Monday, July 13, 2026
Home Blog Page 252

पाकिस्तानच्या ‘शत्रू’च्या मदतीने सिंधूसहीत ‘या’ 2 नद्यांचं पाणीही अडवणार; मोदी सरकारचा मास्टर प्लॅन

0
पाकिस्तानच्या ‘शत्रू’च्या मदतीने सिंधूसहीत ‘या’ 2 नद्यांचं पाणीही अडवणार; मोदी सरकारचा मास्टर प्लॅन


Shahtoot Dam Project: पाकिस्तानच्या मुस्क्या आवळण्यासाठी भारत दिवसोंदिवस नवीन नवीन धोरणं राबवत असून आता स्वत: घातलेल्या बंदी आणि निर्बंधांसहीत पाकिस्तानची इतर शेजारच्या राष्ट्रांच्या माध्यमातून कोंडी करण्याचाही भारताचा मानस आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता पाकिस्तानबरोबर वैर असलेल्या अफगाणिस्तानला मदत करुन काट्याने काटा काढण्याचा भारताचा विचार सुरु असून त्यासंदर्भात एक पाऊल भारताने पुढे टाकलं आहे. सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया केल्यामुळे पाकिस्तानबरोबर असलेला सिंधू जल करार भारताने पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तातडीने स्थगित केला. आता भारत अफगाणिस्तानातूनही पाकिस्तानची जलकोंडी होण्याची दाट शक्यता आहे. 

‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’; मोदींनीही ठणकावलं

भारताने सिंधू जल करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेत याबद्दल पुन्हा विचार करण्याची मागणी भारताने नुकतीच फेटाळून लावली. ‘पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही’, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनीही पाकिस्तानला ठणकावलेलं असतानाच आता भारताने मित्र देश असलेल्या अफगाणिस्तानच्या माध्यमातून पाकिस्तानची अधिक प्रमाणात जलकोंडी करण्यासंदर्भातील हलचाली सुरु केल्या आहेत.

मोदी सरकारची ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अफगाणिस्तानशी पहिल्यांदाच चर्चा

भारत व अफगाणिस्तानचे उत्तम संबंध असून अफगाणिस्तानमध्ये काबुल नदीवरील शाहतूत धरण बांधण्यासाठी भारताने सहकार्य दिले असून, ते पूर्ण झाल्यास तिथून पाकिस्तानला होणारा जलपुरवठा कमी होऊ शकतो. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमधील परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी यांच्यामध्ये गुरुवारी रात्री दूरध्वनीवरून चर्चा झाली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पहिल्यांदाच अफगाणिस्तानशी चर्चा केली आहे.

पाकिस्तानसाठी चिंतेंचा विषय

अफगाणच्या हिंदूकुश पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या व पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात प्रवेश करणाऱ्या काबुल नदीवर बांधले जाणारे शाहतूत धरण हा पाकिस्तानसाठी संवेदनशील आणि चिंतेंचा विषय आहे. काबुल नदी हा सिंधू नदी प्रणालीचाच भाग आहे. या नदीमधून पाकिस्तानात जाणाऱ्या पाण्यावर पाकिस्तानमधील अनेकांचं दैनंदिन जीवन अवलंबून आहे.

या प्रकल्पालाही करणार मदत?

तालिबान सरकारने  अफगाणिस्तानमधील कुणार नदीवर आणखी एक मोठा जलविद्युत प्रकल्प बांधण्याची घोषणा केली आहे. हिंदूकुशमध्ये उगम पावणारी कुणार नदी पुढे काबुल नदीला मिळते व पाकिस्तानात प्रवेश करते. तिथे जलविद्युत प्रकल्प झाला तर काबुल नदीच्या आणि पर्यायाने पाकिस्तानच्या पाणी पुरवठ्याला फटका बसणार आहे. त्यामुळे आता भारत या प्रकल्पासाठीही काही तांत्रिक आणि आर्थिक मदत देतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 





Source link

नवी मुंबई विमानतळाचे स्वातंत्र्यदिनी उद्घाटन?

0
नवी मुंबई विमानतळाचे स्वातंत्र्यदिनी उद्घाटन?


नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा जून महिन्यात सुरू करू, अशी घोषणा अदानी उद्याोगसमूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी केली होती. परंतु विमानतळाचे काम पूर्ण झाले नसल्याने आता आणखी दीड महिना विलंब होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दोनपैकी एका धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून विमान उड्डाणाच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. टर्मिनल इमारतीमध्ये बोर्डिंग पास (तिकीट) काऊंटर यंत्रणासुद्धा तयार आहे. तर सध्या विमानतळ टर्मिनल इमारतीच्या प्रथम प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे.

लंडन येथील एका नामवंत कंपनीने या विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या प्रवेशद्वाराचे अनोखे संकल्प चित्र रेखाटले. मात्र या आकर्षक संकल्प चित्रात रेखाटल्याप्रमाणे प्रवेशद्वारावरील कलाकृतीमध्ये ६० ते ७० मीटर उंचीवर अॅल्युमिनियमची प्लेट जोडणी करणे हे सर्वात जोखमीचे काम आहे.

भारत-पाकिस्तान संघर्षाचा फटका

भारत-पाकिस्तान संघर्षाचा या कामाला फटका बसल्याचे सांगितले जात आहे. कारण केंद्राने या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मे महिन्यात विमानतळ सुरू करण्याबाबतचे पत्र अदानी कंपनीने राज्य सरकारला दिले आहे. राज्याकडूनही केंद्राला याबाबत कळवण्यात आले आहे. याबाबत सिडको मंडळाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि अदानी समूहाच्या जनसंपर्क विभागाला संपर्क साधला मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही.





Source link

‘गुजरात समाचार’च्या मालकाला अटक, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी

0
‘गुजरात समाचार’च्या मालकाला अटक, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी



enforcement directorate arrested owner of Gujarat Samachar for inquiry of financial irregularities ‘गुजरात समाचार’च्या मालकाला अटक, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी





Source link

तळटीपा : जनांची नाही, निदान वनांची तरी…

0
तळटीपा : जनांची नाही, निदान वनांची तरी…



शहरी गोंगाट आणि गजबजाटापासून दूर कुठे तरी निवांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचे माणसे ठरवतात. मनाला विरंगुळा मिळावा म्हणून निर्जन अशा जागा त्यासाठी खुणावत असतात. तिथे गेल्यानंतरही काही वृत्ती, प्रवृत्ती उफाळून येतातच. आनंद ही अनुभवण्याची नाही तर उपभोगण्याची गोष्ट आहे असाच अनेकांचा समज असल्याकारणाने त्या जागेची शांतता घालवण्यापासून ते तिथे अस्वच्छता करण्यापर्यंत अनेक गोष्टी माणसांच्या हातून घडतातच. मग तो ‘येणे सुखे रुचे एकांताचा वास’ उरत नाही.

सुनील गंगोपाध्याय यांच्या ‘अरण्येर दिन रात्री’ या कादंबरीवर सत्यजित रे यांचा त्याच नावाचा सिनेमा आहे. बिहारमधल्या पलामु या घनगर्द जंगलात काही दिवस घालवण्यासाठी असीम, हरी, संजय आणि शेखर हे चार मित्र कोलकात्याहून जातात. खरं तर असं कुठे निश्चित ठिकाण ठरवून जायचं हे त्यांनी ठरवलेलंही नसतं, पण या परिसरात आल्यानंतर त्यांना इथंच थांबावं वाटतं. आरक्षण न करता जंगलातल्या डाक बंगल्यात चौकीदाराला चिरीमिरी देऊन कक्ष बळकावण्यापासून ते मद्याधुंद अवस्थेत जंगलातल्या वाटांवर गाडी थांबवून नाचगाणी आणि धुडगूस घालण्यापर्यंत या सर्वांचे उद्याोग चाललेले असतात. जंगलात तिथं अगोदरच आलेलं आणखी एक कुटुंब आहे. या कुटुंबाशी या चौघांचा होणारा संवाद, तिथल्या आदिवासींशी येणारा संपर्क यातून चित्रपटाचं कथानक उलगडत जातं. या चार मित्रांना शहरी गोंगाटापासून पूर्णपणे अलिप्त असे काही दिवस घालवायचे आहेत. त्याच त्या दैनंदिन घटना- घडामोडींचा उबग नको म्हणून या कोलाहली पर्यावरणापासून स्वत:ला तोडण्यासाठी ते प्रतीकात्मकरीत्या वर्तमानपत्राचे दहन करतात. या चौघांची भेट जंगलात ज्या कुटुंबाशी झालेली आहे त्यात शर्मिला टागोर (अपर्णा), कावेरी बोस (जया) या दोघी आहेत. जंगलात आल्यानंतर दाढी वगैरे करायची नाही असं ठरवणारा शेखर या दोघींना पाहिल्यानंतर आपल्या निर्धारापासून ढळतो. या चौघांमधलाच एक असीम हा अपर्णा या व्यक्तिरेखेकडे आकर्षित होतो, पण बुद्धिमान असलेल्या तिच्याशी याचे सूर जुळत नाहीत. संजय हा विधवा असलेल्या जयाकडे आकर्षित होतो. स्वत:च्या कौटुंबिक असमाधानातून जयाला आधीचंच एक रितेपण आलेलं आहे. यातला हरी एका संथाली आदिवासी मुलीला जाळ्यात ओढतो. सिनेमात असे अनेक प्रसंग आहेत जे मध्यमवर्गीय नैतिकतेपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. या चौघांच्या असंवेदनशील, बेपर्वा अशा वर्तनाचा प्रत्यय काही प्रसंगांमधून येतो. जंगलातल्या त्या डाक बंगल्यावरच्या चौकीदाराची बायको अतिशय आजारी असते, तो बिचारा तशाही परिस्थितीत या चौघांची कामं करत असतो. ही कामं करणं म्हणजे त्याचं कर्तव्यच आहे अशा भावनेतून अत्यंत असंवेदनशीलतेने हे त्याच्याशी वागतात. विशेषत: सिनेमातल्या पुरुष व्यक्तिरेखांचा स्वभाव यानिमित्ताने कळून येतो. समाजजीवनातील आणि कौटुंबिक नात्यातले पेच कळून येतात. ५० वर्षं होऊन गेली तरी हा सिनेमा आजही समकालीन वाटावा असाच आहे. (योगायोगाचा भाग म्हणजे याच वर्षी दिनांक १३ मेपासून सुरू झालेल्या कान्स चित्रपट महोत्सवात तो दाखवला जाणार आहे.) जंगलात चार-दोन दिवस घालवतानाही यातली प्रत्येक व्यक्तिरेखा ही कुठल्या ना कुठल्या न्यूनगंडाने कुरतडल्यासारखी वाटते. जंगलात स्वच्छंदी जगायचंय, पण प्रत्येकाच्या भोवती कुठली ना कुठली वर्तुळं आहेत. यातल्या चौघांचेही स्वभाव भिन्न आहेत आणि ते जणू आपल्या नागर समाजाचेच प्रतिनिधित्व करतात. शेवटी घाईघाईतली ही जंगलातली सहल उरकून ते पुन्हा आपल्या शहरात परतायला निघतात. तुम्ही कुठेही गेलात तरी व्यक्ती म्हणून सुटे नसता. तुमचे पूर्वग्रह, तुमच्या धारणा, समज- गैरसमज या सगळ्यांनी मिळूनच तुमचं व्यक्तिमत्त्व वावरत असतं. मग तुम्ही जनात असा की वनात… हे सांगणारा हा चित्रपट आहे.

जंगलं वाचवा, त्यावरील अनधिकृत अतिक्रमणांना थोपवा, नैसर्गिक संपत्तीची धूळधाण थांबवा, तिथल्या जैवविविधतेचं रक्षण करा, पशु-पक्ष्यांचा, प्राण्यांचा अधिवास जपा, वनजमिनी कोणाच्या तरी घशात घालणं थांबवा, अशा बाबी रोजच कानावर पडतात आणि त्यांना छेद देणाऱ्या घटनाही रोजच पाहायला, ऐकायला, वाचायला मिळतात. विभूतीभूषण बंदोपाध्याय यांची ‘आरण्यक’ ही कादंबरी बंगाली भाषेत सात-आठ दशकांपूर्वी प्रसिद्ध झाली. याच नावाने तिचा मराठी अनुवाद शंकर बाळाजी शास्त्री यांनी केला आहे. अनुवाद शब्दबंबाळ असला तरी कादंबरीचा आशय वाचकांपर्यंत पोहोचतो. पदवीधर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेला एक नायक अपघाताने माणसांच्या जंगलातून खऱ्याखुऱ्या जंगलात जातो. कोलकात्यातून थेट उत्तर बिहार इलाख्यातल्या जंगलात तो येतो. एका मोठ्या जमीनदाराच्या जंगलव्याप्त जमिनीचं व्यवस्थापन करण्यासाठी थेट पश्चिम बंगालच्या सीमेला येऊन भिडलेल्या या निबिड अरण्यात त्याला यावं लागतं. तिथल्या लोकांना भाडेतत्त्वावर वनजमिनींचे काही पट्टे शेतीसाठी द्यायचे, जंगलातून निर्माण होणाऱ्या काही उत्पादनांची शहरात विक्री करण्याची व्यवस्था लावायची अशी अनेक कामं असतात आणि हा श्रीमंत जमीनदार त्याला त्यासाठी मुखत्यार म्हणून नेमतो. सत्यचरण जेव्हा नोकरीच्या शोधात कोलकात्यात भटकत असतो तेव्हा त्याला तिथं भेटलेल्या अविनाश या त्याच्या एका श्रीमंत मित्रानेच हे काम त्याच्याकडे सोपवलं आहे. काम मोठं आहे, जंगलही थोडंथोडकं नाही तर तब्बल ३० हजार बिघे एवढी व्याप्ती असलेलं. हे काम जमीनदारीच्या धंद्यात मुरलेल्या लोकांकडे सोपवता येत नाही. कारण अशी माणसं खोटेनाटे धंदे करून फसवणारी असतात. शिकला-सवरलेला पण प्रामाणिक असाच माणूस या सर्व व्यवहारासाठी त्या जमीनदार कुटुंबाला हवा असतो. सत्यचरण हा तरुण नायक या कामासाठी त्यांना योग्य वाटतो. काम स्वीकारल्यानंतर तो जंगलात जातो. काही वर्षं तिथलाच होऊन राहतो. तिथल्या पानाफुलांशी, झाडांशी, वेलींशी त्याचं एक नातं निर्माण होऊ लागतं. जंगलातले सगळे बारकावे त्याला कळू लागतात. तिथल्या माणसांशी त्याचे भावसंबंध निर्माण होतात. जमिनीचा तुकडा आपल्याला वहितीसाठी मिळावा म्हणून दीनवाण्या नजरेने त्याच्या कार्यालयात येऊन बसणारे लोक जसे आहेत तसेच जंगलातल्या अद्भुत शिकारकथा आपल्या खास शैलीत त्याला सांगणारेही आहेत.

काही वर्षं या अरण्यात घालवल्यानंतर या कादंबरीचा हा नायक एक दिवस तिथून आपलं निहित कर्तव्य पार पाडून हा इलाखा सोडतो. त्या वेळी त्याला निरोप देण्यासाठी अनेक जण जमतात. हा असा काळ की ज्या काळात दळणवळणाची साधनं फारशी उपलब्ध नव्हती. तो या भागातून पालखीत बसून बाहेर पडतो. जरा उंच जागेवर आल्यानंतर नजर मागे वळवून पाहतो तेव्हा अरण्यातली मोठी मोठी झाडं कापून त्या ठिकाणी वसलेली काही घरं त्याला दिसू लागतात. गुरंढोरं, माणसांची वर्दळ, आरडाओरडा, हसणं-खिदळणं त्याला जाणवू लागतं. वहितीखाली आलेली शेतं दिसू लागतात. आपण आलो तेव्हा हा परिसर कसा निर्मनुष्य होता आणि आज कसा गजबजलेला आहे याची तुलना तो करू लागतो. दुरूनच या अरण्यप्रदेशाला तो मनोमन नमस्कार करतो. ‘अरण्यातील वनदेवतांनो, मला क्षमा करा, मी येतो’ असं म्हणत तो या ठिकाणाहून निरोप घेतो. बईहरच, लबटूलिया अशी गाव परिसराची नावं असलेला हा इलाखा, तेथील अरण्य आपल्याच हातून नष्ट झाले आहे याची खंत त्याच्या मनाला आहे. कादंबरीच्या सुरुवातीला लेखकाचे दोन पानी मनोगत आहे. या मनोगताच्या शेवटी एक कबुलीजबाब आहे. ‘अरण्य म्हणजे निसर्गाची एक स्वच्छंद अशी लीलाभूमी. ती माझ्या हातून नष्ट झाली. वनदेवता माझ्या या अपराधाबद्दल मला क्षमा करणार नाही. पण गुन्ह्याची कबुली आपल्याच तोंडाने दिल्याने अपराधाचे ओझे कमी होते असे मी ऐकले आहे.’ असा हा कबुलीजबाब लेखकाच्या मनोगतात आहे. जंगलातला निसर्ग नासवण्याचा, जंगलं निर्वस्त्र करण्याचा हा अपराधभाव केव्हाच अस्तंगत होऊन आता एक सर्वदूर असा निर्ढावलेपणा आलेला आहे.

आसाराम लोमटे (लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत.)

aasaramlomte@gmail.com



Source link

बुकमार्क : युद्धाच्या बातम्या की प्रचार?

0
बुकमार्क : युद्धाच्या बातम्या की प्रचार?



युद्ध वार्तांकन तंतोतंत करणे अवघड आहे. कारण अनेक घटना समांतररीत्या घडत असतात. त्यात हे वार्तांकन निष्पक्षपाती असणे तर जवळपास अशक्यच. महाभारत- युद्धातील संजयाचे वर्तांकनदेखील पांडवांच्या बाजूला झुकलेले आहे. मराठी मनाला जवळ असलेली भाऊसाहेबाची बखर लिहिणारा प्रत्यक्ष रणभूमीवर उपस्थित होता का नाही याबद्दल काही सांगता येत नाही. पण १८५७ च्या बंडाविषयी गालिबचे ‘दस्तांबू’ आणि दुसरे गोडसे भटजींचे ‘माझा प्रवास’ या दोन्ही पुस्तकांतले अनुभव प्रत्यक्ष आहेत. गालिब दिल्लीबद्दल आणि स्वत:बद्दल लिहितो तर गोडसे भटजी मध्य भारतात ठिकठिकाणी जातात. जिवाची भीती या दोघांनाही आहे. युद्धाचे वर्णन करताना ते आकर्षक होईल असे लिहिणे हे त्याच सुमारास पश्चिमेत सुरू झाले. पूर्ण क्रिमियन युद्धाचे वार्तांकन विल्यम रसेल या वार्ताहराने केले. त्यातील बलाक्लावा इथल्या लढाईचे वार्तांकन विशेष गाजले. ते ‘द चार्ज ऑफ लाइट ब्रिगेड’ म्हणून १४ नोव्हेंबर १८५४ च्या लंडनच्या ‘द टाइम्स’मध्ये छापून आले. पुढे ते टेनिसनने वाचले आणि त्याच शीर्षकाची कविता लिहिली जी वाचल्यावर कुसुमाग्रजांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ या कवितेची आपल्याला आठवण येते. त्यात असलेल्या साहित्यिक मूल्यामुळे व आवेगामुळे मूलत: ते रिपोर्टिंग आहे याकडे आपले लक्ष जात नाही. युद्धाबद्दलच्या लिखाणात व्यक्तिनिष्ठता, लघुदृष्टी, अभिनिवेश अशा अनेक कारणांमुळे खोटेपणा येणारच, याची पुरेपूर कल्पना देणारी दोन पुस्तके- ‘फॉल्सहूड इन वॉरटाइम’ हे आर्थर पॉन्सनबीचे ( Arthur Ponsonby) आणि ‘द फर्स्ट कॅज्युअल्टी’ हे फिलिप नाईटली (Knightly) यांचे – सध्याच्या वातावरणात क्रमाने वाचल्यास उद्बोधक व एकमेकाला पूरक ठरतील!

सामान्य माणूस मनाने युद्धात गुंतलेला असला तरीही रणांगणावरील डावपेचांबाबत अनभिज्ञ असतो. जबाबरदार व्यक्तींना त्याला मानसिकदृष्ट्या लढवत ठेवावे लागते. ‘फॉल्सहूड इन वॉरटाइम’ हे पुस्तक युद्धकाळातील खोटेपणाचे व्याकरण स्पष्ट करते. असत्य गोष्टीलाही युद्धकाळात किंमत असते. त्याचा उपयोग केवळ शत्रूला फसवण्यासाठीच नव्हे तर स्वत:च्या जनतेला सावरण्यासाठीदेखील असतो. मनुष्य हा काही सत्यप्रेमी प्राणी नाही. असत्य फोफावते कारण विश्वास ठेवण्याची मनुष्याची क्षमता अमर्याद आहे. अर्थात ते अल्पायुषी असते पण युद्धकाळात तेवढे पुरेसे ठरते. ‘हत्ती का माणूस माहीत नाही,’ या साध्या वाक्याने शत्रूचा एक महान योद्धा बाजूला काढला जाऊ शकतो. शरण गेलेल्या सैनिकांचे शत्रू कसे हाल करत आहे याचे टोकाचे खोटे वर्णन करावे लागते कारण आपल्या सैनिकांची शरणागती आपल्याला रोखून धरायची असते.

खोटेपणाचे काही स्तर असतात. सामान्य जनतेला खोटी पण भावनिक बातमी चालून जाते. बुद्धिजीवी लोकांसाठी मात्र बुद्धिप्रधान खोट्या बातम्या पेराव्या लागतात- पण हे फार काळजीपूर्वक करावे लागते कारण सामान्य जनतेत पसरवण्यात येणाऱ्या बातम्या फारच बटबटीत खोट्या असतील तर बुद्धिजीवींनादेखील त्यांच्यासाठीच्या बातम्यांविषयी संशय येऊ लागतो. जर्मन सेना स्वत:च्या सैनिकांची प्रेते उकळवून त्यातील चरबी साबण बनवण्यासाठी वापरत आहे, असे ब्रिटनमधील वर्तमानपत्रांनी छापले. ते खोटे होते हे नंतर युद्ध संपल्यावर त्यांनी मान्य केले. लेखकाने पहिल्या महायुद्धातील अशी बरीच उदाहरणे मांडली आहेत. बुद्धिजीवी लोक कायम वाद घालत बसतील असा एक प्रश्न म्हणजे पहिले महायुद्ध सुरू कोणी केले? ज्या राजपुत्राच्या खुनाने ते महायुद्ध सुरू झाले त्याला सार्बियन अतिरेकी गट जबाबदार होता आणि त्यांना लष्करातील लोकांनी प्रशिक्षण दिले होते. हे सगळे बाजूला पडले व युद्धाबद्दल जर्मनीला जबाबदार धरण्यात आले, असे पॉन्सनबी लिहितात.

‘फॉल्सहूड इन वॉरटाइम’मधील उदाहरणे पहिल्या महायुद्धाची असली तरी, ‘ठरवून खोट्या बातम्या पसरवून त्याचा एक शस्त्र म्हणून वापर करणे’ हाच त्याचा विषय. हे करताना मुळात खरी बातमी काय हे माहीत असायला हवे. खरी बातमी मिळवणे सोपे नसते. युद्ध वार्ताहर हा व्यवसाय म्हणून १९व्या शतकात ऊर्जितावस्थेला आला. ‘द फर्स्ट कॅज्युअल्टी’ हे पुस्तक (मूळच्या आवृत्तीत) १८५४ ते १९७५ या काळातील लढायांचा मागोवा घेते. युद्धात पहिला बळी सत्याचा जातो अशा अर्थाचे हे शीर्षक आहे. वाचताना लक्षात येते की युद्धकाळात वार्ताहर, लष्कर आणि सरकार यांच्यातील नाते गुंतागुंतीचे असते. तिघांना एकमेकांचा उपयोगही असतो तसेच अडचणही असते.

ब्रिटिश पत्रकार विल्यम रसेलने १८५० पासून प्रत्यक्ष युद्धभूमीवर उपस्थित राहून केलेले युद्धवार्तांकन थोडे निराळे होते. युद्ध फक्त सेनापतींच्या व सैनिकांच्या हातात नसते, तर सामान्य माणसालाही त्याबद्दल काही मत असू शकते हे त्याच्या वार्तांकनातून सुरू झाले. त्याच्या टीका ब्रिटिश पंतप्रधानांनी वाचल्या होत्या. एका मेजवानीत भेट झाली असता त्याला पंतप्रधानांनी विचारले, ‘‘तू सेनापती असतास तर काय केले असतेस?’’ या प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर नव्हते. पुढे भारतातील १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाबद्दलचे त्याचे निरीक्षण महत्त्वाचे होते- ‘‘ब्रिटिशांचे या देशातील दिवस फार नाहीत. त्यांनी या काळ्या लोकांच्या प्रती असलेला हीन भाव सोडावा… किंवा त्यांचा राग टोकाला जाऊन ब्रिटिशांची सत्ता म्हणजे चैन ठरेल अशा दिवसाची वाट पाहावी.’’

अमेरिकन यादवी युद्धात पीटर अलेक्झांडर या वार्ताहराची वार्तांकने प्रभावी होती. त्यांचा उपयोग जनमत झुकवण्यासाठी होत आहे हे नेत्यांच्या लक्षात आले. अब्राहम लिंकनने इंग्लंडमध्ये जनमत तयार करण्यासाठी माणसे पाठवली आणि नंतर मँचेस्टरच्या कामगारांना उद्देशून पत्रही लिहिले जे नंतर सर्व वर्तमानपत्रांनी छापले. दक्षिणेने मात्र व्हिस्की आणि सिगार देऊन आपले काम होईल असे पाहिले. यात त्यांना यशही मिळाले.

पहिल्या महायुद्धापर्यंत तारायंत्राचा शोध लागला होता. नेमका मजकूर वेगाने वर्तमानपत्राकडे पाठवणे शक्य झाले. जनता मोठ्या संख्येने साक्षर झाली. वाचणाऱ्यांची संख्या वाढली. त्या लढाया जेव्हा कुठल्यातरी दूर देशात, ज्याच्याशी आपल्या देशाचा संबंध नाही अशा ठिकाणी लढल्या जात होत्या तोवर सारे छान आणि आकर्षक होते. पण जेव्हा स्वत:चा देश त्यात गुंतलेला असे तेव्हा चित्र वेगळे होऊ लागले. वार्तांकनाला केवळ देशभक्तीची नाही तर उदात्त हेतूची झिलई चढू लागली. ब्रिटनमध्ये पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस एच जी वेल्स नामक प्रतिभावंताने तर, ‘हे साधे युद्ध नसून, शेवटचे युद्ध आहे’ अशी आरोळी ठोकली. त्याला काही युद्धावर जायचे नव्हते. पण याच युद्धात हेमिंग्वे वार्ताहर होता. तो लिहितो, ‘‘बेधुंद नरसंहार’ यापलीकडे जाऊन जो या युद्धाचे वर्णन करेल तो खोटे लिहीत आहे.’

या वार्ताहरांना प्रथम सैन्याचा, विशेषत: हर्बर्ट किचनेर या ब्रिटिश सेनपतीचा विरोध होता. पूर्वी स्वत: युद्धवार्ताहर म्हणून काम केलेल्या आणि पहिल्या महायुद्धात नौदल सांभाळणाऱ्या चर्चिलनेही युद्धवार्ताहरांना थारा दिला नाही. ‘डेली मेल’ या वर्तमापत्राचा क्रीडा विभाग बघणाऱ्या संपादकला एक घोडा विकत घेऊन सैन्याच्या युद्ध कचेरीत हजर व्हायला सांगितले गेले. पण तिथे तो आल्यावर त्याला युद्धवार्ताहर म्हणून सामावून घेण्याविषयी कुठलीही योजना सैन्याकडे नव्हती. तेव्हा त्याला हाइडपार्कमध्ये घोड्याला पळवून आणायला सांगितले. तिथे आणखी तसे बरेच वार्ताहर आपापले घोडे पळवत होते! पण नंतर युद्धात होत असलेल्या अपरिमित नरसंहाराने सैनिकांची गरज राजकीय नेत्यांना आणि सैन्याला वाटू लागली. वृत्तपत्रांच्या मालकांनाही युद्ध ही उत्तम व्यवसायसंधी होती. सामान्य लोकांच्या भाषेत युद्ध आकर्षकपणे कसे मांडावे हे त्यांना माहीत होते. त्यांना हे माहीत होते की लोकांवर तर्काचा प्रभाव पडत नसतो. लोकांना कथा हव्या असतात… मग शौर्य, देशभक्ती, त्याग असलेल्या कथांचा मारा दोन्ही बाजूंकडून सुरू झाला. शेवटी अमेरिकेतील जर्मन राजदूताला विनवणी करावी लागली की, ‘‘मित्रहो, बातम्या पाठवा, युक्तिवाद नको.’’

नुकसानीची वाच्यताच नाही!

ऑगस्ट १४ ते २५ १९१४ च्या दरम्यान, ‘केवळ अकरा दिवसांत जर्मन सेनेने तीन लाख फ्रेंच सैनिक ध्वस्त करून टाकले’ तेव्हा जेराल्ड कॅम्पबेल फ्रेंच सैन्यासह टाइम्सचा वार्ताहर होता. त्याने पाठवलेल्या वार्तापत्रात या मोठ्या घटनेचा एका शब्दानेही उल्लेख नव्हता. यानंतर सलग नऊ दिवस फ्रेंच वृत्तपत्रातही कुठलीच बातमी आली नाही. नंतर अफवा सोडण्यात आल्या की, जर्मनीत युद्धविरोधी दंगे आणि संप सुरू झाले आहेत; जर्मन सैनिकांना पिस्तुलाच्या धाकाने सीमेवर पाठवले जात आहे; एका फ्रेंच सैनिकाने पन्नास घाबरलेल्या जर्मन सैनिकांची शरणागती घेतली… वगैरे. या गोष्टी खोट्या होत्या पण एका बाजूला पॅरिस सोडण्याची तयारी करताना फ्रेंच सरकारने या अफवांमुळे तेथल्या जनतेचे मनोधैर्य टिकवून ठेवले.

स्पॅनिश युद्धात आंद्रे मालरॉ, आर्थर कोस्लर यांच्यासारखे अनेक विद्वान, कलाकार, लेखक गुंतले होते. यातील जॉर्ज ऑर्वेल याला नेमके काय घडते आहे हे दिसत होते. ‘स्टॅलिनला फ्रँकोच्या सैन्याशी लढणाऱ्यांना मदत करण्यापेक्षा स्वतंत्र विचार करणाऱ्या डाव्या लोकांना संपवण्यात रस होता’ असे वार्तांकन त्याने ‘न्यू स्टेट्समन’ला पाठवले पण त्यांनी ते छापले नाही. नंतर ‘होमेज टू कॅटालोनिया’ या पुस्तकात ऑर्वेल लिहितो : ‘‘देशभक्तीच्या गर्जना, खोटारडेपणा, जाहिरातबाजी हे सर्व जे लोक प्रत्यक्ष लढत नसतात त्यांच्याकडून होत असते आणि बऱ्याच प्रसंगी या असल्या लोकांनी, लढण्याऐवजी १०० मैल लांब पळून जाणे पसंत केले असते.’’ हे त्याचे पुस्तक कोणीही छापयला तयार झाले नाही. नंतर छापले गेले, पण ऑर्वेलच्या हयातीत त्याच्या फक्त ६०० प्रती संपल्या.

दुसऱ्या महायुद्धाच्या आधी दोन वर्षे ब्रिटनच्या मंत्रिमंडळात ‘माहिती खाते’ निर्माण करण्यात आले. या खात्याने सर्व ब्रिटिश वृत्तपत्रांना आपापले प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले. त्यातील काहीजण फ्रेंच सैन्यासह असणार होते. यातील कोणाचेच रिपोर्टिंग सेन्सॉरपासून मुक्त असणार नव्हते. नंतर लक्षात असे आले की सेन्सॉरच्या अनेक टप्प्यांतून जात बातमी वर्तमानपत्रापर्यंत पोहोचायला ४८ तास लागत. तोवर बातमीचा जीव गेलेला असे. ‘‘आय विटनेस’चे रूपांतर ‘आयवॉश’मध्ये झालेले असे’. डंकर्कच्या पराभवाचे हाऊस ऑफ कॉमन्समधील चर्चिलकृत पहिले वर्णन, ‘एक विशाल लष्करी पराभव’ असे होते. पण वृत्तपत्रांनी खेळ पालटवला. वृत्तपत्रांनी छापले, ‘‘समुद्र शांत राहून आपल्या सैन्याला मदत करत आहे, धुके आपल्या बोटींचे रक्षण करत आहे.’’ मग माघारी परतणाऱ्या ब्रिटनच्या सैनिकांच्यासाठी देशभर प्रार्थना झाल्या. न्यू यॉर्क टाइम्सने कौतुकाने लिहिले, जोवर इंग्रजी भाषा राहील तोवर डंकर्कचे हे वर्णन अभिमानाने वाचले जाईल. वृत्तपत्रांनी बातमीचे परिवर्तन दृष्टिकोनात केले. काहींनी ‘माघारीला विजय म्हणणे हास्यास्पद आहे’ असे त्याही वेळी म्हटले; पण त्यांचे कोणी ऐकले नाही.

सारेच सरकारी प्रचारात!

हिटलरच्या फौजांच्या वेगाने गणित बदलले आणि वृत्तपत्रांऐवजी रेडिओवरील रिपोर्टिंगला महत्त्व आले. सीबीएसच्या विल्यम शिररने (ज्याने पुढे ‘राइज अॅण्ड फॉल ऑफ थर्ड राइश’ – नाझी भस्मासुराचा उदयास्त- लिहिले), फ्रेंचांच्या शरणागतीचे जिवंत वर्णन रेडिओवरून साऱ्या जगाला ऐकवले. हिटलर आला कसा, त्याने सॅल्यूट कसा केला, फ्रेंच त्याच्यासमोर थिजलेल्या स्थितीत कसे बसले होते, हेसुद्धा त्याने टिपले. त्याच सुमारास ब्रिटनवर हवाई हल्ले सुरू झाले आणि बीबीसीच्या चार्ल्स गार्डनरने त्या हल्ल्याचे गच्चीवर जाऊन एखाद्या फुटबॉलच्या सामन्यासारखे समालोचन करायला सुरुवात केली, त्यामागे ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचा हेतू अमेरिकेवर प्रभाव टाकून त्या देशाला युद्धात आणण्याचा होता. काही पत्रकारांना हे दिसत होते आणि तसे ते कळवतही होते. ड्रेयू मिडलटाउन याने कळवले ‘युद्ध संपेपर्यंत चर्चिलवर ब्रिटन विश्वास ठेवेल पण त्याला शक्य तेवढ्या लवकर घालवले पाहिजे या मतांचे अनेकजण त्यांच्याच पक्षात आहेत.’ पण हे सगळे सरकारी प्रचारात बुडून गेले. अमेरिकन जनतेला भवनाप्रधान रिपोर्टिंग हवे होते. माल्कम मगरीज यांनी नंतर म्हटले, ‘‘ते सारे वीरोचित आणि अविस्मरणीय होते पण त्याचबरोबर ते खोटे, ओंगळ आणि विसरण्याजोगे होते.’’

… अपवादही आहेत!

युद्धात केवळ हिंसा, देशभक्ती, शौर्य यांचे रिपोर्टिंग होत नसते. अमेरिकन यादवी युद्धात पीटर अलेक्झांडरने अनवाणी लढणाऱ्या सैनिकांबद्दल लिहिलेच, पण दारुडे अधिकारी आणि झिंगलेल्या स्थितीत सैनिकाचा पाय आणि चाकाची लाकडी आरी यांतला फरक न ओळखणारे डॉक्टर यांच्याविरुद्ध त्याने वर्तमानपत्रातून मोहीम उघडली. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात अर्नी पाइल( Ernie Pyle) यांनी सैनिकांच्या अवस्थेचा मुद्दा लावून धरला. त्याच्या लिखाणामुळे परदेशात लढणाऱ्या अमेरिकन सैनिकांना १० डॉलरचा भत्ता सुरू झाला. एकदा त्याने सैनिकांच्या पायाला लावायच्या मलमाच्या रंगाबद्दलही लिहिले. सामान्य सैनिकाच्या अगदी लहानसहान अडचणींवर लिहायला त्याला कमीपणा वाटत नसे. एकाच वेळी ३०० वर्तमानपत्रांत व साप्ताहिकांत त्याचे लिखाण येत असे. लष्करी अधिकाऱ्यांवर त्याच्या लिखाणाचा प्रचंड दबाव होता आणि सैनिकांचा तो लाडका होता. युद्धभूमीवर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी सैनिकांनी एक पाऊल पुढे जाऊन घेतली होती. अणुबॉम्ब पडल्यावर जॉन हर्से या वार्ताहराला न्यू यॉर्करने हिरोशिमाला पाठवले. त्याचा ३०,००० शब्दांचा रिपोर्ट त्यांनी छापला. त्यात त्याने सहा माणसे निवडून त्या दिवशी त्यांच्या आयुष्यात काय घडले हे सांगितले. या वार्तांकनाला साहित्यिक दर्जा आहे.

व्हिएतनामच्या युद्धभूमीवर वार्ताहरांना बऱ्यापैकी स्वातंत्र्य होते. ते फ्रेंच आणि अमेरिकी सैनिकी तुकड्यांबरोबर असत. त्यात बर्नार्ड फॉलसारखे विद्वान पत्रकार मारले गेले. सततच्या हिंसाचाराने तिथले सैनिक हळूहळू संवेदनाहीन होत गेले. चित्रवाणी आणि छायापत्रकार (फोटो जर्नालिस्ट) यांनी व्हिएतनाम हे युद्ध गाजवले म्हणायला हवे. त्यांनी काढलेली छायाचित्रे अस्वस्थ करणारी होती. जीव धोक्यात घालून काढलेले हे फोटो विकून काहींनी पैसेही कमावले. लाइफ मासिकाने एका फोटोसाठी एक लाख डॉलर्स मोजल्याचे फिलिप नाइटली यांनी लिहिले आहे. आय. एफ. स्टोन या पत्रकाराचा त्यांच्यातील अनेकांच्यावर प्रभाव होता. प्रत्येक सरकार खोटारडे असते… अधिकृत बातम्या, सरकारी घोषणा आणि अहवाल यांतूनच खोटेपणा उघड कसा करायचा हे त्याला नेमके साधले होते. ‘सत्य हे लपलेले नसते तर ते केवळ दुर्लक्षित असते. फक्त त्याच्याकडे लक्ष वेधण्याची गरज असते,’ असे स्टोन म्हणे. अशा वार्तांकनांनी अमेरिकन व्हिएतनाम युद्धविरोधी जनमत घडत गेले.

युद्ध जेव्हा संपते त्या वेळी, विशेषत: जिंकलेल्या पक्षाच्या लक्षात येते की आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या जात होत्या त्या तशा नव्हत्या. पहिले महायुद्ध ब्रिटनने जिंकले होते. पण त्याच्या पुढच्या पिढ्यांनी ते लक्षात कसे ठेवले याविषयी The Great War and Modern Memory या पुस्तकात पॉल फुसेलने (Paul Fussell) लिहिले आहे त्याविषयी परत कधीतरी. पण अशा गोष्टी वाचल्यावर यापुढे तरी आपण आपले डोके ताळ्यावर ठेवून बातम्या पाहू अशी आशा करायला हरकत नसावी.
Kravindrar@gmail.com



Source link

बुकमार्क : ही पुस्तकं ‘बालाकोट’नंतरची…

0
बुकमार्क : ही पुस्तकं ‘बालाकोट’नंतरची…



रचना बिष्ट रावत यांनी भारतीय सैनिकांच्या (१९७१ आणि त्याही आधीपासूनच्या) शौर्याबद्दल चार पुस्तकं लिहिल्यानंतर, भारताचे पहिले संयुक्त सेनादलप्रमुख जनरल बिपीनकुमार रावत यांचं चरित्र मेहनतपूर्वक लिहिलं. लेखिकेचं हेही पुस्तक ‘पेंग्विन’नं २०२३ मध्ये प्रकाशित केलं. लेखिकेच्या आडनावातही ‘रावत’ असलं तरी या चरित्रनायकाशी त्यांचं कोणतंही नातं नव्हतं. रावत यांच्या मुली, सिमल्याच्या सेंट एडवर्ड स्कूलमधले त्यांचे तत्कालीन सोबती, विविध पदांवरचे निवृत्त सेनाधिकारी, अशांना भेटून जणू प्रत्येकाच्या तोंडून आपण जन. रावत यांच्याबद्दल ऐकत आहोत अशा शैलीत हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. पुलवामा हल्ला त्यांच्या कारकीर्दीत झाला आणि ‘बालाकोट’चा बदलादेखील. पण तो घटनाक्रम कसकसा घडला आणि त्यात जन. रावत यांची भूमिका काय होती, यावर अजिबात भर न देता, ‘मॅन बिहाइण्ड द युनिफॉर्म’ या उप-शीर्षकाला पुस्तक जागतं.

‘बालाकोट एअर स्ट्राइक- हाउ इंडिया अॅव्हेन्ज्ड पुलवामा’ या पुस्तकाचे लेखक आहेत ‘नौदलाच्या ९७ च्या बॅचचे’ आणि आता पूर्णवेळ लेखन करणारे मन्नन भट. भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर लगेच, ९ मे रोजी भट यांनी आपल्या फेसबुक वॉलवर, २०२१ सालीच प्रकाशित झालेल्या ‘बालाकोट…’च्या मुखपृष्ठाचा फोटो पुन्हा लावला आणि लिहिलं…‘वॉर रूममध्ये नियोजन कसं केलं जातं हे जाणून घ्यायचंय? बालाकोट एअर स्ट्राइकच्या वेळी केवढं बारकाईनं नियोजन केलं गेलं होतं, माहिती आहे? – मग तुमच्या हातात हे पुस्तक हवंच…’! लेखकाचा हा दावा खराही ठरतो, कारण बालाकोटमध्ये प्रतिहल्ला म्हणून कारवाई करण्याचा निर्णय, नियोजन आणि त्याचं श्रेय याबद्दल या पुस्तकात बराच मजकूर आहे. आपले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे मिग-२१ विमान कोसळूनही कसे वाचले, पाकिस्तानच्या ताब्यातून कसे सुखरूप भारतात आले, याची शौर्यगाथाही आहे… त्यामुळे विंग कमांडर अभिनंदन यांची प्रतिमा मुखपृष्ठावरही आहे. कोणाही बहुराष्ट्रीय प्रकाशन संस्थेनं बालाकोटसारख्या वीरश्रीपूर्ण विषयावर पुस्तक काढण्याची तातडी दाखवली नाही, हेही विशेषच… ‘गरुड प्रकाशन’ हे या पुस्तकाचे प्रकाशक असल्याने त्याबद्दलची जिज्ञासा बळावते. त्याचे संस्थापक संक्रांत साहू आणि अंकुर पाठक हे दोघेही आयआयटीयन असल्याचा, तसंच संक्रांत साहू हे ‘योग, क्रिया आणि ध्यान’ अशी ‘डेली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस’ करण्याच्या ‘भारतन ट्रॅडिशन्स’शी (‘भारतन’ हा शब्द ‘इंडियन’च्या ऐवजी आहे) सुपरिचित असल्याचा; तर अंकुर पाठक हे ‘आध्यात्मिक युयुत्सु (सीकर)’ आणि ‘ध्यान व प्राणायाम करणारे’ असल्याचा उल्लेख या प्रकाशनाच्या संकेतस्थळानं, या प्रत्येक संस्थापकाची ओळख फार तर १५० शब्दांत करून देतानासुद्धा आवर्जून केलेला आहे.

पण या बालाकोटच्या ‘सर्जिकल स्ट्राइक’चे खरे नायक होते ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पद सांभाळणारे ‘सुपरकॉप’ अजित डोभाल, याचा पुरेपूर तपशील देणारं आणि त्यानिमित्ताने डोभाल यांच्या कारकीर्दीतले प्रमुख टप्पे आणि या टप्प्यांमधलं यश, त्या यशासाठी डोभाल यांच्या कारकीर्दीकडे पाहूनच मिळणारा ‘मंत्र’… हे सारं चटपटीतपणे मांडणारं पुस्तक महेश दत्त शर्मा यांनी लिहिलं आहे. ‘सुपरकॉप एनएसए अजित डोभाल – अॅन इन्स्पिरेशनल बायोग्राफी’- हे या पुस्तकाचं नावही साजेसं ठरण्याचं कारण, हे रूढार्थानं चरित्र अजिबात नसून, डोभाल यांच्याकडून नव भारतीय पिढीनं काय शिकलं पाहिजे, यावर या लिखाणाचा भर आहे. ‘टॉप इन्स्पायरिंग थॉट्स ऑफ… अशी पुस्तकमालिकाच शर्मा यांनी यापूर्वी संकलित/संपादित केली असून त्यात भगत सिंग, बराक ओबामा, अझीम प्रेमजी, बेंजामिन फ्रँकलिन असं वैविध्य आहे. अर्थात, २०२२ साली अजित डोभाल यांच्याविषयीचं हे पुस्तक लिहिल्यानंतर मात्र महेश दत्त शर्मा हे चरित्रलेखनाकडे वळले आणि ‘गौतम अदानी- अ कम्प्लीट बायोग्राफी’ हे पुस्तक २०२३ मध्ये प्रकाशित झालं.



Source link

Attempt to grab land in Wagholi; case filed against four people, including a senior police inspector

0
Attempt to grab land in Wagholi; case filed against four people, including a senior police inspector



Attempt to grab land in Wagholi; case filed against four people, including a senior police inspector | वाघोलीतील जमीन बळकाविण्याचा प्रयत्न, वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल





Source link

अजितपर्व एकांकिका, स्पर्धेत ‘पाटी’ प्रथम

0
अजितपर्व एकांकिका, स्पर्धेत ‘पाटी’ प्रथम



पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘अजितपर्व’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘पाटी’ या एकांकिकेने ५१ हजार रुपयांच्या पारितोषिकासह सांघिक विजेतेपद पटकाविले. ‘शमा’ एकांकिकेला द्वितीय, ‘सखा’ एकांकिकेला तृतीय, तर ‘एका कळीची गोष्ट‘ एकांकिकेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक नाट्यगृहात झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत २२ संघांच्या एकांकिका सादर झाल्या.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, संदीप पाठक, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुके, राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, रूपाली पाटील, माजी महापौर दत्ता धनकवडे, सुभाष जगताप, आप्पा रेणुसे, बाबुराव चांदेरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे बाबासाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष नितीन धवणे, प्रदेश सरचिटणीस आदित्य संजयराव यांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

जोशी म्हणाले, ‘एकांकिकांचे प्रयोग हे फक्त स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता नवनवीन प्रयोग इतर ठिकाणी झाले पाहिजेत. दर वर्षी ही स्पर्धा घेऊन नवोदित कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. ‘मराठवाड्याच्या ग्रामीण भागात अशा प्रकारच्या सुविधा नसताना महाविद्यालयीन जीवनात भरपूर एकांकिका करत करत मी ही मजल गाठली आहे,’ असा अनुभव पाठक यांनी सांगितला.



Source link

रामराजे नाईक निंबाळकर यांची पोलिसांकडून चौकशी

0
रामराजे नाईक निंबाळकर यांची पोलिसांकडून चौकशी



सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांची त्यांच्या फलटण येथील घरी साडेतीन तास चौकशी केली. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या चौकशीच्या वृत्तामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

गोरे यांची बदनामी करणे आणि त्यांना खंडणी मागणे या प्रकरणात एका महिलेला एक कोटी रुपये खडणी स्वीकारताना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी रामराजे यांच्यासह अन्य ११ जणांना नोटीस बजावत चौकशीसाठी वडून पोलीसांकडे हजर होण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. यातील माजी आमदार घार्गे यांनी वडूज पोलिस ठाण्यात चौकशी वकिलासह हजेरी लावली होती. तर रामराजे नाईक निंबाळकर यांनी चौकशीसाठी मुदत मिळावी, अशी मागणी केली हेाती. तसेच आरोग्याचे कारण देऊन पोलिस चौकशीला येण्याचे टाळले होते. त्यानंतर आज वडूज पोलिस हे रामराजे यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले.

आज पोलिसांनी त्यांची साडेतीन तास चौकशी केली. त्याप्रमाणे त्यांचा जबाब या प्रकरणाचे तपासी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी नोंदविला. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त होता.

रामराजेंच्या चौकशीनंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. यावर रामराजेंशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.

जयकुमार गोरेंची टीकादरम्यान रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आयुष्यभर अनेक राजकीय नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा दुसऱ्याला संपविण्यासाठी खड्डा खोदतो, तेव्हा आपोआप तोच खड्डा आपल्यासाठीही तयार होतो. हीच परिस्थिती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबत निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले व्यक्त केली आहे.



Source link

man swallowed six mutton bones Sassoon hospital doctors removed them via endoscopic esophagoscopy successfully

0
man swallowed six mutton bones Sassoon hospital doctors removed them via endoscopic esophagoscopy successfully



man swallowed six mutton bones Sassoon hospital doctors removed them via endoscopic esophagoscopy successfully | अन्ननलिकेत अडकलेली हाडे बाहेर काढण्यात यश, ससूनमध्ये शस्त्रक्रिया; एंडोस्कोपी प्रक्रियेमुळे इजा न होता उपचार





Source link