Friday, August 21, 2026
Homeमनोरंजनसाताऱ्यात ‘स्टिरॉइड इंजेक्शन’चा साठा जप्त

साताऱ्यात ‘स्टिरॉइड इंजेक्शन’चा साठा जप्त

साताऱ्यात ‘स्टिरॉइड इंजेक्शन’चा साठा जप्त

[ad_1]

सातारा : साताऱ्यात शनिवारी पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचा ‘स्टिरॉइड इंजेक्शन’चा साठा जप्त केला. शहरात अशा प्रकारची ‘इंजेक्शन’ आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.सातारा शहर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी राष्ट्रीय मल्ल शिवराज कणसे (शाहूनगर, सातारा) याला अटक केली होती. यानंतर साईकुमार महादेव बनसोडे (भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), सुदीप संजय मेंगळे (कोयना सोसायटी, सदर बझार, सातारा), अतुल विलास ठोंबरे (झेड. पी. कॉलनी, शाहूपुरी, सातारा), तय्यब हाफीस खान (बांगूरनगर, गोरेगाव, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तय्यब खान हा ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची विक्री साताऱ्यातील खेळाडूंना करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची व्याप्ती वाढत असल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. साताऱ्यात नशेसाठी इंजेक्शन वापरले जात असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून सातारा शहर पोलीस लक्ष ठेवून होते. बेकायदा ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची विक्री करणाऱ्या राष्ट्रीय मल्लाला अटक केल्यानंतर यामध्ये आणखी आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले. सातारा शहर पोलिसांनी मुंबईतून मुख्य सूत्रधाराला अटक केली. या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. तय्यब हाफीस खान (मालाड, मुंबई) असे पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे.

सातारा शहर पोलिसांनी चार दिवसांपूर्वी राष्ट्रीय मल्ल शिवराज कणसे (शाहूनगर, सातारा) याला अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर पोलिसांना ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ विक्री करणाऱ्यांची नावे समोर आली. यानंतर पोलिसांनी एका शिकाऊ डॉक्टरसह तिघांना अटक केली. या तिघांच्या चौकशीतून मुख्य आरोपीचे नाव पोलिसांनी निष्पन्न केले. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सोमवारी मुंबईला रवाना झाले होते. पोलिसांनी मालाड येथून तय्यब खान याला अटक करून साताऱ्यात आणले. रात्री उशिरा त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

हेही वाचा

तय्यब खान हा ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची विक्री साताऱ्यातील खेळाडूंना करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ‘स्टिरॉइड इंजेक्शन’ची व्याप्ती वाढत असल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि श्याम काळे, फौजदार डी एस देवकर आदी तपास करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments