Saturday, July 11, 2026
Home Blog Page 219

2,000-Year-Old Wine Found in Roman Tomb in Southern Spain—And It’s Still Liquid

0
2,000-Year-Old Wine Found in Roman Tomb in Southern Spain—And It’s Still Liquid


History of Old Wine: स्पेनच्या कारमोना शहरात पुरातत्त्वज्ञांनी एक अद्भुत असा शोध लावला आहे. हा शोध केवळ इतिहासाच्या पुस्तकांपुरता मर्यादित नाही, तर प्रत्यक्ष गतवैभवाची साक्ष देणारा आहे. एका रोमन थडग्यात सापडलेली ही वाईन केवळ द्रव स्वरूपात टिकून राहिलेली नाही, तर ती प्राचीन रोमन संस्कृती, अंत्यसंस्कार याबाबत अनेक ऐतिहासिक गोष्टी सांगून जाते. हजारो वर्ष जुन्या थडग्याच्या आत दडलेली ही ‘वाईनची कहाणी’ म्हणजे पुरातत्त्व शास्त्राच्या इतिहासातली एक अविस्मरणीय क्षणचित्रच ठरावे.

रोमन थडग्यात आढळली २,००० वर्षे जुनी वाईन; ती आजही द्रवस्वरूपात कशी?

स्पेनमधील पुरातत्त्वज्ञांना रोमन काळातील एक कलश एका थडग्यात सापडला आहे. या कलशात जगातील सर्वात प्राचीन द्रव स्वरूपातील वाईन असल्याचा दावा केला जात आहे. जवळपास २,००० वर्षे सीलबंद असलेल्या या कलशात लालसर वाईन आहे, तसेच या थडग्यातील मानवी अवशेष आजही टिकून राहिले आहेत. ही वाईन दक्षिण स्पेनमधील कारमोना शहरात सापडली आहे. कलशात असलेली मूळ वाईन पांढऱ्या रंगाची होती. परंतु, कालौघात झालेल्या बदलामुळे तिचा रंग लालसर झाला आहे, असे वैज्ञानिक विश्लेषणातून स्पष्ट झाले.

पाच कलश आणि एक वाईनचा…

ही लाल रंगाची वाईन एका पूर्णतः बंद रोमन थडग्यात आढळली. या थडग्यात सहा कलश सापडले आहेत. या थडग्यातील कलशांमध्ये दहन केलेल्या मृत व्यक्तींचे अवशेष होते. त्यापैकी एका कलशात जवळपास ४.५ लिटर लालसर द्रव आढळला आहे. हा द्रव रासायनिक विश्लेषणानुसार वाईन असल्याचे सिद्ध झाले आहे. ही आजपर्यंत जतन करून ठेवलेली द्रवरूपातील सर्वात प्राचीन वाईन आहे.

हेही वाचा

हा कलश इ.स. पूर्व पहिल्या शतकातील थडग्याचा भाग आहे. या कलशातील अवशेष रोमन पुरुषाचे होते. याशिवाय या कलशात एक सोनेरी अंगठी देखील सापडली आहे. कलश पूर्णपणे सीलबंद असल्यामुळे या द्रवाचे जतन होऊ शकले. त्यामुळे त्या वाईनवर भूगर्भातील पाणी, आर्द्रता किंवा गळती यांचा काहीही परिणाम झाला नाही. हे ठिकाण प्राचीन रोमन प्रांत बाएटिका भागात येते. हा प्रांत त्याकाळी वाईन उत्पादनासाठी प्रसिद्ध होता.

वाईनचे रासायनिक विश्लेषण

कोर्डोबा विद्यापीठाच्या संशोधकांनी या वाईनचे सखोल विश्लेषण केले आहे. ‘हाय-परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी-मास स्पेक्ट्रोमेट्री’च्या (HPLC-MS) साहाय्याने केलेल्या परीक्षणात या वाईनमध्ये सात प्रकारचे पॉलीफिनॉल्स आढळले. यात ‘क्वेर्सेटीन’ आणि ‘एपिजेनिन’ यांचाही समावेश होता. ‘झीएमई सायन्स’ने दिलेल्या माहितीनुसार या वाईनमध्ये ‘सायरिंजिक अॅसिड’ नव्हते. हे अॅसिड लाल वाईनमध्ये आढळते. यावरून ही वाईन मूलतः पांढऱ्या रंगाची होती हे सिद्ध होते. परंतु, कालांतराने रंग बदलून ती लालसर झाली. या वाईनमधील खनिज संरचना मॉन्टिला-मोरीलेस भागातील आधुनिक पांढऱ्या वाईनशी मिळतीजुळती आहे.

एकमेव प्राचीन वाईन

रोमन काळातील जर्मनीत सापडलेली ‘स्पेयर बॉटल’ ही वाईन जरी प्रसिद्ध असली, तरी ती द्रव स्वरूपात नसून बंद बाटलीतील अवशेष स्वरूपात आहे. त्यामुळे कारमोना येथे सापडलेली ही वाईन आजपर्यंतच्या शोधांमध्ये एकमेव अशी रोमन वाईन आहे, जी अजूनही द्रव स्वरूपात आढळली आहे.

रोमन संस्कृतीत वाईनचे मृत्यूनंतरचे महत्त्व

रोमन संस्कृतीत वाईनला सामाजिक आणि धार्मिक दोन्ही अर्थ होते. वाईन मृत व्यक्तीस परलोकात बरोबर घेऊन जाण्यासाठी थडग्यात ठेवली जात असे. पुरातत्त्वज्ञ जुआन मॅन्युएल रोमान यांच्या मते, वाईनबरोबर दहन अवशेष आढळणे हे त्या काळातील अंत्यसंस्कारांमध्ये वाईनच्या धार्मिक भूमिकेचे महत्त्व विशद करते. दुसऱ्या एका कलशात महिलांचे अस्थिवशेष, दागिने, पॅचुली तेलाचा परफ्यूम आणि रेशमी कापडही सापडले आहे. या वस्तूंमधून स्त्री-पुरुषांतील वेगळे अंत्यसंस्कार, सामाजिक स्थान आणि संस्कृतीचे भान दिसून येते.

रोमन वाईन संस्कृती आणि स्त्री-पुरुष भेद

या शोधामुळे प्राचीन रोमन समाजातील लिंगभेदाच्या पद्धतीही उघड झाल्या आहेत. वाईन रोमन समाजात सर्व स्तरांमध्ये वापरली जात होती. परंतु, ती विशेषतः पुरुषांशी संबंधित मानली जात असे. उच्चवर्गीय स्त्रियांना वाईन पिण्यास बंदी होती आणि काही धार्मिक विधींमधून त्यांना वगळले जात असे. त्या काळातील कायद्यानुसार, एखाद्या स्त्रीने वाईन प्यायल्याचे आढळल्यास तिचा पती तिला घटस्फोट देऊ शकत असे किंवा शिक्षा करू शकत असे, असे ऐतिहासिक संदर्भ सापडतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा

परंतु, पुरातत्त्वीय पुरावे असे दर्शवतात की, काही स्त्रिया ‘पास्सम’ नावाची गोड वाईन पीत होत्या. ही वाईन सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह मानली जात होती. पुरूषांच्या कलशात वाईन आढळणे आणि स्त्रियांच्या कलशात नसणे, ही त्या काळातील सामाजिक रचना आणि लिंगभेदाच्या नियमांची साक्ष देणारी बाब आहे.





Source link

HIFAA 2025 करणार आरोग्य क्षेत्रातील Unsung Heroes सन्मानित

0
HIFAA 2025 करणार आरोग्य क्षेत्रातील Unsung Heroes सन्मानित


HIFAA 2025 :  उद्या म्हणजे 25 मे 2025 रोजी HIFAA आरोग्यसेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि इतर आवश्यक कर्मचारी यांना सन्मानित करण्याचा एक खास उपक्रम आहे. या उपक्रमाचं नाव Healthcare Innovators and Facilitators Award (HIFAA) 2025 असं आहे. या कार्यक्रमात  आरोग्यसेवेत काम करणाऱ्या काही अनसंग हीरोजला त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमांसाठी आणि ज्यांनी आपलं आयुष्य आरोग्याच्या सेवेत वाहून दिलंय, त्यांच्या या अमूल्य योगदानाला प्रकाशात आणण्यासाठी आयोजित केला जात आहे.

आरोग्यसेवेतील हीरोंचा सन्मान

HIFAA 2025 हा एक असा सोहळा आहे जो सगळ्यांना प्रेरणा देतो आणि आरोग्यसेवेत त्यांनी जे काही केलं त्यासाठी त्यांना सन्मानित करतात.  आपल्या आरोग्यसेवेत काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आणि हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान खूप महत्त्वाचे असते. ते दिवस आणि रात्र न काही विचार करता तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर उपचार करतात. HIFAA 2025 हा कार्यक्रम त्यांचं हे कर्तव्य आणि न सांगता ते अनेक गोष्टींचा त्याग करतात ते या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून  समाजासमोर आणण्यासाठी याचे आयोजन करण्यात येते. 
 

HIFAA 2025 to honor Unsung Heroes in Healthcare

डॉक्टर, परिचारिका ते रुग्णालयात काम करणाऱ्यांचे रॅम्प वॉक

HIFAA 2025 मध्ये विविध विषयांवर चर्चा आणि त्यासोबत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. जिथे आरोग्यसेवा क्षेत्रातील उत्कृष्टतेला, प्रेमाला आणि नवकल्पनांना सन्मान दिला जाईल. पण या कार्यक्रमाला खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला एक अनोखा फॅशन रॅनवे सेगमेंट. ज्यात डॉक्टर, परिचारिका, हॉस्पिटलमध्ये इतर कामं करणारे कर्मचारी आणि वॉर्डमध्ये काम करणारे लोक वॉक करतील. या फॅशन शोमुळे त्यांचा मान वाढेल आणि समाजात त्यांच्याबद्दल अधिक आदर निर्माण होईल.

या कार्यक्रमातून एक सुंदर संदेश देण्यात आला की, प्रत्येक उपचाराच्या मागे एक असामान्य आत्मा आहे जो सन्मानाचा पात्र आहे. या कार्यक्रमातून प्रेम आणि सहकार्याची खरी ताकद दाखवण्याचा प्रयत्न होईल.

आरोग्यसेवा क्षेत्रातील लोक हे आपल्या समाजाचे खरे हीरो आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच आपली आरोग्य व्यवस्था चालू राहते. त्यांच्या कर्तृत्वाला आणि प्रेमाला आपण सर्वांनी मान्यता द्यायला हवी. HIFAA 2025 हा सोहळा त्यांचं काम ओळखून त्यांना सन्मानीत करण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. आपण सगळे मिळून या हीरोंना आदर आणि सन्मान देऊन त्यांचे योगदान उजाळून धरूया, कारण त्यांच्या मुळेच आपला जीवन आरोग्यपूर्ण राहतो. 





Source link

नागपूर, मुंबई- पुण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार

0
नागपूर, मुंबई- पुण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार


नागपूर : नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे मार्गाची चाचणी पूर्ण झाली आहे. अंतिम अहवाल प्राप्त होताच नागपूर-पुणे-नागपूर तसेच नागपूर-मुंबईदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांनी खासदारांना दिली.

खासदारांनी नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची मागणी केली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांच्या उपस्थितीत नागपूर विभागीय कार्यालयातील समाधान सभागृहात नागपूर व भुसावळ विभागातील खासदारांसोबत बैठक घेण्यात आली.

नागपूर-पुणे-नागपूर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय झाला असतानाही अद्याप सुरू झाली नसल्याचा मुद्दा खासदारांच्या बैठकीत चर्चेत आला. बैठकीत रेल्वे व्यवस्थापक यांच्यासह खासदार डॉ. दिनेश बच्छाव, राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे, भास्कर मुरलीधर भागरे (दिंडोरी), बळवंत बसवंत वानखेडे (अमरावती), बटी विवेक साहू(छिंदवाडा), श्यामकुमार बर्वे ज (रामटेक), संजय उत्तमराव F देशमुख (पवतमाळ-वाशीम), दर्शनसिंह चौधरी (होशंगाबाद), अमर काळे (वर्धा) आणि अनुप संजय धोत्रे (अकोला) उपस्थित होते. यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी रामटेक ते गोटेगाव रेल्वे मार्गाची मागणी केली आहे, तर खासदार अमर काळे यांनी वर्धा जिल्ह्यातील रेल्वे पुलाची मागणी रेटून धरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा
हेही वाचा

नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा के किमान एक ते दीड तासांचा वेळ वाचणार आहे. पुण्याहून सद्यःस्थितीत तीन वंदे भारत एक्सप्रेस धावतात. यात सोलापूर-मुंबई, पुणे-कोल्हापूर व पुणे-हुबळी या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. नागपूर ते पुणे आणि पुणो ते नागपूर ही सेवा आठवड्यातून सहा दिवस असणार आहे. एक दिवस रेकच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी राखीव असणार आहे. प्रवाशांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा खासदारांनी व्यक्त केली. मध्य रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर विभागातील खासदारांसोबत वार्षिक बैठकीत खासदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. मुख्य रेल्वे स्थानक तसेच अजनी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.





Source link

Sarfaraz Khan: कसोटीत धावांचा पाऊस पाडला, १० किलो वजन कमी केलं; तरीही सरफराज खानची इंग्लंडची फ्लाईट हुकली, नेमकं कारण काय?

0
Sarfaraz Khan: कसोटीत धावांचा पाऊस पाडला, १० किलो वजन कमी केलं; तरीही सरफराज खानची इंग्लंडची फ्लाईट हुकली, नेमकं कारण काय?



team india squad announced for england tour sarfaraz khan not selected despite loosing 10kg weight know the reason| कसोटीत धावांचा पाऊस पाडला, १० किलो वजन कमी केलं; तरीही सरफराज खानची इंग्लंडची फ्लाईट हुकली, नेमकं कारण काय?





Source link

Corona Cases surge Kerala Mumbai Delhi hospitals on alert marathi news

0
Corona Cases surge Kerala Mumbai Delhi hospitals on alert marathi news



Corona Cases surge Kerala Mumbai Delhi hospitals on alert marathi news | मुंबई, दिल्लीसह देशातील अनेक ठिकाणी करोना रुग्णांच्या संख्येत वाढ! रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश





Source link

भारतातील शेवटचं रेल्वे स्थानक कोणतं? प्रश्न सोपा, तरीही त्याचं उत्तर देणं मात्र अनेकांनाच नाही जमलंय

0
भारतातील शेवटचं रेल्वे स्थानक कोणतं? प्रश्न सोपा, तरीही त्याचं उत्तर देणं मात्र अनेकांनाच नाही जमलंय


Indian Railway : दर दिवशी कोट्यवधींच्या संख्येनं प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवणाऱ्या भारतीय रेल्वेसंदर्भाती बरीच माहिती आजही अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. फक्त रेल्वेच्या वेळा आणि रेल्वेमार्ग याव्यतिरिक्तसुद्धा या भारतीय रेल्वेशी संबंधित काही अशाही गोष्टी आहेत, ज्यांच्याविषयीची माहिती जाणून तुम्हालाही आश्चर्यच वाटेल. 

जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक असणाऱ्या या भारतीय रेल्वेनं अतिशय दुर्गम भागांपर्यंत मजल मारली आहे. पण, या साऱ्यमध्ये तुम्हाला देशातील सर्वात शेवटचं रेल्वेस्थानक कोणतं याची कल्पना आहे का? हा प्रश्न खरंतर बराच सोपा वाटत असला तरीही त्याचं उत्तर देणं मात्र बऱ्याचजणांना जमलेलं नाही. 

देशातलं सर्वात शेवटचं रेल्वे स्थानक आहे…. 
सिंहाबाद, हे भारतातील सर्वात शेवटचं रेल्वेस्थानक आहे. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपुर भागात भारत आणि बांगलादेश सीमेवर हे स्थानक असल्याचं सांगितलं जातं.या स्थानकानंतर इथून रेल्वेमार्ग पुढे बांगलादेशमध्ये प्रवेश करतो. भारताचा इतिहास आणि शेजारी राष्ट्राशी असणारे व्यापारी संबंध याचंच हे प्रतीक आहे. 

ब्रिटीश काळापासून हे स्थानक इथं असून, नेताजी सुभाषतंद्र बोस आणि महात्मा गांधी यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींनीसुद्धा इथून प्रवास केल्याचं सांगितलं जातं. सुरुवातीच्या काळात इथून प्रवाशांची ये-जा व्हायची मात्र 1971 मध्ये बांगलादेशच्या निर्मितीनंतर या स्थानकाला मालगाड्यांचा ट्रान्झिटपॉईंट करण्यात आलं आणि 2011 नंतर नेपाळसाठी इथून वाहतूक सुरू झाली. 

ब्रिटीशकालीन रचना आणि जुन्या उपकरणांमुळं आजही हे रेल्वेस्थानक अनेकांसाठीच आकर्षणाचा विषय ठरतं. मात्र इथून नियमित प्रवासी वाहतूक मात्र होत नाही. हे झालं देशाच्या एका टोकाला असणारं रेल्वे स्थानक. 

