Saturday, July 11, 2026
Home Blog Page 222

The existence of Ayuka this campus of Savitribai Phule Pune University

0
The existence of Ayuka this campus of Savitribai Phule Pune University


सिद्धार्थ केळकर
पुणेकरांचे काही खास हळवे कोपरे आहेत. ‘इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स’ अर्थात ‘आयुका’ हा त्यातील एक. ‘एक काळ होता,’ असे म्हणावे इतकीही ही संस्था खरे तर जुनी नाही. उणीपुरी साडेतीन दशके हा काही तसा ‘ऐतिहासिक’ म्हणावा, असा काळ नाही. पण, पुणेकरांना याचे अप्रूप निश्चित होते, आहे. आकाश निरीक्षणाच्या हौसेला अभ्यासू बनविण्याचे नि:संशय श्रेय ‘आयुका’चे. ‘आयुका’च्या आवारातील शास्त्रज्ञांचे पुतळे विचारमग्न असले, तरी मुक्त आहेत, याचे पुण्याकरिता असलेले मोल अनुभवायचे असेल, तर एकदा तरी ‘आयुका’तील एखादा का होईना कार्यक्रम प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहायला-ऐकायला हवा.

त्यातून ‘आयुका’चे अस्तित्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात. विद्यापीठाच्या या आवाराने पुण्यातील शैक्षणिक वातावरण शब्दश: घडवले. विविध विद्याशाखांच्या विभागांना भारदस्तपणा असला, तरी तो समोरच्याची छाती दडपून टाकणारा नाही. तो आपलासा करणारा, स्वागतशील आहे. तीच गोष्ट विद्यापीठ आवारातील संशोधन संस्थांच्या बाबतीतही. आयुका, एनसीआरए, एनसीसीएस, सी-डॅक या सगळ्याच संस्थांवर पुणेकरांनी प्रेम केले आहे. विद्यापीठात आपण गणेशखिंड रस्त्यावरील ज्या आनंदऋषीजी महाराज चौकातून जातो, तेथून पाषाणला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या शैक्षणिक आणि संशोधन संस्था हे पुण्याचे मोठे ज्ञानसंचित. एनसीएल, आयआयटीएम, आयसर, एआरडीई… या आणि अशा संस्था या रस्त्यावरून जाताना एका पाठोपाठ एक दिसतात म्हणजे काय, या प्रश्नाच्या उत्तराचे मोल जाणतेपणाने जाणिवेत रुजवून घ्यावे, असे.

ज्या काळात भारताने जागतिकीकरण स्वीकारले, त्या नव्वदच्या दशकात हा परिसर नवकल्पना, नवसर्जन आणि नवसंशोधनाने सळसळत होता. विद्यापीठाच्या आवारातील ‘आयुका’त डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या खगोलशास्त्रातील सहकाऱ्यांना संशोधनासाठी आपल्या आकाशापलीकडचे आकाश खुणावत होते; त्याच्या थोडे अलीकडे सी-डॅकमध्ये डॉ. विजय भटकर आणि त्यांच्याबरोबर ‘परम’ संगणकावर काम करणारा संगणकशास्त्रज्ञांचा चमू भारताचा देशी सुपरकम्प्युटर बनविण्यासाठी झटत होता आणि नवसंशोधकांना कायमच व्यापक दृष्टी देणारे, देशभरात विज्ञान लोकाभिमुख करण्यात खूप मोठा वाटा असलेले डॉ. रघुनाथ माशेलकर तेथूनच जवळ पाषाण रस्त्यावरच्या ‘एनसीएल’मध्ये वेगवेगळ्या संशोधनांवर स्वत: काम करता करता इतरांना प्रोत्साहन देत होते. त्या भारावलेल्या नव्वदच्या दशकाअखेरच्या वर्षात, २००० मध्ये पुण्यात झालेली सायन्स काँग्रेस हा या सगळ्याचा कळस होता. अवघ्या दोन-तीन किलोमीटरच्या परिसरात हे तिघे शास्त्रज्ञ एकाच काळात, एका वेळी कार्यरत असणे म्हणजे काय, हे या पुण्याने अडीच-तीन दशकांपूर्वी अनुभवले आहे!

हेही वाचा

डॉ. जयंत नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले, त्या वेळी अनेक पुणेकरांकडून या सगळ्या नजीकच्या भूतकाळाची उजळणी झाली. अनेकदा तशी ती होणे आवश्यक असते. अशासाठी, की चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या (इंडस्ट्री ४.०) अखेरच्या टप्प्यात तंत्रज्ञानाचा प्रचंड रेटा उद्योग क्षेत्राची दिशा बदलून टाकत असताना, रोजगाराच्या दिशाही बदलतायेत आणि पर्यायाने शिक्षणाच्याही. व्यावसायिक शिक्षण, कौशल्यवृद्धी हे परवलीचे शब्द बनले असले आणि ते रोजगारक्षम होण्यासाठी आवश्यकही असले, तरी शहरातील उपरोल्लेखित ज्ञानमार्गावर मूलभूत विज्ञानातील दीपस्तंभ उभे आहेत, याचे यानिमित्ताने स्मरण झाले, तर ते हवे आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. ज्या पुणेकरांनी आपल्या विद्यार्थीदशेत जागतिकीकरणोत्तर काळात नारळीकर, माशेलकर, भटकर हे तीन दिग्गज एकत्र कार्यरत असताना पाहिले आहेत, सायन्स काँग्रेस अनुभवले आहे, त्यातील बरेचसे आता पालकांच्या भूमिकेत असतील. त्यांनी याचे महत्त्व आपल्या पाल्यांपर्यंत पोहोचवायला हवे आहे. आणि, ते केवळ स्मरणरंजन म्हणून नाही, तर या स्मृतींतून विज्ञानाची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवण व्हावी, म्हणून. मूलभूत विज्ञान हा प्रत्येकाचाच अभ्यासाचा विषय होऊ शकत नाही, पण या शहराचे त्यात काय योगदान आहे, हे माहीत असेल, तर त्याबद्दलचा आदर वाढत राहतो, हे महत्त्वाचे.

डॉ. जयंत नारळीकरांनी या वर्षीच्या विज्ञानदिनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देतानाच, उपस्थितांनाही विज्ञानविषयक प्रश्न विचारले होते. त्यांना आदरांजली वाहताना पुणेकरांनी, त्यांचे स्मरण केवळ समाज माध्यमांत पोस्ट टाकण्यापुरते न ठेवता, वैज्ञानिक म्हणून त्यांनी आपल्याला काय दिले आणि आपण त्यातून विज्ञानाकडे पाहायला कसे शिकलो, शिकत राहू, असा प्रश्न विचारत राहून ठेवले, तर अधिक बरे! तेच अधिक खरे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

siddharth.kelkar@expressindia.com





Source link

A shocking case of a friend being held hostage in a room in Kondhwa डांबून ठेवून मागितली खंडणी

0
A shocking case of a friend being held hostage in a room in Kondhwa डांबून ठेवून मागितली खंडणी


पुणे : मैत्रिणीने चहा पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावून मित्राच्या डोळ्यात मिरची टाकून जखमी केले, त्यानंतर साथीदारांच्या मदतीने त्याचे हातपाय बांधून खोलीत डांबून ठेवत खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अवघ्या चार तासांत कोंढवा पोलिसांनी अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली. याप्रकरणी मैत्रीण, तिचा पती आणि अन्य दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

सोनल ऊर्फ सोनी अतुल रायकर (वय ३५, रा. कोंढवा खुर्द), तिचा पती अतुल दिनकर रायकर (वय ३८), तसेच त्याचे साथीदार रॉबीन ऊर्फ रवि मंडल (वय २४, रा. कोंढवा खुर्द), सुरेश ऊर्फ सुशांतकुमार सुरवाती हान (वय ३१, रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनल आणि फिर्यादी हे मित्र आहेत. सोनलने बुधवारी मित्राला चहा पिण्याच्या बहाण्याने एनआयबीएम रस्ता परिसरातील घरी बोलाविले. सायंकाळी ते मैत्रिणीच्या घरी गेले. घरात प्रवेश करताच सोनलने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून जखमी केले. त्याचवेळी घराबाहेर दबा धरून बसलेल्या तिच्या पतीसह अन्य दोन साथीदारांनी आत येऊन त्याला मारहाण केली. हातपाय दोरीने बांधले आणि खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर आरोपींनी तरुणाचा मोबाइल संच आणि एटीएम कार्ड काढून घेतले. त्याच्या मोबाइलवरून पत्नीला संदेश पाठवून दागिने आणि पैसे तयार ठेवण्याची धमकी दिली. दरम्यान, या घटनेची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव यांना मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

तत्काळ वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर यांना याबाबतची माहिती देऊन सहायक निरीक्षक सुकेशिनी जाधव, राकेश जाधव यांच्यासह पथकाने एनआयबीएम रस्ता भागातील घरावर छापा टाकून तरुणाची सुटका केली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.





Source link

Bachchu Kadu visited Rahibai Poperes seed bank राहीबाईंच्या बीजबँकेला भेट

0
Bachchu Kadu visited Rahibai Poperes seed bank राहीबाईंच्या बीजबँकेला भेट


अकोले: प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कोंभाळणे येथे पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या बीजबँकेस भेट देत गावरान बियाण्यांचा संग्रह व बीजबँक प्रकल्पाची माहिती त्यांनी घेतली. राहीबाई यांनी बायफ संस्थेच्या मदतीने देशातील पहिली गावरान बियाणे बँक उभारत नामशेष होत चाललेले ५२ पिकांचे ११४ वाण गावातील महिला शेतकऱ्यांच्या मदतीने जतन केले आहेत.

या वेळी सर्व बियाणे व औषधी वनस्पतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. बच्चू कडू यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. राहीबाई यांच्याबरोबर विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा करत बीज संवर्धनात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. कोंभाळणे हे डोंगरावर वसलेले गाव असल्याने शेती व दैनंदिन वापराच्या पाण्याची गंभीर समस्या असल्याचे राहीबाईनी सांगितले. गावरान बियाणे मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी प्रहार संघटना तसेच शासनाकडे पाठपुरावा करून पाणी समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यास मदत करण्याचे आश्वासन बच्चू कडू यांनी दिले.

भेटी दरम्यान बच्चू कडू यांनी बीज बँकेतील संग्रहित बियाण्यांची सखोल माहिती राहीबाईकडून करून घेतली. प्रारंभी राहीबाई यांनी औक्षण करीत पारंपरिक पद्धतीने बच्चू कडू यांचे स्वागत केले. अनेक पारंपरिक आणि नष्ट होत चाललेल्या सांस्कृतिक बाबींबद्दलही दोघांमध्ये चर्चा झाली.

हेही वाचा





Source link

अण्णा हजारे, पोपटराव पवार, राहीबाई पोपरे यांची निवड ; अहिल्यानगर गौरव पुरस्काराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

0
अण्णा हजारे, पोपटराव पवार, राहीबाई पोपरे यांची निवड ; अहिल्यानगर गौरव पुरस्काराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण



अहिल्यानगरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी निमित्त विचार भारती व जनसेवा फाउंडेशनने अहिल्यानगर गौरवदिन व पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २९ ते ३१ मे दरम्यान केले आहे. या कार्यक्रमात पद्मविभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार व पद्मश्री राहीबाई पोपरे या तिघांना ‘अहिल्यानगर गौरव पुरस्कार’ ३१ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरित होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित असतील.

महोत्सवाचे सचिव अनिल मोहिते व स्वागताध्यक्षा धनश्री विखे यांनी ही माहिती दिली. अण्णा हजारे, पोपटराव पवार व राहीबाई पोपरे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून अहिल्यादेवींचे जनसेवेचे कार्य पुढे नेले आहे. या तिन्ही व्यक्तिमत्त्वांमुळे नगरचे नाव देशभर गेले. त्यामुळे तिघांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महोत्सवात दि. २९ मे रोजी जिल्ह्यातील सर्व संतमहंत, ऐतिहासिक स्थळांची ओळख करून देणाऱ्या चित्ररथांची मिरवणूक, दि. ३० मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार ह्यांच्या हस्ते आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ह्यांच्या उपस्थितीत होईल. दि. ३१ मे रोजी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती शिंदे, पालकमंत्री विखे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आदींच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी हिंदुत्ववादी प्रवक्त्या काजल हिंदुस्तानी यांचे महिला सबलीकरणावर व्याख्यान व ‘राष्ट्र समर्थ देवी अहिल्या की पुण्यगाथा’ ही हिंदी नाटिका होईल.



Source link

Chief Minister Devendra Fadnavis approved works हजार कोटींच्या कामांना मंजुरी

0
Chief Minister Devendra Fadnavis approved works हजार कोटींच्या कामांना मंजुरी


कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापूर नियंत्रण प्रकल्प राबवण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दोन्ही जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत केले असतानाच इकडे महसूल व वन विभागाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा -भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी एक हजार कोटींहून अधिक खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही कामे जागतिक बँकेच्या साहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत कोल्हापूर, इचलकरंजी, तसेच सांगली-मिरज-कुपवाड या महापालिकेच्या हद्दीमध्ये करण्यासाठी चालना मिळाली आहे.

हवामान बदलावर आधारित पूर, उष्णतेची लाट, वादळ यांसारख्या आपत्तीपासून होणारे परिणाम कमी करण्यासाठी कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली या महापालिका हद्दीमध्ये पूर आपत्ती नियंत्रणासाठी विविध उपाय योजण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. या अंतर्गत महाराष्ट्र प्रसिद्ध प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन व धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी राज्य सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने ६ मार्च रोजी काही कामांना मंजुरी दिली होती. त्या कामांना नगरविकास विभागाने संमती दर्शवली होती. त्यास आज महसूल व वन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

वादळी पाणी निचऱ्यावर भर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कामांमध्ये कोल्हापूर शहरात वादळी पाण्याचा निचरा योजनेकरिता (स्ट्रॉम वॉटर) ४४४.२५ कोटी, इचलकरंजी महापालिकेत सांडपाणी योजना, प्रकल्प आराखडा तयार करणे यासाठी अनुक्रमे २.२९ कोटी व ४.९२ कोटी, कोल्हापूर शहरात प्रकल्प आराखडा राबवण्यासाठी ४.९२ कोटी, तर सांगली महापालिकेत वादळी पाण्याचा निचरा योजनेसाठी ५०१ कोटी रुपये आदी कामांचा समावेश आहे.

हेही वाचा





Source link

Deputy Chief Minister Ajit Pawar expressed his opinion अजित पवार

0
Deputy Chief Minister Ajit Pawar expressed his opinion अजित पवार


कोल्हापूर : भारताच्या इथेनॉल धोरणाने उसाचा रस आणि मोलॅसेसपासून इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळून साखर उद्योगाचा कायापालट केला आहे. ऊस शेतकऱ्यांना हमीभावाची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

बिद्री (ता. कागल ) साखर कारखान्याच्या सुमारे १३८ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली फित कापून केले.

यावेळी पवार म्हणाले, देशांतर्गत इथेनॉलचे उत्पादन करून भारताने आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी केल्याने मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची बचत झाली आहे. इथेनॉल हे पेट्रोलच्या तुलनेत स्वच्छ इंधन असल्याने हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते. ऊस शेतकऱ्यांना उत्पन्न स्थिरता येऊन वेळेवर पैसेही मिळतात. साखर कारखान्यात इथेनॉल तयार केल्याने मोलॅसेसचा योग्य वापर, आर्थिक लाभ, पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांचा फायदा असा चौफेर उपयोग होतो, असे कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

यावेळी आमदार सतेज पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार संजय घाटगे, कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, प्रादेशिक साखर सहसंचालक जी. जी. मावळे, कार्यकारी संचालक के. एस. चौगुले, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.





Source link

dismiss any police officer found involved in drug dealing पोलीस आढळल्यास बडतर्फी

0
dismiss any police officer found involved in drug dealing पोलीस आढळल्यास बडतर्फी


सांगली : अमली पदार्थाच्या व्यवसायात एखादा पोलीस आढळलाच, तर त्याला बडतर्फ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ४० हजार पोलिसांची भरती केली आहे. यापुढेही भरती केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.

येथे नव्याने उभारण्यात आलेले पोलीस अधीक्षक कार्यालय, कडेगाव व आटपाडी पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी निवासस्थानाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. विशाल पाटील, आ. जयंत पाटील, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, अरुण लाड, तसेच जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी उपस्थित होते. अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रास्ताविक केले.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘भावी पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थाचा वापर रोखणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्यात यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, त्याला चांगले यशही मिळत आहे. दुर्दैवाने यात जर एखादा पोलीस कर्मचारी आढळून आला, तर त्याची गय केली जाणार नाही.’पोलिसांना बदलत्या काळानुसार सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत याकडे सरकारचे लक्ष आहे. नवीन भारतीय न्याय संहितेनुसार लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल होणे आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळणे अपेक्षित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

आरोपपत्र दाखल करण्याची मुदत आता ६० दिवस करण्यात येत आहे. यामुळे अशाच पद्धतीने गुन्हे करणाऱ्यावर वचक बसेल. तसेच तांत्रिक तपासालाही महत्त्व आहे. गुन्हा शाबित होण्यासाठी न्यायवैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरतात. कारण मानवी साक्षीदार फितूर झाले, तरी दोषसिद्धीवर परिणाम होत नाही. सायबर गुन्हेगारीचे नवे आव्हान यापुढील काळात असणार आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी आपण सायबर सुरक्षा केंद्र सुरू केले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले.





Source link

महाराष्ट्र कुस्ती संघाच्या महिला विभागाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कु. ऋतुजा पवार यांची निवड; मुधोजी महाविद्यालयाचा अभिमान

0
महाराष्ट्र कुस्ती संघाच्या महिला विभागाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कु. ऋतुजा पवार यांची निवड; मुधोजी महाविद्यालयाचा अभिमान

हरियाणातील पलवल येथे होणाऱ्या राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्ती संघाने फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील कु. ऋतुजा किशोर पवार यांची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. ही निवड मुधोजी महाविद्यालयासाठी तसेच फलटण तालुक्यासाठी गौरवाची बाब मानली जात आहे.

कु. ऋतुजा पवार यांनी महाविद्यालयात कुस्ती खेळताना उल्लेखनीय यश संपादन केले असून, आता प्रशिक्षक म्हणून देखील त्या राष्ट्रीय पातळीवर योगदान देत आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच सोसायटीचे क्रीडा समिती अध्यक्ष व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री. शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री. दिलीप राजगुडा, सहायक तपासणी अधिकारी श्री. सुधीर अहिवळे, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम, नियामक मंडळ सदस्य श्री. महादेव माने, क्रीडा समितीचे सचिव श्री. सचिन धुमाळ, तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही ऋतुजा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Bangladeshs interim government chief Mohammad Yunus is reportedly set to resign in Bangladesh Politics

0
Bangladeshs interim government chief Mohammad Yunus is reportedly set to resign in Bangladesh Politics



Bangladeshs interim government chief Mohammad Yunus is reportedly set to resign in Bangladesh Politics | मोहम्मद युनूस राजीनामा देणार? लष्कराच्या इशाऱ्यानंतर बांगलादेशात हालचालींना वेग, पण अंतरिम सरकारच्या सल्लागारांनी काय म्हटलं?





Source link

अकलूजमध्ये पाईपलाईन व गटारींच्या कामांना गती; आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामांना सुरुवात

0
अकलूजमध्ये पाईपलाईन व गटारींच्या कामांना गती; आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामांना सुरुवात

अकलूज (प्रतिनिधी) – अकलूज नगरपरिषदेमार्फत शहराच्या पाणीपुरवठा व भूमिगत गटारींच्या कामांना आता गती मिळाली आहे. विधानपरिषद आमदार मा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालेल्या निधीच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण कामांची सुरुवात करण्यात आली असून, विविध भागांतील रस्ते उखडून पाईपलाईन टाकण्याचे व चेंबर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची वाहतूक अडथळ्यात आली असून, ही बाब लक्षात घेऊन नगरपरिषद अधिकारी, बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि संबंधित ठेकेदारांसमवेत पाहणी करून नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले की, सध्याची परिस्थिती पाहता ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. विशेषतः नागरिकांच्या घरासमोरील चेंबरची कामे प्राधान्याने पूर्ण करून पावसाळ्यानंतर रस्त्यांचे पुनर्बांधणी काम मंजूर निधीतून पूर्ण करावे.

यावेळी नगरपरिषद कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागांचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. या निर्णयामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.