Sunday, July 12, 2026
Home Blog Page 235

भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ पाटणला भर पावसात तिरंगा रॅली, शंभूराजेंसह अधिकारी, विद्यार्थी, नागरिक सहभागी

0
भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ पाटणला भर पावसात तिरंगा रॅली, शंभूराजेंसह अधिकारी, विद्यार्थी, नागरिक सहभागी



भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ पाटणला भर पावसात तिरंगा रॅली, शंभूराजेंसह अधिकारी, विद्यार्थी, नागरिक सहभागी





Source link

heavy rain in Satara for a second day flooded roads and disrupted normal life

0
heavy rain in Satara for a second day flooded roads and disrupted normal life



heavy rain in Satara for a second day flooded roads and disrupted normal life | सातारा जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, शहरातील रस्त्यांना नदी-नाल्याचे रूप





Source link

पाकिस्तानच्या टार्गेटवर असद्दुदिन ओवेसी! पाकिस्तानींना काट्यासारखं काय टोचतय?

0
पाकिस्तानच्या टार्गेटवर असद्दुदिन ओवेसी! पाकिस्तानींना काट्यासारखं काय टोचतय?


Asaduddin Owaisi: ऑपरेशन सिंदुरनंतर पाकिस्तान पुरता घाबरून गेला. या काळात देशातील नागरिक आणि एकमेकांवर सातत्याने टीका करणारे नेतेही देशासाठी एकत्र झाले.या नेत्यांपैकी एक नाव म्हणजे MIMचे नेते असदुद्दीन ओवेसी.ओवैसी यांनी देशाच्या संकटाच्या काळात देशाची बाजू जोरकसपणे मांडली.पण आता हेच औवेसी पाकच्या टार्गेटवर आल्याचं समोर येतंय.

 पाकमधले नेते, मौलवींची आता भाषाच बदलली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अचूक आखणी करत ऑपरेशन सिंदूर राबवलं. आणि दहशतवाद्यांना पोसणारा पाकचा खरा चेहरा पुन्हा समोर आणला. या सगळ्यात मुस्लीम चेहरा असलेले MIMचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी भारताची बाजू, लष्करी शौर्याचं कौतुक करत भारताच्या एकात्मतेचं दर्शन घडवलं.पण आपल्या देशाबाबतच्या असद्दुदिन ओवेसी यांच्या प्रेमामुळे पाकच्या पोटात दुखू लागलं. अनेकदा ओवेसी यांचे गोडवे गाणा-या पाकमधले नेते, मौलवी यांची आता भाषाच बदलली. औवेसी आता त्यांच्या रडारवर आले असून त्यांच्यावर पाकमधून सडकून टीका होतीये.

देशातील विविध मुद्द्यांवर ओवैसींचे सरकारशी अनेकदा आपण मतभेद पाहिलेत. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसी देशाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. हीच गोष्ट पाकिस्तानींना आता काट्यासारखी टोचत आहे.

ओवैसींवर विष ओकायला सुरुवात

ओवैसी हे देशातील त्या काही मुस्लिम नेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी पाकिस्तानला वेळोवेळी उघडं पाडलंय. मात्र तरीही पाकिस्तानी यातून धडा घेत नाहीत आणि यावेळी ते इतके पुढे गेले की त्यांनी असदुद्दीन ओवैसींवर विष ओकायला सुरुवात केली.

शिष्टमंडळ तयार

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यासाठी शिष्ठमंडळ तयार केलंय. यात एमआयएमचे नेते असद्दुदिन ओवेसी यांचाही सहभाग आहे. सध्या पाकमध्ये ओवेसींना टार्गेट केलं जात असलं तरी.भारत आणि ओवेसीही अशा पाकच्या धमक्यांना भिक घालणार नाही हे नक्की.





Source link

Dr Narlikars assistant Venkatesh Samak expressed गेली २९ वर्षे डॉ. नारळीकर सरांबरोबर

0
Dr Narlikars assistant Venkatesh Samak expressed गेली २९ वर्षे डॉ. नारळीकर सरांबरोबर


पुणे : ‘डॉ. जयंत नारळीकर हे अत्यंत सकारात्मक स्वभावाचे होते. त्यांचे काम अव्याहत सुरू होते. काही दिवसांपूर्वी कंबरेची शस्त्रक्रिया करायची असतानाही त्यांनी त्यांच्या कन्येला पी. जी. वूडहाऊसचे पुस्तक आणायला सांगितले होते. आता त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून येणार नाही. गेली २९ वर्षे त्यांच्याबरोबर असण्याची सवय झाली आहे,’ अशा भावपूर्ण शब्दांत डॉ. नारळीकर यांचे सहायक वेंकटेश सामक यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सामक म्हणाले, ‘डॉ. नारळीकर सरांच्या भेटी, लेख, पुस्तके, पत्रव्यवहार यांची जबाबदारी मी पाहत होतो. मी केवळ २२ वर्षांचा असताना सरांबरोबर काम करू लागलो. मला त्यांच्याबरोबर काम करण्याचे दडपण आले होते. मात्र, सरांनी मला खूप सांभाळून घेतले. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, ही भाग्याची गोष्ट आहे. सरांना वेगळा वेळ काढून विज्ञानकथा लेखन करावे लागले नाही. त्यांनी बऱ्याचदा विमानतळावर बसून त्यांचे लेखन केले. सरांना खूप पत्रे यायची. त्यांना ते आवर्जून उत्तरे द्यायचे. निधनाच्या आदल्या दिवशी आम्ही एकत्र होतो. त्यांची काही कामे होती. त्याबाबत पाऊण तास आमचे बोलणे झाले. असे काही होईल, असे वाटले नव्हते. मंगलाताई यांचे निधन झाल्यावर दोन वर्षे सरांसाठी अवघड होती. त्यातही ते कधी थांबले नाहीत. २००३ पर्यंत ते ‘आयुका’त संचालक म्हणून कार्यरत होते. ते निवृत्त झाल्यावरही त्यांच्याबरोबर काम करत होतो.

इलेक्ट्रॉनिक अभियंता असलेले एन. आर. जोशी यांना खगोलशास्त्रामध्ये रस आहे. ते म्हणाले, ‘मला खगोलशास्त्रात रस असल्याने ‘आयुका’च्या ग्रंथालयातील संदर्भग्रंथ वापरण्याची परवानगी हवी होती. त्याबाबत डॉ. नारळीकर यांना भेटल्यावर त्यांनी माझ्या कामाची माहिती घेऊन १९९१ ते २००१ अशी १० वर्षे मला ‘आयुका’चे ग्रंथालय वापरण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे अनेक पुस्तके, ग्रंथांचे वाचन करता आले. त्यानंतर डॉ. नारळीकर यांची दोन-तीन वेळा भेट झाली. अत्यंत आदरणीय, मोठे व्यक्तिमत्त्व होते.’

हेही वाचा

कलासक्त शास्त्रज्ञ

‘डॉ. जयंत नारळीकर हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते, ते अतिशय उत्तम रसिक होते. त्यांना विविध कला-कलाकारांविषयी महत्त्व होते. त्याचा भरपूर अनुभव ललित कला केंद्रात विभागप्रमुख म्हणून काम करताना आला. योगायोगाची गोष्ट म्हणजे, विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील गोळे बंगल्यात ‘आयुका’ची स्थापना झाली. संकुलाचे बांधकाम झाल्यावर ‘आयुका’ तिकडे स्थलांतरित झाले आणि तो बंगला ललित कला केंद्रासाठी देण्यात आला. त्याच जागेत आजही ललित कला केंद्राचा कारभार चालतो. मात्र, १९९६मध्ये ललित कला केंद्राकडे पायाभूत सुविधा नव्हत्या. एकदा केंद्रात मैफल असताना डॉ. नारळीकर दाम्पत्य आले. त्यावेळी त्यांनी काही मदत लागली तर सांगा, असे सांगितले. त्यानंतर ललित कला केंद्रात आलेले गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, इब्राहिम अल्काझी यांच्यासारखे मोठे कलाकार ‘आयुका’च्या अतिथीगृहात राहिले.

डॉ. नारळीकर यांनी आमच्या कार्यक्रमांसाठी ‘आयुका’चे सभागृह, ‘आयुका’चा परिसर खुला करून दिला. ‘आयुका’च्या सभागृहाबाहेर विनोद लव्हेकर याने नाटकाचा प्रयोग केला होता. भक्ती बर्वे या आमच्याकडे शिकवायला यायच्या, तेव्हा डॉ. नारळीकरही आवर्जून यायचे. बिखरे बिंब या नाटकाचा प्रयोग ‘आयुका’च्या सभागृहात केला होता. कलेच्या एका नव्या विभागाला विद्यापीठाशी थेट संबंधित नसलेल्या दुसऱ्या संस्थेने आपणहून मन:पूर्वक मदत करावी, त्यासाठी कोणतेही पत्र द्यावे लागले नाही, याचे मला अप्रुप होते. डॉ. नारळीकर यांच्यासारखे निर्मळ मनाचे, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व पुन्हा पाहायला मिळेल का माहीत नाही. त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली.’- डॉ. सतीश आळेकर,ज्येष्ठ नाटककार

असेही डॉ. नारळीकर

राज्य शासनाने २००१ मध्ये राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला. या सक्तीविरोधात एक जनआंदोलन सुरू झाले. या आंदोलनाची तांत्रिक बाजू सांभाळण्याचे काम मी करत होतो. पुणे या आंदोलनात अग्रभागी होते. जनरेट्यापुढे माघार घेऊन राज्य सरकारने हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यानंतर एक-दोन महिन्यांत पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांनी ‘पुणेकरांनी हेल्मेट सक्तीला विरोध करून अशास्त्रीय दृष्टिकोन दाखवला आहे.’ असे विधान केले. अर्थातच माध्यमांमध्ये त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. ते वाचून मी खूपच अस्वस्थ झालो. नारळीकरांना आपली बाजू समजावून सांगायची, असे ठरवले. ‘आयुका’मध्ये फोन करून नारळीकर सरांचा ई-मेल आयडी मिळवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

धाडस करून त्यांना एक ई-मेल पाठवून या विषयावर आमची बाजू ऐकून घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. माझ्यासारख्या सामान्य माणसाचा ई-मेल ते वाचतील, अशी मला आशा नव्हती. मात्र, त्यांनी तो ई-मेल वाचून मला दुसऱ्याच दिवशी भेटीची वेळ दिली. मी उत्साहात माझ्याकडची कागदपत्रे घेऊन ‘आयुका’मध्ये गेलो. जवळपास अर्धा तास त्यांनी माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि शेवटी ‘भारतीय परिस्थितीत हेल्मेटचा शास्त्रीय अभ्यास झाला पाहिजे,’ असे उद्गार काढले. मी लगेच त्यांना आजच्या बैठकीचे सार म्हणून त्यांचे उद्गार माध्यमांना देऊ का, असे विचारल्यावर त्यांनीही लगेच होकार दिला. त्यांचा साधेपणा, दोन्ही बाजू ऐकून घेण्याची संतुलित वृत्ती आणि नंतर कुठलाही अहंभाव न ठेवता आपले मत बदलणे यामुळे त्यांची आठवण कायमची घर करून राहिली आहे.’- विवेक वेलणकर





Source link

Sun Hole : सूर्यामध्ये लाखो किलोमीटर लांबीचा छिद्र! पृथ्वीवर धोका…; तुमच्यावर काय परिणाम होईल?

0
Sun Hole : सूर्यामध्ये लाखो किलोमीटर लांबीचा छिद्र! पृथ्वीवर धोका…; तुमच्यावर काय परिणाम होईल?


Hole in Sun : सूर्याच्या वातावरणात 10 लाख किलोमीटरपेक्षा जास्त रुंदीचा एक महाकाय असं छिद्र निर्माण झाला आहे. ज्यामुळे पृथ्वीकडे सौर वाऱ्याचा एक शक्तिशाली प्रवाह सोडला गेला आहे आणि त्यामुळे अवकाश हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांना येत्या काही दिवसांसाठी भूचुंबकीय वादळाचा इशारा देण्यात आला आहे. सूर्यमालेचा मध्य तारा म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. त्याची शक्ती अमर्याद आहे. यामुळे अनेक वेळा सौरमालेत अनेक प्रकारच्या क्रियाकलाप घडतात, ज्याचा पृथ्वीवरही परिणाम होतो. कधीकधी सौर वादळांमुळे उपग्रह संप्रेषणातही समस्या निर्माण होतात. सूर्याच्या प्रत्येक हालचालीवर शास्त्रज्ञ लक्ष ठेवतात. (hole in the sun millions of kilometers long Danger to Earth What will be the impact on you)

तुमच्यावर काय परिणाम होईल?

आपल्याला असं वाटतं की सूर्य खूप दूर आहे आणि स्थिर आहे. त्याच्या स्फोटांचा केवळ पृथ्वीच्या आकाशावरच नव्हे तर तंत्रज्ञान, दळणवळण आणि पृथ्वीवरील पॉवर ग्रिडवरही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. पण अलिकडेच, अवकाश हवामान निरीक्षकांनी एक मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, सुरतच्या वातावरणात लाखो किलोमीटर पसरलेले एक मोठे छिद्र निर्माण झाले आहे. येथून सूर्याकडून पृथ्वीकडे सौर वारा येत आहे. 

सूर्यातील या छिद्राचा अर्थ काय आहे?

कोरोनल होल ही अशी ठिकाणे आहेत जिथे सूर्याचे चुंबकीय क्षेत्र उघडतं. यातून, चार्ज केलेले कण प्रति सेकंद 700 किलोमीटर वेगाने जातात. या बुलेट स्पीड वाऱ्यांमुळे पृथ्वीवर भूचुंबकीय वादळे निर्माण होतात. सोमवारी, सूर्याच्या उत्तर गोलार्धातून एक चुंबकीय धागा उघडला, ज्यामुळे अवकाशातून पृथ्वीकडे अत्यंत धोकादायक वारे आले.

नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) नुसार, 23 मे रोजी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर एक कोरोनल मास इजेक्शन येऊ शकते, ज्यामुळे G1-क्लास भूचुंबकीय वादळाचा धोका वाढू शकतो. इंडिया टुडेच्या मते, ’20 ते 22 मे दरम्यान कमी-स्तरीय G1 वर्गाचे वादळ देखील शक्य आहे. नुकत्याच तयार झालेल्या कोरोनल होलमधून बुलेट वेगाने येणारा सौर वारा पृथ्वीवरून जाऊ शकतो. ही वादळे लहान असू शकतात पण रेडिओ संप्रेषण आणि उपग्रह ऑपरेशन्सवर गंभीर परिणाम करू शकतात.

पृथ्वीवर होणार परिणाम?

कोरोनल होलमधून येणाऱ्या सौर वाऱ्याचा पृथ्वीवर परिणाम होऊ लागला आहे.

वेगवान सौर वाऱ्यांमुळे लहान भूचुंबकीय वादळे निर्माण झाली आहेत, ज्यामुळे खूप कमी अक्षांशांवर नेत्रदीपक ऑरोरा दिसू लागले आहेत.

सध्या धोका मध्यम पातळीचा मानला जात असला तरी शास्त्रज्ञ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कारण सूर्य सध्या अत्यंत क्रियाकलापांच्या काळात आहे, ज्याला सौर कमाल म्हणतात.

या काळात, सौर ज्वाला, सूर्याचे डाग आणि स्फोट वाढतात. 





Source link

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीवर अजितदादांची नजर; उद्याच्या मेळाव्यात भुमिका स्पष्ट होणार!

0
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीवर अजितदादांची नजर; उद्याच्या मेळाव्यात भुमिका स्पष्ट होणार!


बारामती :- माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या गुरुवार, दि. २२ मे रोजी सकाळी १०.३० वाजता बारामतीतील कसबा येथील राष्ट्रवादी भवनात महत्त्वाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीबाबत अजितदादा आपली स्पष्ट भुमिका मांडणार असून इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या माहितीची पुष्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी दिली आहे.

आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया वेग घेत आहे. याच पार्श्वभूमीवर होणाऱ्या या मेळाव्याकडे माळेगाव परिसरातील राजकीय व सहकारी क्षेत्रातील सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय मिळवला. त्या वेळी त्यांनी विरोधकांनाही एकत्र आणून भूमिका बजावली होती. त्यामुळे आता माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत त्यांची काय भूमिका असते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Violation of safety regulations by Jindal Poly films in Previous accident zws 70

0
Violation of safety regulations by Jindal Poly films in Previous accident zws 70



Violation of safety regulations by Jindal Poly films in Previous accident zws 70 | याआधी दुर्घटनेत ‘जिंदाल पॉलीफिल्म्स’कडून नियमांचे उल्लंघन ; सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह





Source link

Bombay hc Quashes Non Bailable Warrant Against Arjun Rampal in Tax Evasion Case mumbai print news zws 70

0
Bombay hc Quashes Non Bailable Warrant Against Arjun Rampal in Tax Evasion Case mumbai print news zws 70



Bombay hc Quashes Non Bailable Warrant Against Arjun Rampal in Tax Evasion Case mumbai print news zws 70 | २०१९ सालचे कर चोरी प्रकरण: अभिनेता अर्जुन रामपालला उच्च न्यायालयाचा दिलासा, दंडाधिकाऱ्यांनी बजावलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द





Source link

पांथस्थचा पहिला आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा श्रीलंकेत यशस्वीपणे पार पडला; बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ऐतिहासिक स्थळांना दिली भेट

0
पांथस्थचा पहिला आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा श्रीलंकेत यशस्वीपणे पार पडला; बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ऐतिहासिक स्थळांना दिली भेट

साहस टाईम्स :- पांथस्थ या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आणि तोही आपल्या शेजारील द्वीपदेश श्रीलंकेत! वैशाखी पौर्णिमा – म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी – या अभ्यास दौऱ्याचे विशेष औचित्य साधण्यात आले होते.

बुद्ध पौर्णिमा हा दिवस सम्यक संबुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही अत्यंत पवित्र घटना घडल्या असल्याने जगभरातील बौद्ध राष्ट्रांमध्ये मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी जगभरात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

या दौऱ्यादरम्यान श्रीलंकेतील ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणांना भेटी देऊन त्याचा अभ्यास करण्यात आला. विशेष म्हणजे, श्रीलंकेची प्राचीन राजधानी अनुराधापूर येथे बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण सम्राट अशोक यांच्या कन्या थेरी संघमित्रा यांच्या हस्ते जेथे झाले होते, त्या पवित्र स्थळीच बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याचा योग पांथस्थच्या अभ्यासकांना लाभला.

या अभ्यास दौऱ्यात अनुराधापूर, पोलोनारूवा, मिहिंतले, गल विहार, गंगारामया विहार, केलानिय विहार, सिगिरिया, तसेच अलुविहार विहार या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्यात आली. दिनांक १० मे ते १६ मे २०२५ दरम्यान हा दौरा पार पडला.

भारतीय उपखंडातील बौद्ध इतिहास, संस्कृती व वारसा समजून घेण्यासाठी श्रीलंका हा देश म्हणजे जणू चालताबोलता इतिहास आहे. प्राचीन भारताचा बौद्ध संस्कृतीसह संबंध पाहायचा असेल, तर श्रीलंकेला भेट देणे अनिवार्य ठरते.

पांथस्थचा हा पहिला आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा अत्यंत यशस्वी ठरला असून, पुढील काळात अशा आणखी अभ्यासपूर्ण यात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

श्रीलंकेच्या दुसऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी नोंदणी सुरू!
जे सदस्य पुढील श्रीलंका दौऱ्यात सहभागी होऊ इच्छितात, त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp समूहात सामील व्हावे:

समूह लिंक: https://chat.whatsapp.com/B6DsgMjWtCYFSkEx6Nca0f

सुरज रतन जगताप (लेणी अभ्यासक )

सेंद्रिय शेतीच्या दिशेने मोठे पाऊल!शरद पवार यांची के. बी. उद्योग समूहास प्रेरणादायी भेट

0
सेंद्रिय शेतीच्या दिशेने मोठे पाऊल!शरद पवार यांची के. बी. उद्योग समूहास प्रेरणादायी भेट

फलटण – भारतातील सेंद्रिय शेती, वनस्पतीजन्य कीटकनाशक निर्मिती आणि निर्यातक्षम केमिकल-रेसिड्यू फ्री शेतमाल उत्पादनात अग्रगण्य ठरलेल्या के. बी. बायो ऑरगॅनिक्सके. बी. एक्सपोर्ट्स या के. बी. उद्योग समूहाच्या फलटण येथील युनिट्सना माजी केंद्रीय कृषीमंत्री मा. शरदचंद्रजी पवार यांनी त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभाताई पवार यांच्यासह दिनांक १९ मे २०२५ रोजी सदिच्छा भेट दिली.

शेती क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनातून नवसंजीवनी देणाऱ्या या संस्थेच्या प्रयोगशाळा, संशोधन प्रक्रिया आणि वनस्पतीजन्य आधारित जैविक कीटकनाशक निर्मितीचा आढावा घेताना पवार यांनी कौतुकाची थाप दिली. यावेळी कंपनीचे संचालक सचिन यादव व त्यांच्या पत्नी सुजाता यादव यांनी त्यांचे स्वागत केले.

शेतकरी बांधवांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन देऊन सेंद्रिय व निर्यातक्षम उत्पादनाकडे वळवणाऱ्या या संस्थेचे कार्य पाहताना पवार म्हणाले, “कृषी क्षेत्रात एका नावीन्यपूर्ण आणि वनस्पतींच्या अल्कोलाईड्सपासून रसायनमुक्त कीटकनाशकांच्या निर्मितीमध्ये के. बी. उद्योग समूह अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहे. ही दिशा शेतकरी आणि पर्यावरण दोघांसाठीही लाभदायक ठरेल.”

हरित क्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली खरी, मात्र रासायनिक वापरामुळे पर्यावरणीय हानी आणि निर्यातीस अडथळा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर के. बी. उद्योग समूह रसायनमुक्त शेतीसाठी यशस्वी कार्यरत असून, त्यांचं हे कार्य राज्य व देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

यावेळी जैविक शेतीच्या जागतिक बाजारातील वाढता प्रभाव, निर्यातक्षम उत्पादनांची व्याप्ती आणि भारतीय शेतकऱ्यांसाठी सामाजिक बांधिलकी यावर सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

ही भेट केवळ के. बी. उद्योग समूहासाठीच नव्हे तर महाराष्ट्र व देशाच्या कृषी क्षेत्रासाठी सेंद्रिय शेतीच्या नवयुगाची सुरुवात ठरेल, असे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.