Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2752

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार; संपूर्ण यादी?

0
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार; संपूर्ण यादी?


17 September flag hoisting : रविवारी म्हणजे 17 सप्टेंबरला मराठवाड्यात मुक्तिसंग्राम दिनी साजरा केला जाणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम (Marathwada Liberation Day) दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यंदा मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव असल्याने औरंगाबादसह (Aurangabad) विभागात मोठ्या उत्साहात मुक्तिसंग्राम दिन (Liberation Day) साजरा केला जाणार आहे. दरम्यान, मुक्तिसंग्रामदिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते. मात्र, अजूनही अनेक मंत्र्यांकडे दोन जिल्ह्यांचा कारभार आहे. याच, पार्श्वभूमीवर ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय ध्वजारोहण मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते होणार आहे. 

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमातील मंत्र्यांची यादी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे. ज्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त हिंगोली शहरात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते होणार आहे. तर हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जालन्यातील शासकीय ध्वजारोहण होणार आहे. गिरीश महाजन नांदेड, धनंजय मुंडे बीड, संजय बनसोडे लातूर, अतुल सावे परभणी आणि तानाजी सावंत उस्मानाबाद येथे शासकीय ध्वजारोहण करतील.

प्रशासनाकडून जोरदार तयारी…

मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनानिमित्त औरंगाबादमध्ये 16 सप्टेंबरला मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर प्रशासनाकडून याची जोरदार तयारी करण्यात येत असून, मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक देखील पार पडली आहे. ज्यात, जिल्ह्यातील प्रकल्पासाठी आवश्यक निधीची मागणी, तसेच विविध विभागातील वेगवेगळ्या कामासाठीचे प्रस्ताव याबाबत आढावा पालकमंत्री भुमरे यांनी घेतले. जिल्ह्यातील शिक्षण विभागाअंतर्गत शाळा खोल्या बांधकाम, कृषी, रस्तेविकास, पर्यटन वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभाग यांच्यामार्फत ही काही प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या. शासकीय दंत महाविद्यालय, पर्यटन, पोलीस स्टेशनसाठी, पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी प्रस्ताव, महापालिकेचे, भूमिगत गटार योजना ,स्मशानभूमी, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शहरात 5 प्रवेशद्वाराचे निर्मिती याबाबत मागणी प्रस्ताव,  जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारण आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाच्या बळकटी करणासाठी, क्रीडा विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रिंगरोड उड्डाणपूल ,रस्ता अशा प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला.

इतर महत्वाच्या बातम्या: 

History : मराठवाडा मुक्तिसंग्राम, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस; 17 सप्टेंबर महत्वाच्या घटनांचा साक्षीदार



Source link

Bhushan Pradhan: महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटाची घोषणा! भूषण प्रधानसोबत झळकणार फरहान अख्तरची मेहुणी!

0
Bhushan Pradhan: महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटाची घोषणा! भूषण प्रधानसोबत झळकणार फरहान अख्तरची मेहुणी!


या आधी अभिनेता भूषण प्रधान याने अनुषा दांडेकर हिच्यासोबत देखील एक फोटो शेअर केला होता. या आगामी चित्रपटाच्या सेटवरून या दोघांनी आपले फोटो शेअर केले आहेत. अनुषा दांडेकर ही अभिनेता फरहान अख्तर याची पत्नी शिबानी दांडेकर हिची बहीण आहे. अनुषासोबत फोटो शेअर करताना भूषणने लिहिले की, ‘लाईट्स, कॅमेरा आणि जादू… या चित्रपटाची शूटिंग सुरू करताना खूप आनंद होतोय. माझ्या आवडत्या आणि प्रसिद्ध अशा दिग्दर्शकाच्या चित्रपटात अनुषा दांडेकरसोबत स्क्रीन शेअर करतोय.’



Source link

Virendra Pradhan: ‘म्हणून भीतीपोटी ती पोस्ट डिलीट केली’; मराठी दिग्दर्शकाला नेमकी कशाची वाटतेय चिंता?

0
Virendra Pradhan: ‘म्हणून भीतीपोटी ती पोस्ट डिलीट केली’; मराठी दिग्दर्शकाला नेमकी कशाची वाटतेय चिंता?


विरेंद्र प्रधान हे मराठी मनोरंजन विश्वातील मोठे नाव आहे. त्यांनी ‘यशोदा’, ‘उंच माझा झोका’ सारख्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘एका छान कलाकृतीची निर्मिती करताना काही निकष, जे आम्ही या क्षेत्रात २५,३० वर्षे काम केल्यानंतर, साधारण १ टक्का समज आल्यावर (हा एक टक्का माझ्या बद्दल आहे) समोर ठेवतो आणि कथा, पटकथा, संवाद, संगीत, काव्य, दिग्दर्शन, फोटोग्राफी, कला वगैरे वगैरेची मांडणी करतो. एक कथा तयार झाल्यावर आणि ती वाहिनीला आवडल्यावर त्यावर पटकथा तयार होत. पटकथा हाच टीव्हीचा आत्मा आहे. असे माझे मत आहे. आता ही पटकथा तयार झाली की, व्यक्तिरेखे नुसार कलाकार निवड होते. व्यक्तिरेखा म्हणजे काय? एखाद्या पात्राचा स्वभाव, रंगरूप, उंची, जाडी, चेहेरा, शारीरीक ठेवण, कपडे वगैरे वगैरे. थोडक्यात त्या व्यक्तिरेखेचे एक स्केच तयार केले जाते आणि मग त्या स्केचला मिळता जुळता चेहेरा, कलाकार म्हणून निवडला जातो. आता हे जे कलाकार आहेत त्याचे ही काही निकष, शास्त्र, अभ्यास असतो. अनुभव हा काम करुनच मिळतो. परंतु, बेसिक शास्त्र आणि प्रशिक्षण जसं इतर कुठल्याही क्षेत्रासाठी असतं, तसंच ते इकडे ही असतं. डॉक्टर, इंजिनिअर किंवा कुठे ही जसे निकष असतात, तसे ते कलाक्षत्रात ही असतात. पाळणे, न पाळणे हा पुन्हा वैयक्तिक चॉइस आहे. मी पाळतो, ९० टक्के तसा प्रयत्न नक्की करतो.’



Source link

IRCTC: आयआरसीटीसी बेवसाईटवरून आता एसटी बसचंही तिकीट बूक करता येणार!

0
IRCTC: आयआरसीटीसी बेवसाईटवरून आता एसटी बसचंही तिकीट बूक करता येणार!


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऑगस्ट महिन्यात आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्या करार झाला. आयआरसीटीच्या वापरकर्त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. या करारामुळे रेल्वे, बस, हवाई, जल वाहतूक यासोबत निवास व्यवस्थेसारख्या सर्व पैलूंचे नियोजन करण्यात यश येईल. लवकरच प्रवाशांना आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाईट https://www.bus.irctc.co.in वरून रेल्वेसह एसटीबसचेही तिकीट बूक करता येणार आहे.



Source link

Dharmendra Health Update: त्या सगळ्या अफवा?, सनी देओलने सांगितले धर्मेंद्र यांच्या आजारपणाविषयी सत्य

0
Dharmendra Health Update: त्या सगळ्या अफवा?, सनी देओलने सांगितले धर्मेंद्र यांच्या आजारपणाविषयी सत्य


टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची प्रकृती चांगली आहे. सनीने गदर २ला मिळालेल्या यशानंतर पालकांना अमेरिकेला फिरण्यासाठी पाठवले आहे. याबाबत जेव्हा भाजपाचे नेते गुरुदासपुर यांना कळाले तेव्हा त्यांनी राग व्यक्त केला. तसेच या अफवा असल्याचे सांगितले.



Source link

इस्त्रीचे शर्ट-पॅन्ट घालतोस आणि अक्षराशी असा का वागतोस? चाहत्याने अभिनेत्याला रस्त्यातच गाठलं!

0
इस्त्रीचे शर्ट-पॅन्ट घालतोस आणि अक्षराशी असा का वागतोस? चाहत्याने अभिनेत्याला रस्त्यातच गाठलं!


अक्षयने नुकताच एक भन्नाट अनुभव सांगितला आहे. मालिकेत काम करत असताना त्याला अनेक चाहते भेटत असतात. नुकतेच त्याला एक काका भेटले होते. त्यांनी अक्षयला विचारलं की, ‘येवढा चांगला राहतोस, इस्त्रीचे शर्ट पॅन्ट घालतो, भांग पाडून केस व्यवस्थित ठेवतो. पण, अक्षरा सोबत असा का वागतोस?’ चाहत्याचा हा प्रश्न ऐकून अक्षय आधी गोंधळून गेला होता. मात्र, नंतर त्याला हसू आले आणि काकांना समजावत सांगितले की, माझी भूमिकाच तशी आहे, त्याला मी काही करू शकत नाही. पण यावरून त्याला आपली भूमिका चाहत्यांना आवडत असल्याची पोचपावती मिळाली आहे.



Source link

Bollywood Nostalgia: आमिर खानमुळे दिव्या भारती ढसाढसा रडली; सलमान खान आला होता मदतीला धावून!

0
Bollywood Nostalgia: आमिर खानमुळे दिव्या भारती ढसाढसा रडली; सलमान खान आला होता मदतीला धावून!


मात्र, आमिरने नकार दिल्यानंतर दिव्या भारती बाथरूममध्ये जाऊन खूप रडली होती. परंतु, कार्यक्रमासाठी मानधन स्वीकारले असल्याने तिने स्वतःला सावरले. यानंतर ती पुढच्या कार्यक्रमासाठी सज्ज झाली. मात्र, आमिर खानने दिव्याची चूक लक्षात ठेवून पुढे तिला ‘डर’ या चित्रपटातून देखील बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र, नंतर आमिर खानलाच या चित्रपटातून हटवण्यात आले होते.



Source link

सातारा जिल्ह्यातील ‘त्या’ ६ जणांचे दहशतवादी संघटनांशी संबंध: कराडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा दावा | पुढारी

0









कराड : पुढारी वृत्तसेवा: सातारा जिल्ह्यातील कराडमधील अल्ताफ शिकलगार, साबीर मुल्ला, साताऱ्यातील सादिक शेख, रमजान कागदी, जमीर शेख या सहा जणांचे दहशतवादी संघटनांशी कनेक्शन असल्याचा संशय आहे. त्यांना त्वरित अटक करून सखोल चौकशी केल्यास काही महिन्यांपूर्वी पाटण तालुक्यातील जंगलामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोट चाचणीचे धागेदोरे समोर येतील, असा खळबळजनक दावा कराड तालुक्यातील सकल हिंदू समाज, हिंदू एकता आंदोलन समितीने आज (दि. १३) पत्रकार परिषदेत केला आहे.

कराडमधील शासकीय विश्रामगृहात कराडचे माजी नगरसेवक विनायक पावसकर, चंद्रकांत जिरंगे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे काकासाहेब जाधव, रुपेश मुळे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व सकल हिंदू समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
पुसेसावळी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंदू एकता आंदोलन समितीचे पदाधिकारी तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांना अटक करण्याची मागणी मागील दोन दिवसांपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विक्रम पावस्कर यांचा पुसेसावळीतील घटनेची काही संबंध नाही. जर विनाकारण विक्रम पावसकर यांच्यावर कारवाई झाली. तर संपूर्ण महाराष्ट्रातील सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

सातारा जिल्ह्यात कोणतीही घटना घडली, तरी ते सहा जण प्रत्येक वेळी पुढे असतात. राज्यातील वातावरण दूषित करून दंगल घडवण्याचा त्यांचा डाव आहे. बंदी घातलेल्या देशद्रोही संघटनांची त्यांचे लागेबंधे आहेत. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करावी. सकल हिंदू समाज कधीही देश विघातक कृत्य करत नाही. त्यामुळे आम्ही शांत आहोत, असेही या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा 











Source link

Pune Crime: पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा; ५ बांग्लादेशी महिलांची सुटका; सात जण ताब्यात

0
Pune Crime: पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा; ५ बांग्लादेशी महिलांची सुटका; सात जण ताब्यात


या पूर्वही अशीच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी १० ते १२ बांग्लादेशी नागरिकांना अटक अटक करण्यात आली होती. तर १९ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. आज करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी पोलिसांनी पारपत्र अधिनियम, तसेच परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमांन्वये फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केल्याप्रकरणी ३ दलालांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Bhausaheb Gajare: आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू – भाऊसाहेब गाजरे

0
Bhausaheb Gajare: आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू – भाऊसाहेब गाजरे


Maratha Reservation : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार आज संध्याकाळी मनोज जरांगे यांना भेटणार, जरांगे आज उपोषण सोडणार?



Source link