हेसुद्धा वाचा : Ladki Bahin Yojna Latest News : सरकारची दमछाक? लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचे 357 कोटी 70 लाख रुपये वळते 

देशाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजेच जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला इथं भारतातील सर्वात शेवटचं रेल्वे स्थानक असून ते काश्मीरला देशाच्या उर्वरित भागांशी जोडतं. जम्मू काश्मीरसारख्या भागाला देशाशी रेल्वेमार्गानं जोडण्यासाठी या स्थानकाच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेत अनेक बोगदे आणि पुलांच्या सहाय्यानं तो मार्गी लावण्यात आला. 

भारताच्या पूर्व सीमेपाशी आसामच्या तिनसुकिया भागातही या दिशेला असणारं देशातील अखेरचं रेल्वेस्थानक आहे. लिडो असं त्याचं नाव. लुमडिंग- दिब्रुगड रेल्वे नेटवर्कवर हे स्थानक आहे. तर, पश्चिमेकडे गुजरातच्या कच्छमध्ये असणारं नालिया हे देशाच्या पश्चिम सीमेवरील शेवटचं रेल्वे स्थानक आहे. राहिला प्रश्न देशाच्या दक्षिणेकडील रेल्वे स्थानाचा तर, तामिळनाडूतील कन्याकुमारी हे या भागातील शेवटचं रेल्वे स्थानक आहे. हिंद महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर एकत्र येतात तिथं हे स्थानक असून यानजीकचा भाग पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. 





Source link

केस खूप गळतात? वाढ होत नाही? आंब्याची कोय ‘या’ पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सुळसुळीत होतील केस

0
केस खूप गळतात? वाढ होत नाही? आंब्याची कोय ‘या’ पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सुळसुळीत होतील केस



Hair care 5 Benefits Of Mango Seeds For Skin, Hair, Weight Loss And More Hair Growth tips |केस खूप गळतात? वाढ होत नाही? आंब्याची कोय ‘या’ पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सुळसुळीत होतील केस





Source link

ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलनाला मिळाले यश; कारवाईचे लेखी आश्वासन

0
ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलनाला मिळाले यश; कारवाईचे लेखी आश्वासन

अकलूज/प्रतिनिधी: तांबवे (ता. माळशिरस) येथील ग्रामसेवक व लिपिक यांनी गावातील विविध कामांमध्ये संगणमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत दिव्यांग क्रांती लोकसेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेने जोरदार आंदोलन उभारले होते. या आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले असून, येत्या पंधरा दिवसात दोषींवर कारवाई केली जाईल, असे विस्तार अधिकारी कोळी यांनी स्पष्ट केले आहे. या लेखी आश्वासनानंतर सदर धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सत्यवान भोसले यांनी दिली.

संघटनेच्या वतीने तांबवे ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन दिवस धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनास दुसऱ्या दिवशी पंचायत समिती माळशिरसचे विस्तार अधिकारी कोळी यांनी भेट देऊन चर्चा केली आणि कारवाईचे लेखी आश्वासन दिले. मात्र, जर पंधरा दिवसात कारवाई झाली नाही, तर गटविकास अधिकारी कार्यालय माळशिरस समोर आक्रमक आंदोलन छेडले जाईल आणि त्यास पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा सत्यवान भोसले यांनी दिला आहे.

हडपसरमध्ये रहिवासी तरुणीचा गळा दाबून खून; आरोपी स्वतः पोलिसांकडे हजर

0
हडपसरमध्ये रहिवासी तरुणीचा गळा दाबून खून; आरोपी स्वतः पोलिसांकडे हजर

पुणे : पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या २७ वर्षीय अनिता लोंढे या तरुणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर आरोपी स्वतः यवत पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी राहुल शिवाजी मिसाळ (वय अंदाजे ३०) या युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरच्या भंडलकरनगर शेवळवाडी परिसरात अनिता आणि राहुल एकत्र राहत होते. घरगुती वादातून आरोपी राहुल याने अनिताचा गळा दाबून खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. खून केल्यानंतर त्याने थेट यवत पोलीस ठाणे गाठत गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणाची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Why Rahul Gandhi targeting s Jaishankar over operation sindoor

0
Why Rahul Gandhi targeting s Jaishankar over operation sindoor



Why Rahul Gandhi targeting s Jaishankar over operation sindoor | सत्य देशाला कळलं पाहिजे; राहुल गांधींची परराष्ट्रमंत्र्यांवर टीका, नक्की काय म्हणाले?





Source link