीमुळे आग; दोन जण गंभीररित्या होरपळले


मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील खेरवाडी भागात आज संध्याकाळी ४.४४ वाजता गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत दोन अल्पवयीन मुले गंभीररित्या होरपळले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीच्या तपशीलाची प्रतीक्षा आहे. गुरुनानक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.



Source link

Gondia: कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने जवानाचा मृत्यू

0
Gondia: कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने जवानाचा मृत्यू



Gondia Jawan Dies: या जवानावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात येईल.



Source link

ST Employee DA: एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; महागाई भत्त्यामध्ये वाढ!

0
ST Employee DA: एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; महागाई भत्त्यामध्ये वाढ!


एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळावा, अशी मागणी करत होते. यानंतर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली. सध्या एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ३८ टक्के मिळणार आहे.



Source link

DA News : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ

0
DA News :  एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ


मुंबई गणेशोत्सवाच्या आधी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिेदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के होणार आहे. या निर्णयाचा फायदा एसटी महामंडळातील 90 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. 

सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते.  त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.  

 

त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 203 टक्क्यांवरून वाढवून 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनावर कार्यवाही होत नसल्याने एसटी कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाची फाईल मंत्रालयात धूळ खात पडली असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी एसटी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला होता. 

शासनाच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता दिला आहे. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनासुद्धा मिळायला हवा होता, पण तो अद्याप मिळालेला नाही.  राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळत असून त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता मिळायला हवा होता. पण एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप 34 टक्के इतकाच महागाई भत्ता मिळत असल्याचेही कर्मचारी संघटनांनी म्हटले. 





Source link

Dhangar Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजही आक्रमक, मंत्री विखे- पाटलांवर भंडारा उधळला!

0
Dhangar Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजही आक्रमक, मंत्री विखे- पाटलांवर भंडारा उधळला!


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर विखे पाटील यांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांची भेट घेतली. मात्र, निवेदन देत असताना एका कार्यकर्त्याने खिशातून भंडाऱ्याची पुडी काढून विखे पाटलांच्या डोक्यावर ओतली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले. यावर विखे पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली. विखे पाटील म्हणाले की, “भंडारा पवित्र असतो. पवित्र भंडाऱ्याची माझ्यावर उधळण झाल्याने मला आनंद आहे. प्रतिकात्मक गोष्टी करण्याची कार्यकर्त्यांची भावना असते. त्यांनी काही चुकीचे केले, असे मला वाटत नाही”, असे विखे पाटील म्हणाले.



Source link

मुस्लिम मावळ्याची अनोखी ‘शिवनिष्ठा’, छत्रपती शिवरायांवर रचलं ‘महाकाव्य’

0
मुस्लिम मावळ्याची अनोखी ‘शिवनिष्ठा’, छत्रपती शिवरायांवर रचलं ‘महाकाव्य’


Raja Shiv Chhatrapati Mahakavya: छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) व्यक्तिमत्त्वाने प्रेरित झालेल्या एका मुस्लीम मावळ्यानं एक अनोख कामं केलं आहे. शिवरायांवरील असलेल्या निष्ठेसाठी अवघ्या तीन महिन्यांत या युवकानं  ‘राजा शिव छत्रपती महाकाव्य’ (Raja Shiv Chhatrapati Mahakavya) रचलं आहे. अहमद मोहम्मद शेख (Ahmad Mohammed Shaikh) असं या मुस्लीम  शिवभक्ताचं नाव आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. या निमित्ताने ‘महाशिवकाव्य’ लिहून अहमद यांनी शिवरायांना आदरांजली अर्पित केली आहे. 

अहमद शेख हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील येळंब गावचे रहिवासी आहेत. ते सध्या पुणे इथं वास्तव्यास आहेत. पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया अॅक्टिव्हिटी रीसर्च अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. तर त्यांची पत्नी संगणक अभियंता आहे. त्यांनी लिहलेल्या राजा शिव छत्रपती महाकाव्यासंर्भात एबीपी माझाने त्यांची संपर्क साधला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा

छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप लिखाण उपलब्ध आहे. मात्र, काव्य स्वरुपात फार लिखाण कोणी केलेलं नाही. ‘राजा शिव छत्रपती महाकाव्य’ लिहण्यामागे छत्रपती शिवाजी महाराज यांचीचं प्रेरणा असल्याचे अहमद शेख म्हणाले. भूतो न भविष्यतो असा राजा कधी झाला नाही. रयतेच्या शेताची, रयतेच्या घरांची, नात्यांची तळागाळातील व्यक्तिची चिंता असणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजे होते असे अहमद शेख म्हणाले. कायम रयतेची काळजी करणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज. शेतकऱ्यांचा सारा माफ करणं, त्यांच्या शेतीसाठी पाणी मिळवून देण्याचं काम महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमक मोठा होता. हार्ट टू हार्ट कनेक्ट असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.  म्हणूनच स्वराज्य उभं राहिल्याचे अहमद शेख म्हणाले.

शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं विस्तारत गेलं याची माहिती

‘राजा शिव छत्रपती महाकाव्यात’ ज्या गोष्टीमुळं वाद होतील त्या गोष्टी टाळल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील प्रसंग लिहले आहेत. महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रसंगाची माहिती या महाकाव्यात दिल्याची माहिती अहमद शेख यांनी दिली.
शिवाजी महाराजांचे स्वराज्य कसं विस्तारत गेलं, याची माहिती काव्यस्वरुपात यामध्ये मांडली आहे. सिंहगडावरचा प्रताप, अफजलखानाचा प्रसंग, पुरंदरचा तह, आग्र्याचा प्रसंग, रायगडावरील, राजगडावरील प्रसंग, आरमार याबाबतची माहिती या काव्यात देण्यात आल्याचे शेख म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर केला जातो हे दुर्दैवी

दरम्यान, जो इथला मूळ मुस्लिम आहे, त्याला इथल्या मातीचा अभिमान आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराज वंदनिय असल्याची माहिती अहमद शेख यांनी दिली. मात्र, आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर केला जाते हे दुर्दैवी असल्याचे शेख म्हणाले. त्यामुळं कोणीही चुकीच्या वक्तव्यांना थारा देऊ नये असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाजार वाचले पाहिजेत. दर वेळेस आपल्याला महाराज वेगळे सापडतील. कधी ते कृषीप्रधान तर कधी प्रजापती तर कधी अधिपती वाटतील. महाराज हे सामान्यांचे राजे होते असे असे अहमद शेख म्हणाले.

तरुणांनी वाचलं पाहिजे

आजकालच्या तरुणांनी वाचलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचं महत्व कळणार नाही. छत्रपती शिवाजी माहाराजांचे कार्य आपल्याला माहित होणार नाही. युद्ध आणि धर्मासह छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक कामं केली असल्याचे अहमद शेख म्हणाले. वाचल्याने महाराज समजतील. लिहण्याचा प्रयत्न करा. मोबाईलपासून दूर राहा असा सल्लाही अहमद शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला.

साडेतीनशे पेक्षा जास्त कडवी

राजा शिव छत्रपती महाकाव्यामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त कडवी आहेत असल्याची माहिती अहमद शेख यांनी दिली. रविद्र घाटपांडे यांच्या स्नेहल प्रकाशनतर्फे (पुणे) या राजा शिव छत्रपती महाकाव्याचे प्रकाशन होणार आहे. हे काव्य लिहण्याची संकल्पना मुंबईचे मित्र यदुनाथ देशपांडे सुचवली होती असे अहमद शेख म्हणाले. पुढच्या महिनाभरात या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याचे शेख म्हणाले.  

महत्त्वाच्या बातम्या:

Sindhudurg News : भारतीय नौदल सिंधुदुर्ग किल्ल्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा



Source link

Aai Kuthe Kay Karte: शेखर दुसरं लग्न करणार, संजनाला बसला धक्का

0
Aai Kuthe Kay Karte: शेखर दुसरं लग्न करणार, संजनाला बसला धक्का


तेवढ्यात अभी तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की तो जे करत आहे ते योग्यच आहे. दरम्यान, अनिरुद्धने तूला आता तुझी किंमत कमी होत आहे हे पाहून वाईट वाटत असले. तू नेहमी तुझाच विचार केला आहे. ते ऐकून संजनाला राग येतो. ती रागाच्या भरात म्हणते, ‘शेखर कसाही असला तरी तो माझा आदर करायचा. माझ्या प्रत्येक गोष्टीत मला पाठिंबा द्यायचा. सतत माझा विचार करायचा. माझे त्याच्यावर अजूनही प्रेम आहे. तुझ्याशी लग्न करणे माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती आणि ती आज मी सगळ्यांसमोर मान्य करते.’



Source link

KBC 15: स्पर्धकाने २५ लाख रुपयांच्या प्रश्नाला सोडला खेळ, तुम्हाला उत्तर माहिती आहे का?

0
KBC 15: स्पर्धकाने २५ लाख रुपयांच्या प्रश्नाला सोडला खेळ, तुम्हाला उत्तर माहिती आहे का?


१२ लाख ५० हजार रुपयांसाठी अर्चनाला ‘अक्षय मुकुल यांनी लिहिलेली बायोग्राफी रायटर, रिबेल, सोल्जर, लव्हरचा विषय कोणत्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्याच्या आयुष्यावर आधारित आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी A.दिनकर B.अग्या C.फिरक आणि D. शरया हे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर B.अग्या असे आहे.



Source link

Jailer actor: ‘जेलर’मधील अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
Jailer actor: ‘जेलर’मधील अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन



G Marimuthu dies: तमिळल चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते जी. मरिमुथू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन



Source link