Monday, July 13, 2026
Home Blog Page 260

DRDO ची कमाल.. समुद्राचे खारट पाणी गोडे बनवण्याचे तंत्रज्ञान ८ महिन्यात केले विकसित

0
DRDO ची कमाल.. समुद्राचे खारट पाणी गोडे बनवण्याचे तंत्रज्ञान ८ महिन्यात केले विकसित


‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दिशेने मोठे यश मिळवत डीआरडीओने अशी कामगिरी केली आहे जी देशाच्या किनारपट्टी भाग आणि संरक्षण क्षेत्र या दोन्हींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. डीआरडीओच्या कानपूर येथील प्रयोगशाळेने केवळ ८ महिन्यांत नॅनोपोरस मल्टीलेयर्ड पॉलिमर मेम्ब्रेन तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे समुद्राच्या क्षारयुक्त पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रूपांतर करू शकते. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांसाठी हे तंत्रज्ञान खास डिझाइन करण्यात आले आहे.



Source link

गुढीपाडव्याच्या ऐतिहासिक दिवशी स्त्रीसमानतेचा निर्णय घेणारे मालोजीराजे – त्यांच्या विचारांचा वारसा तात्यासाहेब कोरे यांच्यात दिसतो : श्रीमंत रामराजे

0
गुढीपाडव्याच्या ऐतिहासिक दिवशी स्त्रीसमानतेचा निर्णय घेणारे मालोजीराजे – त्यांच्या विचारांचा वारसा तात्यासाहेब कोरे यांच्यात दिसतो : श्रीमंत रामराजे

फलटण (प्रतिनिधी) :गुढीपाडव्याच्या ऐतिहासिक शुभमुहूर्तावर सन १९१७ साली श्रीमंत मालोजीराजे फलटण संस्थांच्या गादीवर अधिपती म्हणून विराजमान झाले आणि त्यांनी घेतलेला स्त्रियांना समान संधी देण्याचा निर्णय हा भारतीय संस्थानांच्या इतिहासातील पहिला ठरला. अशा क्रांतिकारी विचारांचे व्रत घेऊन समाजहितासाठी झटणाऱ्या मालोजीराजेंच्या कार्याचा उल्लेख करत, “स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्यात मालोजीराजेंचा विचार स्पष्टपणे दिसतो,” असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

स्वर्गीय तात्यासाहेब कोरे (सावकार) यांना प्रथम मरणोत्तर श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार डॉ. विनय कोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष व पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेचे शिरीष देशपांडे, माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे, युवराज श्रीमंत अनिकेतराजे, श्रीमंत विश्वजीतराजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रामराजे पुढे म्हणाले, “तात्यासाहेब कोरे यांचे विचार व कार्य समाजोन्मुख होते. त्यांनी सत्तेपासून दूर राहून सहकाराच्या माध्यमातून वारणा खोऱ्यात सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्रांती घडवली. त्यांचे कार्य पुढील पिढीने जाणावे म्हणून त्यांच्यावर आधारित माहितीची पुस्तके आमच्या संस्थेला द्यावीत, अशी विनंती मी विनय कोरे यांना करतो.”

विनायक कोरे यांनी सांगितले, “फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे केवळ राजकारणात नव्हे तर समाजकारणात अग्रस्थानी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुटुंब व जाधव घराण्याशी त्यांचे पिढ्यानपिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. रामराजे यांनी माझ्या मतदारसंघातील जलप्रश्न सोडवण्यासाठी भरीव भूमिका घेतली. कृष्णा खोरे महामंडळाची फलटणसाठी घोषणा देखील त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शक्य झाली.”

या वेळी स्मृती पुरस्काराची ५१ हजार रुपयांची देणगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सुपूर्त करत, ती सामाजिक कार्यासाठी वापरण्याचे आवाहन विनय कोरे यांनी केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावना श्रीमंत संजीवराजे यांनी केली तर आभार प्रदर्शन प्रा. प्रभाकर पवार यांनी मानले.

prisoners enjoyed playing cricket in jail premier league organize in mathura jail watch video

0
prisoners enjoyed playing cricket in jail premier league organize in mathura jail watch video



prisoners enjoyed playing cricket in jail premier league organize in mathura jail watch video | कैद्यांच्या ‘जेल प्रीमियर लीग’चा व्हिडिओ व्हायरल; मथुरा कारागृहात रंगला क्रिकेटचा थरार





Source link

बलूचिस्तानमधील हिंगलाज माता मंदिर का आहे इतके खास? जिथं भरते पाकिस्तानमधील सर्वात मोठी हिंदू जत्रा

0
बलूचिस्तानमधील हिंगलाज माता मंदिर का आहे इतके खास? जिथं भरते पाकिस्तानमधील सर्वात मोठी हिंदू जत्रा


भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी तेथे असलेल्या एका हिंदू मंदिराचा उल्लेख करत ते सनातन धर्माचे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याचे म्हटले आहे. बलुचिस्तान हिंदूंसाठी ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण येथे असलेले हिंगलाज मातेचे मंदिर ५१ पवित्र शक्तीपीठांपैकी एक आहे.



Source link

जळगाव जिल्ह्यातील पुस्तक खरेदीत भ्रष्टाचार ? ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या चौकशीची मागणी

0
जळगाव जिल्ह्यातील पुस्तक खरेदीत भ्रष्टाचार ? ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या चौकशीची मागणी


जळगाव : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे. मात्र, बऱ्याच ग्रंथालयांना पुस्तकेच पोहोचलेली नाहीत. त्यामुळे पुस्तकांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त करून संबंधितांची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथील साने गुरूजी वाचनालयाचे अध्यक्ष अरूण जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जगताप यांनी ग्रंथालय संचालनालयासह राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. जळगाव जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील बऱ्याच ग्रंथालय व वाचनालयांना पुस्तकांचा पुरवठा न करता संबंधितांकडून आधीच स्वाक्षरी आणि शिक्के असलेले ग्रंथालय, वाचनालयाचे नाव असलेले पत्र जमा करून घेतले होते. ज्यांचा वापर करून नंतर त्यांनी पुस्तके मिळाल्याबाबतचे बनावट पत्र तयार करून घेतले. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा, एरंडोल आणि जळगाव तालुक्यातील बऱ्याच वाचनालयांचा त्यात समावेश आहे.

संबंधित सर्व वाचनालयांना पुस्तके न देताच त्यासाठी मंजूर झालेला निधी परस्पर लाटल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे काही ग्रंथालयांना २०१९ आणि २०२० या वर्षाची पुस्तके २०२३-२४ मध्ये वितरीत केली आहेत. बऱ्याच ग्रंथालयांना अद्याप कोणतीच पुस्तके मिळालेली नाहीत. धक्कादायक प्रकार म्हणजे काही ग्रंथालयांना ९० हजार रुपये किंमतीची पुस्तके द्यायची होती. प्रत्यक्षात फक्त ३० हजार रुपयांची पुस्तके पुरविण्यात आली आहेत. माहितीच्या अधिकारात ही सर्व माहिती उघड झाली आहे. या प्रकरणाची निःष्पक्ष चौकशी करून सात वर्षांपासून एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी. योग्य तो न्याय न मिळाल्यास मुंबईत ग्रंथालय संचालकांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देखील अरूण जगताप यांनी दिला आहे.

आमदार निधीतून खरेदी केलेली पुस्तके जळगाव जिल्ह्यातील ग्रंथालयांना वेळोवेळी व नियमानुसार पुरविण्यात आली असून, त्याची पोहोच देखील संबंधितांकडून घेण्यात आली आहे. पुस्तक वाटपात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. – सुहास रोकडे (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव



Source link

1 लाख कोटींचं झाला Taj Hotel हा ब्रॅण्ड! 1903 मध्ये सहा रुपयला मिळणाऱ्या रुमचं आजचं भाडं…

0
1 लाख कोटींचं झाला Taj Hotel हा ब्रॅण्ड! 1903 मध्ये सहा रुपयला मिळणाऱ्या रुमचं आजचं भाडं…


Business News Taj Hotel : देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वात महागड्या हॉटेल व्यवसायाची साखळी म्हणून नावाजलेल्या ताज हॉटेल (Taj Hotel) समुहावर सध्या कौतुकाता वर्षाव होत आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे या समुहानं मिळवलेलं यश. ताज हॉटेल्स चालवणाच्या अर्थात या समुहाच्या कार्यकारिणी आणि व्यवस्थापनावर लक्ष ठेवणाऱ्या इंडियन होटल्स कंपनी लिमिटेड (IHCL) नं तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप अर्थात कंपनी मूल्य गाठत असं करणारी ही पहिली भारतीय हॉस्पिटॅलिटी कंपनी ठरली आहे. ज्यामुळं शेअर मार्केटपासून ते अगदी हॉटेल व्यवसायाच्या क्षेत्रापर्यंत फक्त आणि फक्त ताज हॉटेल्सचीच चर्चा सुरू आहे. 

ताज हॉटेल म्हणजे एक अनुभव… 

मुंबईतील अपोलो बंदर इथं अतिशय दिमाखात असणाऱ्य हॉटेल ताजच्या ऐतिहासिक इमारतीत एकदातरी मुक्काम करणं हे अनेकांचच स्वप्न असतं. काहीचं हे स्वप्न साकार होतंही, पण काहीजण बाहेरूनच या सुरेख ठिकाणाला न्हाहाळताना दिसतात. 

आजच्या घडीला उपलब्ध आकडेवारी आणि सध्याच्या दरानुसार द ताज महाल पॅलेसमधील सर्वात महागड्या रुममध्ये मुक्काम करण्यासाठी तब्बल आठ लाख रुपयांचा खर्च येतो. तर, हॉटेलच्या इतर रुमच्या किमती खालीलप्रमाणे..

  • ताज क्लब रून सिटी व्ह्यू – ₹ 28,000
  • ताज क्लब रून सी व्ह्यू – ₹ 32,000
  • एक्झिक्युटीव्ह सुईट वन बेडरून सिटी व्ह्यू- ₹ 51,000 ते ₹ 62,000
  • लक्झरी सुईट वन बेडरुम सिटी व्ह्यू- ₹ 59,500 ते ₹ 72,000
  • ग्रँड लक्झरी वन बेडरुम सी व्ह्यू- ₹ 93,500 ते ₹ 1,12,000

वरील रुमव्यतिरिक्त हॉटेलमध्ये लक्झरी रुम, लक्झरी ग्रँड रुम सिटी व्ह्यू, , लक्झरी ग्रँड रुम सी व्ह्यू, सिग्नेचर सुईट आणि द टाटा सुईट अशा अविस्मरणीय अनुभव देणाऱ्या रुमसुद्धा उपलब्ध आहेत. 

हेसुद्धा वाचा : जगातील सर्वाधिक आनंदी देशाला रशियन सैन्याचा वेढा? PHOTO मध्ये स्पष्ट दिसली लढाऊ विमानं 

आजच्या घडीला जरी इथं मुक्कामासाठी हजारो आणि लाखो रुपये मोजावे लागत असले तरीही 1903 मध्ये मात्र या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी 6 रुपये इतका खर्च यायचा असं सांगितलं जातं. फक्त मुंबईच नव्हे तर देशात आणि अगदी परदेशातही ताज हॉटेल्सची साखळी सक्रिय असून, तिथंही कमाल सुविधा देत येणाऱ्यांचा पाहुणचार केला जातो. मात्र, मुंबईतील ताजची बातच काही और… नाही का?





