Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 267

अंदमानमध्ये मोसमी पावसाचे आगमन…

0
अंदमानमध्ये मोसमी पावसाचे आगमन…



मुंबई : अंदमानच्या समुद्रात मंगळवारी मोसमी पाऊस (नैऋत्य मोसमी वारे) दाखल झाला. यंदा मोसमी पाऊस आठ ते दहा दिवस आधीच अंदमानमध्ये दाखल झाल्याने केरळमध्ये तो २५ ते २७ मे, तर तळकोकणात २ जूनपर्यंत येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरवर्षी अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे २२ ते २४ मे दरम्यान आगमन होते, तर केरळमध्ये मोसमी पाऊस १ ते ३ जून रोजी दाखल होतो. मात्र यंदा नैऋत्य मोसमी वारे अंदमानातच आठ ते दहा दिवस आधी येऊन धडकले. ते आता वेगाने पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकत आहेत.

नैऋत्य मोसमी वारे मंगळवारी बंगालच्या उपसागराच्या काही भागात, दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागात, निकोबार बेटांवर आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. पुढील दोन – तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती राहील. याचबरोबर पुढील दोन दिवसांत दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांवर, मालदीव आणि कोमोरिन भागात, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागांवर, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांवर, अंदमान समुद्राच्या उर्वरित भागांवर आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती.

यंदा सर्वात लवकर

गेल्या सात वर्षांच्या तुलनेत यंदा दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांत सर्वात लवकर नैऋत्य मोसमी वारे दाखल झाले आहेत.

मोसमी पाऊस २७ मे रोजी केरळमध्ये !

यंदा केरळमध्ये २७ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तवला. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यतः १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आधी किंवा नंतर पावसाचे आगमन होऊ शकते (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान). यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो.

मोसमी पावसाचे वेळापत्रक काय ?

भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्षांनुवर्षांची निरीक्षणे, संकेत यानुसार मोसमी पाऊस दाखल होण्याच्या तारखा निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार मोसमी पाऊस सर्वप्रथम २० मेच्या सुमारास अंदमान निकोबार बेटांवर दाखल होतो. नैर्ऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये तो १० जूनला पोहोचतो. मात्र दरवर्षी तो या ठरावीक तारखेलाच येतो, असे नाही.



Source link

शरीरातून आत्मा बाहेर पडताना पाहायचं होतं, तरुणानं संपूर्ण कुटूंबाला संपवलं; कोर्टाने सुनावला फैसला

0
शरीरातून आत्मा बाहेर पडताना पाहायचं होतं, तरुणानं संपूर्ण कुटूंबाला संपवलं; कोर्टाने सुनावला फैसला


केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे २०१७ मध्ये एका तरुणाने आई-वडील, बहीण आणि मावशीची हत्या केली होती. कॅडेल जिसन राजा नावाच्या व्यक्तीने आपण मानसिक आजारी असल्याचा दावा केला होता. कुटुंबाबद्दलचा राग आणि व्हिडिओ गेम आणि ऑनलाइन कंटेंटच्या प्रभावामुळे त्याने हे भयानक कृत्य केल्याचे सांगत कोर्टाने आरोपी कॅडेल जिसनला दोषी ठरवले. डॅरेस कॅडेल इंजिनीअरिंग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला. मात्र, घरच्यांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांना अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वीच परतावे लागले. कुटुंबात राहूनही तो एकाकीपणाचा बळी ठरला होता. त्याचबरोबर त्याला व्हिडिओ गेम्स आणि इंटरनेटचे व्यसन जडले होते. यामुळे त्याच्या मनात हिंसक विचार आले आणि त्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले.



Source link

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे ३ दहशतवादी ठार

0
जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे ३ दहशतवादी ठार


जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलआणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर लष्कराने प्रत्युत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी संबंध आहे की नाही याची पुष्टी अद्याप झालेली नाही.



Source link

SSC Result 2025: राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के; यंदाही पोरींचीच बाजी, कोकण विभाग अव्वल तर नागपूर तळाला

0
SSC Result 2025: राज्याचा दहावीचा निकाल  ९४.१०  टक्के; यंदाही पोरींचीच बाजी, कोकण विभाग अव्वल तर नागपूर तळाला


यंदा दहावीच्या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यातील १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.



Source link

Trending News Live Updates: नवरीची एण्ट्री होताच डीजेवाल्याने लावले चुकीचे गाणे; ‘हा’ VIDEO पाहून हाॅटेल बुक करताना विचार कराल १०० वेळा, पाहा आजचे Viral Video 

0
Trending News Live Updates: नवरीची एण्ट्री होताच डीजेवाल्याने लावले चुकीचे गाणे; ‘हा’ VIDEO पाहून हाॅटेल बुक करताना विचार कराल १०० वेळा, पाहा आजचे Viral Video 



Today’s Viral News Live Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.



Source link

न्या. गवईंचा प्रवास अमरावती ते दिल्ली व्हाया नागपूर!

0
न्या. गवईंचा प्रवास अमरावती ते दिल्ली व्हाया नागपूर!


नागपूर : न्या. भूषण रामकृष्ण गवई १४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. २००७ मध्ये सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारी न्या. के. जी. बालाकृष्णन यांच्यानंतर न्या. गवई ही दुसरी दलित व्यक्ती ठरणार आहेत. न्या. गवई यांचा प्रवास अमरावतीच्या गल्लीतून सुरू झाला आणि पुढे ते नागपूरमार्गे दिल्लीपर्यंत पोहोचले.

न्या. गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावतीमध्ये झाला. त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी होते. त्यांनी अमरावतीचे खासदारपद व पुढे बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपालपद भूषवले. भूषण गवई तीन भावंडांपैकी ज्येष्ठ होते. वडील राजकारण, समाजकारणात सक्रिय असल्याने बालपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याचा वारसा लाभला.

वडील सातत्याने कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे संगोपन आई कमला गवई यांनी केले. कमलाताई न्या. गवई यांच्या बालपणाची आठवण सांगतात, घरातील ज्येष्ठ मुलगा असल्याने तो लहान वयातच परिपक्व झाला. १९७१ मध्ये झालेल्या भारत-बांगलादेश युद्धादरम्यान अमरावतीच्या फ्रेजारपुरा भागात सैनिकांसाठी भूषण भाकरी बनवायला मदत करत होता. ‘मेरे बच्चे तो मुकद्दर का सिकंदर बनना ही चाहिये ना’, अशा अभिमानास्पद शैलीत त्यांनी मुलाचे कौतुक केले.

हेही वाचा

उच्च न्यायालयातील आठवणी…

●बी.कॉम.ची पदवी प्राप्त केल्यावर गवई यांनी विधि अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. १९८५ साली वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी वकिली सुरू केली. काही काळ मुंबई येथे काम केल्यावर त्यांनी नागपूरकडे मोर्चा वळवला.

●उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरुवातीला अतिरिक्त सहायक वकील म्हणून आणि नंतर मुख्य सरकारी वकील म्हणून कार्य केले. स्वत:च्या मर्जीने सरकारी वकिलांचा चमू निवडणार या अटीवर त्यांनी मुख्य सरकारी वकिलाचे पद स्वीकारले.

●सध्या उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत न्या. भारती डांगरे आणि न्या. अनिल किलोर याच चमूतील सदस्य होते. त्या काळातील एक आठवण ताजी करताना न्या. किलोर सांगतात की, एकदा राज्याच्या मुख्य सचिवांनी गवई यांच्या चमूतील एका वकिलाला काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र गवई यांनी चमूतील सदस्याची बाजू घेतली आणि त्याला काढायचे असेल तर आधी मला काढा, अशा शब्दात ठणकावले.

●नागपूर खंडपीठात सध्या प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून कार्यरत न्या. नितीन सांबरे म्हणाले, गवई हे सामान्य नागरिकांची संवेदना समजणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना सामान्य माणसांच्या समस्या कळतात. गवई यांना एकदा घर विकत घ्यायचे होते. यासाठी त्यांनी स्वत:ची चारचाकी विकली आणि सुमारे वर्षभर आपल्या दुचाकीने न्यायालयात आले.





Source link

केंद्राची आंतरजातीय विवाह योजना बंद

0
केंद्राची आंतरजातीय विवाह योजना बंद


नागपूर : जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मांत समानता यावी, या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना अचानक बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने २०१४-१५ पासून ही योजना सुरू होती. परंतु, कुठलेही कारण न देता ही योजना बंद करण्यात आली. विशेष म्हणजे, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना योजना बंद झाल्याचे थेट पत्रच दिले जात आहे.

केंद्र सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास २ लाख ५० हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जात होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय विवाहित दाम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीची असणे आवश्यक होते. विवाहाच्या एक वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे व राज्याच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या संकेतस्थळावर आजही ही योजना सुरू असल्याचे दर्शवले जाते. परंतु, पात्र अर्जदारांना समाज कल्याण विभागाकडून पत्र पाठवून ही योजना बंद झाल्याचे कळवण्यात आले आहे. तसेच सामाजिक न्याय आयुक्तालयानेही सर्व जिल्ह्यांच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना ही योजना बंद झाल्याचे पत्र पाठवले आहे.

‘आंतरजातीय’चे प्रमाण ५ टक्के

जात, धर्माच्या भिंती भेदून विवाह करण्याचे प्रमाण आजही कमी आहे. अनेक संस्थांच्या अहवालानुसार, भारतात हे प्रमाण केवळ ५ टक्के इतके आहे.





Source link

हरिजन सेवक संघांच्या राज्य अध्यक्षपदी मोहन जोशी

0
हरिजन सेवक संघांच्या राज्य अध्यक्षपदी मोहन जोशी


मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या ‘हरिजन सेवक संघा’च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर कुमार संन्याल यांनी जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतिगृहे आणि शाळा चालविल्या जातात. ग्रामीण भागात गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, अभ्यासिका चालविल्या जातात.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसाराचे कार्य हरिजन सेवा संघातर्फे करण्यात येते, त्याचा विस्तार आगामी काळात केला जाईल, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर सांगितले. हरिजन सेवक संघाच्या स्थापनेला यंदा ९३ वर्षे झाली आहेत. याआधी गांधीवादी नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांनी हे महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्षपद होते.





Source link

सिंधुदुर्गातील २५ गावे ‘पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील’ का?

0
सिंधुदुर्गातील २५ गावे ‘पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील’ का?



sindhudurg district sawantwadi dodamarg taluka 25 villages environmentally sensitive विश्लेषण : सिंधुदुर्गातील २५ गावे ‘पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील’ का?





Source link

अन्वयार्थ : झुंडीचा ‘हल्ला’!

0
अन्वयार्थ : झुंडीचा ‘हल्ला’!



युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा अंतिम उपाय नसतो. त्यामुळे युद्धाची वेळ आलीच तर त्याला मुत्सद्देगिरीची जोड देत कुठे थांबायचे, कितपत ताणायचे यावर विचार करून निर्णय घ्यावा लागतो. सरकार कोणतेही असो, त्याचा प्राधान्यक्रम असाच असतो. गेल्या दहा वर्षांपासून देशभर सुळसुळाट झालेल्या नव-राष्ट्रवाद्यांना हे कदाचित ठाऊक नसावे. म्हणूनच त्यांनी शस्त्रसंधी जाहीर होताच काहीही कारण नसताना देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना लक्ष्य केले. त्यांचा दोष काय तर, कर्तव्य म्हणून हा निर्णय त्यांनी जाहीर केला. या मोठ्या निर्णयाशी अतिउच्चपदस्थ सत्ताधारी नेत्यांचाही संबंध असणारच आणि मिस्री केवळ तो जाहीर करण्याचे काम करताहेत, हा विचार अतिउत्साही भक्तमंडळींनी केला नाही. मिस्रींना, त्यांच्या मुलीला वाईट भाषेत ‘ट्रोल’ करण्याचे प्रमाण रविवारी इतके वाढले की अखेर मिस्रींना त्यांचे ‘एक्स’वरील खाते ‘पोस्ट प्रोटेक्ट’ करावे लागले. मूळचे काश्मिरी असलेले मिस्री हे परराष्ट्र सेवेतील अतिशय उमदे व निष्कलंक अधिकारी म्हणून ओळखले जातात. तणावाच्या चार दिवसांत त्यांनी माध्यमांसमोर सरकारची बाजू संयत व प्रभावीपणे मांडली. विचारीजनांच्या वर्तुळात त्यासाठी त्यांचे कौतुक होत असताना जल्पकांनी त्यांना लक्ष्य करून आपला ‘खरा’ चेहरा दाखवून दिला.

मुळात या टोळांची निर्मिती सत्ताधाऱ्यांकडून झाली ती विरोधकांवर आभासी धाडी टाकण्यासाठी. मागचा पुढचा कसलाही विचार न करता तुटून पडायचे एवढेच त्यांना ठाऊक. सारासार विचार करणारा मेंदू गहाण ठेवत ‘वरून’ आलेल्या आदेशाचा आपापल्या कुवतीने अर्थ लावायचा नि सुरू व्हायचे, हेच त्यांचे काम. कमालीचा धार्मिक द्वेष यांच्यात ठासून भरवला गेलेला. पक्षपुरस्कृत ‘उच्छादा’मुळे आपण म्हणू तेच अंतिम सत्य अशी यांची भावना झालेली. हे असे जल्पक आपल्यावरच उलटू शकतात याची जाणीव या निमित्ताने सत्ताधाऱ्यांना झालेली बरी. युद्धातून मिळणारे तत्कालिक यश संपूर्ण देशात राष्ट्रभक्तीची भावना चेतवण्यासाठी कामी येत असले तरी याचे दीर्घकालीन परिणाम हे विकासात बाधा निर्माण करणारे असतात याची जाणीव कदाचित या जल्पकांना नसावी. कुठलाही जहाल विचार हा युद्धाची खुमखुमी जागवणारा असतो. त्यातून तयार होणारी वीरश्री एकदा अंगात संचारली की संपूर्ण जगाला अक्कल शिकवण्याचा मक्ता आपल्याकडेच अशी भावना तयार होते. त्यामुळे या जल्पकांनी मिस्रींना त्रास दिलाच पण परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनाही ‘ट्रोल’ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. अमेरिकन नागरिक असलेल्या त्यांच्या मुलाला या वादात नाहक ओढले गेले तर पॅलेस्टाइनवर अभ्यास करणाऱ्या व त्यावर आधारित एक लेख ‘द वायर’मध्ये लिहिणाऱ्या मिस्रींच्या मुलीवरसुद्धा आरोपाचे शिंतोडे उडवले गेले. याआधी याच जल्पकांनी पहलगामच्या हल्ल्यात पती गमावणाऱ्या हिमांशी नरवालवरही असाच असभ्य भाषेचा मारा केला होता. तिचा दोष एवढाच की तिने या हत्याकांडाकडे धार्मिक दृष्टिकोनातून बघू नका असे जाहीर आवाहन केले होते.

केंद्र सरकारने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्याचा निर्णय सामूहिक जबाबदारीतून घेतला होता. यासाठी विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले होते. या निर्णयाची माहिती देण्याचे काम परराष्ट्र खात्याचे सचिव म्हणून मिस्रींनी केले असेल तर नंतर झालेल्या शस्त्रविरामासाठी नेमके तेच दोषी कसे, हा साधा प्रश्न ज्या जल्पकांना पडत नाही, त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच! लष्करी कारवाई सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस लष्करासोबतच मोदी सरकारचे गुणगान गाणारे हे उचापती लोक माघारीसाठी मोदींना जबाबदार धरण्याची हिंमत दाखवू शकले नाहीत. असा पेचप्रसंग जेव्हा असल्या अविचारी लोकांसमोर उभा ठाकतो तेव्हा ते संताप व्यक्त करण्यासाठी नेहमी ‘सॉफ्ट टार्गेट’ निवडतात. त्यामुळेच मिस्री या झुंडीच्या रोषाचे बळी ठरले. अशा झुंडी तयार करणे सोपे. मात्र त्यांना हाताळणे किती कठीण असते याचा परिचय अलीकडे वारंवार सत्ताधाऱ्यांना येऊ लागला आहे. अयोध्येचा मुद्दा मार्गी लागल्यावर कायम उन्मादी अवस्थेत जगणाऱ्या या जल्पकांनी नंतर प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर सरसंघचालक मोहन भागवतांनीच शोध थांबवा असे आवाहन केले. तरी अजूनही या उचापतखोरांची शोधमोहीम पूर्णपणे थांबलेली नाही. पाकिस्तानविरुद्ध केलेली कारवाई ही धार्मिक उन्मादाला जन्म देणारी ठरू शकते एवढेच या जल्पकांना ठाऊक आहे. हाच उन्माद प्रत्येक निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी कामात येतो याच भूमिकेत हे लोक वावरत असतात. पाकिस्तानला बेचिराख करून टाका ही भाषा येते ती यातून. असे करून निवडणुकीत यश संपादन करता येईल पण सरकार चालवण्याचे काय? त्या पातळीवर हा उन्माद कामाचा नसतो. तिथे कामी येतो तो मुत्सद्दीपणा. त्याचे दर्शन सरकारने या निर्णयातून घडवले. पण या जल्पकांना हे कोण समजावून सांगणार?



Source link