Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 269

भारतीयांच्या सुरक्षेसाठी आकाशात फिरत आहेत १० उपग्रह, २४ तास असते नजर – इस्रो प्रमुख

0
भारतीयांच्या सुरक्षेसाठी आकाशात फिरत आहेत  १० उपग्रह, २४ तास असते नजर – इस्रो प्रमुख


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी सांगितले की, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह २४ तास सतत देशावर लक्ष ठेवून आहेत. मणिपूरची राजधानी इम्फाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की, भारत ‘लिव्हिंग स्पेस पॉवर’ बनत आहे आणि २०४० पर्यंत देशातील पहिले अंतराळ स्थानक उभारण्यात येईल.



Source link

आम्ही चिनी क्षेपणास्त्रे पाडली, पाकिस्तान आमची डिफेन्स सिस्टम भेदू शकले नाही – IAF

0
आम्ही चिनी क्षेपणास्त्रे पाडली, पाकिस्तान आमची डिफेन्स सिस्टम भेदू शकले नाही – IAF


India Pakistan ceasefire: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीसंदर्भात लष्कराकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. हवाई दलाने सांगितले की, ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आम्ही केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केले. पाकिस्तानने केलेल्या कारवाईमुळे आम्हाला प्रत्युत्तर देणे भाग पडले. पाकिस्तानकडून चिनी क्षेपणास्त्रांनी आमच्यावर हल्ला केला, पण ते आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेत घुसण्यात अपयशी ठरले. आमच्या संरक्षण यंत्रणेने हवेतच ही क्षेपणास्त्रे नष्ट केली.



Source link

फलटणचा शकुनी मामा कधीच जिंकणार नाही, जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांना टोला

0


Jayakumar Gore on Ramraje Naik Nimbalkar : रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र  करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही. मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही, असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर यांच्यावर टीका केली. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये मार्डी गटाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली.

फलटणचा शकुनी जिंकणार नाही

जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांना शकुनी मामाची उपमा  दिली. रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही अशी जहरी टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे. यमाने जीआर काढला आहे, पोटाला यायचं बंद केलं आहे. स्मशानभूमीत जायच्या आधीच ते फेडल्याशिवाय त्याला स्मशानभूमीत घेऊन जाणार नाही असा जीआर यमाने काढला असल्याचे गोरे म्हणाले. 

मी बारामतीची तडजोड केली असती तर माझ्या आमदारकीचा त्रास कमी झाला असता

जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला त्यानंतर आमदार झालो संघर्ष केला. एकही वेळ अशी नाही की मी संघर्ष केला नाही. त्यामुळं परमेश्वराने सर्व गोष्टींवर मार्ग काढून दिला आहे. मान खटावच्या मातीचा सुपुत्र कधी झुकला नाही कधी वाकला नाही. मी बारामतीची तडजोड केली असती तर माझ्या आमदारकीचा त्रास कमी झाला असता. मी फलटणशी आणि साताऱ्याशी तडजोड केली असती तर राजकारणातील संघर्ष, त्रास कमी झाला असता. मात्र माण खटावच्या मातीला स्वाभिमानाने उभं करु शकलो नसतो. त्यांना पाणी देऊ शकलो नसतो असे गोरे म्हणाले. 

मला संपवता संपवता तेच घरी बसले

माझी बाजू सत्याची होती मी संघर्ष केला. सत्याचा आयुष्य जास्त असते. आजपर्यंतचा इतिहास आहे रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा कधीही जिंकला नाही. शकुनी मामा जिंकला नाही मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही. मला संपवता संपवता मी संपलो नाही मात्र त्यांना संपावे लागलं. त्यांना घरी बसावं लागलं. त्यामुळेच मी स्वाभिमानाने उभा असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. अनेकांना काळजी आहे, अनेकांनी केसमध्ये नाव आहे की नाही माहिती नसताना जामीन घेऊन ठेवले. त्यामुळं जयकुमार गोरे कधीही चुकीची कारवाई कोणावर करणार नाही. सत्ता असली किंवा नसेल तरी सुद्धा कोणाच्या वाळक्या पाचोळ्यावर पाय देणार नाही असेही गोरे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Jaykumar Gore : ‘जे कधी पाकिस्तानात घडले नाही ते त्यांनी इथे करून दाखवले’; मंत्री जयकुमार गोरेंची माळशिरसच्या सभेतून तूफान फटकेबाजी

 

अधिक पाहा..



