Tuesday, August 18, 2026
Homeमनोरंजनnavi mumbai panvel couple fined for obscene act in nmmc bus

navi mumbai panvel couple fined for obscene act in nmmc bus

navi mumbai panvel couple fined for obscene act in nmmc bus

[ad_1]

पनवेल: नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम सेवेच्या बसमध्ये महिन्याभरापूर्वी एक प्रेमीयुगल अश्लिल चाळे करतानाची चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरली होती. याच प्रकरणानंतर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम सेवेच्या (एनएमएमटी) बससेवेचा असाही वापर अशा पद्धतीची टिका टिप्पणी समाजमाध्यमांवर चर्चेला आली होती. तातडीने एनएमएमएटी प्रशासनाने वाहकाला दोषी मानत कामावरुन कमी केले. विशेष म्हणजे याच वाहकाच्या फीर्यादीनंतर कामोठे पोलीस ठाण्यात संबंधित प्रेमी युगलाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी त्या प्रेमी युगलाचा शोध घेऊन त्यांना नोटीस बजावली. या प्रेमी युगलांनी न्यायालयासमोर त्यांनी स्वताची चूक कबूल केल्यानंतर या दोघांनाही प्रत्येक दोन हजार रुपयांच्या दंड ठोठावून सोडण्यात आले.

१८ एप्रिलची ही घटना आहे. सायंकाळी पावणेसहा वाजण्याची वेळ होती. पनवेल रेल्वेस्थानकासमोर असणा-या एनएमएमटीची कल्याण मार्गावर धावणारी बस अर्धवट टप्पा वाहतूकीसाठी आयजीपीएल थांब्यापर्यंत तळोजापर्यंत सोडण्यात आली. बसचे ३५ वर्षीय वाहक सोमनाथ जाधव हे बसमध्ये कमी प्रवासी घेऊन रेल्वे स्थानकासमोरुन निघाले. आसूडगाव आगारापर्यंत बस येईपर्यंत बसमध्ये ८ ते ९ प्रवासी बसले होते. याच बसमध्ये कमी प्रवासी संख्या असल्याने बसची मागील आसने रिकामी होती. याच आसनावर संबंधित १९ वर्षांचे प्रेमी युगल बसले होते. या दोघांनी एक फुल एक अर्धे असे २७ रुपये देऊन तिकीट घेतले होते. बसला दोन दरवाजे असले तरी पुढचा दरवाज्यातून प्रवाशांची येजा असल्याने वाहक जाधव हे पुढच्या दरवाज्याशेजारी उभे होते.

बस कळंबोली सर्कलपर्यंत आल्यावर या प्रेमीयुगलाचे अश्लिल चाळे सुरू असतानाची चित्रफीत त्याच सर्कलच्या इतर मार्गावर सिग्नलवर उभ्या असणा-या इतर प्रवाशाने बनवली होती. तब्बल चार दिवसांनी ही चित्रफीत समाजमाध्यमावर वा-यासारखी पसरल्यानंतर या प्रकरणात जेवढी चर्चा प्रेमी युगलांची झाली तेवढीच चर्चा एनएमएमटी बससेवेची झाली. नवी मुंबई महापालिकेच्या काही अधिका-यांनी या प्रकरणावर तातडीने पडदा टाकावा यासाठी संबंधित वाहकाला नोकरीवर न येण्याच्या सूचना दिल्या. तोपर्यंत नवी मुंबईचे पोलीस दलाला जाग आली होती. समाजमाध्यमांवर चर्चा असणारी ही बस शोधून काढून हा प्रकार जेथे घडला तेथे गुन्हा नोंदविण्याच्या सूचना पोलीस दलाच्या वरिष्ठांकडून आल्यामुळे कामोठे पोलीस ठाण्यात याबाबत २२ एप्रिलला गुन्हा नोंद करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या वाहकाला कामावरुन काढून टाकण्यात आले तोच या प्रकरणाचा फीर्यादी आहे.

हेही वाचा

पोलीस दफ्तरी हे प्रकरण नोंदवल्यावर वरिष्ठ पोलीस निरिक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत तायडे यांनी या प्रकरणातील प्रेमी युगलांपैकी एका तरुणाला उसाटणे गावातून आणि पेणधर गावात राहणा-या मुलीचा शोध लावून २६ एप्रिलला या दोघांनाही कायदेशीर कारवाई संदर्भात नोटीस बजावली. हा तरुण पहिले एका रक्तपेढीत कामाला होती. तर संबंधित मुलगी वैद्यकीय क्षेत्रात कामाला होती. दोघेही उत्तरप्रदेश या राज्यातील मूळ राहणारे आहेत. दोघांची ओळखीनंतर प्रेम झाले. काही महिने हा कामानिमित्त इतर ठिकाणी गेला होता. एप्रिल महिन्यात तो तरुण तळोजात परत आल्यानंतर त्याने या मुलीची भेट घेतली. आणि भेटीनंतर १८ एप्रिलला हे दोघे पहिले पनवेल रेल्वेस्थानकाजवळील उद्यानात भेटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर ते घरी जात असताना बसमधील गंभीर प्रकार त्यांच्याकडून घडला. १६ मे रोजी या दोघांनीही न्यायालयासमोर स्वताची चूक कबूल केल्यानंतर न्यायाधीशांनी त्या दोघांना चार हजार रुपयांचा दंड भरुन सोडून दिले. न्यायालयाने प्रेमी युगलांना सोडून दिल्याचे समजल्यानंतर एनएमएमटी प्रशासनाने सुद्धा वाहक जाधव यांना कामावर परत रुजू करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. वाहक जाधव हे मागील १० वर्षांपासून एनएमएमटीमध्ये कार्यरत आहेत. २४,५०० रुपयांचे ठोक मानधनावर काम करणारे जाधव हे पत्नी पाच आणि सव्वा वर्षांच्या दोन मुलासोबत खोपोली येथे राहतात. अचानक नोकरीवरुन काढून टाकल्याने तेही या प्रकरणात पालिका आयुक्त कधी न्याय करतात याकडे लक्ष लावून आहेत.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments