Sunday, July 12, 2026
Home Blog Page 231

रेवा राजेश पांडे लिखित पारंपारिक खेळ पुस्तक प्रकाशनात झाला आपले आंगण चा सन्मान; पालकांनी आपल्या आपल्या मुलांना पारंपारिक खेळांची ओळख करून द्यावी- अनिल बेलकर यांचे आव्हान !

0
रेवा राजेश पांडे लिखित पारंपारिक खेळ पुस्तक प्रकाशनात झाला आपले आंगण चा सन्मान; पालकांनी आपल्या आपल्या मुलांना पारंपारिक खेळांची ओळख करून द्यावी- अनिल बेलकर यांचे आव्हान !

पुणे : राजेश पांडे यांच्या कन्या व युवा लेखिका रेवा पांडे लिखित ‘ पारंपारिक खेळ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात नव्या पिढीतील मुलांना लुप्त होतं चाललेल्या जुन्या खेळाविषयी माहिती करून देण्यात आली. प्रसंगी पराग काळकर व किरण केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू शकुंतला खटावकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
या प्रकाशन सोहळ्यात विजेंद्र चाबुकस्वार, अनिल बेलकर व संकेत थोपटें यांचा ही विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

काही दिवसापूर्वी कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांच्या वाढदिवसानिमित्त विजयेंद्र चाबुकस्वार, अनिल बेलकर व संकेत थोपटे यांच्या कल्पनेतून व समर्थ बेलकर ,जिगर शहा व सहकारी यांच्या नियोजनातून स्पर्धेच्या आधुनिक युगात लहान मुलांना आपल्या पारंपारिक खेळांची ओळख व्हावी म्हणून ‘आपले आंगण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .ज्यांला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
सदर कार्यक्रमाचे निमंत्रण पुणे बुक फेस्टिवलचे प्रमुख व भारतीय जनता पार्टीचे नेते राजेशजी पांडे यांना देताना त्यांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले व असा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर राबवला गेला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन आमदार हेमंत रासने प्रतिष्ठान च्या सदस्यांना दिले.

याच पार्श्वभूमीवर राजेश पांडे यांनी पुढाकार घेऊन पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुणे बाल पुस्तक जत्रेच्या कार्यक्रमात आपले आंगणचा समावेश केला. २२ मे पासून २५ मे पर्यंत चिमुकल्यांना गणेश कला,कला क्रीडा मंच स्वारगेट,पुणे येथे सायंकाळी ४ ते ६ आपल्या पारंपारिक खेळांचा आनंद घेता येणार आहे.

स्मार्ट फ़ोन च्या जमान्यात आपल्या मातीशी,पारंपारिक खेळांशी नाळ नवीन पिढीशी जोडली जावी या उद्दिष्ठाने आम्ही आपले आंगण हा उपक्रम राबवला होता ज्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.भविष्यात अनेक ठिकाणी आम्ही हा उपक्रम राबवला जाणार आहे,ज्यात पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलांना आपल्या मातीशी जुन्या पारंपारिक खेळांशी ओळख करून द्यावी असे आव्हान अनिल बेलकर यांनी केले.

Anil Parab says Shivsena UBT positive to make Alliance with MNS now Raj Thackeray Has to take decision

0
Anil Parab says Shivsena UBT positive to make Alliance with MNS now Raj Thackeray Has to take decision



Anil Parab says Shivsena UBT positive to make Alliance with MNS now Raj Thackeray Has to take decision | “आम्ही प्रतिसाद दिला, आता राज ठाकरे…”, मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर अनिल परबांचं सूचक वक्तव्य





Source link

‘Hera Pheri 3’ मधून परेश रावल बाहेर पडताच झाली ‘या’ ॲक्टरची एंट्री, नाव ऐकून व्हाल खुश

0
‘Hera Pheri 3’ मधून परेश रावल बाहेर पडताच झाली ‘या’ ॲक्टरची एंट्री, नाव ऐकून व्हाल खुश


बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी इंडस्ट्रीतील अशा स्टार्सपैकी एक आहे जो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सुनील सध्या ‘हेरा फेरी ३’ मुळे चर्चेत आहे. ‘हेरा फेरी ३’ची बातमी समोर आल्यापासून दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. अशातच ‘हेरा फेरी ३’मधील मुख्य पात्र परेश रावल चित्रपटातून बाहेर पडल्याच्या बातमीने निर्मात्यांनाच नव्हे तर चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अशातच आता या कॉमेडी चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या एका हँडसम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. त्याचं नाव ऐकून तुम्हीही आनंदाने उड्या माराल.



Source link

दहशतवादाचे नीच कृत्य, वॉशिंग्टनमध्ये इस्रायल दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या

0
दहशतवादाचे नीच कृत्य, वॉशिंग्टनमध्ये इस्रायल दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या


Washington DC Shooting: वॉशिंग्टनमधील इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची बुधवारी सायंकाळी कॅपिटल ज्यूइश म्युझियमबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, ज्याला इस्रायली अधिकारी “यहूदीविरोधी दहशतवादाचे नीच कृत्य” म्हणत आहेत.



Source link

Suryakumar Yadav Equals World Record Becomes 1st Indian Player with Most Consecutive 25+ Scores in T20 Cricket MI vs DC IPL 2025

0
Suryakumar Yadav Equals World Record Becomes 1st Indian Player with Most Consecutive 25+ Scores in T20 Cricket MI vs DC IPL 2025


Suryakumar Yadav Equals World Record in T20I Cricket: सूर्यकुमार यादव यंदा आयपीएल २०२५ मध्ये वादळी फॉर्मात आहे. तर ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही सूर्यादादा आहे. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या प्लेऑफसाठी महत्त्वाच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला १८० धावांचा टप्पा गाठण्यात मोलाची भूमिका बजावली. या खेळीसह सूर्यादादाने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

सूर्यकुमार यादवने यंदाच्या मोसमात भले ही शतकी खेळी केलेली नाही. पण अर्धशतकी आणि छोट्या खेळींच्या जोरावर सूर्यादादाने आपला फॉर्म दाखवत विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादव वानखेडेच्या मैदानावर संथ फलंदाजी करत मैदानावर टिकून होता. त्याने सावध खेळी खेळत अखेरच्या षटकापर्यंत सामना नेला. जिथे मुंबई १८व्या षटकात १३२ धावांवर होती. तिथे नमन धीरने १९व्या षटकात २७ धावा केल्या आणि सूर्याने अखेरच्या षटकात फटकेबाजी करत १८० धावांचा टप्पा गाठला.

सूर्यकुमार यादवने यंदाच्या मोसमात त्याच्या सर्व खेळींमध्ये २५ अधिक धावा केल्या आहेत. आतापर्यंत टी-२० क्रिकेटच्या इतिहासात, टेम्बा बावुमा हा एकमेव फलंदाज आहे ज्याने सलग १३ डावांमध्ये २५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने २०१९ ते २०२० दरम्यान हा पराक्रम केला होता, पण आता एकाच वर्षात २०२५ मध्ये सलग १३ वेळा २५ अधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमार यादवने करत त्याची बरोबरी केली आहे.

हेही वाचा

सूर्या एका वर्षात सर्वाधिक वेळा सलग २५ धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. सूर्यकुमार यादवने या वर्षी आयपीएलमध्ये खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये किमान २५ धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा आणि भारतातील पहिला फलंदाज ठरला आहे. ब्रॅड हॉज, जॅक रुडॉल्फ, कुमार संगकारा, ख्रिस लिन आणि काइल मेयर्स यांनी आतापर्यंत ११ वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे.

हेही वाचा
हेही वाचा

सर्वाधिक वेळा २५ अधिक धावा करणारे टी-२० क्रिकेटमधील फलंदाज

१३ वेळा टेम्बा बावुमा (२०१९-२०)
१३ – सूर्यकुमार यादव (२०२५)
११ – ब्रॅड हॉज (२००५-०७)
११ – जॅक रुडोल्फ (२०१४-१५)
११ – कुमार संगकारा (२०१५)
११ – ख्रिस लिन (२०२३-२४)
११ – काइल मेयर्स (२०२४)

सर्वाधिक वेळा २५ अधिक धावा एका आयपीएल मोसमात करणारे फलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१३ डाव – केन विल्यमसन (सनराझर्स हैदराबाद, २०१८)
१३ डाव – शुभमन गिल (गुजरात टायटन्स, २०२३)
१३ डाव – सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स, २०२५)
१२ डाव – विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०१६)
१२ डाव – डेव्हिड वॉर्नर (सनराझर्स हैदराबाद, २०१६)





Source link

धक्कादायक! You Tuber ज्योतीकडून ‘लालबागचा राजा’चीही रेकी; मुंबईतील अनेक व्हिडीओ, Locations मिळाल्यानं खळबळ

0
धक्कादायक! You Tuber ज्योतीकडून ‘लालबागचा राजा’चीही रेकी; मुंबईतील अनेक व्हिडीओ, Locations मिळाल्यानं खळबळ


YouTuber Jyoti Malhotra Visited Mumbai : भारत- पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीमध्ये भारतात तपास यंत्रणांनी अधिक कठोर कारवाई करत पाकच्या गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतातील हेरांचा पर्दाफाश केला आहे. यातच युट्यूबर ज्योती मल्होत्रा या हरियाणाच्या कंटेंट क्रिएटरचंही नाव समोर आलं. गेल्या काही दिवसांपासून ज्योतीचं पाकिस्तान कनेक्शन उघडकीस येत असून, देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबईसुद्धा आता तिच्या रडारवर असल्याची बाब समोर आली आहे. 

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू असणाऱ्या ज्योतीच्या चौकशीदरम्यान अतिशय खळबळजनकरित्या ही माहिती हाती लागली असून, ज्योतीनं अनेकदा मुंबईत भेट दिली असून, इथं तिनं बऱ्याचदा शहरातील विविध आणि संवेदनशील भागांचे व्हिडीओसुद्धा शूट केल्याचं तपासातून उघडकीस आलं. 

लालबागच्या राजाचीही रेकी… 

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राने मुंबईतील लालबागच्या राजाच्या गर्दीचेही व्हिडीओ काढल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. आयएसआयसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा मुंबईत आली होती आणि इथं तिने लालबागच्या राजाच्या गर्दीचे व्हिडीओ काढले होते. (Lalbaugcha Raja Mumbai)

उपलब्ध माहितीनुसार तिने चार वेळा मुंबई दौरा केल्याची माहिती समोर येत असून त्यामुळं आता मुंबईसुद्धा ज्योतीच्या आणि पर्यायाने पाकिस्तानच्या रडारवर असल्याचं स्पष्ट होत आहे. सध्या . पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्राने अखेर आयएसआयशी संबंध आणि तत्सम कृत्यांची कबुली दिली आहे. याचदरम्यान तिच्याकडे असणारे मुंबईचे व्हिडीओसुद्धा माध्यमांच्या हाती लागल्यानं एकच खळबठळ माजली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार ज्योतीनं आतापर्यंत ज्योतीन तीन ते चार वेळा मुंबईत भेट दिली असून या प्रवासात तिनं ट्रेन आणि लक्झरी बसनं प्रवास केला. ती ऑगस्ट 2024 मध्ये पहिल्यांदाच मुंबईला अहमदाबाद- मुंबई अशा प्रवासातून कर्णावती एक्स्प्रेसच्या माध्यमातून पोहोचली होती. या प्रवासादरम्यान तिनं अनेक व्हिडीओ रेकॉर्ड केले जिथं तिनं रेल्वे स्थानकं आणि इतर माहिती रेकॉर्ड केली. 

पुढे ज्योती सप्टेंबर 2024 मध्ये मुंबईत आली, जेव्हा तिनं 12138 दिल्लीहून पंजाब मेलनं प्रवास करत हे शहर गाठलं. आश्चर्याची बाब म्हणजे तिच्या एका व्हिडीओमध्ये पंजाब मेल कधीएकेकाळी पेशावरपर्यंत जोडली गेली होती असा उल्लेखही केल्याचं आढळतं. 2023 मध्ये ज्योतीनं मुंबईच्या गणेशोत्सवाची रेकी करत लालबागचा राजा या गणेशोत्सव मंडळालाही भेट दिली होती. प्रचंड गर्दी, स्थानिक ठिकाणं, प्रवेश आणि निकासाचे मार्ग आणि आजुबाजूचा परिसर अशी बरीच संवेदनशील माहिती ज्योतीनं तिच्या लालबागच्या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड केल्याचं पाहायला मिळालं, ज्यामुळं आता शहरातील बहुतांश भागांमध्ये सुरक्षेचा बंदोबसत्त वाढवण्यात आला असून, तिथं तपास यंत्रणा ज्योतीची कसून चौकशी करत असल्याचं स्पष्ट होत आहे. 





Source link

DJ’s huge setup falls on young woman’s head while she’s dancing on road shocking video goes viral on social media

0
DJ’s huge setup falls on young woman’s head while she’s dancing on road shocking video goes viral on social media



DJ’s huge setup falls on young woman’s head while she’s dancing on road shocking video goes viral on social media | बापरे! नाचताना डीजेचा भलामोठा सेटअप तरुणीच्या डोक्यावर कोसळला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO पाहून झोप उडेल





Source link

Jammu and Kashmir Kishtwar encounter between army and terrorists security forces corner terrorists

0
Jammu and Kashmir Kishtwar encounter between army and terrorists security forces corner terrorists



Jammu and Kashmir Kishtwar encounter between army and terrorists security forces corner terrorists | जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, सुरक्षा दलांनी ३ ते ४ दहशतवाद्यांना घेरले





Source link

नव्या धरणामुळे शेतकऱ्यांना दिलासा; कोरडवाहू शेती बागायती होणार

0
नव्या धरणामुळे शेतकऱ्यांना दिलासा; कोरडवाहू शेती बागायती होणार

सातारा : पाण्यासाठी तळमळणाऱ्या माण, फलटण आणि वाई तालुक्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरात नवे धरण उभारण्याची तयारी सुरू झाली असून, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कोरडवाहू क्षेत्र ओलीताखाली येणार असून, अनेक गावांतील पाण्याची टंचाई दूर होणार आहे.

महाबळेश्वर परिसरात सोळशी धरण उभारण्यासाठी आज आढावा बैठक पार पडली. ही बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये मंत्री जयकुमार गोरे, मकरंद पाटील, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी भाग घेतला. यावेळी धरणाच्या प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली.

शेतीला मिळणार नवसंजीवनी

या नव्या धरणामुळे माण, फलटण आणि वाई तालुक्यातील मोठ्या भागात सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे कोरडवाहू शेती बहरून येणार असून, उत्पादन वाढण्यास हातभार लागणार आहे. पाण्याची टंचाई दूर होऊन शेती अधिक फायदेशीर होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

bombay hc guardianship mentally ill father | अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध वडिलांचे पालकत्व दोन मुलींकडे

0
bombay hc guardianship mentally ill father | अंथरुणाला खिळलेल्या वृद्ध वडिलांचे पालकत्व दोन मुलींकडे


मुंबई : अंथरुणाला खिळलेल्या वृद्धाचे पालकत्व उच्च न्यायालयाने त्याच्या दोन मुलींकडे सोपवले. या मुलींचे वडील मानसिकरित्या आजारी असून ते स्वतःची आणि मालमत्तेची काळजी घेण्यास असमर्थ असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने हा निर्णय देताना नोंदवले.अशा प्रकरणांत न्यायालये बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, असेही न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या एकलपीठाने याचिकाकर्त्या मुलींकडे त्यांच्या वडिलांचे पालकत्व सोपवताना प्रामुख्याने नमूद केले.

आपल्या देशात उच्च न्यायालयांना ‘पॅरेन्स पॅट्रिए’अंतर्गत विशेषाधिकाराचा (स्वतःचे संरक्षण करण्यास असमर्थ नागरिकांचे कायदेशीर संरक्षक) वापर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याचमुळे, आपल्यासमोरील प्रकरणातही आपण वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे एकलपीठाने म्हटले. त्याचप्रमाणे याचिकाकर्त्यांना त्यांच्या वडिलांचे पालक म्हणून नियुक्त केले.

मानसिक आरोग्य सेवा कायद्याअंतर्गत, मानसिक आजार म्हणजे विचारसरणी, अभिमुखतेचा विकार आहे. त्यामुळे, एखादी व्यक्ती निर्णय घेण्यास आणि जीवनाच्या सामान्य गरजा पूर्ण करण्यास अक्षम ठरते. याचिकाकर्त्यांचे वडील देखील काहीही समजण्यास किंवा माहितीपूर्ण निर्णय घेण्यास असमर्थ आहेत. तसेच, त्यांना सतत काळजी आणि लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याचिकाकर्त्यांच्या वडिलांना हृदयविकाराच्या झटक्या आला आणि त्यामुळे मेंदूवर परिणाम होऊन ते मानसिक रुग्ण झाले. परिणामी, ते स्वतःची काळजी घेण्यास किंवा त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासही असमर्थ झाले. यामुळेच हे मानसिक आजाराचे प्रकरण असून या प्रकरणी आपण पॅरेन्स पॅट्रिए’अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून याचिकाकर्त्या मुलींना त्यांच्या वडिलांचे पालक म्हणून नियुक्त करत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

प्रकरण काय ?

याचिकेनुसार, याचिकाकर्तींच्या वडिलांना (७३) २०२४ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे मेंदूला इजा झाली. परिणामी, तो अर्धबेशुद्ध आणि अशक्त अवस्थेत असून अंथरुणाला खिळलेले आहेत. वडील कोणताही संवाद साधण्यास असमर्थ असल्याने स्वतःच्या मूलभूत वैयक्तिक गरजाही पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे, वडिलांचे पालकत्व आपल्याकडे सोपवण्याच्या मागणीसाठी याचिकाकर्तींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.





Source link