Source link

‘आमचा लढा दहशतवादाविरोधात होता, पण पाकिस्तान लष्कराने….’, एअर मार्शल एके भारतींनी जगासमोर आणलं सत्य

0
‘आमचा लढा दहशतवादाविरोधात होता, पण पाकिस्तान लष्कराने….’, एअर मार्शल एके भारतींनी जगासमोर आणलं सत्य


MoD Press Conference: आमचा लढा दहशतादाविरोधात होता, पण पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना साथ देणं योग्य समजलं आणि या लढाईला आपली लढाई केली असं सांगत एअर मार्शल एके भारतींनी पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघड केला आहे. तिन्ही सैन्य दलाकडून पत्रकार परिषद घेत पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी प्रत्युत्तर कारवाई करणं गरजेचं होतं. जे नुकसान झालं त्यासाठी पाकिस्तानी लष्करच जबाबदार आहे असंही त्यांनी सांगितलं. 

भारतीय सैन्य दलाकडून पत्रकार परिषद घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात सध्या असणारी स्थिती आणि पाकिस्तानवर करण्यात आलेली माहिती देण्यात आली. यावेळी एअर मार्शल एक भारती यांनी सांगितलं की, “आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात आहे. यामुळे आम्ही दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला होता. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांची साथ देणं योग्य समजलं. यामुळे पाकिस्तानने ही लढाई आपली लढाई बनवली आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं”.

पुढे ते म्हणाले की, आम्ही दहशतवादाविरोधात कारवाई केली. भारताची सुरक्षा यंत्रणा भेदणं अशक्य आहे. पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या चिनी मिसाईल्सपण अपयशी ठरल्या आहेत. 

लेफ्टनंट जनरल राजीव घई य़ांनी यावेळी सांगितलं की, “आमच्या एअर डिफेन्स कारवाईला समजून घेण्याची गरज आहे. पहलगामपर्यंत यांचा पापाचा घडा भरला आहे. आम्ही आधीच तयारी केली होती आणि कारवाई करण्यात आली”.

लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, “ड्रोन आणि शस्त्रं नष्ट करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि उर्वरित ड्रोन पाडण्यात आले. मला बीएसएफचेही कौतुक करायचे आहे. गस्त घालणारे जवान आमच्या मोहीमेत सहभागी झाले आणि शौर्य दाखवत आम्हाला साथ दिली.यामुळे पाकिस्तानच्या नापाक कारवाया उद्ध्वस्त झाल्या”.

व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद म्हणाले, “हवाई क्षेत्रासह सतत देखरेख स्थिर करण्यासाठी नौदलाचा वापर करण्यात आला. नौदल एकाच वेळी हवाई, भूपृष्ठ आणि भूपृष्ठावरील धोके शोधण्यात सक्षम होते. नौदल सतत देखरेख सुनिश्चित करण्यास सक्षम होते. अनेक सेन्सर्स आणि इनपुटचा प्रभावीपणे वापर करून आम्ही सतत देखरेख ठेवत आहोत. म्हणूनच आम्ही या धोक्यांना निष्प्रभ करू शकलो. आम्ही जास्तीत जास्त रडारचा वापर केला आणि सर्व उडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं, मग ते ड्रोन असोत किंवा लढाऊ विमान असोत.”

“आमचे वैमानिक आमच्या विमानांमध्ये दिवसरात्र काम करण्यास सक्षम आहेत. आपल्या हद्दीपासून काही किलोमीटर अंतरावरही शत्रूच्या कोणत्याही विमानाला येऊ दिलं नाही. कोणतंही विमान शेकडो किलोमीटर आत येऊ शकत नाही. आम्ही आमच्या क्षेपणास्त्रविरोधी आणि विमानविरोधी तंत्रज्ञानाची पडताळणी केली. आमचे शक्तिशाली युद्ध गट निर्भयपणे काम करण्यास सक्षम होते. यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. त्यामुळे पाकिस्तानला सीमेजवळ राहण्यास भाग पाडलं गेलं,” असंही त्यांनी सांगितलं. 

भारतीय नौदलाच्या वर्चस्वामुळे हे स्पष्ट झाले की, जर आपल्याला हवे असेल तर आपण आपल्या इच्छेनुसार हल्ला करू शकतो असंही ते म्हणाले.  यानंतर एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, आमचे सर्व लष्करी तळ, उपकरणे आणि यंत्रणा कार्यरत आहेत आणि गरज पडल्यास कोणत्याही मोहिमेसाठी सज्ज आहेत.

विराट कोहलीचा उल्लेख

डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, “आपल्या एअरफील्ड्स आणि लॉजिस्टिक्सला लक्ष्य करणे खूप कठीण आहे. विराट कोहलीने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तो माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील सामन्यादरम्यान, दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेफ थॉमसन आणि डेनिस लिली यांनी इंग्लंडच्या फलंदाजीची लाइनअप उद्ध्वस्त केली. नंतर ऑस्ट्रेलियाने एक म्हण रचली होती की – “अॅशेस टू अॅशेस, डस्ट टू डस्ट, जर थॉमस नसेल तर लिली नक्कीच असेल.” जर तुम्ही लेअर पाहिल्या तर तुम्हाला मी काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे ते समजेल. जरी तुम्ही सर्व लेअर ओलांडल्या तरी या ग्रिड सिस्टमचा एक थर तुमच्यावर नक्कीच परिणाम करेल,”





Source link

फलटणमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त भव्य मूर्ती मिरवणूक; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

0
फलटणमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त भव्य मूर्ती मिरवणूक; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

फलटण (प्रतिनिधी) – सालाबादप्रमाणे यंदाही फलटणमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त भव्य मूर्ती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती २०२५ च्या वतीने १२ मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ येथून सुरू होणार आहे.

या मिरवणुकीचे उद्घाटन भारत सरकारचे सहआयुक्त आयु. तुषार शांताराम मोहिते (IRS) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आयु. अनिल आबाजी अहिवळे, सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. प्रसाद मधुकर काकडे,       सहाय्यक गटविकास अधिकारी आयु. शंकेश्वर हनुमंत अहिवळे मंडल अधिकारी आयु. योगेश अशोक धेडे, डॉ. श्रीनिशा अविनाश भोसले (मुक्ताई डेंटल क्लिनिक), माजी प्राचार्य आयु. सुधीर चिंतामण अहिवळे, फलटण वकील संघाचे सचिव ऍड. निलेश सर्जेराव भोसले, तसेच मुधोजी कॉलेजचे प्रा. डॉ. बाळासो शंकर कांबळे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला मा. नगरसेवक आयु. सचिन रमेश अहिवळे, सनी संजय अहिवळे व वैशाली सुधीर अहिवळे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.

बौद्ध उपासक-उपासिका यांच्या उपस्थितीत वंदना आणि पुष्पार्पण करून मिरवणुकीची सुरुवात करतील. या मिरवणुकीत डॉल्बी, बॅनर्स, फलक, पारंपरिक ढोल-ताशा तसेच विविध वेशभूषांमध्ये सहभागी झालेली तरुणाई लक्ष वेधून घेणार आहे. संपूर्ण मिरवणूक आकर्षक आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडणार असून बौद्ध अनुयायांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

शस्त्रविरामाच्या बाबतीत डीजीएमओंची भूमिका का आहे महत्त्वाची?

0
शस्त्रविरामाच्या बाबतीत डीजीएमओंची भूमिका का आहे महत्त्वाची?


जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं उत्तर भारतानं पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’मार्फत दिलं. या ऑपरेशनच्या अंतर्गत भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करीत १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारलं. दहशतवादी मारले गेल्यानंतर पाकिस्ताननं भारतावर ड्रोन हल्ले केले. दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत होता आणि त्याच पार्श्वभूमीवर ही युद्धाची चाहूल आहे की काय, असंही बोललं जात होतं. मात्र, शनिवारी संध्याकाळी दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) फोनवर चर्चा करीत शस्त्रविराम घोषित केला.

शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर डीजीएमओ हा शब्द खूप सर्च केला गेला. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर जितक्या पत्रकार परिषदा झाल्या, त्या सर्व भारतीय हवाई दलाच्या महिला अधिकाऱ्यांनी लीड केल्या. मात्र, यावेळी शस्त्रविरामाबाबत सविस्तर बोलताना डीजीएमओंनी पत्रकार परिषद का घेतली, असा प्रश्न पडला. डीजीएमओ म्हणजे नक्की कोण? त्यांचा सशस्त्र दलांतला वाटा किती महत्त्वाचा आहे? शस्त्रविरामात त्यांची भूमिका काय आणि ती का महत्त्वाची आहे अशा सगळ्या मुद्द्यांबाबतची माहिती पुढील लेखातून जाणून घेऊ…

डीजीएमओ म्हणजे काय?

भारतीय सेनेत डीजीएमओ म्हणजे (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) एक वरिष्ठ लेफ्टनंट जनरल रँकचा अधिकारी असतो. हे अधिकारी सेनेतील मोठ्या ऑपरेशन्सची योजना आखतात आणि त्याचा रिपोर्ट सेनाप्रमुखांना देतात. सध्या देशाचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई हे आहेत. देशात ज्यावेळी युद्ध परिस्थिती निर्माण होते त्यावेळी डीजीएमओंची भूमिका महत्त्वाची असते. ते सैन्याच्या कारवाईवर नजर ठेवतात. भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी फोनवर चर्चा करीत शस्त्रविरामाचा निर्णय घेतला. डीजीएमओंचं मुख्य कार्य युद्धाची रणनीती आखणं, सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणं व सैन्याच्या गुप्त माहितीची पडताळणी करणं, असं आहे. डीजीएमओंची निवड सैन्याचे प्रमुख आणि संरक्षण मंत्रालयाकडून केली जाते. त्यासाठी कोणतीही भरती किंवा परीक्षा होत नाही.

डीजीएमओंची भूमिका काय?

लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएमओ) हे लष्करी कारवायांचे निरीक्षण आणि समन्वय करण्यासाठी जबाबदार असलेले एक वरिष्ठ नेतृत्वाचे पद आहे. डीजीएमओ सशस्त्र दलांमधील सेना, नौदल, हवाई दल यांच्या संयुक्त कारवायांसाठी इतर एजन्सींमध्ये संपर्काचा प्रमुख स्रोत म्हणून काम करतात. ते ऑपरेशनल योजनांमध्ये गुप्तचर यंत्रणेशी समन्वय साधतात. भारतात डीजीएमओ शस्त्रविराम आणि सीमापार तणाव यांसह सीमासंबंधित संवेदनशील समस्यांचे व्यवस्थापन करतात.

डीजीएमओ प्रथम संपर्क का करतात?

दोन राष्ट्रांच्या डीजीएमओंमधील विशेषतः संघर्षग्रस्त देशांमध्ये अनेकदा प्रथम संपर्क स्थापित केले जातात. कारण- डीजीएमओ हे वरिष्ठ लष्करी अधिकारी असतात, जे लष्करी कारवायांशी थेट संबंधित ऑपरेशनल आणि धोरणात्मक समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी नियुक्त केले जातात.

त्यांची भूमिका त्यांना तणावपूर्ण वातावरण रोखणे, हेतू स्पष्ट करणे किंवा तत्काळ समस्या दूर करणे यांसाठी संवाद सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.

  • त्यांना त्यांच्या सैन्याच्या कारवायांचे प्रत्यक्ष ज्ञान असते. त्यामुळे ते शस्त्रविरामाचे उल्लंघन किंवा सीमेपलीकडच्या घटनांसारख्या गैरसमज किंवा उल्लंघन करणाऱ्या बाबींना दूर करण्यास सक्षम असतात.
  • वरिष्ठ अधिकारी (बहुतेकदा लेफ्टनंट जनरल किंवा त्यांच्या पदाइतके वरिष्ठ) म्हणून डीजीएमओंना फील्ड कमांडर्सना ऑपरेशनसंदर्भात निर्देश जारी करण्याचे अधिकार असतात.
  • भारत-पाकिस्तान संघर्षात डीजीएमओंकडे अनेकदा हॉटलाइन किंवा सीमेवरील तणाव व्यवस्थापित करण्यासाठी नियमित चर्चा करण्यासाठीच्या यंत्रणा उपलब्ध असतात.
  • डीजीएमओ लष्करी आणि ऑपरेशनल बाबींवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे त्यांना राजकीय किंवा राजनैतिक संवेदनशीलतेचा दबाव न येता सैन्याच्या हालचाली, तोफखाना गोळीबार यांसारख्या तांत्रिक समस्या सोडविता येतात.
  • डीजीएमओ पारंपरिकपणे लष्कर-ते-लष्करी संपर्क बिंदू म्हणून काम करतात. शांततेच्या काळातही नियमित डीजीएमओस्तरीय चर्चा संवादासाठी एक विश्वासार्ह पाऊल म्हणून महत्त्वाचे ठरते.
  • डीजीएमओ त्यांच्या संबंधित लष्करप्रमुखांना थेट अहवाल देतात आणि त्यांना उच्च सरकारी नेतृत्वापर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्यांना महत्त्वाची माहिती प्रसारित करण्यास किंवा जलद निर्णय घेण्यास मदत होते.



Source link

Ind – Pak शस्त्रसंधीनंतर देशातील ‘ती’ 32 विमानतळं पुन्हा सुरू; कधी आहे तुमचं फ्लाईट? आताच पाहा स्टेटस

0
Ind – Pak शस्त्रसंधीनंतर देशातील ‘ती’ 32 विमानतळं पुन्हा सुरू; कधी आहे तुमचं फ्लाईट? आताच पाहा स्टेटस


India-Pakistan Ceasefire Airports Latest Update : पहलगाममधील दहशतवादी हल्ला, त्यामागोमागच भारतीय लष्करानं दिलेलं या ह्ल्याचं उत्तर अर्थात ऑपरेशन सिंदूर. या संपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून उत्तर भारतातील जवळपास 32 विमानतळं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने जारी केला होता. ज्यानंतर 10 मे रोजी दोन्ही देशांमधील तणाव विकोपास केलेला असताना शस्त्रसंधी लागू होता युद्धविराम झाला आणि पुन्हा एकदा सीमाभागातील तणाव निवळू लागला. 

संकटांचं हे सावट कमी होत असल्याची चिन्हं असतानाच देशातील हवाई वाहतूक पूर्वपदावर आणण्याच्या हेतूनं भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सूचना जारी करत सर्व बंद विमानतळं तात्काळ प्रभावाने नागरी कामकाजासाठी खुली करणार असल्याचं जाहीर केलं. 

सर्व बंद विमानसेवा आजपासून सुरू 

सोमवार, 12 मे 2024 रोजी सकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तणावाच्या परिस्थितीमध्ये श्रीनगर, अमृतसर आणि इतर ३२ विमानतळ बंद करण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून होणारा हवाई हल्ल्यांचा प्रयत्न पाहता सावधगिरी म्हणून ही विमानतळं बंद करण्यात आली होती. आता मात्र सर्व विमान कंपन्यांनी विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये नियोजित प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, लेह, श्रीनगर यांसारख्या भागांमध्ये भारत पाकिस्तान तणावादरम्यान अडकलेल्या देशाच्या विविध राज्यातील प्रवाशांच्या परतीच्या प्रवासाचा मार्ग आता खऱ्या अर्थानं मोकळा झाला आहे. 

कोणत्या विमानतळांवरील नागरी वाहतूक पुन्हा सुरू? 

अधमपुर, अंबाला, अमृतसर, अवंतीपुर, बठिंडा, भुज, बीकानेर, चंडीगढ़, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपुर, कांडला, कांगड़ा (गग्गल), केशोद, किशनगढ़, कुल्लू मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नलिया, पठानकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हीरासर), सरसावा, शिमला, श्रीनगर, थोइस आणि उत्तरलाई ही विमानतळं पुन्हा एकदा कार्यान्वित होत आहेत. 





Source link

अभिनेत्री सोन्या अयोध्या हर्ष सर्मोरे घटस्फोट

0
अभिनेत्री सोन्या अयोध्या हर्ष सर्मोरे घटस्फोट



Sonyaa Ayoddhya reacts on Divorce : सोन्या अयोध्याचं घटस्फोटाबद्दल वक्तव्य : अभिनेत्री सोन्या अयोध्या हर्ष सर्मोरे घटस्फोट



Source link

वर्षभरात ‘या’ भारतीय बँकेने कमवला 70901 कोटींचा नफा! Top 5 बँकांच्या नफ्याचे आकडे पाहाच

0
वर्षभरात ‘या’ भारतीय बँकेने कमवला 70901 कोटींचा नफा! Top 5 बँकांच्या नफ्याचे आकडे पाहाच


Top 5 Earning Banks In India: बुडीत कर्जाचे प्रमाण (एनपीए) कमी झाल्याने तसेच व्यवहारांमध्ये वाढ झाल्याने देशातील सर्व 12 सरकारी बँकांनी वर्षभरात विक्रमी कमाई केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी विक्रमी 1 लाख 79 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा 27 टक्क्यांनी अधिक आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या 12 बँकांना 1 लाख 41 कोटी रुपये इतका नफा झाला होता. विशेष म्हणजे घसघशीत कमाई करणाऱ्या या 12 बँकांपैकी अर्ध्या म्हणजेच सहा बँका अशा आहेत, ज्यांनी वर्षभरात 10 हजार कोटींपेक्षा अधिक फायदा कमावला आहे. 

या बँकेला 101 टक्के नफा

सर्वाधिक कमाई करणाऱ्या बँकांच्या यादीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया पहिल्या स्थानी आहे. एसबीआयने सर्वाधिक म्हणजेच 70 हजार 901 कोटी रुपये नफा कमवला आहे. त्या खालोखाल बँक ऑफ बडोदाचा क्रमांक लागतो. बीओआयने 19 हजार 581 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. युनियन बँकने आर्थिक वर्षात 17 हजार 978 कोटी रुपये कमावले आहेत. 17 कोटी 540 लाख रुपयांच्या कमाईसहीत युनियन बँक सर्वाधिक कमाई करणाऱ्या बँकाच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या नफा सर्वाधिक 101 टक्क्यांनी वाढून 16 हजार 630 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सर्वाधिक नफा वाढलेल्या बँकांच्या यादीत 78 टक्के वाढीसहीत सेंट्रल बँक दुसऱ्या आणि पंजाब अँड सिंध बैंक 71 टक्क्यांच्या वाढीसहीत तिसऱ्या स्थानी आहे. 

शुद्ध बुडीत कर्जाचे प्रमाण​ 0.70 टक्क्यांपेक्षा कमी 

बँकांचा शुद्ध एनपीए 0.70 टक्क्यांपेक्षा कमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेचा एनपीए 0.96 टक्क्यांपेक्षा कमी आहे. सर्वात कमी 0.18 टक्क्यांपेक्षा कमी एनपीए बँक ऑफ महाराष्ट्रचा आहे. 

