Saturday, July 11, 2026
Home Blog Page 217

विमान प्रवासात दागिने लंपास

0
विमान प्रवासात दागिने लंपास



पुणे : विमानात ठेवलेल्या पर्समधून महिलेचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमान प्रवाशाच्या सामानातून ऐवज चोरीला गेल्याची अन्य एक घटना पंधरा दिवसांपूर्वीच घडली होती.

याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळच्या दिल्लीच्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला २२ मे रोजी दिल्लीहून पुण्याकडे विमानाने येत होत्या. विमान प्रवासात त्यांच्याकडील पिशवीतून पाच ग्रॅम सोन्याचे दागिने, तसेच १३ हजार ५०० रुपये असा ऐवज चोरून नेण्यात आला. तक्रारदार महिला पहाटे विमानातून उतरल्यानंतर पर्समधून ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.



Source link

children stories education stories balmehfil बालमैफल : खारूताईचं घर

0
children stories education stories balmehfil बालमैफल : खारूताईचं घर


रविवार म्हणजे मुलांच्या मौजमस्तीचा दिवस. आईनं केलेल्या पावभाजीवर ताव मारून अथर्व मित्रांबरोबर खेळायला घराबाहेर निघाला होता. रणरणत्या उन्हात मुलं खेळायला गेली तर त्यांना त्रास होईल म्हणून आईनं अथर्वला मित्रांना बोलवून घरीच खेळण्यास सांगितलं. पडत्या फळाची आज्ञा मानून अथर्वनं फोन करून यश, विराज, सई यांना घरी कॅरम खेळायला बोलावलं. पाच मिनिटांत सगळी मुलं हजर झाली.

अथर्व सगळ्या मित्रांना घेऊन आपल्या बेडरूममध्ये गेला. कपाटाच्या मागे ठेवलेला कॅरम बोर्ड त्यानं बाहेर काढला. टेबलाच्या खणातून सोंगट्या काढल्या व कॅरमच्या चारी बाजूस सगळे जण खेळायला बसले. एकमेकांशी बोलत, गप्पा मारत खेळताना सईचं लक्ष खिडकीकडे गेलं. तिला तिथं काहीतरी पडलेलं दिसलं. ती मोठ्यानं ओरडत उठली, ‘‘तिकडे खिडकीच्या ट्रॅकवर काहीतरी पडलं आहे.’’

लगेच सगळ्यांनी खिडकीकडे पाहिलं तर त्यांना तिथे काहीतरी पडलेलं दिसलं. सगळे हळूच खिडकीजवळ आले. पाहतात तर काय, खिडकीच्या ट्रॅकमध्ये एक छोटं पिल्लू पडलं होतं. विस्फारलेल्या नजरेनं पाहत यश म्हणाला, ‘‘अथर्व, अरे हे कसलं तरी पिल्लू आहे रे.’’

‘‘अरे हो रे…’’ अशी सगळ्यांनीच री ओढली. सगळे त्या पिल्लाला निरखून पाहू लागले.

अथर्वने धावत जाऊन आईला बोलवून आणलं. आईनं पिल्लाला पाहताच ओळखलं की ते खारूताईचं पिल्लू आहे. तिनं हळूच खिडकीच्या बाहेर पिल्लाची आई दिसते का ते पाहिलं. कुणी नसल्याची खात्री केल्यावर मुलांना पिल्लावर लक्ष ठेवायला सांगून आई एखादी लाकडी किंवा पुठ्ठ्याची छोटी पेटी शोधायला घाईनं निघून गेली.

शोधाशोध करताना आईचं लक्ष बाबांनी आणलेल्या द्राक्षाच्या पेटीवर गेलं. तिनं सगळी द्राक्षं काढून काचेच्या मोठ्या वाडग्यात भरली. पेटी पुसून स्वच्छ केली. कपाटातून दोन मऊ कपडं काढली. एका कापडाची व्यवस्थित घडी घालून ते त्या पेटीत अंथरलं. लगबगीनं ती पेटी घेऊन आई बेडरूममध्ये आली. त्या छोट्या पिल्लाला तिनं अलगद उचलून दुसऱ्या कपड्यात गुंडाळलं व हळूच त्या पेटीत ठेवलं. सगळी मुलं आई काय करतेय हे उत्सुकतेनं पाहत होती.

‘‘काकू, हे कोणाचं पिल्लू आहे?’’

‘‘त्याची आई कुठे असेल?’’

‘‘त्याचे डोळे का बंद आहेत?’’

‘‘ते जगेल ना?…’’

असा प्रश्नांचा भडिमार मुलं करू लागताच आईनं आधी सगळ्यांना शांत केलं.

‘‘हे पिल्लू खारूताईचं आहे बरं का! साधारण दोन आठवड्याचं हे पिल्लू असावं. त्याला ऊब मिळावी म्हणून मी कपड्यात गुंडाळून ठेवलं. बहुतेक त्याची आई त्याला घेऊन जाताना ते पडलं असेल…’’

‘‘काकू, ते पिल्लू आपल्या आईशिवाय जगू शकेल का?’’ सईनं चिंतित मुद्रेनं प्रश्न केला.

‘‘आपण त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर ते नक्की जगेल. अथर्व, माझा मोबाइल घेऊन ये. मधू मावशीची प्रतीक्षा नावाची मैत्रीण प्राण्यांची डॉक्टर आहे. आपण तिला या पिल्लाची काळजी कशी घ्यायची ते विचारू.’’ आईच्या उत्त्तरानं मुलांना हायसं वाटलं. अथर्वनं धावत जाऊन आईचा फोन आणला. आईनं ताबडतोब डॉ. प्रतीक्षाला फोन लावला. पिल्लाची काळजी कशी घ्यायची, त्याला काय खायला द्यायचं ते सगळं तिनं सविस्तर सांगितलं. त्यानुसार आईनं मेडिकलमधून प्राण्यांसाठीची दूध पावडर, सिरिंज, कॉटन इत्यादी सामान विकत आणलं.

बच्चे कंपनी खारूताईच्या पिल्लाभोवती बसून होती. आईनं सिरिंजमध्ये पाणी भरलं व अलगद पिल्लाला जवळ घेऊन हळूहळू पाजलं. पिल्लू डोळे मिटून हळूहळू पाणी पित होतं. सगळी मुलं कौतुकानं पाहत होती. पाणी पाजून आईनं पुन्हा पिल्लाला कपड्यात लपेटून पेटीत ठेवलं. पेटीचं झाकण न लावता ती एका कोपऱ्यात ठेवून आई आपल्या कामाला निघून गेली. त्या दिवशी मुलं दिवसभर खारूताईच्या छोट्या पिल्लाच्या विचारात रमली.

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आई दोन-तीन तासांनी पिल्लाला पावडरचं दूध बनवून सिरिंजनं पाजू लागली. अथर्वसाठी हे सगळं नवीन होतं. आईबरोबर तोही पिल्लाची काळजी घ्यायला शिकला. पंधरा दिवसांत पिल्लू हळूहळू द्राक्ष, कलिंगडची छोटीशी फोड चोखून खाऊ लागलं. पिल्लू हळूहळू मोठं होत होतं. आता ते चिकू, केळं, आंब्याची फोड अशी फळं कुरतडून खायला लागलं. पिल्लाचे दात अजून मजबूत झाले नसल्यानं आई त्याला मऊमऊ खायला देत होती. अथर्वला त्या पिल्लाची काळजी घ्यायला आवडू लागलं.

थोड्या दिवसांनी पिल्लू इकडेतिकडे तुरूतरू पळू लागलं. ते अथर्वच्या अंगाखांद्यावर सरसर चढायचं-उतरायचं. त्याला भारी गंमत वाटायची. आधी पिल्लाला पेटीतून बाहेर काढावं लागायचं. पण दोन महिन्यांत ते स्वत:हून बाहेर येऊ लागलं. घरभर तुरूतुरू पळू लागलं. बघता बघता पिल्लू मोठ्या खारूताईसारखं दिसू लागलं.

एक दिवस अथर्व पिल्लाबरोबर खेळत होता. आई म्हणाली, ‘‘अथर्व, आता हे पिल्लू मोठं झालं आहे. त्याला आपल्याला जास्त दिवस घरात ठेवता येणार नाही. कारण खारूताईला आता स्वत:च्या घरात राहायला जावं लागेल.’’

‘‘पण आई, हेही तिचंच घर हे ना…’’

‘‘नाही बाळा. प्राणी आपल्या अधिवासात आनंदी राहतात. खारूताई झाडाच्या ढोलीत किंवा फांदीवर आपलं घर बनवून राहते. हे पिल्लू आता स्वत:चं आयुष्य आपल्या पद्धतीने जगू शकतं. आपण त्याला आपल्या घरात ठेवलं तर ते कोंडल्यासारखं होईल.’’

आईनं अथर्वला प्राण्यांसाठी त्यांचा अधिवास कसा महत्त्वाचा आहे ते समजावून सांगितलं. शेवटी तो खारूताईला सोडायला तयार झाला.

रविवारी संध्याकाळी खारूताईला घेऊन अथर्व व आई जवळच्या बागेत गेले. तिथल्या एका झाडाला ढोल तयार झालेली होती. आईनं अथर्वला त्या झाडाच्या बुंध्याजवळ खारूताईला सोडायला सांगितलं. खारूताईला सोडताच ती झाडाभोवती तुरूतुरू पळू लागली. थोड्याच वेळात ती झाडावर सरसर चढताना अथर्वला दिसली.

आई म्हणाली, ‘‘बघ अथर्व, खारूताईनं आपलं घरं शोधलंच.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खारूताई झाडाच्या ढोलीत गेली आणि ढोलीतून खाली वाकून बघू लागली. अथर्वला वाटलं जणू ती आपल्याला टाटा करते आहे. त्याने भरल्या डोळ्यांनी हात हलवत ‘टाटा’ म्हटलं व तो खारूताईच्या गोड आठवणी साठवत आईबरोबर आपल्या घरी निघाला…





Source link

ज्योतीचं बांगलादेश कनेक्शन; बांगलादेशला गोपनीय माहिती दिल्याचा संशय

0
ज्योतीचं बांगलादेश कनेक्शन; बांगलादेशला गोपनीय माहिती दिल्याचा संशय



पाकिस्तान आणि चीननंतर ज्योतीचं आता बांगलादेश कनेक्शनही समोर आलंय. आतापर्यंत ज्योतीने बांगलादेशच्या व्हिसासाठी अर्ज केला होता अशी माहिती समोर आली होती. मात्र गद्दार ज्योतील ही बांगलादेशमध्येही जाऊन आल्याची माहिती समोर आलीय. 



Source link

ऐका! मी आजारी आहे, लग्नाची वरात आणू शकत नाही; वराने रुग्णालयातून फोन केला अन् पुढच्या क्षणी…

0
ऐका! मी आजारी आहे, लग्नाची वरात आणू शकत नाही; वराने रुग्णालयातून फोन केला अन् पुढच्या क्षणी…


Viral News : लग्न हे वधू वरासोबत दोन्ही कुटुंबातील मिलनाचा एक सुंदर सोहळा असतो. सनई चौघडा वाजतो मांडव दारी, मंडप सजवला होता, वधू मेहंदीच्या हाताने भावी आयुष्याचे स्वप्न रंगत होती, घरात नातेवाईकांची धावपळ सर्वत्र आनंदाचं वातावरण पण काही क्षणात दारावर वर घोड्यावर येणार, सासूची स्वागतासाठी तयारी…पण एका फोननंतर घरातील वातावरणात दु:खाची लाट पसरली. नेमकं काय झालं जाणून घेऊयात. 

ऐका! मी आजारी आहे, लग्नाची वरात आणू शकत नाही…

लक्ष्मीचे लग्न रामनगर परिसरातील बिथोरा गावातील रहिवासी लवलेशसोबत ठरलं होतं. लग्नासाठी वडील अनेक दिवसांपासून तयार करत होते. लेकीला सासरी पाठवण्यासाठीचा तो क्षण जवळ आला होता. पण लवलेशचा अचानक फोन आला की, ऐका मी आजारी आहे, लग्नाची वरात आणू शकत नाही. रुग्णालयातून वराचा फोन आला आणि वडिलांसह वधूच्या चेहऱ्यावरील आनंदावर विरजन पडलं. लक्ष्मीच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांना सांगण्यात आले की वराची तब्येत बिघडली आहे. मुलीच्या बाजूचे लोक ताबडतोब रुग्णालयात पोहोचले, जिथे लव्हलेश बेडवर पडलेला आढळला. पण त्याची प्रकृती सामान्य होती, ज्यामुळे आजारपणाचे निमित्त करून लग्न पुढे ढकलण्यात आल्याचा संशय वधूच्या कुंटुबाला आला. (Viral News Groom calls bride I am sick I am canceling the wedding on the wedding day due to dowry demands)

लग्न मोडण्यामागे हे होतं खरं कारण…

कुटुंबातील सदस्यांना सांगितलं की, लग्नापूर्वी मुलाच्या कुटुंबाने एक लाख रुपये रोख आणि अपाचे बाईकची मागणी केली होती. लक्ष्मीचे वडील साहेब दीन म्हणाले की, ते गेल्या काही महिन्यांपासून लग्नाची तयारी करत होते. नातेवाईक येत-जात राहिले, जेवण आणि सजावटीवर पैसे खर्च होत होते. मुलीच्या हातावर मेहंदी लावण्यात आली होती, पण लग्नाची वरात आली नाही. 

वधूच्या कुटुंबाने रात्री पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पीआरबी पोलीस घटनास्थळी पोहोचले पण कोणताही उपाय सापडला नाही. आता साहब दीनचे कुटुंब न्यायासाठी याचना करत आहे. तीन बहिणींपैकी सर्वात लहान लक्ष्मीची स्वप्ने एकाच दिवसात भंगली. ही घटना आहे, बाराबंकी जिल्ह्यातील सिरौली गौसपूर भागातील कसरैलाडीह गावातील. महाराष्ट्रात वैष्णवी हगवणेचा हुंडाबळीमुळे सर्वत्र हादरला बसला आहे. अशातच बाराबंकीमधील या घटनामुळे अजून कधीपर्यंत हुंडाबळी होणार हा विचार कराला लावणारी गोष्ट आहे. 





Source link

Relief and Rehabilitation Minister Makarand Jadhav Patil ordered मकरंद पाटील यांचे आदेश

0
Relief and Rehabilitation Minister Makarand Jadhav Patil ordered मकरंद पाटील यांचे आदेश


सातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मकरंद पाटील म्हणाले, की नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. यासाठी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी व विभागाने पथके गठीत करून ही कार्यवाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मंत्री जाधव-पाटील यांनी दिल्या आहेत.

जाधव पाटील म्हणाले, अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी सन २०२३- २०२४ या वर्षात ५४ लाख ८० हजार पात्र शेतकऱ्यांना ४ हजार ८३३ कोटी (चार हजार आठशे तेहसतीस कोटी ) रुपये तर १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ६९ लाख ३ हजार शेतकऱ्यांना ६ हजार ९८९ कोटी ( सहा हजार नऊशे एकोणनव्वद) आणि १ एप्रिल २०२५ ते २१ मे २०२५ या कालावधीत ९ लाख ७ हजार शेतकऱ्यांना ९७५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा





Source link

जमील शेख हत्या प्रकरणात पोलिसांनीच कायद्याची हत्या केली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

0
जमील शेख हत्या प्रकरणात पोलिसांनीच कायद्याची हत्या केली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांवर गंभीर आरोप



Maharashtra Navnirman sena Jameel shaikh murder case Jitendra awhad criticizes police जमील शेख हत्या प्रकरणात पोलिसांनीच कायद्याची हत्या केली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांवर गंभीर आरोप





Source link

minister bawankule claimed opposition spreads false Ladki Bahin Yojana news to mislead the public

0
minister bawankule claimed opposition spreads false Ladki Bahin Yojana news to mislead the public



minister bawankule claimed opposition spreads false Ladki Bahin Yojana news to mislead the public | लाडकी बहीण योजनेविषयी विरोधकांकडून दिशाभूल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप





Source link

illegal hill excavation will face fivefold fines said Revenue Minister Chandrashekhar Bawankule

0
illegal hill excavation will face fivefold fines said Revenue Minister Chandrashekhar Bawankule



illegal hill excavation will face fivefold fines said Revenue Minister Chandrashekhar Bawankule | अवैध उत्खननास पाचपट दंड, विभागीय महसूल आढावा बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा





Source link

Paydhuni police arrested 20 year old boyfriend over a Masjid Bandar students suicide

0
Paydhuni police arrested 20 year old boyfriend over a Masjid Bandar students suicide



Paydhuni police arrested 20 year old boyfriend over a Masjid Bandar students suicide | महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराला अटक, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप





Source link

Fact Check : नदीमध्ये दिसला महाकाय एनाकोंडा; थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहून सगळेच घाबरले

0
Fact Check : नदीमध्ये दिसला महाकाय एनाकोंडा; थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहून सगळेच घाबरले


तंत्रज्ञान बदलत असताना, मानवी जीवन अधिकाधिक सोपे होत आहे. पण असे अनेक तंत्रज्ञान आहेत जे आपल्याला गोंधळात टाकत आहेत आणि सत्य आणि असत्य यातील फरक देखील नष्ट करत आहेत. AI हे देखील असेच एक वैशिष्ट्य आहे. जरी एआयने अनेक कामे सोपी केली आहेत. अलिकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्येही असेच काहीसे दिसून आले. या व्हिडिओमध्ये अमेझॉन नदीत एक मोठा एनाकोंडा पोहताना दिसत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर हे खरं आहे का? असा संभ्रम निर्माण झाला आहे. पण सत्य काय हे पाहणार आहोत. 

एक्स वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये एक महाकाय ऍनाकोंडा अमेझॉन नदीत रेंगाळताना दिसत आहे. ज्यामुळे त्याच्यावरुन वाद निर्माण झाला आहे. १४ मे २०२५ रोजी @myhiddenvalue या अकाउंटने शेअर केलेल्या या १५ सेकंदांच्या क्लिपमध्ये घनदाट जंगलाने वेढलेल्या चिखलाच्या ओढ्यावरून एका विशाल, सर्पिल प्राण्याचे हवाई दृश्य दाखवले आहे. या व्हिडिओमध्ये, ज्याने बरीच लक्ष वेधून घेतले आहे, तो याकुमामा नावाचा पौराणिक एनाकोंडा दाखवल्याचा दावा करतो, जो ३० मीटरपेक्षा जास्त लांबीचा असल्याचे म्हटले जाते, असे पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. 

नदीत दिसला महाकाय ऍनाकोंडा

हेलिकॉप्टरमधून घेतलेले हे फुटेज नदीच्या तपकिरी रंगासमोर एक गडद, ​​सर्पिल आकार स्पष्टपणे दाखवते. दृष्टीकोन थोडासा बदलतो, कथित अॅनाकोंडाचे वेगवेगळे कोन दाखवतो, तर हेडफोन आणि मायक्रोफोन घातलेला एक व्यक्ती देखील दिसतो. या नाट्यमय दृश्यामुळे आणि प्राण्याच्या आकारामुळे ऑनलाइन व्यापक अटकळ आणि चर्चा सुरू झाली आहे.

व्हिडीओवर काय आहे प्रतिक्रिया? 

व्हिडिओच्या सत्यतेबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यानंतर, एका समुदायाच्या नोटमध्ये असे म्हटले आहे की हा व्हिडिओ द एआय व्हायब या यूट्यूब चॅनलवरून घेण्यात आला आहे, जो मजेदार आणि कल्पनारम्य एआय व्हिडिओ तयार करतो.

हा व्हिडिओ इतका वास्तववादी आहे की पहिल्या दृष्टीक्षेपात तो कोणालाही खरा वाटू शकतो. हवाई दृश्य, सापाच्या हालचाली आणि त्यामागील जंगल हे अगदी वास्तविक दिसते.

लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

काही लोक घाबरले तर काहींनी व्हिडिओवर विनोदी प्रतिक्रिया दिली. एका युझरने लिहिले, ‘मी देवाला प्रार्थना करतो की हे एआय आहे’. यामधून लोकांची भीती दर्शवते. एआयचे काम आता इतके शक्तिशाली झाले आहे की खरे आणि बनावट यात फरक करणे कठीण होत चालले आहे. हा व्हिडिओ डिजिटल भ्रमाचे देखील एक उदाहरण आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अमेझॉनच्या जंगलात अनेक अज्ञात प्रजाती असू शकतात, परंतु इतक्या मोठ्या आकाराच्या ऍनाकोंडाचे पुरावे अद्याप सापडलेले नाहीत.





Source link