Saturday, July 11, 2026
Home Blog Page 208

महावितरण वर्धापन दिन विशेष: शून्य अपघात महाराष्ट्र; आपल्या माणसांना जपणारी एक विशेष मोहीम!

0
महावितरण वर्धापन दिन विशेष:  शून्य अपघात महाराष्ट्र; आपल्या माणसांना जपणारी एक विशेष मोहीम!


  • Marathi News
  • Opinion
  • Electrical Safety Week Organized Across The State On The Occasion Of The 20th Anniversary Of Mahavitaran

ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण7 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

कोणत्याही मूलभूत गरजेइतकी वीजही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. जीवन सुखकर बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्याला विजेचा फायदा होऊ शकतो, त्याचप्रमाणे ती वापरताना योग्य काळजी घेतली नाही, तर विद्युत अपघात घडून नुकसान होऊ शकते. सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळले तर हे अपघात टाळता येतात. महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त…

शॉर्टसर्किट पासून होणारे अपघात असोत की, वीज हाताळताना होणारे अपघात, हे खबरदारी न घेतल्यामुळेच होतात. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत विद्युत अपघाताच्या घटना पाहता आता अधिक जागरूकतेने व सुरक्षितपणे विजेचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे. याकरिता प्रभावी जनजागृतीची आवश्यकता आहे.

चुकीला माफी नाही : ‘वीज’ ही अशी बाब आहे, ही डोळ्याने दिसत नाही परंतु ती वापरताना काळजी घेतली नाही तर होणारे परिणाम टाळता येत नाहीत. वीज हाताळताना चुकीला माफी नाही. त्यामुळे वीज उपकरणे हाताळताना वापरताना काय काळजी घ्यावी, याचा प्रत्येकानेच गांभीर्याने विचार करावा.

दर्जेदार उपकरणांचा वापर : घर, उद्योग,कार्यालय अथवा शेती असो, वीज वापरताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. वीजपुरवठा घेताना किंवा वेळोवेळी विद्युत केबल, स्विचेस अथवा इतर उपकरणे ही ‘आयएसआय’प्रमाणि असल्याचे व योग्य क्षमतेचे असल्याची खात्री करावी. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नये. प्रमाणित ठेकेदारांकडूनच विद्युतीकरणाची कामे कघ्यावीत. वायरिंगसाठी योग्य क्षमतेचे एमसीबी (मिनिएचर सर्किट ब्रेकर) वापरावेत, जेणेकरून अतिभार किंवा शॉर्टसर्किटमुळे धोका निर्माण होणार नाही. गुणवत्ता नियंत्रण मंडळाने प्रमाणित केलेली विद्युत उपकरणेच वापरावीत. उदा. मिक्सर, पाण्याचे हीटर, टोस्टर, ग्राईंडर, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी.

योग्य अर्थिंग : वीज वापरामध्ये अर्थिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेक अपघात हे योग्य प्रकाराची अर्थिंग न केल्यामुळे घडल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वायरिंग इन्स्टॉलेशनसाठी कॉपर प्लेट किंवा कॉपर रॉडची अर्थिंग कार्यक्षमपणे घेणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.

इन्सुलेटेड वायरचा उपयोग : अर्थ लीकेजपासून होणारा धोका टाळण्यासाठी ईएलसीबी (अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर) वापरावे. मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये 20 ते 50 मीटरची स्वतंत्र मीटर रूम असते. बऱ्याच वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मीटर रूम स्वच्छ, प्रकाशित व हवेशीर असली पाहिजे. पावसाळ्यात मीटर रूममध्ये पाणी जाणार नाही; त्याचबरोबर भिंती ओल्या होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मीटर रूमचा वापर स्टोअर रूम म्हणून करू नये. मीटर रूममध्ये उंदरांचा वावर होणार नाही, याकडेही लक्ष दिले पाहिजे. तेथे ज्वालाग्राही पदार्थ ठेवणे टाळायला हवे. न्युट्रल वायरसाठी उघड्या वायरचा वापर न करता इन्सुलेटेड वायरचाच वापर करा. एका सर्किटमध्ये मल्टी प्लग/तारा घालू नका. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आगीस निमंत्रण मिळते.

मेन स्विचचा वापर : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यास प्रथम मेन स्विच बंद करा. विद्युतरोधक अग्निशमनचा वापर करा. पाण्याचा वापर करू नका. प्लग, पिन, बटण, बोर्ड यांना तडे गेल्यास ती त्वरित बदलावीत. पंखे, इस्त्री, कूलर वापरताना त्यात वीजप्रवाह उतरू शकतो. याची जाणीव ठेवूनच सावधानतेने ती हाताळावीत.

आयुष्याचे मोल जाणा : विजेविषयी अज्ञान असणे, ही गोष्ट जितकी भयानक आहे, त्याहीपेक्षा ज्ञान असूनही निष्काळजीपणा, फाजील आत्मविश्वास हे अधिक भयंकर आहे. अतिउत्साहात अगदी निष्णात लोकदेखील हातात रबरी ग्लोव्हज घालणे, पायात सेफ्टी बूट वापरणे तसेच वीजपुरवठा बंद करून मग काम करणे, अशा छोट्याछोट्या बाबींकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. रात्रंदिवस विजेच्या क्षेत्रात काम करणारे कामगार, जनमित्र, वायरमन यांनी आपले जीवनमूल्य जाणून घेऊन आपल्यावर आपल्या कुटुंबाचीही जबाबदारी असल्याचे भान ठेवूनच विद्युतीकरणाचे काम करावे. सुरक्षेचे उपाय हे केवळ आपल्यासाठी नसून आपल्याशी निगडित प्रत्येक घटकासाठी तितकेच महत्वाचे आहेत, याची जाणीव सातत्याने ठेवणे महत्वाचे आहे.

दैनंदिन वीज वापरातील महत्वाच्या बाबी

विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका. वीजवाहिनीच्या खाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका. विद्युत खांब किंवा तणाव तारांना गुरे, ढोरे बांधू नका. विद्युतप्रवाह सोडू नका. तात्पुरते लोंबकळणारे वायर वापरू नका. विजेचा अनधिकृत वापर टाळा. कुलरमध्ये पाणी टाकताना वीजपुरवठा बंद ठेवा. विजेच्या तारेखाली कापलेले पीक ठेवू नका. कपडे वाळवण्यासाठी वीज तारांचा वापर करू नका. गंमत म्हणून विजेच्या खांबावर चढणे टाळा. विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्या असतील तर त्यांना स्पर्श करू नका किंवा त्या ओलांडून जाण्याचा प्रयत्न करु नका व इतरांनाही तसे करू देऊ नका.

– ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडल



Source link

देश – परदेश: मनाला भावणारे केरळ

0
देश – परदेश:  मनाला भावणारे केरळ


ज्ञानेश्वर मुळे13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

केरळमध्येही भ्रष्टाचार आहे, पण त्याचबरोबर जनतेची कामे होतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे, ही जनता आपल्या प्रश्नाबाबत गंभीर आणि सतर्क आहे. ती लोकप्रतिनिधींवर दबाव टाकते. आपल्यासारखे लोकप्रतिनिधींना अव्वाच्या सव्वा महत्त्व दिल्याचे इथे दिसत नाही.

पाऊस धो धो कोसळत होता. इतका की, हॉटेलच्या दहाव्या मजल्यावरून फारसे काही दिसतही नव्हते. ढग भरून आले होते, दिवसा अंधारून आले होते. खाली रस्त्यावर वाहनांची वाहतूक मात्र नेहमीप्रमाणे सुरू होती. सतत पाऊस पडत असूनही एकदाही वीज गेली नाही आणि सगळे व्यवहार व्यवस्थित सुरू होते. मॉन्सून लवकर आला म्हणून शहर कोलमडले नाही. त्यामुळे आमच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्याची गरज वाटली नाही.

हे आहे केरळमधील कोची किंवा कोचीन. आपल्या देशाचं वैशिष्ट्य हे की, राज्याराज्यांत काही समानता आणि अनेक फरकही जाणवतात. हे फरक जसे प्रशासनात दिसतात, तसे माणसांच्या स्वभावातही जा‌णवतात. केरळचे वैशिष्ट्य हे आहे की, चार कोटींच्या या राज्यातील जवळपास एक कोटी म्हणजे २५ टक्के लोक विदेशात आहेत. विदेशात साधारण साडेतीन कोटी भारतीय राहतात, त्यात एक कोटी मल्याळी लोक आहेत. अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे पंजाबी, गुजराथी, राजस्थानी, तेलुगु या राज्यांतील नागरिक मोठ्या प्रमाणात विदेशात स्थायिक झाले आहेत? मराठी माणूस आजही फार अल्प प्रमाणात विदेशात दिसतो. मॉरिशस आणि इस्रायल सोडल्यास अन्य ठिकाणी तर त्यांची संख्या अत्यल्प आहे. आपल्या लोकांचं म्हणणं असतं की, महाराष्ट्रात खूप नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे आपले लोक बाहेर जात नाहीत. पण, याही पलीकडे जाऊन काही कारणे असतील आणि त्यातले एक कारण म्हणजे, मराठी माणूस हा बऱ्यापैकी अंतर्मुख झाला आहे आणि तो अल्पसंतुष्टही आहे. याच कारणाने आजही आपल्याला मोठे मराठी उद्योगपती तुरळक प्रमाणात दिसतात. सतराव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत संपूर्ण देशावर प्रभाव टाकणाऱ्या मराठी माणसाचे हे अंतर्मुख होणे कोड्यात टाकणारे आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत केरळच्या एकूण उत्पन्नाच्या ३७ टक्के हे विदेशातून मल्याळी लोकांनी पाठवलेल्या रकमेचे होते. आता ही रक्कम कमी होऊन १३ टक्क्यांवर आली आहे. कारण केरळ बदलत चालला आहे आणि तरुणांमध्ये आखाती देशात जाण्यासाठी पूर्वीचा उत्साह राहिलेला नाही. शिवाय, आखाती देशात मिळणाऱ्या आणि केरळमध्ये मिळणाऱ्या पगारात फारसा फरक राहिलेला नाही. विदेशात जाण्यासाठी मानसिक किंमत द्यावी लागते, कुटुंबापासून दूर जावे लागते. तरुण पिढीमध्ये स्वत:चा उद्योग असावा, असा विचार वाढला आहे.

केरळमध्ये फिरताना, रस्त्यावर असो वा मॉलमध्ये; आर्थिक संपन्नता स्पष्टपणे जाणवते. माझ्या वास्तव्यात तिथे एकही भिकारी किंवा फाटलेल्या कपड्यात फिरणारी व्यक्ती मला दिसली नाही. विमानतळापासून हॉटेलपर्यंत नेणाऱ्या रस्त्यापर्यंत एकही छोटा किंवा मोठा खड्डा असल्याचे जाणवले नाही. इथले विमानतळही इतर विमानतळांसारखे काचेच्या पेटीसारखे दिसत नाही. त्याला एक मंगलोरी कौलारु व्यक्तिमत्व आहे. या विमानतळावर विश्वास बसणार नाही इतके मोठे टर्मिनल आहे. कोचीमधून अनेक देशांत विमाने जातात आणि त्यामुळे विमानतळ प्रवाशांनी खच्चून भरलेले दिसते.

माझ्याबरोबर असणाऱ्या हरिकृष्ण या युवकाचे विचार ऐकताना मला केरळमधला युवक हा अत्यंत जागृत असल्याचे जाणवले. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तीनही समुदायांची लोकसंख्या असणाऱ्या केरळात अजून तरी अपवादानेच वाद – प्रतिवाद किंवा दंगली होतात. इथे भ्रष्टाचार आहे, पण त्याचबरोबर जनतेची कामे होतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे, ही जनता आपल्या प्रश्नाबाबत गंभीर आणि सतर्क आहे. ती लोकप्रतिनिधींवर दबाव टाकण्यात यशस्वी होते. आपल्यासारखे लोकप्रतिनिधींना अव्वाच्या सव्वा महत्त्व दिल्याचे इथे दिसत नाही. माझ्या एका कार्यक्रमाला स्थानिक आमदार आले होते. सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने या आमदारांचे नाव घेईपर्यंत ते तिथे उपस्थित आहेत, हेही अनेकांना कळले नसेल. त्यांचे भाषण तीन मिनिटांचे होते आणि तेही त्यांनी वाचून दाखवले. या लहानशा गोष्टीतूनही केरळची संस्कृती कळते.

केरळच्या संपन्नतेचा एक भाग म्हणून तिथल्या मॉलकडे पाहता येईल. अतिशय भव्य असे मॉल तर आहेतच; पण भारतातील सर्वात विशाल मॉलही केरळमध्येच आहे. अशाच एका मॉलमध्ये भटकताना मला तिथे फार मोठे पुस्तकाचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र दिसले. इतकेच नव्हे, तर अनेक आबालवृद्ध उभे राहून त्या पुस्तकांचा आनंद घेत होते.

दिल्लीतील मॉलमध्ये पुस्तकांचे दुकान पाहिल्याचे मला आठवत नाही. मल्याळी लोक मोठ्या प्रमाणात पुस्तके वाचतात. पण, नव्या पिढीमध्ये हळूहळू पुस्तक वाचण्याचे प्रमाण कमी होत आहे, हेही मी ऐकले. आणखी एक गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे या ठिकाणी नेत्यांचे, मग ते केंद्रातले असो किंवा राज्यातल्या असो; पोस्टर्स किंवा जाहिराती अजिबात दिसल्या नाहीत. ही एक डोळ्यांना समाधान देणारी गोष्ट होती. वाहतुकीत लेन सोडून इकडेतिकडे वाहन चालवणारेही मला दिसले नाहीत आणि हॉर्न नावाचा प्रकार ऐकायला मिळाला नाही. धर्म आणि राजकारण याविषयी जवळपास कोणीही चर्चा केली नाही. त्यात कुणालाही फारसा रस दिसला नाही.

ज्ञानेश्वर मुळे dmulay58@gmail.com



Source link

लोककल्याणकारी: राज्यकारभाराचा आदर्श

0
लोककल्याणकारी:  राज्यकारभाराचा आदर्श


संजय सोनवणी11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

देश जोडण्याची स्वप्ने पाहत अहिल्यादेवींनी मंदिरे तर उभारलीच, पण रस्तेही बांधले, घाट-बारवांची निर्मिती करत एका अर्थाने राष्ट्रबांधणीचा पाया घातला. त्यांच्या या द्रष्टेपणाचा, उत्तुंग कार्याचा आदर्श ठेवला, तर खऱ्या अर्थाने स्त्री-स्वातंत्र्याचा आणि लोककल्याणकारी सुशासनाचा जागर होईल. काल (दि. ३१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी झाली. त्या औचित्याने त्यांच्या असामान्य व्यक्तित्वाचे आणि अद्वितीय कर्तृत्वाचे स्मरण…

“अठराव्या शतकातील जगातील सर्वोत्कृष्ट प्रशासिका” असा बहुमान ब्रिटिश पार्लमेंटने दिलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे हे ३०० वे जयंती वर्ष. नाना फडणवीस त्यांना ‘गंगा-जल निर्मळ’ असे संबोधत, तर टिपू सुलतानाने त्यांना “तत्त्वज्ञ महाराणी” हे बिरुद बहाल केले होते. खरे तर, अहिल्यादेवी या दुष्काळी भागातील एका धनगर कुटुंबातील साधी मुलगी. त्यांचे सासरे मल्हारराव होळकर हेही तरुणपणी मेंढपाळ होते. स्वपराक्रमाने आणि मुत्सद्दीपणाचे गुण असल्याने त्यांनी आधी माळव्यावर हुकूमत निर्माण केली. त्यामुळे प्रभावित झालेल्या पहिल्या बाजीराव पेशव्यांनी त्यांना आपल्या सोबत घेत, ‘सुभेदार’ ही पदवी देऊन त्यांच्याकडे उत्तरेचा कारभार सोपवला. अहिल्यादेवी मल्हाररावांच्या स्नुषा बनल्या आणि वंचित-शोषित कुटुंबातून आलेल्या या स्त्रीने आपली कर्तबगारी आणि प्रजाहितकारी सुशासनाच्या जोरावर राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प पूर्ण केला.

महिला सबलीकरणाचा रचला पाया : भारतातील स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचार करुन, त्याप्रमाणे पहिल्यांदाच प्रत्यक्ष कृती केली ती अहिल्यादेवींनी. ज्या काळात महिलांना गोषातच राहावे लागे, शिक्षणावर बंधने होती, त्याकाळी मल्हाररावांसारख्या खऱ्या पुरोगाम्याने त्यांना शिकवले. नुसते लिहिणे-वाचणेच नव्हे, तर भालाफेकीतही त्या तरबेज झाल्या. अहिल्यादेवी तेथेच थांबल्या नाहीत. त्यांनी अन्य महिलांनाही लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सुरू केले. महिलांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी जगात निघालेले हे पहिले विद्यालय. त्या काळात देशभर संतती नसलेल्या विधवांची मालमत्ता सरकार दरबारी जमा करायचा कायदा होता. अहिल्यादेवींनी तो कायदा रद्द तर केलाच, पण विधवांना दत्तक घेण्याचीही कायदेशीर तरतूद केली. महेश्वरला वस्त्रोद्योगामध्ये आघाडीवर आणतानाच महिला विणकरांनाही प्रोत्साहन दिले. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. ती मोडून काढण्यासाठी त्यांनी स्वत:च्या मुलीचा प्रौढ विवाह करुन आदर्श घालून दिला. एवढेच नव्हे, तर जो तरुण माळव्यातील दरोडेखोरांचा उपद्रव नष्ट करेल, अशा कोणाही युवकाशी तिचा विवाह लावून देईन, असे दरबारात घोषित करून जातीची अटही काढून टाकली. हे काळाच्या फार पुढचे पाऊल होते. महिला सबलीकरण म्हणजे काय, हे अहिल्यादेवींनी अठराव्या शतकात कृतीतून दाखवले.

स्त्रियांच्या जागतिक लढ्याच्या मानबिंदू : युरोपात एकोणिसाव्या शतकापर्यंत स्त्रिया दास्यातच होत्या. काही लेखिका स्त्री-स्वातंत्र्याबद्दल दबकत बोलत असल्या, तरी त्यांचे सामाजिक स्थान दुय्यमच होते. युरोपातील महिलांना सर जॉन माल्कममुळे अहिल्यादेवी माहीत झाल्या. या महिलांसाठी हे नुसते आश्चर्यच नव्हते, तर त्यांनी अहिल्यादेवींमध्ये आपले आदर्श पाहिले. जोआना बेली या इंग्रज कवयित्रीने तर अहिल्यादेवींवर खंडकाव्य लिहिले. विदेशी साहित्यिकाने कोणाही भारतीयावर लिहिलेले हे पहिले खंडकाव्य. युरोपातील स्त्रियांच्या स्वातंत्र्यलढ्याचा आदर्श निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवी या जागतिक स्त्री-स्वातंत्र्याच्या लढ्याचा मानबिंदू ठरल्या. तथापि, त्यांचा हा खरा आदर्श पुढच्या पिढ्यांच्या समोर आला नाही. तसे झाले असते, तर त्यांच्यापासून प्रेरणा घेत भारतीय स्त्रिया आज अधिक आत्मसामर्थ्याने उभ्या राहिल्या असत्या. सहृदयी, संवेदनशील राज्यकर्ती : कोणाच्या हातून काही काढून घेतले, तर त्याला पर्यायही दिला पाहिजे, हे सूत्र अहिल्यादेवींनी घालून दिले. त्या काळात डोंगराळ भागातील आदिवासी हे व्यापारी आणि यात्रेकरुंना लुटून उपजीविका चालवत. अहिल्यादेवींनी त्यांना पकडून शिक्षा न देता त्यांच्या गुन्ह्यांचे कारण शोधले आणि त्यांचे मन वळवून त्यांच्यावरच यात्रेकरुंच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली. व्यापारी आणि यात्रेकरुंकडून ‘भिलकवडी’ नावाचा कर घ्यायची परवानगी त्यांना दिली. एवढेच नव्हे, तर त्यांना कसायला जमिनीही दिल्या. आता भारतातील वंचितांचे असंख्य पारंपरिक रोजगार नष्ट झाले अथवा केले गेले असले, तरी त्यांना जगायचे अन्य पर्याय दिलेले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्याच पारंपरिक व्यवसायांमध्ये पोहोचले नाही, हे आपले आजचे दुर्दैव! अहिल्यादेवी मात्र नेहमी काळाच्या पुढे राहिल्या.

अलौकिक नैतिक अधिष्ठान : अहिल्यादेवींचा प्रवास सोपा नव्हता. त्यांना आपला पती, माता-पित्याचे प्रेम देणारे सासू-सासरे, मुलगा, मुलगी, जावई आणि नातवाचे मृत्यू डोळ्यासमोर पाहावे लागले. पण, त्यांनी व्यक्तिगत संकटांना आणि दु:खांना आपल्या कर्तव्यावर स्वार होऊ दिले नाही. मल्हाररावांनी त्यांना प्रशिक्षितच तसे केले होते. आपला पुत्र खंडेरावाचा कुंभेरी वेढ्यात लढताना मृत्यू झाल्यानंतर मल्हाररावांनी अहिल्यादेवींना सती जाऊ न देता त्यांनाच पुत्र मानून त्याचे स्थानही दिले. मल्हारराव हयात असताना त्यांना युद्धांत युद्धसामग्री पुरवणे, व्यापारी रस्ते मोकळे करणे यांसाठी अहिल्यादेवींना अनेक लढाया लढाव्या लागल्या. गादीवर आल्यानंतर त्यांनी रामपुऱ्याचा संस्थानिक चंद्रावताशीही युद्ध केले. मुस्लिम राजवटी असतानाही त्यांच्या प्रदेशात सोमनाथ, अयोध्या, वाराणशी आदी तीर्थस्थळी मंदिरे बांधली. पण, कोणाही मुस्लिम शासकाने त्यांना विरोध केला नाही, एवढे नैतिक अधिष्ठान अहिल्यादेवींनी प्राप्त केले होते.

देश जोडण्याची स्वप्ने पाहत अहिल्यादेवींनी मंदिरे तर उभारलीच, पण रस्तेही बांधले, घाट-बारवांची निर्मिती करत एका अर्थाने राष्ट्रबांधणीचा पाया घातला. कोणीही आपल्या राज्याच्या बाहेर काही पाहात नव्हते, असा तो काळ होता, हे लक्षात घ्यायला हवे. आजच्या तमाम महिला आणि राज्यकर्त्यांसह आपण साऱ्यांनी अहिल्यादेवींच्या या द्रष्टेपणाचा, उत्तुंग कार्याचा आदर्श ठेवला पाहिजे. तसे झाले तरच खऱ्या अर्थाने स्त्री-स्वातंत्र्याचा आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा जागर होईल!

अभिवादन संजय सोनवणी sanjaysonawani@gmail.com



Source link

आयुष्याच्या पन्नास पायऱ्या चढून झाल्यावर: द्वेषभावनेची क्षुद्र अहंता आपल्यात येवू नये; वाचा कवी पी. विठ्ठल यांचे लेखकीय समाजचिंतन

0
आयुष्याच्या पन्नास पायऱ्या चढून झाल्यावर:  द्वेषभावनेची क्षुद्र अहंता आपल्यात येवू नये; वाचा कवी पी. विठ्ठल यांचे लेखकीय समाजचिंतन


  • Marathi News
  • Opinion
  • Nanded Professor Writer P Vitthal Article; Poet Critic Novelist | P Vitthal Birthday Special

पी. विठ्ठल15 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रतिभावंत कवी, समीक्षक, कादंबरीकार आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे कार्यरत असलेले प्राध्यापक पी. विठ्ठल यांचा आज रोजी (एक जून) पन्नासावा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचे हे लेखकीय समाजचिंतन….

बघता बघता पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो. म्हणजे आयुष्याच्या पन्नास पायऱ्या चढून (अथवा उतरून) झाल्या असे म्हणता येईल. पन्नास हा तसा पुष्कळच मोठा टप्पा आहे. अर्थात मी माझ्या आयुष्याविषयी कमालीचा कृतज्ञ आहे. आणखी किती वय हातात आहे? माहीत नाही. ते कुणालाच माहीत नसतं, हीच तर जगण्यातली खरी गंमत असते. माझा जन्म १९७५ चा. याचा अर्थ असा की, आजवर माझा विसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि एकविसाव्या शतकाचा पूर्वार्ध जगून झाला आहे. या दोन शतकातली पाच दशके मी पाहिली, अनुभवली आहेत. या पृथ्वीच्या अंगाखांद्यावर खेळलो, वाढलो वगैरे. निसर्ग नियमाप्रमाणे आणि रीतीरीवाजानुसार जे जे आयुष्यात घडायला हवे, ते घडले. म्हणजे आयुष्य हे चक्र असतं. अगदीच ते यंत्रवत नसलं तरी त्याचं ठरवून व्यवस्थापन नाही करता येत. किंवा अगदी पद्धतशीरपणे नियमनही करता येत नाही. असंख्य चढउतारांचा हा एक अज्ञात प्रवास असतो. आपण फक्त चालत राहतो. कोणत्याही सिद्धांताची तार्किक संगती लावावी, इतके हे सोपे नसते. निसर्ग, समाज- संस्कृती, भाषा आणि सुख-दुःखाच्या समग्र पर्यावरणाने आपण कायमच वेढलेलो असतो. आयुष्य ही अफाट गोष्ट असते. पृथ्वीपेक्षाही थोर.

आपल्या वाट्याला एक छोटासा काळ येतो. हा काळ आपल्याला घडवतो. आकार देतो. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि अस्तित्वाला एक नवा अर्थ देतो. ओळख देतो. माझ्या वाट्यालाही असाच एक काळाचा तुकडा आला. या काळाने सुख-दुःखाचे अगणित क्षण दिले. नातीगोती दिली. मित्र परिवार दिला. भाषा दिली. संस्कार दिले. स्थैर्य दिले. स्वास्थ्य दिले. अर्थात स्थैर्य ही गोष्ट कायमच सोबत असते असे नाही. चढउतारांच्या असंख्य कहाण्या यात सामावलेल्या असतातच. या कहाण्या अभावाच्या असतात, तशा आनंदाच्याही असतात. ‘अभाव’ आणि ‘आनंदा’च्या दरम्यान जे असतं ते ‘आयुष्य’. ही माझी धारणा. आयुष्यातल्या या नानाविध अनुभवांना तोंड देत देतच आपली जीवनदृष्टी आकाराला येत असते. हे अनुभव जसे प्राकृतिक असतात, तसेच ते सामाजिक आणि सांस्कृतिकही असतात.

पन्नास वर्षात मी काय पाहिलं आणि काय अनुभवलं? याचा लेखाजोखा मांडण्याचे तसे काही कारण नाही. कारण काळ नावाची गोष्ट कधीच स्थिर नसते. ती गतिमान असते. ती अव्याहत धावत असते. युद्ध, हिंसा, दमन, दुष्काळ, ताणतणाव, आरोग्याचे आणि स्वास्थ्याचे प्रश्न कायमच सोबत असतात. दहशत, भीती, मरणभय, भ्रष्टाचार, पाशवीपणा, क्रूरता, धार्मिक उन्माद आणि राजकारणाचे विकृत रूप या सगळ्या गोष्टी प्रत्येक काळात असतात. त्या आजही आहेत. माणसाच्या भावजीवनाचेच हे ‘अप्रिय’ पैलू आहेत. हे सर्वच मी अनुभवले, पाहिले आहे. या सगळ्याच गोष्टींची आपल्याला काही काटेकोर संहिता लिहिता येत नसते. जीवन व्यवहारातल्या या अपरिहार्य गोष्टी असतात. यापैकी काहीच गोष्टींना आपण स्पर्श करू शकतो. विश्वासाच्या गूढ, गहन स्मृतींना आपण सांभाळत राहतो. प्रेम, मैत्री आणि आत्मीयतेची सर्वस्पर्शी सोबत आपण जपत राहतो. म्हणून तर आयुष्य सुखकर आणि सुंदर होतं.

कौटुंबिक परीघ ओलांडला की व्यवहार सुरू होत असतो. तो ‘प्रिय’ आणि ‘अप्रिय’ या दोन स्वरूपाचा असतो. कोणताही कलावंत काळाच्या या दोन्ही प्रारूपांना प्रतिसाद देत असतो. कवी म्हणून मीही माझ्या काळाचे परिशीलन करण्याचा काहीएक प्रयत्न केला आहे. बऱ्यावाईट गोष्टींची कमी अधिक चिकित्सा केली आहे. शिक्षण आणि वाचनामुळे विचारदृष्टीचे क्षितिज विस्तारले. त्यामुळे वैचारिक भूमिका तयार होऊ शकली. त्यामुळेच पारंपरिक चौकटबद्ध जगण्याचे माप ओलांडता आले. वास्तवाचा अन्वयार्थ लावता आला. ‘लिहिणे’ हे अभिव्यक्तीचे एक प्रमुख अंग झाले. आकलनाच्या दिशा विस्तारल्या की ‘सत्य’ सांगताना भय वाटत नाही. व्यवस्थेच्या प्रभावाने आपली अभिव्यक्ती बाधित होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. ही काळजी मी कायमच घेत आलो.

दिवसेंदिवस आपल्या सामाजिक, सांस्कृतिक संवादाच्या शक्यता क्षीण होत चालल्या आहेत. नवमाध्यमांनी दिलेल्या फाजील आत्मविश्वासामुळे मूर्खांनाही आपण सर्वज्ञानी असल्याचा साक्षात्कार होऊ लागला आहे. त्यामुळे चिकित्सेचे साधकबाधक क्षेत्र संकुचित झाले आहे. ट्रोलिंगच्या उथळ हाणामाऱ्यांनी आपण सर्वच अस्वस्थ आहोत. मीही आहे. पण तरीही आपण आपली मते मांडली पाहिजेत. वैचारिक मूल्य जपले पाहिजे, असे मला वाटते. मी माझ्या परीने तसा सतत प्रयत्न करत आलो आहे. पाच दशकात झालेली कितीतरी स्थित्यंतरे मी अनुभवली आहेत. कौटुंबिक सुख-दुःखाची असोत की, सामाजिक, राजकीय वा सांस्कृतिक स्वरूपाची असोत. या स्थित्यंतरामुळेच माझ्या आयुष्यालाही नवे वळण लाभले आहे. या सगळ्याच वाटा वळणांचा हिशेब मांडता येणार नाही. हा काळ जसा संपन्न होता, तसाच तो क्वचितप्रसंगी निरर्थक आणि नीरसही होता. अर्थात ही निरर्थकताही आपल्याला ‘अर्थपूर्ण आणि प्रगल्भ’ बनवत असते. अशा आत्मसंघर्षातूनच सर्जनाच्या नव्या दिशा सूचित होत असतात.

या संपूर्ण प्रवासात ‘पुस्तक’ ही अत्यंत महत्वाची गोष्ट सोबत होती, आहे. पुस्तकांविषयीची कृतज्ञतेची विनम्र भावना माझ्या मनात आहे. आयुष्यात पुस्तक नावाची गोष्ट आली नसती, तर काय झाले असते? याची कल्पनाही करवत नाही. पुस्तकांची सोबत होती म्हणूनच माझी थोडीफार बौद्धिक जडणघडण होऊ शकली. पुस्तकांमुळेच अमर्याद जगाचे दर्शन घडू शकले. साहित्य, ज्ञान-विज्ञान आणि इतिहास, तत्त्वज्ञानाची दालने खुली होऊ शकली. आत्मशोधाचा हा मार्ग सार्वकालिक महत्त्वाचा वाटतो मला. पुस्तकांमुळेच आपल्या थोर ज्ञानपरंपरेचा परिचय होऊ शकला. निकोपपणे भोवतालाकडे पाहण्याची दृष्टी विकसित होवू शकली. पुस्तकाइतकी सुंदर गोष्ट जगात अन्य नाही. याशिवाय सहवासात आलेल्या कितीतरी व्यक्तींनीही मला सर्वार्थाने समृद्ध केले आहे. आज प्रचंड वेगाने आपला भोवताल बदलत आहे. नवनव्या धारणा रूढ होत आहेत. हे उत्तर आधुनिक बदल आपल्याला कुठे घेऊन जातील? हे सांगता येत नाही. अशावेळी पुस्तकाचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते.

आपण आपल्या परीने या काळाचा, नव्या संवेदनेचा अन्वयार्थ लावायला हवा, असे मला वाटते. मागच्या काही वर्षात जाणीवपूर्वक मी देश- विदेशात भटकलो. पर्यटनासह साहित्य, कला आणि संस्कृतीच्या नव्या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्न केला. विविध विचारधारांना आणि वर्गीय सामाजिक संघर्षाला थोडे का होईना, समजून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात मी कुणी तत्त्ववेत्ता किंवा थोर अभ्यासक नाही; पण समाजव्यवस्थेचे हे आंतरिक रूप किमान आपल्याला माहीत असावे, ही यामागची माझी भावना. आजचे आपले एकूणच सामाजिक चर्चाविश्व खूप एकांगी आणि संशयास्पद होत चालले आहे. माणसांचे स्वास्थ्यपूर्ण जगणे संपुष्टात आले आहे. अविचारी आस्था नेहमीच धोकादायक असतात. आज काळ त्या वळणावर येऊन ठेपला आहे. समाजाच्या केंद्रस्थानी ‘धर्म’ नावाची गोष्ट येऊन बसली आहे. आपले श्रद्धा आणि विचारविश्व बदलले आहे. या काळाची चिकित्सा खूप वेगवेगळ्या अंगाने करता येऊ शकते. एक लेखक म्हणून या सगळ्या स्थित्यंतराला प्रतिसाद देण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवा.

मागच्या सुमारे पंचवीस वर्षांपासून मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. मला माझ्या विद्यार्थी आणि विद्यापीठाप्रती आत्यंतिक प्रेम आहे. मी शिक्षण क्षेत्रात नसतो तर पत्रकारितेत रमलो असतो. (अर्थात अशा जर तरला काही महत्त्व नसते.) गेल्या दीड-दोन दशकात एकोणवीस पुस्तके लिहून झाली. पुढच्या एक वर्षात आणखी दोनेक पुस्तके प्रकाशित होतील. ‘लिहिणे’ ही माझी आंतरिक गरज आहे. अजून बरच काही लिहायचं आणि वाचायचं बाकी आहे. बघूया किती जमतं ते. अर्थात हे काही माझ्या आयुष्याचे समग्र परिशीलन नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने केलेले एक चिंतन म्हणता येईल फार तर. असा जमाखर्च मांडून काही साध्य होत नसते हेही खरे. कारण आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात काय घडलं? याविषयी जाणून घेण्याची इतरांना उत्सुकता असण्याचे कारण नसते. माझ्याविषयी तर अजिबातच नसणार. पण तरीही मी लिहिले.

या प्रवासात आपल्या सर्वांची सोबत खूप आश्वासक आहे. जगण्याची, नैतिकतेची सकारात्मक ऊर्जा तुमच्यामुळेच तर मला मिळत आली आहे. मागच्या महिन्यात देशभर तणाव होता. युद्धजन्य परिस्थिती होती. यातून आपण जेमतेम सावरलो तर अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. कोरोनाचे संकट पुन्हा घोंगावत आहे. थोडक्यात काय तर यातल्या कोणत्याही गोष्टींना आपण टाळू शकत नाहीत. जे घडणार आहे ते घडणारच आहे. संयम आणि विवेकाने येणाऱ्या काळाला सामोरे जाणे एवढेच आपल्या हातात आहे. मात्र द्वेषभावनेची क्षुद्र अहंता आपल्यात आणि माझ्यात फिरकू नये कधीच. यानिमित्ताने एवढेच. आपण सर्वजण मला खूप प्रिय आहात. अंत:करणपूर्वक आभार.

(संपर्कः p.vitthal75@gmail.com)

संबंधित वृत्त

कवितेचा सन्मान:कवी पी. विठ्ठल यांना कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्यपुरस्कार जाहीर; मराठवाडा साहित्य परिषदेची घोषणा

पाऊसवेळा VIDEO:पाऊस पडतो म्हणजे…पिकांचे हिरवे उच्चार ठळक होत जातात; आज पी. विठ्ठल यांची कविता

कविता ही माझी रक्तवाहिनी- पी विठ्ठल



Source link

ढवळ येथे पूल खचल्यामुळे वाहतूक ठप्प; श्रीमंत संजीवराजेंच्या तत्परतेमुळे मार्ग मोकळा

0
ढवळ येथे पूल खचल्यामुळे वाहतूक ठप्प; श्रीमंत संजीवराजेंच्या तत्परतेमुळे मार्ग मोकळा

फलटण  – गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या   मुसळधार पावसामुळे ढवळ (ता. फलटण) येथील श्री ढवळाईदेवी मंदिराजवळील ओढ्यावर असलेला पूल खचला. या पूलाच्या खचल्यामुळे वस्तीवरील नागरिकांना तसेच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या परिस्थितीची गंभीर दखल घेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तत्काळ निर्णय घेत सहा सिमेंटचे तीन फूट रुंदीचे व नऊ फूट लांबीचे पाईप उपलब्ध करून दिले. या पाईप्सच्या सहाय्याने पुलाचे काम सुरु करण्यात आले असून, नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

या उपक्रमाबद्दल ढवळ ग्रामस्थांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानले आहेत.

साताऱ्यात मध्यरात्री ‘स्ट्राईक’; अजिंक्यतारा किल्ल्याजवळील अनधिकृत थडगे हटवले

0
साताऱ्यात मध्यरात्री ‘स्ट्राईक’; अजिंक्यतारा किल्ल्याजवळील अनधिकृत थडगे हटवले

सातारा | सातारा नगरपालिकेने गुरुवारी (30 मे) मध्यरात्री किल्ले अजिंक्यतारा पायथ्यालगत असलेली अनधिकृत थडगी पोलिस बंदोबस्तात हटवली. रात्रीच्या अंधारात ही धडक कारवाई करत संपूर्ण जागा भुईसपाट करण्यात आली. येत्या काळात या परिसरात पाण्याची टाकी उभारण्यात येणार असल्याने, संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.

राज्य सरकारने 31 मेपर्यंत सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेने या थडग्यांबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करून पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र कोणतीही व्यक्ती किंवा संस्था पुढे न आल्याने पालिकेने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी रात्री 11 वाजता पोलिसांचा सुमारे 60 जणांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करून पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने कारवाई सुरू केली. सुमारे एक तास चाललेल्या मोहिमेत थडग्यांची पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत कोणतेही मानवी अवशेष सापडले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रतापगड, अजिंक्यतारा, मंगळाई देवी परिसर आदी ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम प्रशासनाने सुरू ठेवली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक उपक्रम — मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबिर बारामतीत ४ जूनपासून

0
ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक उपक्रम — मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबिर बारामतीत ४ जूनपासून

बारामती : बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात, उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ४ जून व ७, ८ आणि १६ जुलै २०२५ रोजी होणार आहे.

या शिबिरात वॉक फाऊंडेशन (पुणे) आणि बायोरॅड मेडिसिस या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पूर्णपणे मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आर्थिक अडचणीमुळे उपचार घेऊ न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ही मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

मुंबई, पुणे व कोल्हापूर येथील नामांकित व गुडघा प्रत्यारोपणातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांधे व रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये होणार आहे, ज्यामुळे शस्त्रक्रिया अचूकतेने व यशस्वीपणे होईल.

शिबिरात विशेषतः संधिवात, तीव्र वेदना, चालण्यास अपार अडचण असलेले व आर्थिक दुर्बल पार्श्वभूमीतील रुग्णांनी सहभाग नोंदवावा. इच्छुकांनी लवकरात लवकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. आपल्या नातेवाईकांना व परिचितांना याबाबत माहिती देण्याचे आवाहनही रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

अवकाळी पावसाचा तडाखा: मदतीसाठी सरकार कटिबद्ध – ना. मकरंद पाटील

0
अवकाळी पावसाचा तडाखा: मदतीसाठी सरकार कटिबद्ध – ना. मकरंद पाटील

फलटण | साहस Times प्रतिनिधी :-  संपूर्ण महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे थैमान घातले असून अनेक ठिकाणी रस्ते, शेती, घरे आणि पालखी मार्गांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद (आबा) पाटील यांनी फलटण तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली.

यावेळी ते म्हणाले, “ज्या ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे, अशा सर्व ठिकाणी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल प्राप्त होताच शासन स्तरावर तातडीची मदत पुरवली जाणार आहे.”

फलटण येथील पाहणी दरम्यान आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, फलटणचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी विशेषतः पालखी मार्गाच्या दुरवस्थेचा उल्लेख केला. ते म्हणाले, “फलटण शहरासह तालुक्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, नगरपरिषद, प्रांताधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यासह मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन मार्ग दुरुस्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. पालखी सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी शासन सज्ज आहे.”

श्रीलंकेच्या दुसऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी पांथस्थतर्फे नोंदणी सुरु; मराठी भाषेत माहिती व सांस्कृतिक समृद्ध अनुभवांची हमी

0
श्रीलंकेच्या दुसऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी पांथस्थतर्फे नोंदणी सुरु; मराठी भाषेत माहिती व सांस्कृतिक समृद्ध अनुभवांची हमी

लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप यांची माहिती

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने यशस्वीपणे पार पडलेल्या पहिल्या अभ्यास दौऱ्यानंतर आता पांथस्थ या अभ्यासवृत्त संघटनेतर्फे श्रीलंकेच्या दुसऱ्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा अभ्यास दौरा दिनांक २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, यामध्ये सहभागी सदस्यांना श्रीलंकेच्या समृद्ध खाद्यसंस्कृती, पारंपरिक नृत्यकला, तसेच सांस्कृतिक, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

या अभ्यास दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण माहिती ही मराठी भाषेतून समजावून सांगितली जाणार आहे, जेणेकरून सहभागी सदस्यांना स्थानिक संस्कृतीचे अधिक सखोल आणि सहज आकलन होऊ शकेल. या दौऱ्यात फक्त पर्यटन नव्हे तर अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून अनुभव घेण्यावर भर देण्यात येणार आहे.

या दौऱ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी फक्त आपण प्रत्यक्ष दौऱ्यात सहभागी होणार असाल तरच खालील लिंकद्वारे WhatsApp समूहात सामील व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे:
👉 https://chat.whatsapp.com/B6DsgMjWtCYFSkEx6Nca0f

– सूरज रतन जगताप, लेणी अभ्यासक









पुण्यात एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा मंजूर

0
पुण्यात एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा मंजूर


पुणे : एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एम. व्ही. भाटिया यांनी निकाली काढला. वकिलांनी केलेल्या प्रयत्नांमुळे घटस्फोटाचा दावा निकाली काढण्यात यश आले.

या प्रकरणातील दाम्पत्याचा वीस वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना विवाहानंतर चार अपत्ये झाली. संसारही सुखात चालला होता. मात्र, वैचारिक वाद, कुरबुरी दाम्पत्यामधील तणाव वाढला. नातेवाईकांनी दोघांमधील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, दोघांमधील मतभेद दूर झाले नाहीत. त्यानंतर पत्नी माहेरी गेली. पती व्यवसाय करत होता. त्याने चार मुलांची जबाबदारी स्वीकारली.

घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर सहा महिन्यांच्या सक्तीच्या प्रतीक्षा कालावधीस न्यायालयाने सूट दिली. त्यानंतर दोघांचे एकाच दिवशी समुपदेशन करण्यात आले. आवश्यक कागदपत्रे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन एकाच दिवसात घटस्फोट मंजूर करण्यात आला. घटस्फोटानंतर चार मुलांचा ताबा वडिलांकडे देण्यात आला आहे. पत्नीने पोटगीचा हक्क स्वेच्छेने सोडून दिला आहे.

ॲड. जान्हवी भोसले, ॲड. भालचंद्र धापटे, ॲड. राहुल पोल यांनी काम पाहिले. न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. दोन्ही पक्षांची सहमती, न्यायालयीन प्रक्रियेतील अचूकता, निर्णयामुळे एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा निकाली काढण्यात आला. अशा प्रकारे घटस्फोटाचे दावे निकाली काढले गेल्यास न्यायालयाचा वेळही वाचेल, तसेच दाव्यांचा निपटारा जलदगतीने करणे शक्य होईल. हे प्रकरण मार्गदर्शक ठरले आहे, असे ॲड. भोसले, ॲड. धापटे, ॲड. पोल यांनी नमूद केले.



Source link