Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रअकलूजमध्ये पाईपलाईन व गटारींच्या कामांना गती; आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामांना...

अकलूजमध्ये पाईपलाईन व गटारींच्या कामांना गती; आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामांना सुरुवात

अकलूज (प्रतिनिधी) – अकलूज नगरपरिषदेमार्फत शहराच्या पाणीपुरवठा व भूमिगत गटारींच्या कामांना आता गती मिळाली आहे. विधानपरिषद आमदार मा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालेल्या निधीच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण कामांची सुरुवात करण्यात आली असून, विविध भागांतील रस्ते उखडून पाईपलाईन टाकण्याचे व चेंबर बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची वाहतूक अडथळ्यात आली असून, ही बाब लक्षात घेऊन नगरपरिषद अधिकारी, बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि संबंधित ठेकेदारांसमवेत पाहणी करून नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले की, सध्याची परिस्थिती पाहता ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. विशेषतः नागरिकांच्या घरासमोरील चेंबरची कामे प्राधान्याने पूर्ण करून पावसाळ्यानंतर रस्त्यांचे पुनर्बांधणी काम मंजूर निधीतून पूर्ण करावे.

यावेळी नगरपरिषद कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागांचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. या निर्णयामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments