Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशबजाजनगरमध्ये धाडसी दरोडा; आठ किलो सोने, ४० किलो चांदी घेऊन पसार

बजाजनगरमध्ये धाडसी दरोडा; आठ किलो सोने, ४० किलो चांदी घेऊन पसार

बजाजनगरमध्ये धाडसी दरोडा; आठ किलो सोने, ४० किलो चांदी घेऊन पसार

[ad_1]

छत्रपती संभाजीनगर : विदेशात गेलेल्या उद्योजकाच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून घरातील ८ कोटी रुपये किमतीचे ८ किलो सोने व ४० किलो चांदी दरोडेखोरांनी मध्यरात्री पळवून नेल्याची थरारक घटना छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज औद्योगिक वसाहत भागात सकाळी उघडकीस आली. या माहितीनंतर वाळूज एमआयडीसी पोलीस, ठसे तज्ज्ञ व श्वान पथकासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल असून, सोने, चांदीशिवाय अन्य काय-काय ऐवज चोरीस गेला आहे, याची माहिती घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात हा दरोडा पडला असून, ते व त्यांची पत्नी सध्या अमेरिकेत शिकत असलेल्या मुलाकडे गेले आहेत. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांच्या वतीने जबाब देण्यात आल्यानंतर घटनेचा अधिक तपशील स्पष्ट होणार आहे.

लड्डा कुटुंबीय अमेरिकेत गेल्याने त्यांनी जाण्यापूर्वी घरामध्ये एका सुरक्षा रक्षकाला नियुक्त केले होते. घटनेवेळी सहा दरोडेखोर घरात घुसले व त्यांनी त्या सुरक्षा रक्षकाचे हात पाय बांधून डांबून ठेवले. पैकी एकाने रक्षकावर बंदूकही रोखले. उर्वरीत दरोडेखोरांनी घरातील ८ किलो सोने व ४० किलो चांदी लुटली आणि सर्व जण पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments