Saturday, July 11, 2026
Home Blog Page 218

EPFO च्या 7 कोटी ग्राहकांसाठी मोठी अपडेट! आता PF वर मिळणार ‘इतके’ टक्के व्याज

0
EPFO च्या 7 कोटी ग्राहकांसाठी मोठी अपडेट! आता PF वर मिळणार ‘इतके’ टक्के व्याज



PF Interest Rate:देशातील EPFO च्या 7 कोटी ग्राहकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 



Source link

शशांक हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण या तिघांचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव

0
शशांक हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण या तिघांचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव



Vaishnavi Hagawane suicide Case pistol gun license of shashank hagawane cancelled pune police action Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : शशांक हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण या तिघांचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव





Source link

पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी तरूणाला अटक

0
पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी तरूणाला अटक



मुंबई : पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी २७ वर्षीय तरूणाला अटक केली. त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व दारू बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पोलीस शिपाई संदीप चंपतराव सोनकांबळे यांना शिवीगाळ करून लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत आरोपीचे तीन साथीदारही सहभागी होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

संदीप सोनकांबळे हे दहिसर येथे राहत असून सध्या बोरिवली पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. सोनकांबळे बीट मार्शल असल्यामुळे परिसरात गस्त घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. ते २० मे रोजी रात्री कामावर हजर झाले. सोनकांबळे २० मे रोजी मध्यरात्री ३ च्या सुमारास सोनकांबळे बोरिवली पश्चिम येथे गस्त घालत होते. त्यावेळी बोरिवलीतील बाभईनाका परिसरात गौरव त्याच्या तीन साथीदारांसोब दारुच्या नशेत गोंधळ घालत होता. सोनकांबळे यांनी त्यांना हटकले व कुठे राहतात असे विचारले. त्यावेळी त्यांनी गोरेगाव असे सांगितले. त्यावेळी सोनकांबळे यांनी चारही तरूणांना गोंधळ न घालता घरी जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने गौरवसह इतर तिघांनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच त्यांना लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाणही केली.

सोनकांबळे यांच्या हातात वॉकीटॉकी असल्यामुळे ते प्रतिकार करू शकले नाहीत. आरोपींनी सोनकांबळे यांच्या पोटात लाथा मारल्या. ते खाली कोसळले. या मारहाणीत त्यांच्या पोटाला, हाताला आणि अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. पण त्यांनी त्या स्थितीतही आरोपी गौरव शेलारला पकडून ठेवले. त्याचे तीन साथीदार घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंंतर सोनकांबळे यांनी याबाबतची माहिती बोरिवली पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या मदतीसाठी पोलीस पथक बाभई नाका परिसरा रवाना झाले. संदीप सोनकांबळे यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी गौरव शेलारला ताब्यात घेतले.

याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहितासह महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत नंतर गौरवला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आरोपी पोलीस कोठडीत आहेत. याप्रकरणात गौरवच्या तीन साथीदारांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची ओळख पटली आहे. आरोपींनी सोनकांबळे यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला होता. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने इतर तीन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.



Source link

खंडणीच्या गुन्ह्यांत चौघांना अटक, आरोपींंची जामिनावर सुटका

0
खंडणीच्या गुन्ह्यांत चौघांना अटक, आरोपींंची जामिनावर सुटका



मुंबई : काळबादेवी परिसरातील बांधकाम स्थळी खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली लोकमान्य टिळक (एलटी) मार्ग पोलिसांनी चौघांना अटक केली होती. यावेळी बांधकाम ठिकाणी शिरलेल्या आरोपींनी तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी खंडणी व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणातील चारही आरोपींची न्यायालयाने जामीन दिला. सर्व आरोपींची १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.

तक्रारदार निसार कुरेशी (४४) जोगेश्वरी येथील रहिवासी असून काळबादेवी येथील बांधकाम ठिकाणावर पर्यवेक्षक म्हणून काम करतात. त्यांच्या बांधकाम स्थळी १९ मे रोजी सात ते आठ व्यक्ती आले. त्यावेळी त्यांनी राजकीय नेता रोहित गुप्ता याचे कार्ड दाखवून आपण माथाडी कामगार असून या बांधकाम स्थळी त्याच्याकडूनच कामे करून घेण्याबाबत त्यांनी सांगितले. त्यावेळी कुरेशी यांनी त्या सर्वांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा काही व्यक्ती बांधकाम स्थळी आले. त्यांनी कंत्राटदाराला भेटण्याचे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना खालीच अडवण्यात आले. त्यावेळी तुम्हाला कोणाकडूनही काम करायचे असेल, त्याच्याकडून करून घ्या. पण काम पूर्ण करायचे असले, तर २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. ती पूर्ण न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करून हातापायाने व हेल्मेटने मारहाण केली.

याप्रकरणी कुरेशी यांच्या तक्रारीवरून एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (४), ११८ (१), ३५१ (३), १९१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलिसांनी दशरथ पांडे, स्थानिक राजकीय पदाधिकारी रोहित गुप्ता यांना २१ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी जयेश वालंत्रा व आदित्य नायडू यांनाही अटक करण्यात आली. त्यांना शनिवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. याप्रकरणात त्यांना नाहक अडवण्यात आले आहे. ते सर्व विद्यार्थी असून त्यांचा याप्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे बचाव पक्षाचे वकील सुनील पांडे यांनी न्यायालयाला सांगितले. यावेळी तक्रारदारानेही लेखी ना हरकत देऊन आरोपी या प्रकरणाशी संंबधित नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर चारही आरोपींची १० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिनावर सुटका केली. याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.



Source link

Chhagan Bhujbal Interview On I will resign from the ministry and Dhananjay Munde Mahayuti Politics

0
Chhagan Bhujbal Interview On I will resign from the ministry and Dhananjay Munde Mahayuti Politics



Chhagan Bhujbal Interview On I will resign from the ministry and Dhananjay Munde Mahayuti Politics | “…तर मी राजीनामा देईन”, मंत्री छगन भुजबळ यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?





Source link

ashti taluka known for onions has been flooded by unseasonal rains damaging crops

0
ashti taluka known for onions has been flooded by unseasonal rains damaging crops



ashti taluka known for onions has been flooded by unseasonal rains damaging crops | कांद्याचे कोठार सडले….अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी…





Source link

this semi hit film shah rukh khan paid 25 thousand begins farah khan srk dosti

0
this semi hit film shah rukh khan paid 25 thousand begins farah khan srk dosti



this semi hit film shah rukh khan paid 25 thousand begins farah khan srk dosti | शाहरुख खानला ‘या’ चित्रपटासाठी मिळालेले फक्त २५ हजार रुपये; फराह खान म्हणालेली, “मला त्याचं वागणं…”





Source link

Tamil Nadu The driver suffered a heart attack while driving the bus but the conductors quick thinking saved the lives of 40 passengers

0
Tamil Nadu The driver suffered a heart attack while driving the bus but the conductors quick thinking saved the lives of 40 passengers



Tamil Nadu The driver suffered a heart attack while driving the bus but the conductors quick thinking saved the lives of 40 passengers | बस चालवताना ड्रायव्हरला आला हृदयविकाराचा झटका; पण कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला ४० प्रवाशांचा जीव





Source link

14 वर्षाच्या मुलीवर 25 वर्षीय तरुणाचा अत्याचार; 20 वर्षांची शिक्षा झाली नंतर त्याच मुलीमुळे शिक्षा रद्द कारण…

0
14 वर्षाच्या मुलीवर 25 वर्षीय तरुणाचा अत्याचार; 20 वर्षांची शिक्षा झाली नंतर त्याच मुलीमुळे शिक्षा रद्द कारण…


न्यायालयाला कायद्यापेक्षा प्रकरणाच्या परिस्थितीनुसार न्याय द्यावा लागतो, कारण कायदे हे मानवाच्या कल्याणासाठी बनवले जातात. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने असाच एक आदेश दिला, ज्यामध्ये बलात्काराच्या दोषीची शिक्षा रद्द करण्यात आली. या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणात, ही व्यक्ती कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले, परंतु पीडितेने सांगितले की, तिला या व्यक्तीवर प्रेम होते. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर, या मुलीला अखेर खरा ‘न्याय’ मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की,  हा निर्णय पूर्वग्रहदूषित मानला जाणार नाही. नेमकं प्रकरण काय आहे? 

घटना समजून घ्या? 

हे प्रकरण पश्चिम बंगालमधील आहे, जिथे 2018 मध्ये एका 14 वर्षांच्या मुलीवर 25 वर्षांच्या तरुणाने बलात्कार केला होता. बलात्कार प्रकरणात तरुणाला दोषी ठरवत कनिष्ठ न्यायालयाने त्याला पॉक्सो कायद्याअंतर्गत 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण जेव्हा मुलीने सांगितले की ती त्या तरुणावर प्रेम करते तेव्हा या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले. दोघांचेही लग्न झाले होते आणि ती स्वतः घरातून पळून गेली होती. पुढे तिवे असेही सांगितले की,तिला एक लहान मुलगी देखील आहे. आता ती मुलगी तिच्या पतीला आणि तिच्या कुटुंबाला वाचवण्यात व्यस्त झाली. शेवटी, या मुलीचे कुटुंब तुटण्यापासून वाचले. न्यायालयाने बलात्काराच्या दोषीला सोडले. हा ‘सर्वोच्च’ निर्णय न्यायमूर्ती अभय एस. यांनी दिला. ओका आणि उज्ज्वल भुईयान यांच्या खंडपीठाने कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी करताना हा आदेश दिला.

२०१८ मध्ये एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला आणि त्या तरुणाला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मुलीने सांगितले की ती त्याच्यावर प्रेम करते आणि तिने कोर्टाला सांगितले की दोघांनी लग्न केले आहे. ती मुलगी मुलाला मांडीवर घेऊन वकिलीसाठी इकडे तिकडे फिरत राहिली. न्यायालयाने कलम १४२ वापरून त्या तरुणाला सोडले.

बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी कसा सुटू शकतो?

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही तरुण बलात्काराचा दोषी असल्याचे मान्य केले. कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे. परंतु असे असूनही, परिस्थिती लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करून तरुणांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, हे प्रकरण लोकांसाठी डोळे उघडणारे आहे. किशोरवयीन मुलांच्या गोपनीयतेच्या अधिकाराच्या नावाखाली सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या पुढाकाराने या प्रकरणाची सुनावणी करत होते. आरोपीला शिक्षा करून तुरुंगात पाठवण्याशिवाय न्यायालयाकडे दुसरा पर्याय नाही, परंतु या प्रकरणात पीडितेचे कुटुंब, समाज आणि कायदेशीर व्यवस्थेने आधीच पीडितेवर खूप अन्याय केला आहे. मुलगी आणि तिच्या लहान मुलीने खूप ताण आणि वेदना सहन केल्या आहेत, आता न्यायालय तिच्या पतीला तुरुंगात पाठवून तिच्यावर आणखी अन्याय करू शकत नाही. त्यामुळे आरोपीला सोडण्यात येते.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल कनिष्ठ न्यायालयाने पॉक्सो कायद्याअंतर्गत आरोपीला दिलेली २० वर्षांची शिक्षा कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द केली होती. परंतु २० ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात, उच्च न्यायालयाचा शिक्षा रद्द करण्याचा आदेश रद्द करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा शिक्षेचा आदेश पुनर्संचयित केला होता परंतु शिक्षा स्थगित ठेवली होती. यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय तज्ञ समिती स्थापन केली होती आणि या प्रकरणात सविस्तर अहवाल मागितला होता. या समितीने म्हटले आहे की जर त्या तरुणाला शिक्षा झाली तर मुलीचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने पीडितेचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले आणि आरोपीची पुढील शिक्षा माफ केली.





Source link

भारतीय रेल्वेचा वर्ल्ड रिकॉर्ड! सर्वात लांब खांबावर बांधला जात आहे उंच रेल्वे पूल

0
भारतीय रेल्वेचा वर्ल्ड रिकॉर्ड! सर्वात लांब खांबावर बांधला जात आहे उंच रेल्वे पूल


Noney bridge in Manipur: भारतीय रेल्वे नवा वर्ल्ड रिकॉर्ड रचणार आहे. भारतीय  रेल्वे नेटवर्क आता जागतिक दर्जाचे होत आहे. रुळांपासून ते पुलांपर्यंत, भारतीय रेल्वे आपल्या यशाने जगाशी स्पर्धा करत आहे. ईशान्येकडील जगातील सर्वात उंच घाट रेल्वे पूल निर्माण केला जात आहे. भारतात बांधला जात सर्वात लांब खांबावर बांधला जात आहे उंच रेल्वे पूल. 

मणिपूरच्या सर्वांगीण विकासासाठी वेगाने काम सुरू आहे, यात भारतीय रेल्वेची महत्त्वाची भूमिका आहे. खडतर भूप्रदेश असूनही, 111 किलोमीटर लांबीच्या जिरिबाम-इंफाळ रेल्वे मार्गाचे काम वेगाने पुढे सरकत आहे. या प्रकल्पात अनेक बोगदे, पूल आणि स्थानके यांचा समावेश आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पिअर पूल जवळपास पूर्ण झाला आहे.

हा रेल्वे ब्रीज एक उल्लेखनीय अभियांत्रिकी प्रयोग मानला जात आहे. एकूण 52 बोगद्यांपैकी 61.32 किलोमीटरपैकी 59 किलोमीटर बोगदा खणण्याचे काम पूर्ण झाले आहे. मणिपूरमधील रेल्वे पूल बांधकाम वेगाने सुरू आहे. 11 प्रमुख पुलांपैकी 5 पूर्ण झाले आहेत, तर 138 लहान पुलांपैकी 81 तयार आहेत. स्थानक विकासाच्याही कामात स्थिर प्रगती होत आहे.

11 नवीन स्थानकांपैकी 6 पूर्ण झाली असून, नोनी येथील खोंगसांग स्थानक आधीच कार्यरत आहे. दरम्यान, ईशान्य भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा जवळपास 10 किलोमीटर लांबीचा संगैहेल बोगदा याचे काम वेगाने पुढे सरकत आहे.  दोन समांतर बोगदे बांधले जात आहेत.एक नियमित रेल्वे वाहतुकीसाठी आणि दुसरा आपत्कालीन बचाव आणि निर्वासनासाठी समर्पित, ज्यामुळे गंभीर परिस्थितीत सुरक्षा आणि गती सुनिश्चित होईल. सुधारित रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे स्थानिक रहिवाशांना आणि मणिपूरला काम किंवा पर्यटनासाठी भेट देणाऱ्यांना सुलभ आणि कार्यक्षम प्रवासाचा फायदा होणार आहे. रेल्वे प्रकल्प आकार घेत असताना, मणिपूर केवळ देशाशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाणार नाही, तर त्याच्या अर्थव्यवस्थेला नवीन गती मिळेल.





Source link