Sunday, July 12, 2026
Home Blog Page 234

खडकवासला धरणाजवळ रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
खडकवासला धरणाजवळ रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू



पुणे : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना खडकवासला धरण परिसरात घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष माधव मते (वय ४७, रा. खडकवासला) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालक राेहित दत्तात्रय चव्हाण (रा. खडकवासला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश माधव मते (वय ४५, रा. खडकवासला) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मते हे १० मे रोजी खडकवासला धरण परिसरातून निघाले हाेते. त्या वेळी भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या मते यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मते यांचे भाऊ अविनाश यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालक रोहित चव्हाण याने मद्यप्राशन करून अपघात केल्याचे मते यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.



Source link

Piracy in India: दहशतवादाचे एकमेव कारण विचारसरणी नाही, पैसा आणि पायरसी हे देखील : माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा

0
Piracy in India: दहशतवादाचे एकमेव कारण विचारसरणी नाही, पैसा आणि पायरसी हे देखील : माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा


India Against Piracy: माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी पायरसी देश आणि समाजासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.  ‘दहशतवादी नेटवर्क केवळ विचारसरणीवर टिकत नाहीत, ते पैशावर टिकतात आणि पायरेटेड कंटेंट हा त्यांच्या सर्वात शांत स्त्रोतांपैकी एक आहे. पायरसीमुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे, असे माजी राज्यसभा खासदार डॉ. चंद्रा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एका पोस्टमध्ये आपले मत व्यक्त केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पायरसीचा काळा बाजार हजारो कोटी रुपयांचा आहे.

fallback

देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे.

अलिकडच्याच एका मीडिया रिपोर्टनुसार, देशात २२,४०० कोटी रुपयांचा चित्रपट लीक घोटाळा उघडकीस आला आहे.  रेड २, सिकंदर आणि जाट सारखे प्रमुख हिंदी चित्रपट त्यांच्या थिएटर रिलीजच्या एक दिवस आधी ऑनलाइन लीक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.  तथापि, अशा प्रकारे चित्रपट लीक होणे यात चित्रपट क्षेत्रातील आतील व्यक्तींचाच  सहभाग असल्याचे अंगुली निर्देश करत आहे. पायरसीतून मिळवलेले पैसे दहशतवाद पसरवण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

मीडिया पार्टनर्स एशियाच्या विश्लेषणानुसार, जागतिक स्तरावर, भारत ९०.३ दशलक्षाहून अधिक युजर्ससह ऑनलाइन व्हिडिओ पायरसी मार्केटमध्ये अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर इंडोनेशिया (४७.५ दशलक्ष) आणि फिलीपिन्स (३१.१ दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो.

 

‘दहशतवादामागे पैसा आणि पायरसी’

पायरसी केवळ मनोरंजन उद्योगाचेच नाही तर संपूर्ण देशाचे नुकसान करते. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, मे २०२५ मध्ये त्यांच्या नियोजित सिनेमा प्रीमियरच्या एक दिवस आधी अनेक चित्रपट लीक झाले होते.

त्याच वेळी, EY-IAMAI अँटी-पायरसी स्टडी २०२४ म्हणजेच द रॉब रिपोर्टनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून एक मोठा घोटाळा सुरू आहे. रिलीजनंतरच्या नेहमीच्या पायरसीपेक्षा वेगळे असलेले हे सुरुवातीचे लीक भारतीय चित्रपट उद्योगात गंभीर चिंता निर्माण करत आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान 

EY-IAMAI आणि ET च्या खुलाशानुसार, २०२३ मध्ये भारतीय मीडिया उद्योगाला पायरसीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. खेदाची बाब म्हणजे सरकार आणि पोलिसांनी या संदर्भात उचलेली सर्व पाऊले अपुरी पडत आहेत.





Source link

मराठवाड्यात पुराची सूचना ‘ड्रोन’ च्या साहाय्याने देण्याच्या हालचाली; मान्सूनपूर्व बैठकीत चर्चा

0
मराठवाड्यात पुराची सूचना ‘ड्रोन’ च्या साहाय्याने देण्याच्या हालचाली; मान्सूनपूर्व बैठकीत चर्चा



छत्रपती संभाजीनगर : पूर नियंत्रणाची सूचना देण्यासाठी दवंडी देण्याची जुनी प्रथा मोडीत निघणार असून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ‘ड्रोन’ च्या आधारे सूचना देणारे ध्वनिवर्धक वापरले जाणार आहेत. संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पातळीवर असे ‘ड्रोन’ उपलब्ध असून अन्य हिंगोली, परभणी, बीड जिल्ह्यात असे ड्रोन घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ड्रोनच्या आधारे पूररेषेबाहेरील काही गावांमध्येही धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना देता येऊ शकेल, अशी चर्चा मान्सून पूर्व आढावा बैठकीत करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर विभागात ६५५ गावे पूरप्रवण आहेत. याशिवाय काही गावांमध्येही सूचना द्यावयाची असल्याने सुमारे १ हजार २०० पेक्षा अधिक गावात सूचना द्याव्या लागतात. एवढ्या गावांना सूचना देण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर घेण्यात आलेल्या ड्रोनचा उपयोग करता येऊ शकेल, अशी सूचना नांदेडचे पाेलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केली. तसेच संभाजीनगरमध्येही अशा प्रकारची यंत्रणा तयार असल्याचे सांगण्यात आले. ‘ड्रोन’ च्या साहाय्याने सूचना देणे आता शक्य असल्याने अन्य जिल्ह्यात पोलीस उपविभागीय स्तरावर ‘ड्रोन’ खरेदी करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.

मराठवाड्यात गोदावरी, बोर, खाम, दुधना, मासोळी, करपरा, पूर्णा, पैनगंगा, मांजरा, रेणा, सिंदफणा, बिंदुसरा, तेरणा, बोरी आदी नद्या आहेत. यामध्ये पैठण येथील नाथसागर आणि नांदेड येथील विष्णुपुरी येथून होणारा विसर्ग तसेच गोदावरी नदीतील उच्च पातळी बंधाऱ्यावरून होणारा विसर्ग याची माहिती पूरस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मिळावी म्हणून ड्रोनचा वापर केला जाईल. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या जातील, असा निर्णय मान्सूनपूर्व आढावा बेठकीत घेण्यात आला.

बीडमधील वीज अटकाव यंत्राची तपासणी

मराठवाड्यात सर्वाधिक वीज अटकाव यंत्र बीड जिल्ह्यात असून त्याचा खरोखर लाभ होतो का, याची तपासणी करून त्याचे विश्लेषण करण्याचे आदेशही विभागीय आयुक्तांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या यंत्राचा खरोखर प्रभाव पडतो का, अधिक अटकाव यंत्रे असणाऱ्या भागात वीज पडली होती का, हे तपासून पाहिले जाणार आहे. या यंत्राचा प्रभाव असेल तर या यंत्राची संख्याही वाढवता येऊ शकेल, असेही गावडे म्हणाले. मराठवाड्यात ८७५ धरणे असून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्या यंत्रणेने काय काम करावे, या बाबतच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.



Source link

कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

0
कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा



मुंबई : राज्यात वळिवाच्या पावसाने जोर धरला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस कोकणात, तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात मागील दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. पावसाने मंगळवारी दाणादाण उडवली होती. दरम्यान, पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.

वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचाच परिणाम म्हणून कोकण, घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पावसा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावेळी वेगवान वाऱ्यांसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबईसह राज्याच्या काही भागात पडणारा हा वळिवाचा पाऊस आहे. त्याला मोसमी पाऊस म्हणता येणार नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

पावसाचा अंदाज कुठे गडगडाटासह वादळी पाऊस

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार,जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर
मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर

सोसाट्याचा वारा, विजांसह पाऊस

अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ

सर्वाधिक पावसाची नोंद सावंतवाडीत

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत म्हणजेच मंगळवारी सकाळी ८:३० ते बुधवार सकाळी ८:३० पर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे झाली. तेथे १३० मिमी पावसाची नोंद झाली. अनेक भागात मंगळवारी पावसाने जोर धरला. काही भागात पाऊस संपूर्ण दिवसभर कोसळत होता. तर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सायंकाळनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. सावंतवाडीबरोबरच मालवण येथे ११४ मिमी, रामेश्वर ११८.८ मिमी, रोहा ७८ मिमी, देवरुख ९५ मिमी आणि चिंचवड येथे १०१ मिमी पावसाची नोंद झाली.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला

नैऋत्य ेमोसमी वाऱ्यांनी बुधवारी श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे. मोसमी पावसाने बुधवारी दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात प्रगती केली. मालदीव आणि कोमोरिनच्या आणखी काही भागात मोसमी पाऊस दाखल झाला. तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातही मोसमी पावसाने वाटचाल केली. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे नैऋत्य मोसमी वारे रविवारपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.



Source link

MI vs DC: रोहित शर्मा स्टँडसमोर ‘हिटमॅन’ स्वस्तात माघारी; पत्नी रितिकाची ‘ती’ रिॲक्शन व्हायरल

0
MI vs DC: रोहित शर्मा स्टँडसमोर ‘हिटमॅन’ स्वस्तात माघारी; पत्नी रितिकाची ‘ती’ रिॲक्शन व्हायरल



Ritika Sajdeh Reaction on rohit sharma wicket during mi vs dc match| रोहित शर्मा स्टँडसमोर ‘हिटमॅन’ स्वस्तात माघारी; पत्नी रितिकाची ‘ती’ रिॲक्शन व्हायरल





Source link

सदैव जागरूकता हाच दहशतवादावर उपाय

0
सदैव जागरूकता हाच दहशतवादावर उपाय



देशात २१ मे हा दहशतवादविरोधी दिन. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची या दिवशी हत्या झाली. नुकताच झालेला पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे त्याला दिलेले प्रत्युत्तर याने दहशतवाद ही समस्या किती गंभीर आहे, याची जाणीव सर्वांना पुन्हा एकदा झाली. या पार्श्वभूमीवर ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’मधील संचालक मेजर जनरल (नि.) नितीन गडकरी यांच्याशी प्रसाद श. कुलकर्णी यांनी साधलेला संवाद.

दहशतवादाच्या आव्हानांचा सामना सुरक्षा दले करीत असताना नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी?

दहशतवादाचा सामना सरकार एका नीतीद्वारे करीत असते. सुरक्षा दलेही एका सुनियोजित पद्धतीने दहशतवाद्यांचा निःपात करीत असतात. या साऱ्या रणनीती सर्वांसमोर उघड करता येत नाहीत. लोकांनी सरकार आणि सुरक्षा दलांच्या पाठीशी कसलीही शंका उपस्थित न करता भक्कमपणे उभे राहावे. सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना लोकांचा भक्कम पाठिंबा असेल, तर दहशतवादी आपले काहीही वाकडे करू शकणार नाहीत. दहशतवादाच्या बाबतीत आपण कुठे आहोत, याचा विचार केला, तर एक नक्की लक्षात घ्यावे लागेल, की कलम ३७० रद्द केल्यानंतर दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत. सुरक्षा दले आपले कर्तव्य बजावत असताना नागरिकांनीही एक जबाबदार नागरिक म्हणून राहिले पाहिजे. असे म्हणतात, की If you want the soldier fight for you, be worth the man fight for नागरिकांनी आपले कर्तव्य बजावत राहिले पाहिजे.

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आली. मात्र, सुरक्षा या विषयाच्या बाबतीत अधिक जागरूकतेची गरज आहे का?

आपल्याकडे सुरक्षा, दहशतवाद या विषयावर अधिक जागरूकतेची गरज नक्की आहे. दहशतवादी घटना घडल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येतात. मात्र, दहशतवाद म्हणजे नक्की काय, याची संकल्पनात्मक पातळीवरील माहिती समजून घेण्यात नागरिकांमध्ये फारशी जागरूकता दिसत नाही. संरक्षण क्षेत्रातील जागरूकतेबाबत उदाहरणच द्यायचे झाले, तर संरक्षण तंत्रज्ञान हा विषय पुण्यातील ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीसारख्या (डीआयएटी) अतिशय कमी संस्थांमध्ये शिकविला जातो. हा विषय अधिकाधिक ठिकाणी शिकवून त्याची व्याप्ती वाढवायला हवी. देशप्रेमाचे संस्कार घरातूनच व्हायला हवेत. घरातून देशप्रेमाचे बीज रोवले, तर मोठेपणी त्याचे वृक्षात रूपांतर नक्कीच होईल.

दहशतवाद म्हणजे फक्त हिंसाच, की आणखी काही?

  • दहशतवादाचे रूप आज वेगळे आहे. जो लोकांना मारतो, तोच फक्त दहशतवादी नसतो. दहशतवादी विचारसरणीचा प्रभाव एखाद्याच्या मानसिकतेवर पडावा, यासाठी प्रयत्न करणाराही दहशतवादीच असतो. आपण काय करीत आहोत, ते का करीत आहोत, आपल्यासमोर काही ध्येय आहे का हे आपल्याला माहीत असायला हवे. देशभक्ती, देशप्रेम ही भावना प्रत्येकात असायला हवी. तसे चित्रपटही तयार व्हायला हवेत. आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भेद नकोत. धर्म, जातीवरून भेदभाव नुकसानच करते.

सार्वजनिक ठिकाणी लोकांनी काय काळजी घ्यायला हवी?

  • दहशतवादाचे संकट आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. बाहेरून आलेले दहशतवादी आपल्या आसपासही असू शकतात. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहून, आपण कोणाशी बोलत आहोत, काय बोलत आहोत, याची एक जबाबदार नागरिक म्हणून जाणीव ठेवणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला कोण राहते, बाहेर वावरताना एखाद्या व्यक्तीचे वागणे संशयास्पद तर नाही ना, याकडे लक्ष हवे. आपली पोलीस दले आणि संरक्षण दले मजबूत आहेत. नागरिकांनी सुरक्षेच्या बाबतीत अधिक जागरूकता दाखवून काही संशयास्पद बाबी दिसल्या, तर पोलिसांना हेल्पलाइन क्रमांकावर लगेच माहिती दिली पाहिजे. मीच कशाला पुढाकार घेऊ, मला काय त्याचे, ही भूमिका उपयोगाची नाही. आपल्या घरापर्यंत संकट येत नाही, तोपर्यंत काही करणार नाही, अशी भूमिका चुकीची असते. अशामुळे देश धोक्यात येऊ शकतो. आपण एक असू, सुरक्षेच्या बाबतीत जागरूक असू, तर दहशतवादी काहीही करू शकणार नाहीत. आसपास होणाऱ्या घडामोडींकडे नागरिकांनी बारकाईने पाहणे महत्त्वाचे ठरते.



Source link

Air India EXPRESS चा बंपर ऑफर! 1250 रुपयांत विमान तिकीट करा बुक! परदेशात जाण्यासाठीही लागणार इतकं कमी भाडं

0
Air India EXPRESS चा बंपर ऑफर! 1250 रुपयांत विमान तिकीट करा बुक! परदेशात जाण्यासाठीही लागणार इतकं कमी भाडं


Air India Express Flash Sale : तुम्ही विमान प्रवास करायचा आहे, मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने मर्यादित कालावधीसाठी ‘फ्लॅश सेल’ची घोषणा केली आहे. या बंपर ऑफर अंतर्गत, देशांतर्गत विमान प्रवासाचे भाडे फक्त 1250 रुपयांपासून सुरू होणार आहे. याचा अर्थ. म्हणजेच, देशभरातील एका शहरापासून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी विमान प्रवासाचे भाडे फक्त 1250 रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, परदेशात जाण्यासाठी बुकिंग देखील 6131 रुपयांपासून सुरू होत आहे. दोन्ही प्रकारचे बुकिंग तुम्हाला 25 मे 2025 पर्यंत करायचे आहे. त्यामुळे विमान प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी गमवू नका. (Air India EXPRESS bumper offer Book a flight ticket for Rs 1250 Fares so low that you can even travel abroad)

वेबसाइटने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, देशांतर्गत मार्गांवर एक्स्प्रेस लाइट हवाई प्रवासाचे भाडे रु. पासून सुरू होते. 1250 या श्रेणीमध्ये चेक-इन बॅगशिवाय फ्लाइट तिकिटाचा पर्याय आहे. तर एक्सप्रेस व्हॅल्यूचे भाडे 1375 रुपयांपासून सुरू होते. एअर इंडिया एक्स्प्रेस वेबसाइट, मोबाईल अॅप आणि इतर प्रमुख बुकिंग प्लॅटफॉर्मद्वारे तिकीट बुकिंग करता येते.

त्याच वेळी, फ्लॅश सेल अंतर्गत, आंतरराष्ट्रीय मार्गांवर एक्स्प्रेस लाइटचे भाडे 6131 रुपयांपासून सुरू होते. त्याचप्रमाणे, एक्स्प्रेस व्हॅल्यू आणि एक्स्प्रेस फ्लेक्ससाठी ऑफर अनुक्रमे 6288 रुपये आणि 7,038 रुपयांपासून आहे. परदेशी उड्डाणांसाठीच्या या ऑफर फक्त 6, 12 आणि 20 ऑगस्ट 2025 च्या तिकिटांसाठी वैध आहेत. 

कंपनीने असेही म्हटलं आहे की airindiaexpress.com या वेबसाइटद्वारे केलेल्या एक्सप्रेस लाइट बुकिंगवर ते कोणतेही सुविधा शुल्क आकारत नाही. एक्स्प्रेस लाईट बुकिंग अंतर्गत, कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 3 किलो वजनाची अतिरिक्त केबिन बॅग प्री-बुक करण्याचा पर्याय आहे. त्याच वेळी, देशांतर्गत उड्डाणांमध्ये 15 किलोच्या बॅगेसाठी 1000 रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 20 किलोच्या बॅगेसाठी 1300 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

या लोकांसाठी खास ऑफर 

याशिवाय, एअर इंडिया एक्स्प्रेस वेबसाइटवर निष्ठावंत सदस्यांसाठी उत्तम ऑफर दिल्या जात आहेत. लॉग इन केलेल्या सदस्यांना 10 किलो अतिरिक्त चेक-इन बॅग आणि 3 किलो अतिरिक्त कॅरी-ऑन बॅगवर 25% सूट मिळेल. कंपनी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, परिचारिका, लष्करी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विशेष सवलती आणि फायदे देखील देत आहे.





Source link

भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ पाटणला भर पावसात तिरंगा रॅली, शंभूराजेंसह अधिकारी, विद्यार्थी, नागरिक सहभागी

0
भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ पाटणला भर पावसात तिरंगा रॅली, शंभूराजेंसह अधिकारी, विद्यार्थी, नागरिक सहभागी



भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ पाटणला भर पावसात तिरंगा रॅली, शंभूराजेंसह अधिकारी, विद्यार्थी, नागरिक सहभागी





Source link

heavy rain in Satara for a second day flooded roads and disrupted normal life

0
heavy rain in Satara for a second day flooded roads and disrupted normal life



heavy rain in Satara for a second day flooded roads and disrupted normal life | सातारा जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, शहरातील रस्त्यांना नदी-नाल्याचे रूप





Source link

पाकिस्तानच्या टार्गेटवर असद्दुदिन ओवेसी! पाकिस्तानींना काट्यासारखं काय टोचतय?

0
पाकिस्तानच्या टार्गेटवर असद्दुदिन ओवेसी! पाकिस्तानींना काट्यासारखं काय टोचतय?


Asaduddin Owaisi: ऑपरेशन सिंदुरनंतर पाकिस्तान पुरता घाबरून गेला. या काळात देशातील नागरिक आणि एकमेकांवर सातत्याने टीका करणारे नेतेही देशासाठी एकत्र झाले.या नेत्यांपैकी एक नाव म्हणजे MIMचे नेते असदुद्दीन ओवेसी.ओवैसी यांनी देशाच्या संकटाच्या काळात देशाची बाजू जोरकसपणे मांडली.पण आता हेच औवेसी पाकच्या टार्गेटवर आल्याचं समोर येतंय.

 पाकमधले नेते, मौलवींची आता भाषाच बदलली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अचूक आखणी करत ऑपरेशन सिंदूर राबवलं. आणि दहशतवाद्यांना पोसणारा पाकचा खरा चेहरा पुन्हा समोर आणला. या सगळ्यात मुस्लीम चेहरा असलेले MIMचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी भारताची बाजू, लष्करी शौर्याचं कौतुक करत भारताच्या एकात्मतेचं दर्शन घडवलं.पण आपल्या देशाबाबतच्या असद्दुदिन ओवेसी यांच्या प्रेमामुळे पाकच्या पोटात दुखू लागलं. अनेकदा ओवेसी यांचे गोडवे गाणा-या पाकमधले नेते, मौलवी यांची आता भाषाच बदलली. औवेसी आता त्यांच्या रडारवर आले असून त्यांच्यावर पाकमधून सडकून टीका होतीये.

देशातील विविध मुद्द्यांवर ओवैसींचे सरकारशी अनेकदा आपण मतभेद पाहिलेत. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसी देशाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. हीच गोष्ट पाकिस्तानींना आता काट्यासारखी टोचत आहे.

ओवैसींवर विष ओकायला सुरुवात

ओवैसी हे देशातील त्या काही मुस्लिम नेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी पाकिस्तानला वेळोवेळी उघडं पाडलंय. मात्र तरीही पाकिस्तानी यातून धडा घेत नाहीत आणि यावेळी ते इतके पुढे गेले की त्यांनी असदुद्दीन ओवैसींवर विष ओकायला सुरुवात केली.

शिष्टमंडळ तयार

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यासाठी शिष्ठमंडळ तयार केलंय. यात एमआयएमचे नेते असद्दुदिन ओवेसी यांचाही सहभाग आहे. सध्या पाकमध्ये ओवेसींना टार्गेट केलं जात असलं तरी.भारत आणि ओवेसीही अशा पाकच्या धमक्यांना भिक घालणार नाही हे नक्की.





Source link