Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2753

Viral Video: माधुरी दीक्षितचा ‘लोन डान्स’ होतोय व्हायरल! तुम्ही पाहिलात का? व्हिडीओ बघाच…

0
Viral Video: माधुरी दीक्षितचा ‘लोन डान्स’ होतोय व्हायरल! तुम्ही पाहिलात का? व्हिडीओ बघाच…


‘मुथूट फायनान्स’ कंपनीसाठी माधुरी दीक्षित हिने हा डान्स व्हिडीओ चित्रित केला आहे. गोल्ड लोन, आणि इतर पर्सनल फायनान्स करणाऱ्या या कंपनीची जाहिरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही या फायनान्स कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली आहे. यानंतर तिने या कंपनीसाठी एक जाहिरात शूट केली आहे. यात तिने जाहिरातीच्या बोलांवर मनमोहक नृत्य केलं आहे. तिच्या या डान्सचं अनेकांनी कौतुक केलं आहे.



Source link

Pooja Bhatt: आलिया ही महेश भट्ट आणि तुझी मुलगी आहे?; पूजा भट्टने उत्तर देत व्यक्त केला संताप

0
Pooja Bhatt: आलिया ही महेश भट्ट आणि तुझी मुलगी आहे?; पूजा भट्टने उत्तर देत व्यक्त केला संताप


बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट कायमच चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वी तिने ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये तिने खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले. मात्र, बिग बॉस ओटीटीचे विजेतेपद पटकावण्यात पूजा भट्ट अपयशी ठरली. आता पूजाने एका मुलाखतीमध्ये होणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केले आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: ईशाने केला सगळ्यांसमोर अनिशशी बोलण्याचा हट्ट! काय होणार आजच्या भागात?

0
Aai Kuthe Kay Karte: ईशाने केला सगळ्यांसमोर अनिशशी बोलण्याचा हट्ट! काय होणार आजच्या भागात?



Aai Kuthe Kay Karte Serial Update: आता अनिश ईशाला माफ करणार का? किंवा अनिश तिला काय शिक्षा देणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आले आहेत.



Source link

Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडला? कारण आले समोर

0
Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडला? कारण आले समोर


विशाखा सुभेदारने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तिला ओळख मिळाली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच तिचे ‘कुर्रर्रर्रर्र’ हे नाटक देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.



Source link

Nava Gadi Nava Rajya: आनंदी जाणून घेणार पतीला फसवणाऱ्या योजनाची ‘योजना’! नंदू-वर्षाचीही मदत होणार

0
Nava Gadi Nava Rajya: आनंदी जाणून घेणार पतीला फसवणाऱ्या योजनाची ‘योजना’! नंदू-वर्षाचीही मदत होणार


सगळं काही सुरळीत सुरू असताना राघवच्या ऑफिसमध्ये योजना नावाची एक तरुणी नवीनच रुजू झाली होती. योजनाने नेहमीच राघवच्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान तिने अगदी त्याच्या घरी जाऊन संपूर्ण कुटुंबाची माहिती देखील घेतली होती. तर, दुसरीकडे राघवच्या मनात मात्र कोणताही किंतुपरंतु नव्हता. त्याने योजनाला अगदी आपल्या लहान बहिणीप्रमाणे मानले होते. त्याने नेहमीच त्याला मदत केली होती. मात्र, याचाच गैरफायदा योजनाने घेतला होता. योजनाने संधी साधून राघवसोबत ऑफिसमध्ये एकटीने थांबण्याचा प्लॅन केला. अशी संधी मिळताच तिने आपला प्लॅन पूर्ण करून, एक व्हिडीओ बनवला ज्यात तिने राघवने आपल्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप केला.



Source link

जिथं दोन समाजांनी बंधुभावाने पारायण सोहळा केला तिथेच दंगलीचा डाग; साताऱ्यात आतापर्यंत काय घडलं?

0


सातारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या आणि अखंड भारतात देदीप्यमान परंपरा असलेल्या साताऱ्यामध्ये जातीय दंगलीचा डाग लागला आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. यामध्ये एका तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. जातीय तणाव निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा सोशल मीडिया कारणीभूत ठरला आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. जिल्हा प्रशासनाकडून आज (13 सप्टेंबर) इंटरनेट बंदी करण्यात आली आहे. 

पुसेसावळीत एक महिन्यांपूर्वीच दोन समाजांनी एकत्र गुण्यागोविंदाने एकत्र पारायण सोहळा आयोजित केला होता. त्याच साताऱ्यामधील पुसेसावळीत दंगलीने भयकंप झाला आहे. गावातील जाळपोळ पाहून गावकरी सुद्धा मुळापासून हादरुन गेले आहेत. सातारा शहर आणि जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात इंटरनेट बंदी असल्याने बँकिंग व्यवहार तसेच अनेक कार्यालयांचे व्यवहार ठप्प आहेत. शाळा महाविद्यालय सुरू असली तरी पालकांनी आपल्या जबाबदारी वर विद्यार्थ्यांना सोडावे आणि आणावे असे आवाहन शाळांच्या वतीने देखील करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे. 

सर्वधर्मीयांकडून सातारमध्ये मूक मोर्चा 

दरम्यान, दंगलीचा डाग लागल्यानंतर जिल्ह्यामध्ये शांततेसाठी सर्वधर्मीयांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चामध्ये सर्व धर्मियांचे लोक सहभागी झाले. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण न करता सर्वांनी सामोपचाराने राहण्याचे आवाहन यावेळी सर्वधर्मियांकडून करण्यात आले.

पोलिसांकडून 23 जणांना अटक 

दरम्यान, पुसेसावळीमध्ये झालेल्या जातीय तणावानंतर सातारा पोलिसांकडून आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकऱणाचा तपास सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. सोशल मिडियावर पोस्ट करणाऱ्याला तरूणाही ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट  आणि दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मृत तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात 

दरम्यान, जातीय तणावात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचा मृतदेह 13 तासांनी नातेवाईकांनी ताब्यात घेतला. मुख्य सूत्रधाराला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना अटक केल्याचे सांगत अन्य आरोपींना सुद्धा अटक केली जाणार असल्याची ग्वाही दिल्यानंतर जमाव शांत झाला. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयासमोर तणावाची परिस्थिती होती. 

नेमका प्रसंग काय घडला?

औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी 10 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्टवर दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांकडे विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास जमलेल्या जमावाकडून दुचाकी व चार चाकी वाहने पेटवून देण्यात आली.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

OTT Releases: धमाल कॉमेडीचा डबल डोस; या आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार ‘हा’ मराठी चित्रपट!

0
OTT Releases: धमाल कॉमेडीचा डबल डोस; या आठवड्यात ओटीटीवर पाहायला मिळणार ‘हा’ मराठी चित्रपट!


एकीकडे मुली उच्च शिक्षण घेऊन पुढे जात आहेत. तर, दुसरीकडे काही मुलं मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष करून वाईट वळणावर जात आहेत. या वाईट वळणाने त्यांच्या आयुष्यालाही वाईट कलाटणी मिळते. नंतर पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काही उरत नाही. म्हणूनच मुलांना लग्नासाठी मुली मिळणं कठीण झालं आहे. हा गंभीर मुद्दा सर्वांपर्यंत पोहचावा याच उद्देशाने ‘बायको देता का बायको’ हा मराठी चित्रपटात हलक्या फुलक्या विनोदी ढंगात बनवण्यात आला आहे.



Source link

Tharla Tar Mag: प्रियाचा खोटेपणा अर्जुन सिद्ध करू शकेल का? आश्रमच्या केसला मिळणार नवं वळण

0
Tharla Tar Mag: प्रियाचा खोटेपणा अर्जुन सिद्ध करू शकेल का? आश्रमच्या केसला मिळणार नवं वळण


Tharla Tar Mag 12 September 2023: अर्जुन आश्रमाच्या केसचा छडा लावण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार आहे. यातून प्रियाचा खोटेपणा सगळ्यांसमोर येणार आहे.



Source link

Tuzech Mi Geet Gaat Aahe: ‘स्वराज’ मुलगा नव्हे मुलगी! मल्हारला कळेल का आपल्याला लेक असल्याचं सत्य?

0
Tuzech Mi Geet Gaat Aahe: ‘स्वराज’ मुलगा नव्हे मुलगी! मल्हारला कळेल का आपल्याला लेक असल्याचं सत्य?


Tuzech Mi Geet Gaat Aahe latest Episode 13 September 2023: स्वराजने आपली फसवणूक केली असे वाटून तो त्याच्यावर रागावून बसला आहे. मात्र, आता त्याच्या मनातील बाबा जागा होणार आहे.



Source link

बोगस बियाणे विरोधातील कायद्याबाबत सरकार मागवणार सूचना; संयुक्त समितीच्या बैठकीत निर्णय

0
बोगस बियाणे विरोधातील कायद्याबाबत सरकार मागवणार सूचना; संयुक्त समितीच्या बैठकीत निर्णय


मुंबई: बोगस व बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात विधेयक सादर करण्यात आलेलं आहे. दरम्यान संयुक्त समितीच्या विचारार्थ प्रलंबित असलेल्या याबाबतचे विविध विधेयकांच्याबाबतीत संयुक्त समितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्याबाबत शेतकरी, कृषी तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, निविष्ठा उत्पादक व विक्रेते तसेच संबंधित विविध घटकांकडून सुधारणा व सूचना मागवून घेण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत घेण्यात आला आहे. 

बोगस व बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अत्यावश्यक वस्तू कायदा 1955, बियाणे कायदा 1966, कीटकनाशके कायदा 1968 महाराष्ट्र विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 या 4 कायद्यांमध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयके सादर केली होती. तसेच अप्रमाणित व भेसळयुक्त निवेष्ठांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण विधेयक 2023 सुद्धा मांडले होते. विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहाने दिनांक 4 ऑगस्ट 2023रोजी सदरचे विधेयक दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या 25 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेतला होता. या संयुक्त समितीची बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. 

यावेळी समितीतील विविध सदस्यांनी विधेयकातील तरतुदीबद्दल आपले मत मांडले. तसेच विविध सुधारणा सुचवल्या. त्यावर समितीचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी, हा कायदा व्यापक जनमानसावर प्रभाव टाकणारा असल्याने विधेयकाच्या प्रारूपाची सूक्ष्म चिकित्सा झाली पाहिजे, असे मत मांडले. तसेच गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे, त्याचवेळी सर्वसामान्य शेतकरी आणि प्रामाणिक निवेष्ठा विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रसिद्धी माध्यमांत या प्रस्तावित कायद्यांचे प्रारूप प्रसिद्ध करून समाजातील सर्व घटकांकडून 30 दिवसांच्या आत सूचना मागून घेण्यात येतील. त्यानंतर त्यावर सखोल विचार करून समिती निर्णय घेईल, असे त्यांनी जाहीर केले.

बैठकीत यांची उपस्थिती…

या बैठकीस विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधान परिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदे, अमोल मिटकरी, रमेश कराड, कैलास पाटील, वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य प्रशांत बंब, संजय रायमुलकर, सुरेश वरपुडकर, कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

बोगस बियाणे, खते विकणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा



Source link