Monday, July 13, 2026
Home Blog Page 255

चोरीच्या संशयावरून बांबूने बेदम मारहाण करून हत्या

0
चोरीच्या संशयावरून बांबूने बेदम मारहाण करून हत्या


मुंबई : माहीम येथे चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून बांबूने केलेल्या बेदम मारहाणीत ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या संपूर्ण अंगावर गंभीर जखमा होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी माहीम पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येसाठी वापरलेला बांबू पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

माहीम पश्चिम येथील एस. एल. रहेजा मार्गावरील मच्छीमार कॉलनी परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन मेहबूब शेख (४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो माहीम येथील रामगड झोपडपट्टी परिसरात राहत होता. बुधवारी शेख मच्छीमार कॉलनी परिसरातील इमारत क्रमांक २१ येथे वावरत होता. तो चोर असल्याच्या संशयावरून आरोपी मोहम्मद अन्सारीने (४३) त्याला बांबूने मारहाम केली. गंभीर दुखापत झाल्यामुळे शेख खाली कोसळला. त्याला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर शेखचा भाऊ ख्वाजा मेहबूब शेख (३८) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत हत्येचे गुन्हा दाखल केला.

चोरीच्या संशयावरून मारहाण

तपासात मोहम्मद अस्लम अन्सारीने (४३) बांबूने केलेल्या मारहाणीत शेखचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर माहीम पोलिसांनी मच्छीमार कॉलनी परिसरातून त्याला अटक केली. आरोपी मच्छीमार कॉलनीतील २१ क्रमांक इमारतीतील १०५४ क्रमांक खोलीत वास्तव्यास आहे. अन्सारी खासगी शिकवणी घेऊन उदरनिर्वाह चालवतो. शेख चोरी करण्यासाठी त्याच्या इमारतीखाली आल्याच्या संशयावरून त्याने बांबूने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे शेखच्या संपूर्ण अंगावर जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला बांबू घटनास्थळावरून जप्त केला असून तो न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. आरोपीविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी न्यायवैधक पथकाच्या मदतीने तपासणी करण्यात आली.

हेही वाचा
हेही वाचा

भावाच्या तक्रारीवरून गुन्हा

मृत हसन शेखचा भाऊ ख्वाजा शेख वाहन चालक आहे. त्याच्या तक्रारीनुसार, चोरीच्या संशयावरून हसनला गंभीर मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. म्हणून याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.





Source link

टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल ८’मध्ये दिसणार अवनीत कौर, नवीन फोटो आले समोर

0
टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल ८’मध्ये दिसणार अवनीत कौर, नवीन फोटो आले समोर


Mission Impossible 8: इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौरने आज एक खास ओळख निर्माण केली आहे. अवनीतने लहान वयातच अभिनय विश्वात पाऊल ठेवले आणि आपले मोठे नाव कमावले. सोशल मीडियावरही अवनीतची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सध्या अवनीत तिच्या एका मोठ्या प्रोजेक्टमुळे खूप चर्चेत आहे. हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझचा ‘मिशन इम्पॉसिबल ८’ हा सुपरहिट चित्रपट तिच्या हाती आला आहे. अवनीतने ‘मिशन इम्पॉसिबल ८’च्या प्रीमियरमधील काही फोटो पोस्ट केले आहेत, जे आता वेगाने व्हायरल होत आहेत.



Source link

. “१०वी-१२वी उत्तीर्ण गुणवंतांचा सन्मान सोहळा: सोनिया ट्रस्ट व सनी दादांचा प्रेरणादायी उपक्रम”

0
. “१०वी-१२वी उत्तीर्ण गुणवंतांचा सन्मान सोहळा: सोनिया ट्रस्ट व सनी दादांचा प्रेरणादायी उपक्रम”

फलटण | शिक्षण क्षेत्रात प्रगती करत १०वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व नगरसेवक सनी संजय अहिवळे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार पेठ, फलटण येथे शनिवार दिनांक १७ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता बुद्ध निवास येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर (सभापती पंचायत समिती, फलटण) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती:
मा. विजय येवले,
मा. मधुकर काकडे,
मा. मुन्ना शेख,
मा. संजय निकाळजे,
मा. सतीश अहिवळे,
मा. सुधिर अहिवळे सर,
मा. विकास काकडे सर,
मा. सुहास अहिवळे,
मा. कपिल काकडे

विद्यार्थ्यांसाठी सूचना:
१०वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली नावे खालील क्रमांकावर पाठवावीत –

सुपर्णा अहिवळे: 9960861186

मंगेश जगताप (वस्ताद): 9881388838

राकेश माने: 9890673473

प्रफुल्ल अहिवळे: 9172987286

सागर राजपाल अहिवळे: 9503989905

कार्यक्रम व्यवस्थापन:
हरीश (आप्पा) काकडे, रोहित माने (भैय्या), गणेश बिऱ्हाडे, सिद्धार्थ अहिवळे, विकी काकडे (SK), संग्राम अहिवळे, शक्ती भोसले, प्रवीण काकडे सर, आशय अहिवळे, दयानंद पडकर, जयकुमार रणदिवे, लक्ष्मण काकडे (अध्यक्ष), निलेश मोरे, सागर अहिवळे, गणेश मोरे

आपले आयोजक:
सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण
मा. श्री सनी (दादा) अहिवळे – नगरसेवक, फ.न.प., फलटण

Viral Video : man saves toddler in filmy style

0
Viral Video : man saves toddler in filmy style



Viral Video : man saves toddler in filmy style | मानलं मित्रा! बाळाची बाबागाडी उतारावरून आली सरकत अन्… तुम्हीही बघा व्हिडीओचा शेवट





Source link

रामराजे निंबाळकरांना त्रास देण्याचा प्रयत्न, पण सत्ता ही सदासर्वकाळ…; रोहित पवारांचा जयकुमार

0


Rohit Pawar on Jaykumar Gore vs Ramraje Naik Nimbalkar : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या बदनामी व खंडणी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वडूज पोलिस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. संबंधित महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आता या चौकशीचा भाग म्हणून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू झाली आहे. वडूज पोलिसांनी या प्रकरणात एकूण 11 जणांना समन्स बजावले आहेत. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हल्लाबोल केलाय.

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा असतो, हे मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात दिसत आहे. पदाचा गैरवापर करत न्याय मागणाऱ्या पिडीतेलाच जेलमध्ये टाकून आणि सत्य उजेडात आणणारे निर्भिड व खरे पत्रकार तुषार खरात यांना खोट्या गुन्ह्यात अडकवूनही या मंत्र्यांचं समाधान झाल्याचं दिसत नाही. म्हणूनच विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर साहेब यांना चौकशीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. पण सत्ता ही सदासर्वकाळ नसते. आजची सत्ता उद्या जाईल, त्यावेळी आपली काय अवस्था होईल? हे आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी विसरू नये, असे त्यांनी म्हटले आहे.  

नेमकं प्रकरण काय?

कराड तालुक्यातील एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. संबंधित महिलेने गोरेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप करत सांगितले होते की, मागील सहा वर्षांपासून त्यांचे कार्यकर्ते तिला सातत्याने त्रास देत होते. महिलेने याबाबत तक्रार करत जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर थांबून आपली व्यथा मांडली होती, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही घटनेची माहिती दिली होती. मात्र, पोलीस अधीक्षकांनी याकडे कोणतीही दखल घेतली नाही, असेही तिने सांगितले होते. या आरोपांनंतर विरोधकांनी जयकुमार गोरे यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र, पुढे या प्रकरणातील संबंधित महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना अटक करण्यात आली. तसेच ‘लय भारी’ या यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांनाही अटक झाली. गोरे यांच्याविरोधात एकतर्फी बातम्या प्रसारित करून बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचे मोबाईल संवादावरून समोर आले होते. या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.   

आणखी वाचा 

फलटणचा शकुनी मामा कधीच जिंकणार नाही, जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांना टोला, म्हणाले मला संपवता संपवता तेच घरी बसले

अधिक पाहा..





Source link

उद्धव-राज ठाकरेंमध्ये पुन्हा वाढत आहे जवळीक! BMC निवडणुकीसाठी शिंदे सेनेनेही कसली कंबर

0
उद्धव-राज ठाकरेंमध्ये पुन्हा वाढत आहे जवळीक! BMC  निवडणुकीसाठी शिंदे सेनेनेही कसली कंबर


ठाकरे बंधूंच्या पुनर्मिलनाची चर्चा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरू लागली आहे. उद्धव यांच्या शिवसेनेने त्यांचे चुलत बंधू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युतीची शक्यता पुन्हा एकदा वर्तवली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही मनसेशी जवळीक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे अधिक रंजक झाली आहेत.



Source link

Kalyan police officer Arjun Domade get Award for story collection

0
Kalyan police officer Arjun Domade get Award for story collection



Kalyan police officer Arjun Domade get Award for story collection | कल्याणमधील साहित्यिक पोलीस अधिकारी अर्जुन डोमाडे यांच्या कथासंग्रहाला पुरस्कार





Source link

कंपनीत रात्रपाळीला निघालेल्या २७ वर्षीय महिलेवर चाकण परिसरात बलात्कार; आरोपी म्हणाला, तिला फरफटत नेलं अन्..

0
कंपनीत रात्रपाळीला निघालेल्या २७ वर्षीय महिलेवर चाकण परिसरात बलात्कार; आरोपी म्हणाला, तिला फरफटत नेलं अन्..


कंपनीत नाईट ड्युटीसाठी निघालेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना चाकण परिसरात घडली आहे. आरोपीने पीडितेला तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केला. ही घटना मंगळवारी (१३ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास चाकणजवळील मेदनकरवाडी येथे घडली. चाकणजवळील मेदनकरवाडी परिसरात १३ मे रोजी रात्रपाळीच्या ड्युटीसाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुणीवर एका व्यक्तीने बलात्कार करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती.



Source link

Drone cameras have been banned ड्रोन कॅमेऱ्यांना बंदी

0
Drone cameras have been banned ड्रोन कॅमेऱ्यांना बंदी


नवी मुंबई : नवी मुंबईत ड्रोन बंदी आदेश देण्यात आले आहेत. सागरी किनाऱ्यावर हे आदेश कायम असतात. मात्र पहलगाम येथील हल्ल्यानंतरची परिस्थिती पाहता सुरक्षा म्हणून ही बंदी आयुक्तालय क्षेत्रात घालण्यात आली आहे. या आदेशाचे काटेकोर पणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पहलगाम येथे झालेला अतिरेकी हल्ला आणि त्याला भारताने सडेतोड उत्तर दिल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान शस्त्रविराम आहे. मात्र सुरक्षाविषयक सतर्कता बाळगली जात आहे. आजच्या सॅटेलाईट तंत्रज्ञान काळात असे हल्ले करण्यास ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो त्यामुळे ठाणेपाठोपाठ नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन कॅमेराला बंदी घालण्यात आली आहे.

महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ११० किलोमीटर सागरी किनारा आहे. यात ऐरोली ते वाशी- करावे एनआरआय, खारघर उरण ते घारापुरी लेणी हा परिसर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो. या क्षेत्रात ड्रोन कॅमेरा बंदी कायम असते. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पूर्ण पोलीस आयुक्तालंय क्षेत्रात ड्रोन कॅमेराला बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा

काही अघटित घडू नये म्हणून ड्रोन बंदी घालण्यात आली आहे. खासगी समारंभ वा हौस म्हणून ड्रोन कॅमेराचा वापर केला जातो. मात्र त्यामुळे भीती आणि पाठोपाठ अफ़वा पसरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे ही बंदी घालण्यात येते. जर कोणी या आदेशाचे उलंघन केले तर कायाद्यानुसार गुन्हा नोंद करून कारवाई केली जाईल. – इंद्रजित करले, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा





Source link

Non Marathi get key positions in Mira Bhayandar bjp Marathi community ignore zws 70

0
Non Marathi get key positions in Mira Bhayandar bjp Marathi community ignore zws 70



Non Marathi get key positions in Mira Bhayandar bjp Marathi community ignore zws 70 | मिरा भाईंदर भाजपमध्ये मराठी समाजाला डावलण्याचा प्रयत्न ? जबाबदारीच्या पदावर संधी न मिळाल्याने अंतर्गत नाराजी





Source link