Source link

काय आहे क्रॉनिक फटिग सिंड्रोम? भारतात याचं प्रमाण का वाढतंय?

0
काय आहे क्रॉनिक फटिग सिंड्रोम? भारतात याचं प्रमाण का वाढतंय?


काही आठवडे जास्त थकवा आणि उर्जेचा अभाव तुम्हाला जाणवत आहे का? तर तुम्हाला क्रॉनिक फटिग सिंड्रोम (CFS) असू शकतो. याला मायल्जिक एन्सेफॅलोमायलिटिस (ME) असेही म्हणतात.
सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकणारा तीव्र थकवा याबाबत भारतात फारशी जागरूकता नाही. या सिंड्रोममुळे लहान, मोठ्या, वृद्ध कोणलाही त्रास होऊ शकतो. मात्र, महिलांमध्ये याचे निदान अधिक प्रमाणात होते.

क्रॉनिक फटिग सिंड्रोम म्हणजे काय?

क्रॉनिक फटिग सिंड्रोम म्हणजे दीर्घकाळापर्यंत तीव्र थकवा जाणवणे. हा एक अतिशय गुंतागुंतीचा आजार आहे. यामध्ये व्यक्तीला खूप जास्त थकवा जाणवतो आणि तो कमीतकमी सहा महिने कायम असतो. हा थकवा विश्रांतीनेही कमी होत नाही. या आजारात थकवा तर येतोच, पण प्रामुख्याने शारीरिक व्यायामानंतरचा थकवा, शारीरिक किंवा मानसिक आघात, स्नायू किंवा सांधेदुखी तसंच झोप न येणे अशी लक्षणे दिसतात.
डॉक्टरांच्या मते, या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये शारीरिक किंवा मानसिक हालचालींमुळे थकवा वाढतो. मात्र, हा थकवा विश्रांतीने दूर होत नाही. क्रॉनिक फटिग सिंड्रोम आजार ओळखणे कठीण आहे, त्यामुळे त्यावर काय उपचार करावेत याबाबत लोकांमध्ये जागरूकता नाही.

डॉक्टरांच्या मते, बहुतेक प्रकारच्या थकव्याची कारणे ओळखता येतात. मधुमेह, हृदयरोग, कर्करोग तसंच अगदी अँटीबायोटिक्ससारख्या औषधांचे दुष्परिणामही ओळखता येतात. महत्त्वाचे म्हणजे सीएफएसचे निदान करण्यासाठी कुठलीही चाचणी अस्तित्वात नाही. इतर आरोग्य समस्यांमध्ये विविध वैद्यकीय चाचण्या करून उपचार करता येतात. मात्र, सीएफएसमध्ये चाचण्यांअभावी डॉक्टरांना अनेकदा या आजाराचे वर्णन करणे कठीण जाते.

याचा परिणाम कोणावर होतो?

काही अभ्यासांनुसार, या अति थकव्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये दुप्पट ते चार पट असते. ज्या व्यक्तींमध्ये थायरॉईड, हृदयरोग किंवा मधुमेहाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत त्यांना याचा त्रास होतो. काही तज्ज्ञांच्या मते, विषाणूजन्य संसर्गही याला कारणीभूत असल्याचे दिसते. हिंदू वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, एपस्टाईन-बार विषाणू, सायटोमेगॅल व्हायरस, इतर हर्पिस ग्रुप इन्फेक्शन आणि कोविडसारखे विषाणू हे या आजाराचे ट्रिगर पॉइंट म्हणून काम करतात. असं असताना २५ ते ४५ वर्षे वयोगटातील महिलांना प्रभावित करणाऱ्या या अज्ञात स्थितीचे कारण अद्याप सापडलेले नाही. याचा परिणाम किशोरवयीन मुलांवरही होऊ शकतो असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.
रोग नियंत्रण केंद्राच्या अंदाजानुसार, आठ लाख ३६ हजार ते २.५ दशलक्ष अमेरिकन नागरिक सीएफएसमुळे ग्रस्त आहेत. शिवाय काहींचे निदान तर झालेलेच नाही. या अहवालानुसार, सीएफएसमुळे अमरिकेचा दरवर्षी ९ ते २५ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च कमी उत्पादकता आणि वैद्यकीय खर्चावर होतो. दुसरीकडे भारतातील या स्थितीची आकडेवारी मर्यादित आहे. मात्र, भारतातल्या सध्याच्या जीवनशैलीमुळे या आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

WHO काय सांगते?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, सीएफएस हा प्रामुख्याने एक न्यूरोलॉजिकल आजार मानला जातो, कारण यामध्ये मेंदूच्या कार्यात आणि मज्जासंस्थेमध्ये असामान्यता असते. विशेषतः ऊर्जा, वेदना सहनशीलता आणि मूडवर परिणाम करणाऱ्या न्यूरोकेमिकल्सच्या नियमनात विशिष्ट बदल जाणवतात.

भारतात याबाबत व्यापक जागरूकता नसल्यामुळे आणि मर्यादित समर्पित कार्यक्रम किंवा धोरणांमुळे, जीवनशैलीतील घटक, व्हिटॅमिन बी-१२ किंवा लोहसारख्या पौष्टिक कमतरता किंवा अगदी मानसिक समस्यांमुळे या आजाराचे निदान अनेकदा कमी होते किंवा चुकीचे होते. ही एक महत्त्वाची समस्या असूनही सीएसएफला अद्याप भारतात सार्वजनिक आरोग्य प्राधान्य नाही. जरी कोविड-१९ नंतर प्रामुख्याने शहरी भागात थोडीफार जागरूकता वाढली आहे.

या आजाराची लक्षणे काय आहेत?

या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना अगदी मूलभूत शारीरिक क्रिया करण्यासही त्रास होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, क्रॉनिक फटिग सिंड्रोममध्ये थकवा येणे हे सर्वात सामान्य लक्षण असते. जेव्हा एखादी व्यक्ती सीएफएसग्रस्त असते तेव्हा त्यांना खूप थकवा जाणवतो आणि थकवा येण्याची लक्षणे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहतात. या आजारात स्मरणशक्तीच्या समस्या आणि मेंदूला मिरगी, डोकेदुखी, घसा खवखवणे, मान आणि काखेत वाढलेले लिम्फ नोड्स आणि स्नायू, सांधेदुखी यांसारखी लक्षणेदेखील आहेत. झोपून किंवा बसून उठताना लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात आणि चक्करदेखील येते. फायब्रोमायल्जिया, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, नैराश्य आणि झोपेचे विकार यासारखे काही आजार सीएफएससोबतच असू शकतात.

सीएफएसमुळे झोपेचे विकार होऊ शकतात, जिथे एखाद्या व्यक्तीला सतत झोप येते किंवा झोप येत नाही आणि झोपल्यानंतर ताजेतवाने वाटत नाही. त्याला तीव्र आणि स्पष्ट स्वप्ने पडणे, अस्वस्थता, रात्रीच्या वेळी स्नायूंचा आकुंचन आणि स्लीप एपनिया (झोपेत श्वसनक्रिया बंद पडणे)चा अनुभव येऊ शकतो. या आजाराने ग्रस्त व्यक्तींना जठरांच्या समस्या, रात्री घाम येणे, स्नायू कमकुवत होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चिंता किंवा पॅनिक अटॅक आणि तापदेखील येऊ शकतो.

निदान आणि उपचार

सीएफएसचे निदान करण्यासाठी विशिष्ट चाचण्यांचा अभाव आहे, त्यामुळे रुग्णांना उपचार न घेता आणि वर्षानुवर्षे या त्रासासह जगावे लागत आहे. भारतात एका दशकात डॉक्टरांनी सीएफएसचे फक्त चार-पाच रुग्ण आढळल्याची माहिती आहे. डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सीएफएससाठी कोणताही विशिष्ट उपचार नाही. द फायनान्शियल एक्स्प्रेसच्या एका अहवालात म्हटले आहे की, सीएफएसचे निदान करण्यासाठी दीर्घकालीन थकव्याची लक्षणे महत्त्वाची आहेत, म्हणूनच मानसिक समुपदेशन, व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन डी युक्त पुरेशा पूरक आहारामुळे कधीकधी कमकुवतपणा दूर होण्यास आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते. चांगला, निरोगी आहार आणि नियमित शारीरिक व्यायाम, योग आणि ध्यान यामुळे रुग्णाला क्रॉनिक फटिग सिंड्रोममधून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. सीएफएसची कारणे अद्याप अज्ञात असल्याने तो रोखणे काहीसे अवघडच आहे.



Source link

IPL 2025: गुजरात टायटन्सला मोठा धक्का, जोस बटलर स्पर्धेतून बाहेर पडणार? या आक्रमक फलंदाजाला मिळू शकते संधी

0
IPL 2025: गुजरात टायटन्सला मोठा धक्का, जोस बटलर स्पर्धेतून बाहेर पडणार? या आक्रमक फलंदाजाला मिळू शकते संधी



Big blow for gujarat titans jos buttler likely to ruled out of ipl 2025 kusal mendis can replace him cricket news in marathi| गुजरात टायटन्सला मोठा धक्का, जोस बटलर स्पर्धेतून बाहेर पडणार? या आक्रमक फलंदाजाला मिळू शकते संधी





Source link

बजाजनगरमध्ये धाडसी दरोडा; आठ किलो सोने, ४० किलो चांदी घेऊन पसार

0
बजाजनगरमध्ये धाडसी दरोडा; आठ किलो सोने, ४० किलो चांदी घेऊन पसार


छत्रपती संभाजीनगर : विदेशात गेलेल्या उद्योजकाच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून घरातील ८ कोटी रुपये किमतीचे ८ किलो सोने व ४० किलो चांदी दरोडेखोरांनी मध्यरात्री पळवून नेल्याची थरारक घटना छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज औद्योगिक वसाहत भागात सकाळी उघडकीस आली. या माहितीनंतर वाळूज एमआयडीसी पोलीस, ठसे तज्ज्ञ व श्वान पथकासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल असून, सोने, चांदीशिवाय अन्य काय-काय ऐवज चोरीस गेला आहे, याची माहिती घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात हा दरोडा पडला असून, ते व त्यांची पत्नी सध्या अमेरिकेत शिकत असलेल्या मुलाकडे गेले आहेत. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांच्या वतीने जबाब देण्यात आल्यानंतर घटनेचा अधिक तपशील स्पष्ट होणार आहे.

लड्डा कुटुंबीय अमेरिकेत गेल्याने त्यांनी जाण्यापूर्वी घरामध्ये एका सुरक्षा रक्षकाला नियुक्त केले होते. घटनेवेळी सहा दरोडेखोर घरात घुसले व त्यांनी त्या सुरक्षा रक्षकाचे हात पाय बांधून डांबून ठेवले. पैकी एकाने रक्षकावर बंदूकही रोखले. उर्वरीत दरोडेखोरांनी घरातील ८ किलो सोने व ४० किलो चांदी लुटली आणि सर्व जण पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा





Source link

Worker s mobile phone stolen while sleeping outside waiting area at Thane railway station zws 70

0
Worker s mobile phone stolen while sleeping outside waiting area at Thane railway station zws 70



Worker s mobile phone stolen while sleeping outside waiting area at Thane railway station zws 70 | प्रवास थकव्यामुळे झोप लागली आणि स्थानकातूनच प्रवाशाचा मोबाईल गायब





Source link