Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 274

मराठी चित्रपटांची प्रदर्शनासाठी झुंबड, मे महिन्यात १७ मराठी चित्रपट प्रदर्शन; एकाच दिवशी सहा चित्रपट

0
मराठी चित्रपटांची प्रदर्शनासाठी झुंबड, मे महिन्यात १७ मराठी चित्रपट प्रदर्शन; एकाच दिवशी सहा चित्रपट



17 Marathi films to be screened in May. Six films on a single day मराठी चित्रपटांची प्रदर्शनासाठी झुंबड, मे महिन्यात १७ मराठी चित्रपट प्रदर्शन; एकाच दिवशी सहा चित्रपट



Source link

साताऱ्यात ‘स्टिरॉइड इंजेक्शन’चा साठा जप्त

0
साताऱ्यात ‘स्टिरॉइड इंजेक्शन’चा साठा जप्त


सातारा : साताऱ्यात शनिवारी पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचा ‘स्टिरॉइड इंजेक्शन’चा साठा जप्त केला. शहरात अशा प्रकारची ‘इंजेक्शन’ आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.सातारा शहर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी राष्ट्रीय मल्ल शिवराज कणसे (शाहूनगर, सातारा) याला अटक केली होती. यानंतर साईकुमार महादेव बनसोडे (भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), सुदीप संजय मेंगळे (कोयना सोसायटी, सदर बझार, सातारा), अतुल विलास ठोंबरे (झेड. पी. कॉलनी, शाहूपुरी, सातारा), तय्यब हाफीस खान (बांगूरनगर, गोरेगाव, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तय्यब खान हा ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची विक्री साताऱ्यातील खेळाडूंना करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची व्याप्ती वाढत असल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. साताऱ्यात नशेसाठी इंजेक्शन वापरले जात असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून सातारा शहर पोलीस लक्ष ठेवून होते. बेकायदा ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची विक्री करणाऱ्या राष्ट्रीय मल्लाला अटक केल्यानंतर यामध्ये आणखी आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले. सातारा शहर पोलिसांनी मुंबईतून मुख्य सूत्रधाराला अटक केली. या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. तय्यब हाफीस खान (मालाड, मुंबई) असे पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे.

सातारा शहर पोलिसांनी चार दिवसांपूर्वी राष्ट्रीय मल्ल शिवराज कणसे (शाहूनगर, सातारा) याला अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर पोलिसांना ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ विक्री करणाऱ्यांची नावे समोर आली. यानंतर पोलिसांनी एका शिकाऊ डॉक्टरसह तिघांना अटक केली. या तिघांच्या चौकशीतून मुख्य आरोपीचे नाव पोलिसांनी निष्पन्न केले. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सोमवारी मुंबईला रवाना झाले होते. पोलिसांनी मालाड येथून तय्यब खान याला अटक करून साताऱ्यात आणले. रात्री उशिरा त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

हेही वाचा

तय्यब खान हा ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची विक्री साताऱ्यातील खेळाडूंना करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची व्याप्ती वाढत असल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि श्याम काळे, फौजदार डी एस देवकर आदी तपास करत आहेत.



Source link

MEA: ‘भारतीय लष्करला पूर्ण सूट, पाकिस्तानला परिस्थिती समजेना’, ड्रोन हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका

0
MEA: ‘भारतीय लष्करला पूर्ण सूट, पाकिस्तानला परिस्थिती समजेना’, ड्रोन हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका


MEA Press Conference on Pakistan Ceasefire: शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर काही तासातच पाकिस्तानने उल्लंघन केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मेस्री यांनी ही माहिती दिली आहे. लष्कराला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी आज संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये एक करार झाला. मात्र, गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून या कराराचे उल्लंघन केले जात आहे”. 

 

पुढे ते म्हणाले, “भारतीय सैन्य सीमेवरील या घुसखोरीला प्रत्युत्तर देत आहे आणि त्याचा सामना करत आहे. ही घुसखोरी अत्यंत निंदनीय आहे आणि त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. आम्हाला वाटतं की पाकिस्तानने ही परिस्थिती योग्यरित्या समजून घ्यावी आणि ही घुसखोरी थांबवण्यासाठी त्वरित योग्य ती कारवाई करावी.

याआधीही आज सकाळी पाकिस्तानने पुन्हा एकदा श्रीनगर, उधमपूर, आरएस पुरा, अखनूर, छंब, भिंबर गली, शोपियान, कुलगाम, अनंतनाग यासह अनेक भागात ड्रोन हल्ले केले. सैन्याने त्यांना हवेतच निष्क्रीय केलं. तसंच, या भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.

विविध ठिकाणी ड्रोन उडत असल्याचे वृत्त मिळाल्यानंतर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्तसर साहिब, फिरोजपूर, पठाणकोट, जैसलमेर आणि अंबाला येथे अनेक ठिकाणी पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला आहे.





Source link

Police collect fine of Rs 79 thousands ७९ हजाराचा दंड वसूल

0
Police collect fine of Rs 79 thousands ७९ हजाराचा दंड वसूल


कल्याण : कल्याण डोंबिवलीत गुरुवारी मध्यरात्री अचानक ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशावरून धरपकड मोहीम राबविण्यात आली. या दोन तासाच्या मोहिमे दरम्यान विविध प्रकारचे २५ गुन्हेगार पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. विविध रस्ते भागात नाकाबंदी करून २६६ वाहनांची तपासणी करून त्यामधील बेशिस्त ६६ वाहन चालकांकडून ७९ हजार रूपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.

कल्याण परिमंडलातील या धरपकड (कोम्बिंग ऑपरेशन) मोहिमेत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, ४७ वरिष्ठ पोलीस अधिकारी, २१० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. गुरुवारी रात्री अकरा वाजता या मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. रात्री एक वाजता ही मोहीम संपविण्यात आली.

कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात जाऊन पोलीस पथकांनी अचानक तपासणी करून कारवाया केल्या. तंबाखुजन्य प्रतिबंधित वस्तू विक्री करणाऱ्या २६ टपरी चालकांवर कारवाई करण्यात आली. अवैध धंदे चालविणाऱ्या नऊ जणांवर, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या ८८ जणांवर, सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ विक्री, सेवन करणाऱ्या १४ जणांवर कारवाई करण्यात आली. यामधील २५ जणांवर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा

विविध चाळी, झोपडपट्यांमध्ये छापे मारून तडीपार गुंड, पाहिजे आरोपी, खतरनाक गुंड यांचा शोध घेण्यात आला. कल्याण, डोंबिवली शहराच्या दहा मुख्य प्रवेशव्दारांवर नाकाबंदी करून २६६ वाहने तपासण्यात आली. यामधील अनेक वाहन चालकांनी मद्य प्राशन केल्याचे आढळले. काही जणांकडे वाहनाची कागदपत्रे नव्हती. काही जण सुसाट वेगाने वाहन चालवून जीवितास धोका निर्माण करत होते. अशा एकूण ६६ वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७९ हजाराचा दंड वसूल करण्यात आला, असे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले. या धरपकड मोहिमा यापुढे दर पंधरा दिवसांनी राबविण्याचे नियोजन आहे. शहरातील गुन्हेगारी, गैरधंदे संंपविण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.



Source link

social organization activists protested कार्यकर्त्यांचे आंदोलन

0
social organization activists protested कार्यकर्त्यांचे आंदोलन


ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर भागातील बेकायदा धाबे, हॉटेलचा मुद्दा उपस्थित होत असतानाच, येथे एका पार्टीदरम्यान २५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांच्यासह सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी येऊरच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, त्यांचा हॉटेल मालकांसोबत वाद झाले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिक्षेत्रात आदिवासी पाडे आहेत. या भागात आदिवासींच्या जमीनीवर बेकायदा हाॅटेल, ढाबे, बंगले बांधण्यात आले आहेत. तसेच याठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. रात्री उशीरापर्यंत या पार्ट्या सुरु असतात. त्याचबरोबर या भागात टर्फही बांधण्यात आले आहेत. दोन दिवसापुर्वी या ठिकाणी पार्टीसाठी गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मद्य पाजृून तिच्यावर दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली.

याच पार्श्वभूमीवर उद्यानातील प्रवेशद्वाराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा आव्हाड यांच्यासह सामाजिक संघटनेच्या कार्यकर्ते अजय जया तसेच इतरांनी शनिवारी रात्री आंदोलन केले. यावेळी त्यांनी फलक झळकविले. ‘वर्तक नगर पोलिस, महाराष्ट्र वन विभाग, ठाणे महापालिका यांचा निषेध’, ‘येऊर जंगलातील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर कारवाई कधी होणार?’, ‘महिलांवर होणारे अत्याचार थांबवा’, ‘आदिवासींवरील अत्याचार थांबवा’ असा संदेश फलकांवर होता. सायंकाळी सातनंतर उद्यान परिसरात प्रवेशबंदी असतानाही अनेकजण उद्यानात जात असल्याने त्यांनी उद्यानात जाणाऱ्यांना रोखले. यावरून काही हॉटेल मालकांसोबत त्यांचे वाद झाले.

हेही वाचा



Source link

पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया, MEA म्हणालं ‘समजून घ्या अन्यथा…’

0
पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया, MEA म्हणालं ‘समजून घ्या अन्यथा…’



MEA Press Conference on Pakistan Violation: पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदे खडेबोल सुनावले आहेत.
 



Source link

‘आम्ही पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने’; भारत-पाक तणावादरम्यान चीनचं मोठं विधान

0
‘आम्ही पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने’; भारत-पाक तणावादरम्यान चीनचं मोठं विधान


भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने एक नवीन विधान केले आहे. चीनने म्हटले आहे की आम्ही पूर्णपणे पाकिस्तानसोबत आहोत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा देश पाकिस्तानचे “सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य” राखण्यासाठी त्याच्यासोबत उभा राहील. परराष्ट्र कार्यालयाच्या निवेदनानुसार, चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधताना हे विधान केले.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चर्चेदरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना उदयोन्मुख प्रादेशिक परिस्थितीची माहिती दिली. आव्हानात्मक परिस्थितीत पाकिस्तानच्या संयम आणि जबाबदार वृत्तीचे वांग यी यांनी कौतुक केले. परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे की, पाकिस्तानचा धोरणात्मक सहकारी भागीदार आणि कट्टर मित्र म्हणून चीन पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे, प्रादेशिक अखंडतेचे आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी खंबीरपणे उभा राहील, याची त्यांनी पुष्टी केली.

याशिवाय, इशाक दार यांनी यूएईचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद यांच्याशीही चर्चा केली. त्यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्धबंदी कराराचे स्वागत केले. यासोबतच, डार यांनी तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांना या प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली.

ट्रम्प यांनी युद्धबंदीबद्दल बोलले 

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिहिले की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी एक सामान्य आणि समंजस निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो! या महत्त्वाच्या विषयावर लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद!”

भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांनी थेट प्रयत्न केल्याचे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. शनिवारी दुपारी पाकिस्तानच्या डीजीएमओने चर्चेला सुरुवात केली. यानंतर, चर्चा झाली आणि परस्पर समंजसपणा झाला. सध्या इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.

मार्को रुबियो यांनी दोन्ही देशांशीही केली चर्चा 

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो यांनी लिहिले की, “गेल्या ४८ तासांत, उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, लष्करप्रमुख असीम मुनीर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि असीम मलिक यांच्यासह वरिष्ठ भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी बोललो आहोत.” मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की,भारत आणि पाकिस्तान सरकारांनी तात्काळ युद्धबंदी करण्यास आणि तटस्थ ठिकाणी विविध मुद्द्यांवर वाटाघाटी सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.





Source link

A young man was murdered on the road दोन संशयित ताब्यात

0
A young man was murdered on the road दोन संशयित ताब्यात


परभणी : शहरातील जिंतूर रस्त्यावरील ठाकरे कमान परिसरात विशाल आर्वीकर (वय ३२) या तरुणाचा भर रस्त्यात चौघांनी धारदार शस्त्रांनी खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. ९) रात्री घडली. आज सकाळी शहरात या घटनेचे वृत्त सर्वत्र पसरले. या खून प्रकरणातील दोन संशयित आरोपींना नानल पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेमागील नेमके कारण काय या संदर्भात पोलिसांनी तपास चालवला आहे.

विशाल आर्वीकर हा तरुण शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जिंतूर रस्त्यावरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात आपल्या परिचितांशी बोलत थांबला होता. एवढ्यात तोंडाला कपडा बांधलेले चार जण मोटरसायकलवर तिथे आले. या सर्वांच्या हातात धारदार शस्त्रे होती. त्यांनी विशालवर धारदार शस्त्र आणि हातोड्याने सपासप वार करत त्याला जमिनीवर पाडले. विशाल खाली कोसळल्यानंतर चारही आरोपींनी आपापल्या मोटरसायकलवर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेचे वृत्त परिसरात कळाल्यानंतर त्या ठिकाणी आसपासच्या वसाहतींमधील नागरिकांचा जमाव गोळा झाला. विशाल आर्वीकर यास तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले. मात्र त्याच्यावरचा हल्ला प्राणघातक असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केले.

याप्रकरणी वर्षा गिराम यांच्या फिर्यादीवरून नानल पेठ पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विकी पाष्टे, गोविंद ऊर्फ गोपाल पाष्टे, शुभम पाष्टे, तुषार सावंत या चौघांविरुद्ध हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, काल रात्री घटनेनंतर पसार झालेल्या चौघांपैकी दोन संशयितांना पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक कामठेवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक खज्जे हे करीत आहेत.

हेही वाचा



Source link

maharashtra sahitya parishad in pune declares annual awards amol Palekar one of the recepients

0
maharashtra sahitya parishad in pune declares annual awards amol Palekar one of the recepients



maharashtra sahitya parishad in pune declares annual awards amol Palekar one of the recepients | अमोल पालेकर, मंगला सामंत, अजीम नवाज राही आदी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्कारांचे मानकरी



Source link

Boys Hostel Funny Poster photo Viral giving free wife facility with mess boys rushed for Hostel room booking

0
Boys Hostel Funny Poster photo Viral giving free wife facility with mess boys rushed for Hostel room booking



Boys Hostel Funny Poster photo Viral giving free wife facility with mess boys rushed for Hostel room booking | बॉईज हॉस्टेलबाहेर लावलेला ‘तो’ बॅनर पाहून मुलं पडली विचारात; PHOTO पाहून तुम्ही पोट धरून हसाल



Source link