Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 268

वाल्हेकरवाडीत चाकूने भोसकून अल्पवयीन मुलीचा खून

0
वाल्हेकरवाडीत चाकूने भोसकून अल्पवयीन मुलीचा खून



पिंपरी: दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी घरासमोर थांबलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करून तिचा खून केल्याची घटना वाल्हेकरवाडी येथे घडली. आर्थिक कारणावरून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

उदयभान बन्सी यादव (वय ४२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिषेक रणविजय यादव (वय २१, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुलीच्या मामाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी ही आई व भावासोबत राहत होती.

रविवारी रात्री आठच्या सुमारास मुलगी घराबाहेर थांबली होती. या वेळी दुचाकीवर आलेल्या उदयभान व अभिषेक यांनी तिच्यावर चाकूने वार केले. गळा, पाठ आणि हातावर वार केल्याने मुलगी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. मुलीला सुरुवातीला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच ती मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही आरोपींना अटक केली. आर्थिक कारणावरून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.‘खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आरोपींकडे सखोल चौकशी केल्यानंतर खुनामागील कारणाचा उलगडा होईल,’ असे सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी सांगितले.



Source link

कोट्यावधी रुपयांची घरे पण, पाण्याचा तुटवडा, पाणी टंचाईच्या समस्येने घोडबंदरवासिय हैराण

0
कोट्यावधी रुपयांची घरे पण, पाण्याचा तुटवडा, पाणी टंचाईच्या समस्येने घोडबंदरवासिय हैराण



houses worth crores shortage of water. Ghodbunder residents are worried about water scarcity कोट्यावधी रुपयांची घरे पण, पाण्याचा तुटवडा, पाणी टंचाईच्या समस्येने घोडबंदरवासिय हैराण





Source link

भारताचं ‘पाकिस्तानभेदी’ आकाश क्षेपणास्त्र, ज्याने पाकला दाखवली जागा

0
भारताचं ‘पाकिस्तानभेदी’ आकाश क्षेपणास्त्र, ज्याने पाकला दाखवली जागा


ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास : ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केलेत. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या आकाश क्षेपणास्त्राने पाकिस्तानचे मिसाईल उद्ध्वस्त करत पाकचे हल्ले परतवून लावले.. याच आकाश क्षेपणास्त्रासंदर्भात जाणून घेऊया सविस्तर.. 

ऑपरेशन सिंदुरमध्ये भारताने पाकमधील 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केलाय.. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर अयशस्वी प्रयत्न केले. मात्र हे सगळे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडले.. यामध्ये मोलाची कामगिरी बजावली ती भारताच्या आकाश क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या फतेह – 1 या क्षेपणास्त्रासोबतच आकाशने पाकच्या अनेक क्षेपणास्त्रांची हवेतल्या हवेतच चिंधड्या उडवल्या. 

पाकिस्तानकडून आलेली ही अस्त्र हवेतच संपवण्यात आकाश एअर डिफेन्स सिस्टिमने महत्त्वाची भूमिका बजावलीय.. आणि पाकचे मनसुबे उधळून लावलेत.. आकाश ही भारताची स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र प्रणाली आहे.. 

भारताचं ‘पाकिस्तानभेदी’ आकाश 

– आकाश ही भारताची स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र प्रणाली
– जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली
– DRDO कडून आकाश एअर डिफेन्स सिस्टिम विकसित 
– भारतीय सैन्य आणि एअर फोर्समध्ये 2014 साली तैनात 

भारतीय लष्कराच्या ताफ्यातील आकाश संरक्षण प्रणाली ही पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र आमि ड्रोन्सचा कर्दनकाळ ठरलीय.

भारताचं  ‘पाकिस्तानभेदी’ आकाश 
काय आहेत आकाशची वैशिष्ट्य? 

– रेंज 
 45-70 किमी

– लक्ष्य 
 फाइटर जेट्स, ड्रोन, क्रूज मिसाईल आणि बॅलेस्टिक मिसाईल

– मार्गदर्शन 
डिजिटल ऑटोपायलटसह कमांड 

– स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता
60 किलोग्राम उच्च-स्फोटकं

– तैनाती 
 मोबाईल लॉन्चर, टँक आणि ट्रकवर तैनात

– अचूकता 
 90 ते 100 टक्के 

दरम्यान भारतीय बनावटीच्या आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची 3 व्हेरियंट भारताने विकसीत केलेत.

– पहिलं आकाश MK – 
 रेंज 
30 किलोमीटर

दूसरं आकाश MK 2
  रेंज 
40 किलोमीटर

तिसरं आकाश NG 
रेंज 
80 किलोमीटर

भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीने पाकिस्तान्यांच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सची राख करत भारत मातेचं संरक्षण केलं आहे. त्यामुळे पाकड्यांना भारताच्या सामर्थ्यांची उंची समजायला मदत मिळालीय.. यापुढेही कधी पाकिस्तानने भारताकडे वाकड्य़ा नजरेनं पाहण्याची हिम्मत केली तर त्यांना जशास तसं उत्तर द्यायला आकाश सज्ज आहे.





Source link

रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाविरोधात गुन्हा, प्रवाशाला मारहाण, पत्नीशी असभ्य व्यवहार

0
रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाविरोधात गुन्हा, प्रवाशाला मारहाण, पत्नीशी असभ्य व्यवहार



Crime against Railway Protection Force jawan. Beating up passenger, misbehaving with wife रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाविरोधात गुन्हा, प्रवाशाला मारहाण, पत्नीशी असभ्य व्यवहार





Source link

पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, पाकिस्तानला म्हणाले ‘ऑपरेशन सिंदूर फक्त..’

0
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, पाकिस्तानला म्हणाले ‘ऑपरेशन सिंदूर फक्त..’


PM Narendra Modi on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर न्यायाची प्रतिज्ञा आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज देशाला संबोधित केलं. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं असून, यानंतर दोन्ही देशात तणाव आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. ऑपरेशन सिंदूर फक्त नाव नाही, तर देशातील कोटी कोटी लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे असंही मोदी म्हणाले आहेत. 

“गेल्या काही दिवसात संपूर्ण जगाने देशाचं सामर्थ्य आणि संयम पाहिला आहे. मी सर्वात आधी भारताच्या सशस्त्र दलांचं. गुप्तटर यंत्रणा, वैज्ञानिक यांना प्रत्येक भारतीयाच्या वतीने सलाम करतो. आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशून सिंदूरमध्ये शूर कामगिरी केली. मी त्यांची वीरता, साहस, पराक्रमाला आज समर्पित करतो. आल्या देशातील प्रत्येक आई, बहीण आणि प्रत्येक मुलीला हा पराक्रम समर्पित करतो,” असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

“22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे कृत्य केलं, त्याने देश आणि जगाला बेचैन केलं होतं. सुट्टी साजरी कऱणाऱ्या निर्दोषांना धर्म विचारुन त्यांच्या कुटुंबीयांसमोर, मुलांच्या समोर निर्दयीपणे मारुन टाकलं. हा दहशतवादाचा विभत्स चेहरा आहे. ही क्रूरता होती. देशाची सद्भावना तोडण्याचा प्रयत्नही होता. माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या फार मोठं दु:ख होतं. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, समाज, वर्ग, राजकीय परक्ष एका सूरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी उभा राहिला,” असंही नरेंद्र मोदींनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, “आम्ही दहशतवाद्यांना मातीत मिसळण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट दिली होती. आज प्रत्येक दहशतवादी, दहशतावादी संघटनेला आमच्या बहिणी, मुलींचा कपळावरुन सिंदूर हटवण्याचा काय परिणाम असतो हे समजलं आहे. ऑपरेशन सिंदूर फक्त नाव नाही, तर देशातील कोटी कोटी लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची प्रतिज्ञा आहे”. 

“6 मेच्या रात्री आणि 7 मेच्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला सत्यात उतरताना पाहिलं. भारतीय सैन्याने पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या ठिकाणांना, प्रशिक्षण केंद्रावर प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की, भारत इतका मोठा निर्णय घेईल. पण जेव्हा देश एकत्र येतो, देश पहिला या भावनेने भरलेला असतो, राष्ट्र सर्वपरी असतं तेव्हा असे निर्णय घेतले जातात. परिणाम दाखवले जातात. जेव्हा पाकिस्तानने दहशतवादी ठिकाणांवर भारताने हल्ला केला तेव्हा दहशतवादी संघटनांची इमारतीच नाही, तर धैर्यही कोसळलं आहे. बहावलपूर आणि मुरीदसारखी दहशतवादी ठिकाणं एकाप्रकारे जागतिक दहशतवादाची युनिव्हर्सिटी राहिली आहे. जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत त्या सगळ्याचं कनेक्शन यांच्याशी जोडलं आहे,” असंही त्यांनी म्हटलं.

पुढे ते म्हणाले. “भारताच्या या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केलं आहे. त्यांचे अनेक आका खुलेआम पाकिस्तानात फिरत होते. जे भारताविरोधात षडयंत्र रचत होते. त्यांना भारताने एका झटक्यात संपवंल आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेत आहे. पाकिस्तान घाबरला आहे. आणि त्याचमुळे त्यांनी आणखी एक प्रयत्न केला. भारताच्या कारवाईचं समर्थन करण्याऐवजी भारतावरच हल्ला करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने शाळा, कॉलेज, गुरुद्वारा, मंदिरं, सामन्यांची घरं यांना लक्ष्य केलं. पाकिस्तानने आपल्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तानचचा बुरखा फाटला. जगाने पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल भारतासमोर कशाप्रकारे कोसळली हे पाहिलं. भारताच्या एअर डिफेन्सने आकाशतच त्यांनी नष्ट केलं. पाकिस्तानची सीमेवर वार करण्याची तयारी होती, पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला”

आम्ही पाकिस्तानच्या दशतवादी आणि सैन्य ठिकाणांवर आमच्या प्रत्युत्तर कारवाईला फक्त स्थगित केलं आहे. आगामी दिवसात पाकिस्तान काय भूमिका घेत यावर सगळं अवलंबून असेल. आपली तिन्ही दलं, बीएसएफ सतत अलर्टवर आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवादाविरोधीताल भारताची कारवाई आहे असंही मोदींनी सांगितलं आहे. 





Source link

पंचवटी कारंजावरील वाड्याचे आगीत नुकसान

0
पंचवटी कारंजावरील वाड्याचे आगीत नुकसान


नाशिक – पंचवटी कारंजा येथील माधवजी चिवडा दुकानावर असलेल्या डॉ. जोशी यांच्या वाड्याला सोमवारी दुपारी आग लागली. आगीत जीवितहानी झाली नसली तरी वाड्यातील वस्तू खाक झाल्या.

पंचवटी कारंजा परिसरातील डॉ. जोशी यांच्या वाड्यात माधवजी चिवडा हे दुकान आहे. काही अंतरावर पंचवटी पोलीस चौकी आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वाड्यात अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. पंचवटी अग्निशमन दलाचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने वाड्यातील रवींद्र कापुरे (५४), शीतल कापुरे (४३), दीपक कापुरे (१३), साई कापुरे (नऊ) आणि काजल कापुरे (११) यांना बाहेर काढण्यात आले.

माजी नगरसेवक उल्हास धनवटे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी, किशोर ढगे यांसह इतरांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली. प्राथमिक तपासात आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. आगीत वाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.





Source link

मोठी बातमी : रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार, ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच टीव्हीवर

0
मोठी बातमी : रात्री ८ वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार, ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच टीव्हीवर


Modi Address the Nation : भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि आता शस्त्रसंधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच थेट देशवासियांना संबोधित करणार आहेत. यापूर्वी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये २६ निरपराध लोकांच्या निर्घृण हत्येनंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. यापूर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्याबरोबरच पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. एकापाठोपाठ एक बैठका आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून पंतप्रधान मोदी आता देशवासियांना संबोधित करणार आहेत.



Source link

ब्रिटिशांपासून लपवलेली शस्त्रं दशकांनी सापडली, महाबळेश्वरच्या विहिरीत ‘इतिहास’ गवसला, शिवकालीन

0


Satara: महाबळेश्वरच्या एका विहिरीत ब्रिटिशांच्या नजरेत येऊ नये म्हणून लपवलेली काही ऐतिहासिक पुरातन शस्त्रे सापडली आहेत. महाबळेश्वरच्या एका कोरड्या विहिरीत पुरातत्त्व खात्याला इतिहास गवसलाय. मराठा झोप या पद्धतीच्या या दुर्मिळ तलवारी अतिशय महत्त्वाच्या आहेत. इंडियन आर्म्स ऍक्टनंतर ब्रिटिशांनी अनेक शस्त्रे जप्त करून टाकली. त्यातली शिवकालीन धाटणीची शस्त्रे असल्याचे सांगितलं जात आहे. या शस्त्रांमध्ये मराठा धूप प्रकारच्या तलवारीची मूठ, इतर पुरातन वस्तु सापडले आहेत.  

मराठा युद्धनीती व शस्त्रांच्या अभ्यासात धूप तलवारी या उत्कृष्ट पोलाद दर्जासाठी प्रसिद्ध होत्या. त्यामुळे या तलवारींसाठी फ्रेंच पोर्तुगीज या देशातील बनावटीचे पाते वापरत असल्यामुळे या तलवारींना फिरंगी देखील म्हटले जात असत. या तलवारीमध्ये धूप आणि वक्र असे दोन उपप्रकार आहेत. 3 मे 2025 रोजी महाबळेश्वर येथील ऐतिहासिक व पुरातन वस्तूंचा अभ्यास करताना इतिहास अभ्यासक मयुरेश मोरे व स्थानिक जाणकार राहुल कदम यांना या वस्तू निदर्शनास आल्या.

विशिष्ट पद्धतीनं बनवल्या गेलेल्या दूर्मिळ तलवारी

शत्रूंला भोसकण्यासाठी वक्र आणि धोप प्रकारच्या तलवारींचा वापर केला जात.वक्र आणि धोप या तलवारी घोडदळासाठी वापरल्या जात असत. त्याची लांबी 4 फूट असत. या फिरंगी पात्यांना मराठ्यांनी युद्धामध्ये जास्त काळ टिकण्यासाठी व हाताला इजा हाऊ नये अशा प्रकारे या तलवारींची मूठ बनवली जत असे. या तलवारींचा समतोल बॅलन्स उत्तम असल्यामुळे या तलवारी अभ्यासासाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याची माहिती मयुरेश मोरे यांनी दिली. दरम्यान, महाबळेश्वरमध्ये या तलवारी सापडल्यानंतर स्थानिकांनी व अभ्यासकांनी ही माहिती गावातील प्रमुख व्यक्तींना दिली. त्यानंतर उपविभागिय अधिकारी तसेच तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, तसेच साताऱ्याचे युवा ट्रेकर्स जयवंत बिरामणे आणि संपूर्ण टीमने या ऐतिहासिक वस्तू विहिरीतून बाहेर काढल्या.

मराठा काळातील धोप पद्धतीच्या तलवारी ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत दुर्मीळ आणि मौल्यवान मानल्या जातात. इंग्रजांनी भारतीय शस्त्रास्त्र कायदा लागू केल्यानंतर अनेक पारंपरिक शस्त्रे ताब्यात घेऊन नष्ट केली. मात्र काही शस्त्रं अशा कारवायांमधून वाचली आणि तीच आज ऐतिहासिक ठेव्याचे रूप घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध ‘जगदंबा’ आणि ‘भवानी’ या तलवारींसारख्या प्रकारात धोप तलवारी मोडतात. मराठा सैनिकी रणनीती आणि शस्त्रास्त्रांचा अभ्यास करून अशा तलवारी घडवल्या गेल्या. 

हेही वाचा:

राज्यातील वातावरण बदललं! ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं, हवामान विभागाचा अंदाज काय?

 

अधिक पाहा..



Source link

“यामागे काहीतरी गूढ…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर सलील कुलकर्णींनी उपस्थित केले प्रश्न; म्हणाले, “खूप वाईट वाटतंय…”

0
“यामागे काहीतरी गूढ…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर सलील कुलकर्णींनी उपस्थित केले प्रश्न; म्हणाले, “खूप वाईट वाटतंय…”



marathi singer saleel kulkarni reaction on virat kohli test cricket retirement “यामागे काहीतरी गूढ…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर सलील कुलकर्णींनी उपस्थित केले प्रश्न; म्हणाले, “खूप वाईट वाटतंय…”





Source link

काळू धरणाचे काम पुन्हा रखडणार, भूसंपादनाची अधिसूचना रद्द, पुन्हा प्रक्रिया सुरू होणार

0
काळू धरणाचे काम पुन्हा रखडणार, भूसंपादनाची अधिसूचना रद्द, पुन्हा प्रक्रिया सुरू होणार



Kalu Dam work to be stalled again, land acquisition notification cancelled, process to start again काळू धरणाचे काम पुन्हा रखडणार, भूसंपादनाची अधिसूचना रद्द, पुन्हा प्रक्रिया सुरू होणार





Source link