Sunday, July 12, 2026
Home Blog Page 232

चीन, अमेरिका त्यांच्याजागी… आपण आपले ठरवायचे आहे!

0
चीन, अमेरिका त्यांच्याजागी… आपण आपले ठरवायचे आहे!



निरुपमा राव
भारताने न्यायासाठीच जरी पाकिस्तानवर कारवाई केलेली असली, तरी दक्षिण आशियातली शांततेची स्थिती नाजुकच असल्याचेही त्या संघर्षातून स्पष्ट झाले. सीमेपलीकडून कुरापत काढली जाते आणि मग आपल्याला आपल्या सेनादलांची ताकद दाखवून देणे भाग पडते हेच यंदाही झाले. तरीसुद्धा यंदाच्या संघर्षाचे निराळेपण असे की तो फक्त एक द्विपक्षीय झगडा न राहाता अमेरिकेच्या अध्यक्षांनी तो थांबवण्याचे श्रेय घेऊ पाहिले आणि तसे करताना ‘भारत-पाकिस्तान’ असा जोडचिन्हयुक्त उल्लेख केला. हा असा उल्लेख झाल्याने आपली बरोबरी पाकिस्तानशी होते, ती अर्थातच भारताला नको आहे कारण भारत हा शांतताप्रेमी तर पाकिस्तान हा कुरापतखोर देश आहे.

मात्र यंदाच्या संघर्षाबाबत अमेरिका व अन्य पाश्चात्त्य देशांनी ‘जोडचिन्ह’ पुन्हा वापरलेच. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे यंदा पाकिस्तानने प्रत्युत्तराचे जे काही दावे केले त्यांमधून, चीनकडून पाकिस्तानला केवढी लष्करी मदत मिळते आहे हे दिसून आले. चीन आणि पाकिस्तान अशा व्यूहात्मक त्रिकोणाचा तिसरा कोन म्हणजे भारत. या त्रिकोणातल्या पाकिस्तानी व चिनी बाजू एकमेकांजवळ आल्यास तो आहे त्यापेक्षा अधिक विषमभुज होतो. ही शक्यता पुन्हा बळावली. अर्थात, या संघर्षातून आपण काहीएक लाभही मिळवलाच. पहिले म्हणजे भारत यापुढे सहन करणार नाही- जरब दाखवण्यासाठी थेट संघर्ष करेल, हे स्पष्ट झाले. याचा देशांतर्गत लाभ म्हणून सत्ताधाऱ्यांची राजकीय पत वाढल्यास नवल नाही. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर यातून जो संदेश गेला तो म्हणजे, क्रियेला प्रतिक्रिया येणारच.

परंतु कोणताही सशस्त्र संघर्ष, विशेषत: त्यात इतरांनीही ‘मध्यस्थी’ किंवा तसे दावे केले असतील तर, ‘एक जागतिक शक्ती’ म्हणून भारताच्या स्थानाला पूरक ठरत नाही. शेजारी देशावर केलेल्या लष्करी कारवाईनंतर आपल्याला पुन्हा दक्षिण आशियाच्याच संदर्भात मोजले जाऊ लागते. हे आपल्याला टाळायचे आहे आणि जगातल्या अन्य मोठ्या देशांप्रमाणेच आम्हीही आहोत, हे आपण ठसवू लागलेलो आहोत, हे लक्षात ठेवूनच आता आपल्याला पुढली पावले उचलावी लागतील. त्यातला पहिला अडथळा म्हणजे ‘भारत-पाकिस्तान’ हा जोडचिन्हयुक्त उल्लेख! ते जोडचिन्ह अन्य देशांनी विसरावे, याहीसाठी आपल्याला आता पुन्हा प्रयत्न करावे लागतील. मुळात आपण केलेल्या शस्त्रसंधीवर किंवा कारवाईला दिलेल्या स्थगितीवर ‘मालकी’ सांगण्याचा प्रयत्न अमेरिकेने आरंभला आहे, तोही आपल्या आजवरच्या राजनैतिक यशांकडे पाहाता भूषणावह नाहीच. पाकिस्तानपेक्षा आपण कितीतरी पुढे आहोत. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी आणि जगातील पहिल्या चारपैकी आहे, आपल्यालकडे लोकशाही शाबूत आहेच आणि आपले मित्रदेशही सर्वदूर आहेत- यापैकी काहीही पाकिस्तानकडे नसताना ‘भारत-पाकिस्तान’ हा जोडचिन्हयुक्त उल्लेख होण्यास वावच मिळू नये, हे पाहावे लागेल.

याचे कारण, अशा जोडचिन्हामुळे आपली चुकीची तुलना होते आहे हे आपले ठाम मत आहे. पण दोन देेशांमध्ये संघर्ष सुरू असतो तेव्हा अन्य देशांकडून ‘राजनैतिक समतोल’ साधण्यासाठी, दोन्ही देशांचे ऐकण्याचा पवित्रा घेतला जाणेही नित्याचे असते. त्या नित्यक्रमाचा गैरफायदा पाकिस्तान घेतो आणि ‘दोन्ही देश १९४७ मध्ये अस्तित्वात आले…’ अशा कथनापासून काश्मीर आदी विषय आंतरराष्ट्रीय समुदायापुढे काढू लागतो. अमेरिकेने ‘काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची तयारी’ असल्याची भाषा काही आजच पहिल्यांदा केलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कारकीर्दीतही, अफगाणिस्तानातून काढता पाय घेता घेता अमेरिकेने काश्मीरचा विषय काढलेला होता, पण त्यात सावधगिरी तरी होती. यंदा ट्रम्प यांनी पुन्हा पूर्वापार अमेरिकी भूमिकाच उगाळल्याचे दिसते आहे- ‘दोन्ही देशांना’ संयम पाळण्याचे आवाहन करायचे, दोन्ही देशांमध्ये अमेरिकी उच्चपदस्थांमार्फत भेटीगाठी किंवा संभाषणांचे सत्र सुरू करायचे आणि मुख्य म्हणजे आम्ही या दोहोंपैकी कोणत्याही एका देशाच्या बाजूचे नाही हे जगाला दाखवत राहायचे. राजनैतिक भूमिकांमध्ये काहीएक सातत्य असावे वगैरे अपेक्षा ठीकच, पण भारताशी अमेरिकेचे संबंध केवढे पुढे गेलेले आहेत, अमेरिका आणि भारत यांच्यात परस्परांमधला विश्वास आणि व्यवहारसुद्धा किती वाढलेला आहे, भारत हा केवळ अमेरिकी शस्त्रास्त्रांचे गिऱ्हाईक नसून तंत्रज्ञान आणि ‘हिंद-प्रशांत क्षेत्रीय सहकारा’सारख्या बहुआयामी पुढाकारांमधला भागीदार देश आहे, याचाही विचार अशाच वेळी मागे पडतो, हे आता दिसते आहे.

मग अशा वेळी भारतानेही हे ओळखायला हवे की, व्यूहात्मक भागीदारी वाढली म्हणून नेहमीच आपली बाजू खरी मानली जाईल असे नसते. उलट, अमेरिकेचे तथाकथित ‘समतोलवादी’ वर्तन सुरू झाल्यावर मुळात कुरापतखोर असलेल्या पाकिस्तानने तर, ‘अमेरिका मध्यस्थी करते आहे, याचा आनंदच आहे’ वगैरे शब्दांचा पिंगा घालून जणू काही आपल्या द्विपक्षीय झगड्यात दोन्ही बाजू आपापल्या परीने योग्यच असल्याचा देखावा करणे पुन्हा आरंभले आहे. या असल्या उद्योगांना भारताने अजिबात प्रतिसाद देऊ नये. व्यूहात्मक यश मिळवायचे तर, दुसऱ्याला हवा तितका गवगवा करू द्यावा पण अखेर आपले ऐकावेच लागेल असे पाहावे, हे उत्तम. त्यामुळेच भारताने अमेरिकेशी, ‘दक्षिण आशिया’ वगैरे विषय टाळून सहकार्य सुरूच ठेवावे आणि वाढवावेसुद्धा. भारत-अमेरिका संबंधांची व्याप्ती पाहूनच पाकिस्तान बिचकला पाहिजे, असे आपण पाहावे.

गवगवा दुसऱ्याला करू द्यायचा पण यश आपलेच असेल असे पाहायचे, तर काही पथ्येही पाळावी लागतात. सर्व संभाव्य परिणामांचा विचार बारकाईनेच करावा लागतो. उदाहरणार्थ सिंधू पाणीवाटप करार. तो आपण पाकिस्तानला शिक्षा म्हणून रोखला, आपल्याला हा करार रोखण्याचा हक्कच आहे- अशा अर्थाची भाषा कुठे नेणार याचा विचार आपण करायला हवा. या कराराला प्रतीकात्मक महत्त्व आहेच. पण मुळात पाणी हा फक्त राष्ट्रीय सुरक्षेचाच भाग नसून त्याला राष्ट्रनिरपेक्ष अशा परिसर्ग-सुरक्षेचेही (इकॉलॉजिकल सिक्युरिटी) परिमाण असते आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या निर्णयाची चिकित्सा होऊ शकते- त्यातही चीनसारखे देश अशा चिकित्सेत सहभागी असू शकतात. सिंधू पाणीवाटप कराराचा वापर हत्यार म्हणून आपण करतो आहोत, तो आपला निश्चय दाखवण्यासाठी आहे हे मान्यच. पण हे हत्यार जपून वापरावे लागते.

चीन कुणाच्या बाजूने आहे, हे एव्हाना उघड झालेले आहे. पाकिस्तानसाठी चीन हा केवळ राजनैतिक पाठिंबादार नसून, व्यावहारिक पुरवठादारही आहे. पाकिस्तानकडे सध्या असलेल्या हवाई क्षमतेवर चिनी प्रभाव स्पष्ट दिसतो- मग ती जेएफ- १७ आणि जे- १०७ लढाऊ विमाने असो की ‘विंग लूंग’ ड्रोन असोत की ‘एचक्यू- ९बी’ हवाई हल्ला प्रतिरोध यंत्रणा असो. हे सारे तयार करण्यासाठी चीनची मदत पाकिस्तानला झालेली आहे. याआधी पाकिस्तानची भिस्त पाश्चात्त्य देशांकडून शस्त्रखरेदी करण्यावरच होती, ते आता चीनमुळे कमी झाले. यापुढे पाकिस्तानकडे ‘राफेल’ नाही, पण राफेलला उत्तर म्हणून चीनने तयार केलेले विमान असण्याची शक्यता गृहीत धरूनच भारताला क्षमतावाढ करावी लागेल. महत्त्वाचे म्हणजे, शत्रुपक्ष एकटा नाही- तो एकमेकांशी संपर्कात असू शकतो, एकमेकांची मदत घेऊ शकतो आणि त्यामुळे संघर्षादरम्यानच्या शक्याशक्यतांची समीकरणे अधिकच जटिल होऊ शकतात, हेही भारताने लक्षात घेतले पाहिजे. चिनी सामग्रीचा थेट वापर जर पाकिस्तानने सुरू केला तर संघर्षाचा स्तर बदलू शकतो. पाकिस्तानी जे-१०सी लढाऊ विमाने आणि पीएल-१५ ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे यांना जर चिनी हवाई संरक्षण सामग्रीचे पाठबळ असेल तर, आपल्याच क्षमता अधिक आहेत असे भारताला समजता येणार नाही. ही दोन आघाड्यांवरची आव्हाने आपल्याला कधीतरी पेलावी लागणारच आहेत, अशी भाकिते आजवर होत होती. पण हे आडाखे खरे ठरण्याची वेळ आज आलेली आहे. त्यामुळे, ‘पाकिस्तान एकटा लढत नाही, चीन सीमापार हल्ले करत नाही’ अशा विचित्र स्थितीला सामोरे जाण्याची तयारी आता करावी लागेल.

या बदलत्या समीकरणांमुळेच, संघर्ष हा अंदाज न बांधता येणाऱ्या घटनामालिकेसारखा असण्याची शक्यताही बळावते. दोन देशांमध्ये शस्त्रसंधी होऊ शकतो, त्याने संघर्ष चिघळून लढाईपर्यंत जाण्याची शक्यता मिटूही शकते, पण पुन्हा काही काळाने असाच संघर्ष उद्भवू शकतो. हे असेच चालू राहाणे भारताच्या व्यूहात्मक महत्त्वाकांक्षांसाठी उपयोगाचे नाही आणि विभागीय स्थैर्याकडे नेणारे तर नाहीच नाही. प्रत्येक नव्या संघर्षामुळे राजनैतिक सूर बदलावा लागतो, आंतरराष्ट्रीय संबंधांत संरचनात्मक बदल घडवून आणण्याची राजनयाची क्षमता दुसऱ्याच कारणासाठी वापरली जाते आणि जुनीच कथानके पुन्हा बलवत्तर ठरू लागतात. यातून मार्ग काढायचा तर संघर्ष घडूच नयेत एवढी जरब वाढवून फक्त चालणार नाही. त्यासाठी संघर्षाचे प्रतिमानच पालटावे लागेल. यासाठी सैद्धान्तिक- धोरणात्मक धमक दाखवणे आणि कथनांतूनही प्रभुत्व मिळवणे हे दोन्ही मार्ग वापरावे लागतात.

आजघडीला भारताची धोरणात्मक परिपक्वता, भारताला जागतिक जबाबदारीची असलेली जाणीव यांचे भान जगाला जरूर आहे. म्हणूनच संघर्षांमध्ये आपण वारंवार आपण अडकत राहू नये, कारण तशा स्थितीत अन्य देशांचा प्रतिसाद गाेंधळलेला असू शकतो- आताच्या संघर्षातूनही, जणू काही भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही आपले द्विपक्षीय प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थीची गरज असल्याचा (गैर)समज काही देशांचा असल्याचे उघड झाले, तसे होण्याने पाकिस्तानचे काहीही बिघडत नाही. आपली ‘हिंद- प्रशांत क्षेत्राला स्थैर्य देऊ शकणारी शक्ती’ ही प्रतिमा मात्र डागाळू शकते. अशा वेळी भारताने, आपला धोरणात्मक दृष्टिकोन जगापर्यंत पोहोचवावा आणि झगडे मात्र दोन देशांपुरतेच ठेवावेत यासाठी प्रयत्न करावे लागतील. हे काम जिकिरीचे आहे, कारण संघर्षांकडे लक्ष असणाऱ्यांनी शांततावादी असावेच आणि भारताच्या व्यापक भूमिकेचाही आदर करावा, हे आपल्याला साध्य करायचे आहे.

भारतीय राजनयात आणि त्यासाठीच्या भूमिकांत काही बदल या घडीला करावे लागतील, कारण आपली व्यूहात्मक भूमितीही आता बदलते आहे. ती एका रेषेतली, दोन बिंदूंची नसून ‘त्रिकोण’ आपल्याला गृहीत धरावा लागणार आहे. फक्त सीमांचेच नाही तर आपल्या कथनाचे आणि त्यातून आपल्या सिद्धान्ताचेही रक्षण आपल्याला करायचे आहे. यात एकीकडे अमेरिका चमकण्याचा प्रयत्न करेल, पण म्हणून तो देश सत्याचीच बाजू घेईल असे नव्हे. दुसरीकडे चीन वरकरणी गप्प राहूनच चिथावण्या देईल. या दोघांच्या अशा करणीने पाकिस्तानची कुरापतखोरी वाढू शकते. तिला आवश्यक तेव्हा आणि जितकी गरज आहे तितके सज्जड प्रत्युत्तर आपण देऊच, पण यामध्ये ‘गरज किती’ हे ओळखण्याचे काम आपल्यालाच करावे लागेल आणि नेमके अंदाज बांधून, शक्य असेल तेथे संयमाचेही प्रदर्शन करावे लागेल. आपली शक्ती ही दुसऱ्याच्या दुर्गतीवर अवलंबून नाही, हे आपण आधीपासून म्हणतो आहोतच, ते आता जगला पटवून देण्यासाठी नव्या परिस्थितीत कंबर कसावी लागेल. राजनयात आणि संघर्षातसुद्धा, झुंजत राहाण्यापेक्षा नियंत्रण आपल्याहाती घेण्यातून खरी परिपक्वता दिसते, हे अनेकांच्या लक्षात असेलच.

लेखिका भारताच्या माजी परराष्ट्र सचिव आणि माजी राजदूत आहेत.



Source link

रवी मोहन केनिशा फ्रान्सिस नातं

0
रवी मोहन केनिशा फ्रान्सिस नातं



Ravi Mohan wife Aarti filed petition for 40 lakh alimony per month : Ravi Mohan Aarti Divorce Matter : Ravi Mohan kenishaa francis relation : रवी मोहन आरती घटस्फोट : रवी मोहन केनिशा फ्रान्सिस नातं





Source link

Pune Mumbai Nagpur Breaking News Live Today in Marathi

0
Pune Mumbai Nagpur Breaking News Live Today in Marathi


Pune Breaking News Live Updates: राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या २४ तासांत राज्यात आणखी २६ रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक २५ रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. तर दुसरीकडे राज्यात मान्सूनपूर्व खबरदारी घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकांना आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत, तेव्हा मुंबई, पुणे आणि नागपूर सह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates, 22 may 2025

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे





Source link

राजकारण‎: नेत्यांची अशी विधाने पक्ष का सहन करतात?‎ देश, त्याची सुरक्षा आणि सैन्य यांच्या बाबतीत आपण राजकारणाच्या पलीकडे असले पाहिजे…‎

0
राजकारण‎:  नेत्यांची अशी विधाने पक्ष का सहन करतात?‎ देश, त्याची सुरक्षा आणि सैन्य यांच्या बाबतीत आपण राजकारणाच्या पलीकडे असले पाहिजे…‎


  • Marathi News
  • Opinion
  • Navneet Gurjar, Why Do Parties Tolerate Such Statements From Leaders? When It Comes To The Country, Its Security And The Army, We Should Be Beyond Politics…

नवनीत गुर्जर10 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎ऑपरेशन सिंदूरबाबत जगभरात जागरूकता निर्माण‎करण्यासाठी सरकार विविध पक्षांचे वेगवेगळी‎शिष्टमंडळे पाठवत आहे.‎ जवळजवळ सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे हे गट‎पाकिस्तान सरकारने पोसलेल्या दहशतवादाचा पर्दाफाश‎करतील आणि जगातील बहुतांश देशांसमोर पुराव्यांसह‎पाकिस्तानचा छुपा अजेंडा उघड करतील.‎ ही सरकारची चांगली रणनीती आहे.‎ याहूनही चांगली गोष्ट म्हणजे या शिष्टमंडळांमध्ये सर्व‎पक्षांच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.‎ यामुळे जगभरात नक्कीच चांगला संदेश जाईल.‎

दुसरीकडे आपल्याच देशात सत्ताधारी आणि विरोधी‎पक्षाचे काही नेते बेताल विधाने करण्यास चुकत नाहीत.‎ आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना बाहेर काढण्याऐवजी‎त्यांचे पक्ष अप्रत्यक्षपणे त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न‎करत आहेत!‎ मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा आणि उपमुख्यमंत्री‎जगदीश देवाडा यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या.‎ त्यापैकी एकाने कर्नल सोफिया कुरेशींबद्दल हास्यास्पद‎विधान केले, तर दुसऱ्याने म्हटले की, संपूर्ण सैन्य‎पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाशी नतमस्तक आहे!‎ आता दिखाव्यासाठी या विधानांची चौकशी‎करण्यासाठी एसआयटी स्थापन केली जात आहे.‎नक्कीच हे सर्व ढोंग आहे. जी विधाने केली गेली, ती ‎‎सर्वांसमोर आहेत.यामध्ये एसआयटी स्थापन करण्याचा‎अर्थ काय?‎ ती सारवासारव करण्याशिवाय दुसरे काय करू शकते?‎ राजकीय पक्षांना अशी वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांना ‎‎पोसण्याची सवय झाली आहे, असे दिसते.‎ अशा लोकांवर कारवाई करण्याचे धाडस ते करू‎शकत नाहीत.‎

हे भाजप नेत्यांच्या विधानांबद्दल आहे. आता आपण ‎‎काँग्रेस नेत्यांच्या विधानांकडे येऊया.‎ ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे संपलेले नाही, असे लष्कराने ‎‎म्हटल्यावरही राहुल गांधी कसे विचारू शकतात की, ‎‎पाकिस्तानने आपली किती विमाने पाडली? पाडाली की ‎‎नाही, हा वेगळा प्रश्न असू शकतो, पण असा प्रश्न या वेळी ‎‎विचारला पाहिजे का?‎ एकंदरीत, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, तुम्हाला‎सर्वकाही जाणून घेण्याचा अधिकार आहे. पण, अशा ‎‎प्रश्नांसाठी हा काळ योग्य आहे, असे म्हणता येणार नाही.‎ आता राहुल गांधी हे स्वयंभू नेते आहेत, त्यांच्यावर‎कोण कारवाई करू शकेल?‎ हे प्रकरण फक्त राहुल गांधींपुरते मर्यादित नाही. काँग्रेस‎अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेसुद्धा मागे नाहीत.‎ ते म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहलगाम किंवा‎त्याच्या आसपास काही दहशतवादी कारवाया होणार‎असल्याची माहिती मिळाली होती, म्हणून त्यांनी त्यांचा‎दौरा रद्द केला. त्यानंतर अवघ्या एक-दोन दिवसांनी ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पहलगाममध्ये हत्याकांड घडले!‎ आता माहिती मिळाल्यावरही प्रतिबंधात्मक उपाय केले‎जाणार नाहीत हे कसे शक्य आहे?‎ आणि पंतप्रधानांना हे कळल्यानंतर तर हे शक्यच नाही.‎ विधान करताना खरगे साहेबांनी त्यांच्या बोलण्याचा‎अर्थ काय आहे याचा विचार करावा.‎ हो, पहलगाम घटनेबद्दल तुम्ही म्हणू शकता की, ही‎सुरक्षेतील चूक असू शकते.‎ इतके पर्यटक तिथे होते तर मग योग्य सुरक्षा व्यवस्था‎का केली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ‎शकतो. पण, माहिती असूनही काहीही केले नाही, असे‎म्हणणे योग्य नाही.‎ दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने‎ऑपरेशन सिंदूरशी संबंधित शिष्टमंडळात कोण जावे व‎कोण जाऊ नये यावर वादळ निर्माण केले होते. अखेर‎मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचे‎नाव अंतिम करण्यात आले.‎

इथे शिवसेनेत (उद्धव गटात)ही या विषयावर काही‎कुजबुज सुरू होती.‎ उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासाठी प्रियंका चतुर्वेदी‎यांचे नाव आधीच दिले होते आणि संजय राऊत यांना ते‎माहीत नव्हते, हे समोर आले आहे!‎ उद्धव सेनेत हे कदाचित पहिल्यांदाच घडले असावे.‎ असो, एकंदर मुद्दा असा आहे की, राजकीय पक्षांनी‎पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाबद्दल, त्याच्या‎सुरक्षेबद्दल आणि सैन्याबद्दल बोलले पाहिजे.‎ या वेळी बऱ्याच प्रमाणात हे केले गेले, परंतु कोणत्या ना‎कोणत्या पक्षातील कोणी ना कोणी नेता विचारशून्य विधाने‎करत राहिला.‎ राजकीय पक्षांनी अशा नेत्यांना कडक इशारा द्यावा‎आणि त्यांची तोंडे बंद करावीत.‎ तरीही ऐकत नसेल तर त्याला पक्षातून आणि पदांवरून‎काढून टाकावे.‎ याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसावा.‎



Source link

बरखा दत्त यांचा कॉलम: एकट्यानेच लढावे लागेल‎ आपल्याला पाकशी युद्ध‎, पाश्चात्त्य देशांकडून अपेक्षा करणे व्यर्थ‎

0
बरखा दत्त यांचा कॉलम:  एकट्यानेच लढावे लागेल‎ आपल्याला पाकशी युद्ध‎, पाश्चात्त्य देशांकडून अपेक्षा करणे व्यर्थ‎


  • Marathi News
  • Opinion
  • We Will Have To Fight Alone In A War With Pakistan, It Is Futile To Expect From Western Countries

2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎१० मे रोजी सकाळी जम्मूमध्ये झालेल्या स्फोटांच्या‎आवाजाने मला जाग आली. पहाटेचे ५ वाजले होते. त्याच‎क्षणी माझा फोन वाजला. श्रीनगरमधील माझा सहकारी‎जफर इक्बालही जागा होता. त्याने मला सांगितले, युद्ध‎सुरू झाले आहे. मी नाइट सूटमध्ये स्फोटांच्या दिशेने पळत‎गेलो. माझा कॅमेरामन अजूनही झोपलेला होता. शहराच्या‎मध्यभागी असलेल्या दाट लोकवस्तीच्या भागात‎पाकिस्तानी ड्रोन रोखण्यात आल्याचे आम्हाला आढळले.‎आम्ही घटनास्थळी पोहोचल्यावर एका घराचे छत उडून‎गेल्याचे दिसले. तिथे तिरंगा झेंडा फडकत होता. ते‎भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक होते.‎

ते ज्या कुटुंबाचे घर होते – त्यात एक अस्वस्थ आई‎तिच्या दोन छोट्या मुलांसह रडत होती. ती अजूनही जिवंत ‎‎आहे याबद्दल तिने अश्रू ढाळत भारतीय सशस्त्र दलांचे‎आभार मानले. सर्वत्र कचरा पसरलेला होता, रस्त्यावर‎खड्डे होते, अनेक घरांच्या भिंती पडल्या होत्या आणि‎भीतीचे वातावरण होते. कॉलनीपासून थोड्या अंतरावर ‎‎असलेल्या शंभू मंदिरावर आणखी एक पाकिस्तानी ड्रोन ‎‎अडवण्यात आला. एका रहिवाशाने मला सांगितले की,‎हवाई हल्ल्याच्या सायरनमुळे शेकडो लोकांचे जीव‎वाचले.‎

त्याच सकाळी माझ्या कार्यक्रमात ब्रिगेडियर संदीप थापर‎- ज्यांचे आदल्या रात्रीपर्यंत असे मत होते की, पाकिस्तान‎चिथावणीला बळी पडणार नाही – यांनी आपला विचार‎बदलला. ते म्हणाले, हे आता एक संपूर्ण युद्ध आहे.‎

आपल्या देशावर आता काय संकट आले आहे, हे‎लोकांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. ऑपरेशन‎सिंदूरअंतर्गत भारताने पाकिस्तान व पीओकेतील‎दहशतवादी छावण्यांवर हल्ले केले व हे स्पष्ट केले की, हे‎हल्ले वाढवणारे नाहीत, परंतु पाकिस्तानने धोकादायक‎पद्धतीने प्रत्युत्तर दिले. जम्मू-काश्मीरव्यतिरि क्त पाकिस्तान‎आपल्या पंजाब प्रांतावर हल्ला करण्याच्या तयारीत होता,‎कारण भारताच्या अचूक हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या‎पंजाबमधील मुरीदके व बहावलपूर येथील लष्कर व‎जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले होते. मुरीदके‎लाहोरपासून तितकेच दूर आहे, जितके गुरुग्राम‎दिल्लीपासून आहे. पाकिस्तानच्या राजकारणात व‎लष्करात पंजाबचे वर्चस्व आहे. त्याला वाटले की,‎भारताने त्याच्या मज्जातंतू केंद्रावर हल्ला केला आहे.‎गुजरात व राजस्थानच्या सीमेवर ड्रोन पाठवण्याचे प्रयत्नही‎करण्यात आले.‎

भारताची हवाई संरक्षण प्रणाली पाकिस्तानचे हवाई तळ‎- नूर खान, रहीम यार खान, सरगोधा – नष्ट करू शकली‎नसती व आपण लाहोर व कराचीतील हवाई संरक्षण‎प्रणालींना नुकसान पोहोचवले नसते, तर हे युद्ध खूप‎लांबले असते. ऑस्ट्रियाचे हवाई युद्ध तज्ज्ञ टॉम कूपर‎यांनी मला सांगितले की, सरगोधा संकुलातील‎पाकिस्तानच्या भूमिगत अणुसुविधेच्या प्रवेशद्वारावरील‎हल्ला हा शेवटचा वळणबिंदू असू शकतो. पाकिस्तान‎अशा परिस्थितीत पोहोचला होता, जिथे तो आपल्या‎अण्वस्त्रांचे संरक्षणही करू शकत नव्हता. आणखी एक‎पाकिस्तानी पत्रकार मोईद पीरजादा म्हणाले की,‎भारताकडून होणारे हल्ले ४८ तास चालू राहिले असते तर‎पाकिस्तानी हवाई दल कोसळू शकले असते.‎

आणि म्हणून जो दिवस पहाटे ५ वाजता सुरू झाला‎होता आणि आपण एका पूर्ण युद्धाकडे वाटचाल करत‎आहोत, असे वाटत होते, तो दिवस अचानक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎संध्याकाळी ५ वाजता संपला. पाकिस्तानच्या‎डीजीएमओकडून फोन आल्यावर भारताने युद्धबंदीला‎सहमती दर्शवल्याची घोषणा करण्यात आली. येथे हे‎अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे की, भारताने युद्धबंदी‎हा शब्द वापरला नाही आणि वारंवार सांगितले आहे की,‎हा केवळ चालू असलेल्या कारवाईत एक विराम आहे.‎ट्रम्प कितीही प्रयत्न करत असले तरी हे स्पष्ट आहे की,‎भारताची लष्करी आघाडी नसती तर हा संघर्ष दीर्घकाळ‎टिकला असता. आणि पाकिस्तानच्या हवाई तळांना‎इतका मोठा फटका बसला नसता, तर हा संघर्ष आणखी‎वेगाने वाढू शकला असता.‎

भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न‎व ते रोखण्यात ढोंगी पाश्चात्त्य जगाचे अपयश हे दोन्ही‎कायम आहेत. अशा परिस्थितीत आपण हे समजून‎घेतले पाहिजे की, आपल्याला पाकिस्तानविरुद्धचे युद्ध‎एकट्यानेच लढावे लागेल. चीनचा हात पाकिस्तानच्या‎खांद्यावर असेल, तर पाश्चात्त्य देश आणि त्यांची‎माध्यमे या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ असल्याचे‎भासवत राहतील.‎



Source link

अभयकुमार दुबे यांचा कॉलम: वाढत चाललीय पाकिस्तानचे‎ तुकडे – तुकडे होण्याची शंका‎, सिंध, पख्तून व बलुच फुटीरतावाद‎

0
अभयकुमार दुबे यांचा कॉलम:  वाढत चाललीय पाकिस्तानचे‎ तुकडे – तुकडे होण्याची शंका‎, सिंध, पख्तून व बलुच फुटीरतावाद‎


  • Marathi News
  • Opinion
  • Pakistan’s Fragmentation Is Increasing Suspicion Of Disintegration, Sindhi, Pakhtun And Baloch Separatism

4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

१९७१ मध्ये एकदा पाकिस्तानची फाळणी झाली. ५०‎वर्षांनंतर दुसऱ्यांदा फाळणी होण्याची शक्यता नाकारता‎येत नाही. या वेळी पाकिस्तान फुटला तर त्याचे अनेक‎तुकडे होतील. या प्रकरणातील पहिला प्रश्न असा आहे‎की, मागील फाळणीच्या मॉडेलची पुनरावृत्ती करता येईल‎का?‎

मागील मॉडेलमध्ये तीन विशेष गोष्टी होत्या. भारताच्या‎लष्करी हस्तक्षेपाने निर्णायक भूमिका बजावली. ७० च्या‎दशकातील शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनने‎भारताला दिलेल्या पाठिंब्यामुळे अमेरिकेची पाकिस्तान‎समर्थक भूमिका निष्प्रभ झाली. त्या वेळी पाकिस्तान‎आधीच अतिशय अनैसर्गिक पद्धतीने दोन दूरच्या‎भौगोलिक भागांत विभागलेला होता. पाकिस्तानच्या ‎‎फाळणीचे आणखी एक संभाव्य मॉडेल आहे, ते त्याच्या ‎‎अंतर्गत राजकारणातील विकृतींमुळे होणाऱ्या संभाव्य ‎‎स्फोटाशी जोडलेले आहे. या अंतर्गत स्फोटांची भीती ‎‎पहिल्यांदा २०२२ मध्ये प्रकर्षाने समोर आली, तेव्हा ‎‎पाकिस्तानच्या एका वरिष्ठ नेत्याने उघडपणे पाकिस्तान‎फुटला तर तो कसा आणि का फुटेल याचे तपशीलवार ‎‎स्पष्टीकरण दिले. हे विधान इम्रान खान यांनी केले होते, ते ‎‎पंतप्रधान होते आणि पाकिस्तानला विघटनाच्या‎धोक्यापासून वाचवण्यासाठी मुक्त व निःपक्ष निवडणुका‎घेण्याची मागणी करत होते.‎

इम्रान म्हणाले होते : “संस्था योग्य निर्णय घेत नसतील तर‎त्याही नष्ट होतील. आपण चूक केली तर फटका बसणारी‎सर्वात मोठी संस्था कोणती असेल? पाकिस्तानी सैन्य.‎सैन्याला फटका बसल्यावर आपल्याकडून कोणती‎सवलत घेतली जाईल? युक्रेनकडून अण्वस्त्र‎निःशस्त्रीकरणासाठी घेतलेली सवलत. सर्वात मोठा मुद्दा‎असा आहे की, आपला एकमेव मुस्लिम देश आहे,‎ज्याकडे अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता आहे. ती गेली तर काय‎होईल? पाकिस्तानचे तीन भाग होतील.”‎

येथे इम्रान वेगळ्या सिंध राष्ट्र, पख्तून राष्ट्र आणि‎बलुच राष्ट्राकडे बोट दाखवताना दिसतात. फक्त‎पंजाबसह पाकिस्तान राहील. ज्या वेळी हे विधान‎करण्यात आले, त्या वेळी सिंधमध्ये वारंवार कर्फ्यू‎लावला जात होता. खैबर पख्तुनख्वाचे नेते‎इस्लामाबादविरुद्ध त्यांच्या प्रादेशिक सैन्याचा वापर‎करण्याची धमकी देत ​​होते. बलुचिस्तानमध्ये सशस्त्र‎बंडखोर सैन्यावर हल्ला करत होते.‎

आज इम्रान तुरुंगात आहेत. त्यांचा पक्ष राजकीयदृष्ट्या‎जवळजवळ निष्क्रिय झाला आहे. शाहबाज शरीफ‎लष्कराच्या प्याद्यासारखे राज्य करत आहेत. अमेरिकेला हे‎माहीत आहे, म्हणूनच परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो‎भारताकडून युद्धबंदी मिळवण्यासाठी शरीफ यांच्याआधी‎जनरल असीम मुनीर यांच्याशी बोलले. अमेरिकेने‎आयएमएफकडून २.२५ अब्जची डाॅलरची व्यवस्था केली‎नसती तर इम्राननी ज्या डिफॉल्ट परिस्थितीचा उल्लेख‎केला होता तीच परिस्थिती उद्भवली असती.‎

पाकिस्तानचे विभाजन होण्यापासून तीन शक्ती रोखत‎आहेत : त्याचे सैन्य, अमेरिका आणि चीन. लष्कराने खरी‎राजकीय प्रक्रिया स्थगित केली आहे आणि पूर्णपणे‎बनावट राजकीय प्रक्रिया लादली आहे. इम्रान नक्कीच‎तुरुंगात आहे, पण ते पाकिस्तानचा सर्वात लोकप्रिय नेते‎आहेत. आज निवडणुका प्रामाणिकपणे झाल्या तर त्यांना‎एकतर्फी विजय मिळेल. अमेरिका कसा तरी‎पाकिस्तानची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था टिकवून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ठेवत आहे. पाकिस्तानवर प्रचंड परकीय कर्ज आहे,‎त्यापैकी एकपंचमांश कर्ज चीनचे आहे. जगातील सर्वात‎मोठी शक्ती अमेरिका व त्याच्या बरोबरीचा होऊ पाहणारा‎चीन, दोघांनाही पाकिस्तानचे चार तुकडे करून तो नष्ट‎होऊ नये, असे वाटते. दक्षिण आशियातील भारताचा उदय‎रोखण्यासाठी पाकिस्तानने भारताचा पाय खेचण्यासाठी‎राहावे, अशी त्यांची इच्छा आहे.‎

पाकिस्तानला कायमचे टिकायचे असेल तर तिथे राजकीय‎प्रक्रिया पूर्ववत करावी लागेल. निवडून आलेल्या‎लोकप्रिय सरकारला बलुच, सिंध आणि पख्तून‎उपराष्ट्रीयत्वाच्या प्रतिनिधींना वाटाघाटीच्या टेबलावर‎आणावे लागेल. त्यांना सांस्कृतिक व राजकीय स्वायत्तता‎दिली पाहिजे. १९४७ च्या फाळणीनंतर भारताने नागालँड,‎मिझोराम, पंजाब, काश्मीर व सुरुवातीला तामिळनाडूत‎विविध रणनीती वापरून फुटीरतावादी राजकारण निष्प्रभ‎केले आणि राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण केले. पाकिस्तानी‎लोकांची इच्छा असेल तर ते या बाबतीत भारताकडून‎शिकू शकतात.‎

पाकिस्तानला कायमचे टिकून राहायचे‎असेल तर त्याला देशात राजकीयप्रक्रिया‎पूर्ववत करावी लागेल. निवडून आलेल्या‎लोकप्रिय सरकारलाबलुच, सिंध व‎पख्तून उपराष्ट्रीयत्वाच्या प्रतिनिधींना‎वाटाघाटीच्या टेबलावरआणावे लागेल.‎



Source link

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचा कॉलम: जीवनातील अज्ञात तथ्यांचे रहस्य कोण समजू शकले?‎, 13.8 अब्ज वर्ष जुन्या विश्वात पृथ्वीची स्थिती मोहरीच्या दाण्यासारखीच आहे…‎

0
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचा कॉलम:  जीवनातील अज्ञात तथ्यांचे रहस्य कोण समजू शकले?‎, 13.8 अब्ज वर्ष जुन्या विश्वात पृथ्वीची स्थिती मोहरीच्या दाण्यासारखीच आहे…‎


  • Marathi News
  • Opinion
  • Who Could Understand The Secrets Of The Unknown Facts Of Life?‎, The Position Of The Earth In The 13.8 Billion Year Old Universe Is Like A Mustard Seed…‎ Column By Deputy Chairman Of The Rajya Sabha Harivansh

7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎या ज्ञान-शतकातील शास्त्रज्ञ आहेत डॉ. विली सून‎(हार्वर्ड). खगोल भौतिकशास्त्रज्ञ, अवकाश अभियंता.‎त्यांचा निष्कर्ष असा आहे की – देव अस्तित्वात आहे!‎युरोपियन पुनर्जागरणाच्या गर्भाशयातून आधुनिक युगाचा‎जन्म झाला. त्या काळातील (१४ व्या-१७ व्या शतकातील)‎बौद्धिक संपत्ती, ज्ञान, शहाणपण, वैज्ञानिक विचारसरणी,‎संशोधन व चिंतनातून. पुनर्जागरण काळाच्या उत्तरार्धातील‎जर्मन तत्त्वज्ञानी नित्शे एका विधानाने अमर झाले – देव मृत‎झाला आहे! तथापि, पुनर्जागरण काळातील आणखी एक‎महान नायक कोपर्निकसने म्हटले होते की, पृथ्वी ही देवाचे‎पादासन आहे. विश्वात एका छोट्या मोहरीच्या‎दाण्यासारखे. पण, एआयच्या युगात डॉ. सून यांचा विश्वास‎आहे की, देवाचे अस्तित्व गणितीय सूत्राने सिद्ध करता येते.‎

डॉ. सून पुराव्यासाठी पॉल डिरॅकचा उल्लेख करतात.‎डिरॅक केंब्रिजचा गणितज्ञ होता. गणित ही विश्व व निसर्गाचे‎कार्यनियम समजून घेण्याची प्रामाणिक पद्धत आहे.‎अमेरिकेतील अव्वल गणितज्ञ डेल मॅकनेअर यांनी‎इतिहासातील २१ प्रभावशाली गणितज्ञांच्या देवावरील‎श्रद्धेवर एक शोधनिबंध लिहिला. भारतातील ऋषी गणितज्ञ‎वराहमिहिर, आर्यभट्ट, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त इ. होते. ते‎गणिताला विश्वाचे नियम स्पष्ट करण्याचे एक साधन मानत‎होते. श्रीनिवास रामानुजन यांना गणितातच देव दिसला.‎

मानवी अस्तित्वासोबतच एक उत्सुकता निर्माण झाली‎की, हे विश्व आपोआप निर्माण झाले की त्याचा कोणी‎निर्माता आहे? सुरुवातीला धर्मगुरू व धर्मांनी याचा विचार‎केला. मग गणितज्ञ आले. मग खगोलशास्त्रज्ञ,‎जीवशास्त्रज्ञ, उत्क्रांतीवादी इ. आहेत. अणु भौतिकशास्त्र व‎क्वांटम भौतिकशास्त्राच्या युगात भौतिकशास्त्रज्ञ अमित‎गोस्वामी यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले – देव मृत नाही. ते‎पुस्तकाची सुरुवात एका प्रश्नाने करतात. देवाच्या‎अस्तित्वाचा प्रश्न वैज्ञानिक पुराव्यांद्वारे सोडवता येईल का?‎मग ते म्हणतात, हे शक्य आहे. देवाच्या अस्तित्वाच्या‎बाजूने आहे. सृष्टीतील अगाध व अनाकलनीय रहस्ये‎बुद्धिजीवींना चकित करतात. अगदी सामान्यांनाही.‎

हे भारतीय संत, साधक किंवा आध्यात्मिक ऋषींचे‎दुर्मिळ अनुभव आहेत. जीवनाचे रहस्य शोधण्यासाठी‎निघालेल्या पश्चिमेकडील तर्कशुद्ध बुद्धिजीवींना स्वतःचा‎अनुभव आहे की, जे दृश्यमान आहे ते खरे जग नाही. पॉल‎ब्रंटन हा असाच एक तर्कशुद्ध ब्रिटिश होता. जीवन समजून‎घेण्यासाठी रशिया, इजिप्त इ. ठिकाणी प्रवास केला. समृद्ध‎अनुभव लिहिले. भारतावरील त्यांची दोन पुस्तके – सर्च इन‎सिक्रेट इंडिया (१९३४), अ हर्मिट इन द हिमालय (१९३६)‎सृष्टीच्या विशालतेची सखोल माहिती देतात. अर्न्स्ट‎हॉफमन यांचा जन्म तत्त्वज्ञांची भूमी जर्मनीत झाला. तिबेट,‎बर्मा-चीन इ. ठिकाणी प्रवास केला. तिथले अनुभव पाहून‎थक्क झाले. अंगरिका गोविंद हे सर्वोत्तम बौद्ध लामा बनले.‎जगप्रसिद्ध पुस्तक आहे – द वे ऑफ द व्हाइट क्लाउड्स. ते‎तत्कालीन बर्माची उन्हाळी राजधानी (मेमाओ) येथे होते.‎म्युंग नावाच्या छोट्या मुलाला भेटले. तो आचार्यांच्या‎मोठ्या मेळाव्याला संबोधित करत होता. जेमतेम सहा‎वर्षांचा. गरीब कुटुंबात जन्म. मागील आयुष्यातील मोठा‎बौद्ध मठ ओळखला. बौद्ध गुरूंना त्यांच्या वस्तूंसह‎ओळखले. गोपनीय गोष्टी सांगितल्या. त्या मुलाची‎असाधारण प्रतिभा, विद्वत्ता, भाषण व वर्तन पाहून बर्माचे‎गव्हर्नर सर हेन्री बटलरसह संपूर्ण बर्मा आश्चर्यचकित झाले.‎मग अंगरिका स्वतःला प्रश्न विचारतात. मोझार्ट व‎बीथोव्हेनसारखे संगीतकार लहान वयातच प्रतिभावान कसे‎बनले? मोझार्टने वयाच्या ७ व्या वर्षी उत्तम संगीत रचले.‎ऑस्ट्रियन सम्राज्ञी मारियाच्या दरबारात अविस्मरणीय संगीत‎वाजवले. बीथोव्हेनने वयाच्या ८ व्या वर्षी संगीत मैफल‎केली. अशा प्रकारे अनेक विचित्र व ऐतिहासिक घटना‎(साहित्य, गणित इ. क्षेत्रांतील) अंगरिकांनी नौंदवल्या. ते‎विचारतात की, अशा तथ्यांचे रहस्य कोण समजू शकले?‎

भारतीय मानसिकतेत धारणा आहे की, विश्व दुर्गम व‎अदृश्य आहे. जगातील प्रतिष्ठित संस्था म्हणजे जिनिव्हा‎येथील अणु संशोधन केंद्र, सर्न. त्याचा उद्देश निसर्गाची‎मूलभूत ऊर्जा, कृष्णविवरे, डार्क मॅटरचे स्वरूप व भौतिक‎कणांचे गुणधर्म समजून घेणे आणि ओळखणे आहे. १३.८‎अब्ज वर्ष जुन्या विश्वाच्या केंद्राकडे पाहिल्यास पृथ्वीचे‎स्थान मोहरीच्या दाण्याइतके छोटे आहे!‎



Source link

बंद घरांची पाहणी करून पुण्यात चोरट्यांकडून घरफोडी

0
बंद घरांची पाहणी करून पुण्यात चोरट्यांकडून घरफोडी



पुणे : सुटी असल्याने पर्यटनासाठी बाहेरगावी गेलेल्यांच्या घरांची पाहणी करून चोरी करण्याचे प्रकार वाढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरीला गेल्याच्या घटना विश्रामबाग, बंडगार्डन आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्या असून, त्यामध्ये सुमारे १९ लाख रुपयांचा माल चोरीला गेला आहे.नवी पेठेतील लोकमान्यनगर परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा लाख ९८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत नेहा श्रीराम वाघ (रा. बिबवेवाडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, वाघ यांची आई चारधाम यात्रेला गेल्या आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातून १० लाख ९८ हजारांचे दागिने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.पुणे स्टेशन भागातील आगरकरनगर परिसरात एका सदनिकेत राकेशकुमार भगवती प्रसाद (वय ३७) हे खासगी रेल्वे आरक्षण केंद्र चालवितात. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ६८ हजार रुपयांचा लॅपटाॅप आणि रोकड चोरून नेली. याबाबत प्रसाद यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख ३९ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत बिपीन अजयराव घाडगे (वय ४५, रा. आशिष अपार्टमेंट, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर तपास करत आहेत.
चोरटे सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करतात. ज्या सोसायटीत रखवालदार नाहीत, अशा सोसायटीतील सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेतात.



Source link

पहिले रघुजी भोसले यांच्या तलवार खरेदीसाठी ७० लाख रुपये खर्च

0
पहिले रघुजी भोसले यांच्या तलवार खरेदीसाठी ७० लाख रुपये खर्च



लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती शाहू महाराज्यांच्या काळात बंगाल, ओडिसा, छत्तीसगड प्रांतात मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे शूर सेनापती पहिले रघुजी भोसले यांच्या तलवार खरेदीसाठी सरकार ६९ लाख ९४ हजार रुपये मोजणार आहे.

कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात पहिले रघुजी भोसले (१६९५-१७५५) हे शूर सेनापती होऊन गेले. त्यांचे शौर्य आणि कुशल युध्दनितीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहेबसुबा’ ही पदवी प्रदान केली होती. त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगड, चांदा, संबलपूर या प्रदेशात केला होता. नागपूरच्या भोसले घरण्याची स्थापना त्यांनी केली आहे. ज्या तलवारीच्या जोरावर हा पराक्रम त्यांनी केला, ती तलवार १८१७ मध्ये सीताबुल्दीच्या लढाईत ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लुटीचा भाग म्हणून लंडनला नेली. लंडनमध्ये मागील महिन्यात झालेल्या लिलावात ही ऐतिहासिक तलवार प्रवीण चल्ला या ऐतिहासिक संग्राहकाने खरेदी केली.

चल्ला ही तलवार राज्य शासनाला देण्यास तयार आहेत. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाला ६९ लाख ९४ हजार ४३७ रुपये मोजावे लागणार आहेत. त्याची प्रशासकीय व वित्तीय मान्यता एका शासन आदेशाने देण्यात आली.

गेल्या वर्षी १७ जुलै रोजी माजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानचा ज्या वाघनखांनी कोथळा बाहेर काढला, ती वाघनखे लंडनहून आणली. तीन वर्षे ही वाघनखे राज्यातील विविध वस्तू संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. त्यासाठी ७ कोटी रुपये खर्च करून वस्तू संग्रहालयांची डागडुजी करण्यात आली आहे.



Source link

The list of candidates recommended under selection without interview उमेदवारांची शिफारस

0
The list of candidates recommended under selection without interview उमेदवारांची शिफारस


पुणे : पवित्र संकेतस्थळामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीप्रक्रियेतील मुलाखतीविना निवडीअंतर्गत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार १११४ उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून, त्यात मराठी माध्यमासाठी ९६३, उर्दू माध्यमासाठी १००, हिंदी माध्यमासाठी ३५, बंगाली माध्यमासाठीच्या १६ उमेदवारांचा समावेश आहे.

शिक्षण विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पवित्र संकेतस्थळामार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीविना निवडीचा पर्याय निवडलेल्या १८ जिल्हा परिषदांनी ४६८, १३ महापालिकांनी ३६२, ५७ नगरपालिका-नगर परिषदांनी २२१, तर २५ खासगी शैक्षणिक संस्थांनी ५३७ अशा एकूण १५८८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी केली होती. त्यानुसार पात्रताधारक उमेदवारांचे निवडयादीकडे लक्ष लागले होते.

या पार्श्वभूमीवर, मुलाखतीविना निवडीअंतर्गत १५८८ रिक्त पदांसाठी एकूण १११४ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. त्यात पहिली ते चौथीसाठी ५५४, सहावी ते आठवीसाठी २१०, नववी ते दहावीसाठी २१६, अकरावी ते बारावीसाठी १३४ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यात अनुसूचित जातीतील ३५, अनुसूचित जमातीतील ६४, विमुक्त जातीतील (अ) ३७, भटक्या जमातीतील (ब) २६, भटक्या जमातातील (क) २२, भटक्या जमातीतील (ड) १४, विशेष मागास प्रवर्गातील ६, इतर मागास प्रवर्गातील १६८, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १०७, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील १३३, खुल्या प्रवर्गातील ४०२ उमेदवारांचा समावेश आहे.

हेही वाचा

मुलाखतीसह निवडीसाठी ८ हजार ७३३ पदे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांमध्येही भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार ८ हजार ७३३ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.





Source link