‘4 आर’ धोरणामुळे  घट 

बँकांची स्थिती सुधारणे, एनपीए कमी करण्यासाठी सरकारने ‘4 आर’ धोरण राबवले. यात रिकॅपिटलायझेसन (पुनर्भाडवलीकरण) म्हणजे बँकांमध्ये भांडवल ओतणे, रिकग्निशन (ओळख पटवणे) म्हणजे अडचणीतील कर्जाची ओळख, रिझोल्युशन (निकालात काढणे) म्हणजे वाईट कर्जाचे निराकरण आणि रिफॉर्म (सुधारणा) म्हणजे बँकिंग प्रणालीत सुधारणा यांचा समावेश होता. या धोरणांमुळे बँकांचे एनपीए कमी झाले. बुडीत कर्जाची समस्या आटोक्यात आली. 

चौथ्या तिमाहीत 48,451 कोटी रुपयांचा नफा 

चौथी तिमाही म्हणजेच जानेवारी-मार्च दरम्यान बँकांचा फायदा 48,451 कोटी रुपये इतका होता. 2023-24 याच समान तिमाहीत बँकांचा नफा 428476 कोटी इतका होता. यात एकट्या एसबीआयच्या नफ्याचा वाटा 18643 कोटी इतका आहे. 

सर्वाधिक कमाई कुणाची? 

स्टेट बँक ऑफ इंडिया  70 हजार 901 कोटी रुपये
बँक ऑफ बडोदा  19 हजार 581 कोटी रुपये
युनियन बँक  17 हजार 978 कोटी रुपये
कॅनरा बँक  17 कोटी 540 लाख रुपये 
पंजाब नॅशनल बँक  16 हजार 630 कोटी रुपये 

एसबीआयचा नफा 10 टक्के घटला

तिमाही आधारावर सर्व बँकांचा नफा वाढला, परंतु एसबीआयचा 10 टक्के घटला आहे. सर्वाधिक फायदा कमावण्यात 124 टक्क्यांसह पंजाब अँड सिंध बँक आघाडीवर आहे. बँक ऑफ इंडियाचा नफा 82.3 टक्के, पंजाब नॅशनल बँक 52 टक्के, कॅनरा 28 टक्के, इंडियन बँक 32 टक्के आणि इंडियन ओव्हरसीज बँक 30 टक्के नफा वाढलेला आहे. 





Source link

कुणकेश्वर मंदिरातील हापूस आंब्याची आकर्षक आरास

0
कुणकेश्वर मंदिरातील हापूस आंब्याची आकर्षक आरास


सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीभोवती आणि नंदीला प्रसिद्ध देवगड हापूस आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. सध्या कोकणात आंब्याचा हंगाम असून, देवगडमधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी हजारो हापूस आंबे श्री क्षेत्र कुणकेश्वर चरणी अर्पण केले आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. अनेक पर्यटक देवगडमधील कुणकेश्वर मंदिराला भेट देत आहेत. मंदिरातील भगवान शंकराच्या पिंडीभोवती केलेली हापूस आंब्यांची आकर्षक आरास पाहून पर्यटकांना प्रसन्न वाटत आहे. तसेच, या हापूसची चव घेण्याचा मोह देखील त्यांना आवरवत नाही.

हापूस आंब्यावर वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील बदलांमुळे देवगड हापूसच्या अर्थकारणावर परिणाम होत आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढावे आणि हापूसचे महत्त्व टिकून राहावे, यासाठी श्री क्षेत्र कुणकेश्वर चरणी हापूस अर्पण केले आहेत. कुणकेश्वर मंदिरातील ही आगळीवेगळी आरास पर्यटकांना एक वेगळा अनुभव देत आहे, ज्यामुळे मंदिराच्या भेटीची उत्सुकता आणखी वाढत आहे.



Source link