Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रअंदमानमध्ये मोसमी पावसाचे आगमन…

अंदमानमध्ये मोसमी पावसाचे आगमन…

अंदमानमध्ये मोसमी पावसाचे आगमन…

[ad_1]

मुंबई : अंदमानच्या समुद्रात मंगळवारी मोसमी पाऊस (नैऋत्य मोसमी वारे) दाखल झाला. यंदा मोसमी पाऊस आठ ते दहा दिवस आधीच अंदमानमध्ये दाखल झाल्याने केरळमध्ये तो २५ ते २७ मे, तर तळकोकणात २ जूनपर्यंत येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरवर्षी अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे २२ ते २४ मे दरम्यान आगमन होते, तर केरळमध्ये मोसमी पाऊस १ ते ३ जून रोजी दाखल होतो. मात्र यंदा नैऋत्य मोसमी वारे अंदमानातच आठ ते दहा दिवस आधी येऊन धडकले. ते आता वेगाने पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकत आहेत.

नैऋत्य मोसमी वारे मंगळवारी बंगालच्या उपसागराच्या काही भागात, दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागात, निकोबार बेटांवर आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. पुढील दोन – तीन दिवसांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती राहील. याचबरोबर पुढील दोन दिवसांत दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांवर, मालदीव आणि कोमोरिन भागात, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागांवर, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांवर, अंदमान समुद्राच्या उर्वरित भागांवर आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी १९ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी धडक दिली होती.

यंदा सर्वात लवकर

गेल्या सात वर्षांच्या तुलनेत यंदा दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांत सर्वात लवकर नैऋत्य मोसमी वारे दाखल झाले आहेत.

मोसमी पाऊस २७ मे रोजी केरळमध्ये !

यंदा केरळमध्ये २७ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तवला. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यतः १ जूनच्या आसपास दाखल होतो. भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत तारखेनुसार म्हणजेच १ जूनपूर्वी पाच दिवस आधी किंवा नंतर पावसाचे आगमन होऊ शकते (म्हणजे २७ मे ते ५ जूनदरम्यान). यानंतर पाऊस हळूहळू देशभर पसरतो.

मोसमी पावसाचे वेळापत्रक काय ?

भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्षांनुवर्षांची निरीक्षणे, संकेत यानुसार मोसमी पाऊस दाखल होण्याच्या तारखा निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार मोसमी पाऊस सर्वप्रथम २० मेच्या सुमारास अंदमान निकोबार बेटांवर दाखल होतो. नैर्ऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये तो १० जूनला पोहोचतो. मात्र दरवर्षी तो या ठरावीक तारखेलाच येतो, असे नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments