


कोविड-१९ चा नवीन व्हेरियंट JN.1 हा ओमिक्रॉनचा उपप्रकार आहे. तो हळूहळू आशियाच्या अनेक भागात पसरत आहे. सिंगापूर, हाँगकाँग, भारत आणि थायलंडमध्ये या नव्या व्हेरियंटचे अनेक रुग्ण आढळले आहेत. भारतात अद्याप परिस्थिती गंभीर झाली नसली तरी तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सध्या भारतात या नव्या व्हेरियंटच्या प्रसाराची पुष्टी झालेली नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे असतात. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक, वृद्ध किंवा आजारी लोकांमध्ये लक्षणे अधिक सामान्य असू शकतात.
22 Superintendent of Police Deputy Commissioner transferred : राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, रायगड पोलिस अधीक्षकांची अचानक बदली करण्यात आल्याने भूवया उंचावल्या आहेत. रायगड पोलिस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलिस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची रायगड नंतर आता अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. राज्यात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे.
दरम्यान, धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचं आव्हान असणार आहे. माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना नवीन नियुक्ती मिळालेली नाही. स्वतंत्रपणे त्यांचा नियुक्ती देण्यात येणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..


पनवेल: नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम सेवेच्या बसमध्ये महिन्याभरापूर्वी एक प्रेमीयुगल अश्लिल चाळे करतानाची चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरली होती. याच प्रकरणानंतर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम सेवेच्या (एनएमएमटी) बससेवेचा असाही वापर अशा पद्धतीची टिका टिप्पणी समाजमाध्यमांवर चर्चेला आली होती. तातडीने एनएमएमएटी प्रशासनाने वाहकाला दोषी मानत कामावरुन कमी केले. विशेष म्हणजे याच वाहकाच्या फीर्यादीनंतर कामोठे पोलीस ठाण्यात संबंधित प्रेमी युगलाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी त्या प्रेमी युगलाचा शोध घेऊन त्यांना नोटीस बजावली. या प्रेमी युगलांनी न्यायालयासमोर त्यांनी स्वताची चूक कबूल केल्यानंतर या दोघांनाही प्रत्येक दोन हजार रुपयांच्या दंड ठोठावून सोडण्यात आले.
१८ एप्रिलची ही घटना आहे. सायंकाळी पावणेसहा वाजण्याची वेळ होती. पनवेल रेल्वेस्थानकासमोर असणा-या एनएमएमटीची कल्याण मार्गावर धावणारी बस अर्धवट टप्पा वाहतूकीसाठी आयजीपीएल थांब्यापर्यंत तळोजापर्यंत सोडण्यात आली. बसचे ३५ वर्षीय वाहक सोमनाथ जाधव हे बसमध्ये कमी प्रवासी घेऊन रेल्वे स्थानकासमोरुन निघाले. आसूडगाव आगारापर्यंत बस येईपर्यंत बसमध्ये ८ ते ९ प्रवासी बसले होते. याच बसमध्ये कमी प्रवासी संख्या असल्याने बसची मागील आसने रिकामी होती. याच आसनावर संबंधित १९ वर्षांचे प्रेमी युगल बसले होते. या दोघांनी एक फुल एक अर्धे असे २७ रुपये देऊन तिकीट घेतले होते. बसला दोन दरवाजे असले तरी पुढचा दरवाज्यातून प्रवाशांची येजा असल्याने वाहक जाधव हे पुढच्या दरवाज्याशेजारी उभे होते.
बस कळंबोली सर्कलपर्यंत आल्यावर या प्रेमीयुगलाचे अश्लिल चाळे सुरू असतानाची चित्रफीत त्याच सर्कलच्या इतर मार्गावर सिग्नलवर उभ्या असणा-या इतर प्रवाशाने बनवली होती. तब्बल चार दिवसांनी ही चित्रफीत समाजमाध्यमावर वा-यासारखी पसरल्यानंतर या प्रकरणात जेवढी चर्चा प्रेमी युगलांची झाली तेवढीच चर्चा एनएमएमटी बससेवेची झाली. नवी मुंबई महापालिकेच्या काही अधिका-यांनी या प्रकरणावर तातडीने पडदा टाकावा यासाठी संबंधित वाहकाला नोकरीवर न येण्याच्या सूचना दिल्या. तोपर्यंत नवी मुंबईचे पोलीस दलाला जाग आली होती. समाजमाध्यमांवर चर्चा असणारी ही बस शोधून काढून हा प्रकार जेथे घडला तेथे गुन्हा नोंदविण्याच्या सूचना पोलीस दलाच्या वरिष्ठांकडून आल्यामुळे कामोठे पोलीस ठाण्यात याबाबत २२ एप्रिलला गुन्हा नोंद करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या वाहकाला कामावरुन काढून टाकण्यात आले तोच या प्रकरणाचा फीर्यादी आहे.
पोलीस दफ्तरी हे प्रकरण नोंदवल्यावर वरिष्ठ पोलीस निरिक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत तायडे यांनी या प्रकरणातील प्रेमी युगलांपैकी एका तरुणाला उसाटणे गावातून आणि पेणधर गावात राहणा-या मुलीचा शोध लावून २६ एप्रिलला या दोघांनाही कायदेशीर कारवाई संदर्भात नोटीस बजावली. हा तरुण पहिले एका रक्तपेढीत कामाला होती. तर संबंधित मुलगी वैद्यकीय क्षेत्रात कामाला होती. दोघेही उत्तरप्रदेश या राज्यातील मूळ राहणारे आहेत. दोघांची ओळखीनंतर प्रेम झाले. काही महिने हा कामानिमित्त इतर ठिकाणी गेला होता. एप्रिल महिन्यात तो तरुण तळोजात परत आल्यानंतर त्याने या मुलीची भेट घेतली. आणि भेटीनंतर १८ एप्रिलला हे दोघे पहिले पनवेल रेल्वेस्थानकाजवळील उद्यानात भेटले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
त्यानंतर ते घरी जात असताना बसमधील गंभीर प्रकार त्यांच्याकडून घडला. १६ मे रोजी या दोघांनीही न्यायालयासमोर स्वताची चूक कबूल केल्यानंतर न्यायाधीशांनी त्या दोघांना चार हजार रुपयांचा दंड भरुन सोडून दिले. न्यायालयाने प्रेमी युगलांना सोडून दिल्याचे समजल्यानंतर एनएमएमटी प्रशासनाने सुद्धा वाहक जाधव यांना कामावर परत रुजू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. वाहक जाधव हे मागील १० वर्षांपासून एनएमएमटीमध्ये कार्यरत आहेत. २४,५०० रुपयांचे ठोक मानधनावर काम करणारे जाधव हे पत्नी पाच आणि सव्वा वर्षांच्या दोन मुलासोबत खोपोली येथे राहतात. अचानक नोकरीवरुन काढून टाकल्याने तेही या प्रकरणात पालिका आयुक्त कधी न्याय करतात याकडे लक्ष लावून आहेत.

मंगळवारी सकाळी गुलाबी बाग पोलीस ठाण्याला एक फोन आला होता. फोन करणाऱ्याने अंध मुघल परिसरातील एका घराच्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडला असल्याची माहिती दिली.
Source link


Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून मन भावुक होते तर काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने त्याच्या पुतणीबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची पुतणी त्याला मिठी मारत रडताना दिसत आहे. तो त्याने पुतणी का रडत असल्याचे कारण सांगितले आहे. हे कारण ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या तरुणाजवळ त्याची पुतणी उभी आहे आणि ती रडताना दिसत आहे. तेव्हा हा तरुण पुतणीला समजून सांगताना दिसत आहे.
तरुण म्हणतो, “आम्ही खूश आहे.. एवढ्यात आम्ही खूश आहे” तो पुढे कोणाला तरी हसत म्हणतो, “व्हिडीओ कशाला करतेस?”
पुतणी मात्र रडताना दिसते.
पुतणी म्हणते, “मला ८० तरी पाहिजे होते”
तेव्हा तरुण मजेत म्हणतो, “आपण वाढवून देऊ या ८०. पेनाने आपण करून देऊ या ८०.”
पण पुतणीचे रडणे थांबत नाही. या व्हिडीओवर लिहिलेय, “माझ्या पुतणीला १० वीला ७९.८० टक्के पडले. तिला ८० टक्के पडले नाही म्हणून रडत होती आणि आम्ही एक होतो पास झाल बास झालं”
akash_lokhande_007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्ही कराडकर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पोरीला २० पॉईंट साठी रडवणाऱ्या बोर्डाचा जाहीर निषेध. दिदे तुझ्या टक्यात आनंदाने २ पोर पास झाली असती …. समाधानी रहा चांगले मार्क्स आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “बाई मला ४७ टक्के पडले होते. संपूर्ण भाऊकीला पेढे वाटले होते मी” आणखी एका युजरने लिहिलेय, “रिचेकिंग फॉर्म भरा..” एक युजर लिहितो, “अरे ७९.८० म्हणजे ८०% आहेत ते.. अभिनंदन बाळा” तर एक युजर लिहितो, “अभिनंदन दिदी प्रयत्न केला आहे ना.. नाराज होऊ नकोस. या वेळेस ७९ टक्के घेतलेस ना बारावीला तुला ९० टक्के पडतील.” अनेक युजर्सनी त्यांचे दहावी बारावीचे टक्के सांगत चिमुकलीला नाराज होऊ नको असा सल्ला दिला आहे. काही युजर्सनी चांगले मार्क्स मिळाल्याचे सुद्धा सांगितले आहे. हा व्हिडीओ जवळपास एक लाख लोकांनी लाइक केला आहे.

